मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त देशभर क्रीडा महोत्सव
- केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्री डॉ. मनसूख मांडवीय
क्रीडा महोत्सवाच्या आयोजनातून खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी प्रोत्साहन
- क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे
मुंबई 19 : पद्मभूषण मेजर ध्यानचंद सिंह यांच्या जयंतीनिमित्त 29 ते 31 ऑगस्ट दरम्यान देशभर राष्ट्रीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा भावना आणि ऐक्याच्या या उत्सवात प्रत्येक नागरिकाने किमान एक तास खेळासाठी द्यावा, असे आवाहन केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी केले आहे.
या क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून देशात क्रीडा परिसंस्था उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. युवक कल्याण व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या क्रीडा महोत्सवाच्या आयोजनाबाबत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंत्रालयातून क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, उपसचिव श्री. सुनील पांढरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. तसेच विविध राज्यांचे क्रीडा मंत्री आणि सचिव दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment