Monday, 18 August 2025

गोड्या पाण्यातील मत्स्योद्योगाचे यवतमाळ जिल्हा आदर्श मॉडेल तयार करा

 गोड्या पाण्यातील मत्स्योद्योगाचे

यवतमाळ जिल्हा आदर्श मॉडेल तयार करा

- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

 

मुंबईदि. १८ : मत्स्यव्यवसाय विभागाच्या विविध योजना एकत्रित करून यवतमाळ जिल्ह्यात गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनाचे आदर्श मॉडेल उभारण्याचा आराखडा तयार करावा असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.

यवतमाळ जिल्ह्यातील मत्स्य संवर्धन व मत्स्य व्यवसायासाठी पायाभूत सुविधा उभारण्याबाबत मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी मत्स्यव्यवसाय मंत्री राणे बोलत होते. बैठकीला माजी आमदार मदन येरावारआयुक्त किशोर तावडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

    यवतमाळ जिल्ह्याचे आदर्श मॉडेल तयार करून ते राज्यात सर्वत्र राबवण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश देऊन मत्स्यव्यवसाय मंत्री राणे म्हणाले कीयवतमाळ जिल्ह्यात मत्स्योद्योग विकासासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या तातडीने देण्यात याव्यात. मच्छीमारांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत याची काळजी घ्यावी असेही त्यांनी सांगितले

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi