Tuesday, 19 August 2025

विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करून विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार मोफत चष्मे देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आ

 शालेय विद्यार्थ्यांमध्ये दृष्टीदोष असल्यास त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होऊन त्यांच्या शैक्षणिक वाटचालीवर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून शासनाने नेत्र तपासणी आणि चष्मे बनविणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी असलेल्या एसीलर लक्सोटिका सोबत भागीदारी करार केला. यानुसार २५ लाख शालेय विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करून विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार मोफत चष्मे देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत तपासणी झालेल्या आणि चष्म्याची आवश्यकता असलेल्या ४२,७६२ विद्यार्थ्यांना उच्च-गुणवत्तेच्या चष्म्यांचे वाटप करण्यात आले आहे.

Monday, 18 August 2025

'अंधत्व मुक्त महाराष्ट्र'च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला 'दृष्टी यज्ञ'च्या माध्यमातून बळ आतापर्यंत १,८०० शाळांमधील ७.५ लाख विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी पूर्ण

 'अंधत्व मुक्त महाराष्ट्र'च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला 'दृष्टी यज्ञ'च्या माध्यमातून बळ

  • आतापर्यंत १,८०० शाळांमधील ७.५ लाख विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी पूर्ण

 

मुंबईदि. १८ : अंधत्व मुक्त महाराष्ट्र करणे हे राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे. शासनामार्फत याबाबत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून शालेय विद्यार्थ्यांच्या नेत्र तपासणीसाठी एप्रिल २०१९ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनवनसाईट एसीलर लक्सोटिका फाउंडेशन आणि रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यात करार करण्यात आला असून आतापर्यंत १९ जिल्ह्यांच्या १८०० शाळांमधील ७.५ लाख विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली आहे.

गोड्या पाण्यातील मत्स्योद्योगाचे यवतमाळ जिल्हा आदर्श मॉडेल तयार करा

 गोड्या पाण्यातील मत्स्योद्योगाचे

यवतमाळ जिल्हा आदर्श मॉडेल तयार करा

- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

 

मुंबईदि. १८ : मत्स्यव्यवसाय विभागाच्या विविध योजना एकत्रित करून यवतमाळ जिल्ह्यात गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनाचे आदर्श मॉडेल उभारण्याचा आराखडा तयार करावा असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.

यवतमाळ जिल्ह्यातील मत्स्य संवर्धन व मत्स्य व्यवसायासाठी पायाभूत सुविधा उभारण्याबाबत मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी मत्स्यव्यवसाय मंत्री राणे बोलत होते. बैठकीला माजी आमदार मदन येरावारआयुक्त किशोर तावडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

    यवतमाळ जिल्ह्याचे आदर्श मॉडेल तयार करून ते राज्यात सर्वत्र राबवण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश देऊन मत्स्यव्यवसाय मंत्री राणे म्हणाले कीयवतमाळ जिल्ह्यात मत्स्योद्योग विकासासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या तातडीने देण्यात याव्यात. मच्छीमारांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत याची काळजी घ्यावी असेही त्यांनी सांगितले

राज्यपालांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट

 राज्यपालांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट

 

महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली.

शहरात पाणी तुंबल्यामुळे दोन ठिकाणी वाहतूक प्रभावित झाली. रेल्वे, मेट्रो व इतर वाहतूक सुरळीत

 मुंबईत आज सकाळपासून अवघ्या आठ तासांत 170 मिमी पाऊस झाला आहे. शहरात पाणी तुंबल्यामुळे दोन ठिकाणी वाहतूक प्रभावित झाली. रेल्वेमेट्रो व इतर वाहतूक सुरळीत सुरू आहे. पुढील 10 ते 12 तास मुंबईसाठी अत्यंत महत्वाचे असूनप्रशासनाने काळजी घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. उद्याच्या हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शाळांना सुटी जाहीर करण्याचा अधिकार स्थानिक प्रशासन व महापालिकांना देण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना दिलेल्या सूचनांमध्ये

 मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना दिलेल्या सूचनांमध्येएसएमएस ॲलर्ट पाठवताना वेळेचा अचूक उल्लेख करावायेणारे अलर्ट गांभीर्याने घ्यावेतस्वतःची काळजी घ्यावीअसे आवाहन करण्यात आले. तातडीच्या मदतीसाठी मंत्रालय गाठण्याची गरज नाहीस्थानिक पातळीवरच निधी व अधिकार देण्यात आले आहेतअसे त्यांनी स्पष्ट केले.

घरांच्या पडझडीसाठीची मदतपंचनामे योग्य पद्धतीने करण्याचे निर्देशही देण्यात आले. धोक्याची पातळी वाढण्यापूर्वी अन्य राज्यांशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले. पर्यटकांच्या ठिकाणी पोलिसांनी सतर्क रहावेदरडी कोसळणाऱ्या भागात आधीच यंत्रणा कार्यरत करावीतसेच निवारा केंद्रात भोजनशुद्ध पाणी व पांघरूण यांची पुरेशी सोय करावीअसे आदेश मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी दिले.

राज्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश

 राज्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश

मुंबईदि. 18 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात संपूर्ण राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला.

यावेळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनमाहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलारमुख्य सचिव राजेशकुमारजलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरआपत्ती व्यवस्थापन अपर मुख्य सचिव सोनिया सेठीकृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगीसार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी बृहन्मंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.

            बैठकीत विभागीय आयुक्तांनी आपल्या विभागातील पावसाबाबतची माहिती सादर केली. रत्नागिरीरायगड आणि हिंगोली जिल्ह्यांत अधिक पाऊस झाला असूनहवामान खात्याने 17 ते 21 ऑगस्टदरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

 

Featured post

Lakshvedhi