Wednesday, 20 August 2025

टाटा मेमोरिअल सेंटरच्या रायगड मधील तांबटी खालापूर कर्करोग संशोधन केंद्र pl share

 टाटा मेमोरिअल सेंटरच्या रायगड मधील कर्करोग संशोधन केंद्राच्या

रुग्णालयासाठी मुद्रांक शुल्कात सवलत

 

टाटा मेमोरिअल सेंटर एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग दवाखाना आणि संशोधन केंद्राच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात तांबाटी (ता. खालापूर) येथे शंभर खाटांचे रुग्णालय उभारणार आहे. या रुग्णालयासाठी दिलेल्या १० हेक्टर जमिनीच्या भाडेपट्टा करारवरील मुद्रांक शुल्कात सवलत देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

            राज्य शासनाने हे शंभर खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी तांबाटी ( ता.खालापूरजि.रायगड) येथील दहा हेक्टर जमीन एक रूपया प्रतिवर्षी या नाममात्र दराने दिली आहे. या जमिनीच्या करारनाम्यावरील मुद्रांक शुल्कात सवलत मिळावी अशी विनंती टाटा मेमोरिअल संस्थेने केली होती. या रुग्णालयामुळे रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागासहलगतच्या शहरातील नागरिकांना कर्करोगा संदर्भातील उपचार व आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. रुग्णालयातील १०० खाटांपैकी १२ टक्के खाटा समाजातील गरीबदारिद्र्यरेषेखालील कुटुंबशासकीय कर्मचारी या घटातील रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात याव्यात. तसेच शासकीय योजनेनुसार कर्करोगावर सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध करून द्यावेत. रुग्णासोबतच्या एका व्यक्तीस अत्यल्प दरामध्ये रहिवासी सेवा उपलब्ध करुन देण्यात यावीअशा अटींसह या रुग्णालयाला मुद्रांक शुल्कात सवलत देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली.   

ग्रामीण भागातील तरुणांनाही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळणार

 राज्यात तालुका स्तरावरील तीन दिवसीय क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुणांनाही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी प्रोत्साहन  मिळणार असल्याचा विश्वास क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी यावेळी व्यक्त केला.

केंद्रीय क्रीडा मंत्री मांडवीय यांनी सांगितले कीदेशात मजबूत स्पोर्ट्स इको सिस्टम निर्माण करून 2036 मध्ये ऑलिंपिकचे यशस्वी आयोजन हे शासनाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील खेळाडूंपर्यंत पोहोचणेत्यांना संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या क्रीडा महोत्सवात जिल्हाविद्यापीठमहाविद्यालय व स्टेडियम स्तरावर विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाणार आहे.  यामध्ये क्रीडा स्पर्धावादविवाद व चर्चासत्रेतज्ज्ञ आणि क्रीडा क्षेत्रातील सेलिब्रिटींचा सहभाग असणार आहे. योगबुद्धिबळासारख्या मानसिक खेळांना प्रोत्साहन देण्यात येणार असून३१ ऑगस्ट रोजी सांगता समारोपादिवशी सायकलिंग उपक्रम  देशभर घेण्यात येणार आहे.

खेळ ही केवळ मैदानी मर्यादा नसून आरोग्यफिटनेस आणि राष्ट्रीय एकतेचे प्रतीक आहे. प्रत्येकाने मैदानी खेळयोगा किंवा सायकलिंगमध्ये सहभाग घेऊन फिट इंडिया चळवळीत योगदान द्यावे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची विकसित भारत’ ही संकल्पना साकारण्यासाठी क्रीडा क्षेत्राची मोठी भूमिका आहेअसे केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी अधोरेखित केले.

00000

मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त देशभर क्रीडा महोत्सव

 मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त देशभर क्रीडा महोत्सव

-         केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्री डॉ. मनसूख मांडवीय

क्रीडा महोत्सवाच्या आयोजनातून  खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी प्रोत्साहन

-         क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे

मुंबई 19 : पद्मभूषण मेजर ध्यानचंद सिंह यांच्या जयंतीनिमित्त 29 ते 31 ऑगस्ट दरम्यान देशभर राष्ट्रीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा भावना आणि ऐक्याच्या या उत्सवात प्रत्येक नागरिकाने किमान एक तास खेळासाठी द्यावाअसे आवाहन  केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा  मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी केले आहे.

या क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून देशात क्रीडा परिसंस्था उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.  युवक कल्याण व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या क्रीडा महोत्सवाच्या आयोजनाबाबत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले.  यावेळी मंत्रालयातून क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेउपसचिव श्री. सुनील पांढरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. तसेच विविध राज्यांचे क्रीडा मंत्री आणि सचिव दूरदृश्य प्रणालीद्वारे  उपस्थित होते.

ठाणेकर आणि नवी मुंबईकरांसाठीही महत्त्वाची पायाभूत सुविधा उभारणीचा

 ठाणेकर आणि नवी मुंबईकरांसाठीही महत्त्वाची पायाभूत सुविधा उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान 25 किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड रोड उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे ठाणेनवी मुंबई आणि मधल्या औद्योगिक क्षेत्रांना वेगवान व समर्पित दळणवळण मार्ग उपलब्ध होणार आहे.

उपनगरीय रेल्वे सेवेत आधुनिकता आणण्यासाठीही

 उपनगरीय रेल्वे सेवेत आधुनिकता आणण्यासाठीही मुंबई महानगर प्रदेश विकास योजनेच्या (एमयूटीपी) टप्पा ३ व ३अंतर्गत नवीन गाड्यांची खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. पहिल्या टप्प्यात तब्बल 268 पूर्ण एसी गाड्या खरेदी होणार आहेत. या गाड्या मेट्रोप्रमाणेच बंद दरवाज्याच्याउच्च दर्जाच्या सोयी-सुविधांनी सज्ज असतील. जुन्या विना-दरवाजाच्या गाड्यांना टप्प्याटप्प्याने हटवून त्याऐवजी या आधुनिक गाड्या प्रवाशांना उपलब्ध करून दिल्या जातील. विशेष म्हणजे तिकीट दरांमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितलेकेंद्र सरकारच्या मान्यतेनंतर ट्रेनची खरेदी सुरू होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

पुणे–लोणावळा उपनगरीय रेल्वे मार्गावर तिसरी व चौथी मार्गिका

 पायाभूत सुविधांच्या महत्वाच्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती

                                                                                                – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         पुणे–लोणावळा उपनगरीय रेल्वे मार्गावर तिसरी व चौथी मार्गिका

·         एमयूटीपी अंतर्गत मुंबईसाठी नवीन 268 एसी रेल्वे गाड्यांची खरेदी

·         ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळदरम्यान एलिव्हेटेड रोड

·         मेट्रो मार्गिका 11 या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला हिरवा कंदील

·         नागपुरात नवनगर तयार करण्यास मान्यता

मुंबईदि. 19  : राज्यातील वाहतूक आणि शहरी विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाच्या अनेक प्रकल्पांबाबत निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत घेण्यात आले. या निर्णयांमुळे मुंबईपुणेठाणेनवी मुंबई आणि नागपूर या शहरांना आधुनिक वाहतूक व्यवस्था आणि विकासाची नवी दिशा व गती मिळेलअसे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बैठकीत पुणे–लोणावळा या उपनगरीय रेल्वे मार्गावर तिसरी व चौथी मार्गिका उभारणीस मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे पुणे-लोणावळा कॉरिडॉर अधिक सक्षम होणार असून त्या परिसरातील औद्योगिकनिवासी व व्यावसायिक विकासाला आवश्यक ती कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. तसेच पुणे शहरातील वाढत्या ट्रॅफिकचा ताण कमी करण्यासही यामुळे मदत होईल. याचबरोबर पुणे मेट्रोच्या टप्पा-1 अंतर्गत बालाजीनगर–बिबवेवाडी व स्वारगेट–कात्रज या दोन नवीन स्थानकांना मंजुरी देण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Tuesday, 19 August 2025

ॲग्री हॅकेथॉन भरवण्यासाठी सांगली जिल्ह्याने पुढाकार घ्यावा

 ॲग्री हॅकेथॉन भरवण्यासाठी सांगली जिल्ह्याने पुढाकार घ्यावा. त्याचा फळ उत्पादक व अन्य शेतकऱ्यांना लाभ होईलअसे सूचित करून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेसांगली जिल्ह्यातून द्राक्षडाळिंबकेळी निर्यात मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्या अनुषंगाने द्राक्ष निर्यातीसाठी रेसिड्यू लॅबसाठी कृषि विभागाने आवश्यक कार्यवाही करावी. तसेचकृषि क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेसंबंधी यशस्वी प्रयोग झाले आहेत. पाणीखत बचत आणि जास्त टनेज यासाठी एआयचा चांगला उपयोग होतो. सांगली जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखानदारांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर करावा. त्या अनुषंगाने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम करावेअसे त्यांनी सूचित केले.

 

Featured post

Lakshvedhi