Monday, 18 August 2025

तिसरी मुंबई आर्थिक विकासाचा नवा अध्याय

 गोल्डमन सॅक्सच्या नव्या मुंबई कार्यालयाचे 

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

तिसरी मुंबई आर्थिक विकासाचा नवा अध्याय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. 18 : मुंबई महानगरक्षेत्राच्या विकासासाठी रायगड जिल्ह्यात तिसरी मुंबई विकसित करण्यात येत आहे. ही तिसरी मुंबई म्हणजे आर्थिक विकासाचा नवा अध्याय असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

वरळी येथे गोल्डमन सॅक्स या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक बँकेच्या नव्याविस्तारित मुंबई कार्यालयाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी गुंतवणूकदारांशी चर्चा करताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीगोल्डमन सॅक्ससारख्या जागतिक वित्तसंस्थेचे नवे कार्यालय महाराष्ट्रात उघडले जाणे ही राज्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. यामुळे महाराष्ट्रातील कुशल मनुष्यबळभक्कम बाजारपेठा आणि गुंतवणूक-अनुकूल वातावरणाची पुष्टी होते. ही घटना महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील नेतृत्वाला अधोरेखित करणारी आहे. महाराष्ट्र शासन विकासासाठी कटिबद्ध असूनखासगी क्षेत्रासोबत भागीदारीतून तिसरी मुंबई’ घडवण्यासाठी कार्यरत आहे. तिसऱ्या मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यापीठांची केंद्रे उभारण्यात येत आहेत. मुंबई आणि महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीसाठी हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे.

गोल्डमन सॅक्सचे या कार्यालयाची थोडक्यात माहिती

 गोल्डमन सॅक्सचे अध्यक्ष केविन स्नेडर म्हणाले कीभारतीय बाजारपेठेतील संधी आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

गोल्डमन सॅक्स इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चॅटर्जी म्हणाले कीहे नवे कार्यालय आमच्या भारतातील प्रवासातील एक मैलाचा दगड आहे. या नव्या जागेच्या रचनेत सहकार्यनवोपक्रम आणि कर्मचाऱ्यांच्या कल्याणावर भर देण्यात आला आहे.

या कार्यालयाची थोडक्यात माहिती .

या कार्यालयात जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध आहेतजसे की 

अत्याधुनिक कॉन्फरन्स सेंटर

झूम-सक्षम मीटिंग रूम्स

माहिती सहयोग जागा (information collaboration space)

फोकस रूम्स आणि टीम रूम्स

उंची समायोजित करता येणारे डेस्क

बहुउद्देशीय जागा आणि ऑन-साइट केटरिंगसह कॅफे

गोल्डमन सॅक्सची भारतातली कामगिरी :

 गोल्डमन सॅक्सची भारतातली कामगिरी :

२०२१ पासून Dealogic नुसार भारतात गुंतवणूक बँक म्हणून मान्यता. २०२४ पासून आयपीओ आणि ब्लॉक ट्रेड्सद्वारे $10 अब्जांहून अधिक निधी उभारणारे प्रकल्प पूर्ण. यामध्ये भारतातील सर्वात मोठ्या आयपीओ आणि ब्लॉक ट्रेडचा समावेश. २००६ पासून भारतात $8.5 अब्जांहून अधिक भांडवली गुंतवणूक.

गोल्डमन सॅक्सने भारतात आपली सेवा १९८० च्या दशकात सुरू केली होती. २००६ मध्ये मुंबईत पूर्ण मालकीची उपस्थिती प्रस्थापित केली. सध्या कंपनी भारतात गुंतवणूक बँकिंगइक्विटी विक्री आणि ट्रेडिंगफिक्स्ड इनकम सिक्युरिटीजअ‍ॅसेट मॅनेजमेंट आणि संशोधन अशा विविध सेवा पुरवते.

घरांच्या पडझडीसाठीची मदत, पंचनामे योग्य पद्धतीने करण्याचे निर्देशही

 घरांच्या पडझडीसाठीची मदतपंचनामे योग्य पद्धतीने करण्याचे निर्देशही देण्यात आले. धोक्याची पातळी वाढण्यापूर्वी अन्य राज्यांशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले. पर्यटकांच्या ठिकाणी पोलिसांनी सतर्क रहावेदरडी कोसळणाऱ्या भागात आधीच यंत्रणा कार्यरत करावीतसेच निवारा केंद्रात भोजनशुद्ध पाणी व पांघरूण यांची पुरेशी सोय करावीअसे आदेश मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना दिलेल्या सूचनांमध्ये, एसएमएस ॲलर्ट पाठवताना वेळेचा अचूक उल्लेख करावा,

 मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना दिलेल्या सूचनांमध्येएसएमएस ॲलर्ट पाठवताना वेळेचा अचूक उल्लेख करावायेणारे अलर्ट गांभीर्याने घ्यावेतस्वतःची काळजी घ्यावीअसे आवाहन करण्यात आले. तातडीच्या मदतीसाठी मंत्रालय गाठण्याची गरज नाहीस्थानिक पातळीवरच निधी व अधिकार देण्यात आले आहेतअसे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईत आज सकाळपासून अवघ्या आठ तासांत 170 मिमी

 मुंबईत आज सकाळपासून अवघ्या आठ तासांत 170 मिमी पाऊस झाला आहे. शहरात पाणी तुंबल्यामुळे दोन ठिकाणी वाहतूक प्रभावित झाली. रेल्वेमेट्रो व इतर वाहतूक सुरळीत सुरू आहे. पुढील 10 ते 12 तास मुंबईसाठी अत्यंत महत्वाचे असूनप्रशासनाने काळजी घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. उद्याच्या हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शाळांना सुटी जाहीर करण्याचा अधिकार स्थानिक प्रशासन व महापालिकांना देण्यात आला आहे.

पावसामुळे जनजीवन

 छत्रपती संभाजीनगर विभागातील 800 गावे बाधित झाली आहेत. दक्षिण गडचिरोलीत प्रशासन सतर्क आहे. अकोलाचांदूररेल्वेमेहकरवाशिम येथे परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. विदर्भात प्राथमिक अंदाजानुसार 2 लाख हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले आहे.

Featured post

Lakshvedhi