Tuesday, 19 August 2025

अतिवृष्टी, पुरामुळे होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांचे निर्देश

 अतिवृष्टीपुरामुळे होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांचे निर्देश

 

मुंबईदि. १८ :- राज्यात सध्या पावसाचा जोर वाढला असून हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवसही पावसाचा जोर कायम राहणार आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीमुळे राज्यात शेत पीकफळ बागांचे नुकसान झाल्यास संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे तातडीने करून त्याचा अहवाल विनाविलंब  सादर करावाअसे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिले आहेत.

मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी सांगितलेभारतीय हवामान विभागाने विदर्भमराठवाडाकोकण या भागात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा  दिला आहे.  प्रशासनाने या भागातील नागरिकांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्यासाठी सर्तक रहावे.

            मदत व पुनर्वसन मंत्री जाधव-पाटील यांनी सांगितले कीशासन नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या घटकांना त्वरित मदत व दिलासा मिळावा यासाठी प्रशासनाने अतिवृष्टीपुरामुळे बाधितांचे तातडीने पंचनामे करावेत. या नुकसानीचा अहवाल संबधित विभागीय आयुक्तांमार्फत शासनास सादर करावाअसेही मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी सांगितले.

०००

श्रीमंत राजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवार प्रदर्शनाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा

 नवीन पिढीला इतिहासाशी जोडण्याचे कार्य सुरू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • श्रीमंत राजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवार प्रदर्शनाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा

 

मुंबईदि. १८ : इतिहासाशी नवीन पिढीला जोडण्याची भूमिका श्रीमंत राजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवारीने पार पाडली आहे. या तलवारीमुळे आपण इतिहासाशी जोडले गेलो आहे. नागपूरसह इतर ठिकाणी ही तलवार पोहोचेल आणि त्यामुळे आपल्या हिंदवी स्वराज्याचा विस्तार कसा झालाहे नवीन पिढीपर्यंत पोहोचेलअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीमंत सेना साहिब सुभा श्री राजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक  तलवार प्रदर्शन आणि लोकार्पण सोहळा पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी प्रभादेवी येथे  पार पडला. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलारमुधोजी राजे भोसलेआमदार श्रीकांत भारतीयआमदार संजय उपाध्यायआमदार राणा जगजितसिंह पाटीलआमदार संजय कुटे,  सचिव डॉ.किरण कुलकर्णीसंचालक मीनल जोगळेकरसंचालक डॉ.तेजस गर्गेनागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

नागपूरच्या भोसल्यांचा इतिहास हा पराक्रमाचा इतिहास असूनतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

श्रीमंत रघुजी राजे भोसले यांची तलवार येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देणारे स्वराज्याचे प्रतीक

 श्रीमंत रघुजी राजे भोसले यांची तलवार येणाऱ्या

पिढ्यांना प्रेरणा देणारे स्वराज्याचे प्रतीक

सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार

इंग्रजांच्या काळात लुटून नेलेल्या आपल्याच शौर्याच्यापराक्रमाच्यामराठा साम्राज्याच्या वैभवाची साक्ष देणारी प्रथम रघुजी राजे भोसले यांची तलवार अखेर महाराष्ट्रात परत आली आहे. ही केवळ एक वस्तू नाहीतर आपल्या पिढ्यांना प्रेरणा देणारे स्वराज्याचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार म्हणाले कीछत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर उभे राहून रघुजी राजे भोसले यांनी मराठा साम्राज्य बंगाल, ओडिसातेलंगणापर्यंत विस्तारले. ही तलवार परत मिळवणे म्हणजे सांस्कृतिक पुनर्जन्म आहे. उद्याच्या पिढ्यांना ही प्रेरणा देणारी घटना ठरणार आहे."

 छत्रपतींच्या गड-किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळवून देणे असोकिंवा रघुजी राजे भोसले यांची तलवार परत आणणे असोहीच खरी विरासत से विकास तकची संकल्पना आहे.  महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपराशौर्य आणि गणेशोत्सवासारखे उत्सव जागतिक पातळीवर पोहोचवणे हा आमचा संकल्प आहे.

यावेळी श्रीमंत रघुजी राजे भोसले यांचे वंशज मुधोजी राजे भोसले यांनीही मनोगत व्यक्त केले. तसेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते "मराठ्यांचा दरारा" या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.


दृष्टी यज्ञ – युनिव्हर्सल स्कूल आय हेल्थ प्रोग्राम' ही अशी योजना

 अंधत्व मुक्त महाराष्ट्र'च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला 'दृष्टी यज्ञ'च्या माध्यमातून बळ

  • आतापर्यंत १,८०० शाळांमधील ७.५ लाख विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी पूर्ण

 

मुंबईदि. १८ : अंधत्व मुक्त महाराष्ट्र करणे हे राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे. शासनामार्फत याबाबत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून शालेय विद्यार्थ्यांच्या नेत्र तपासणीसाठी एप्रिल २०१९ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनवनसाईट एसीलर लक्सोटिका फाउंडेशन आणि रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यात करार करण्यात आला असून आतापर्यंत १९ जिल्ह्यांच्या १८०० शाळांमधील ७.५ लाख विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली आहे.


या मोहिमेच्या माध्यमातून शहरांबरोबरच दुर्गमग्रामीण आणि आदिवासी शाळांतील विद्यार्थ्यांची देखील नेत्र तपासणी करण्यात येत आहे. 'दृष्टी यज्ञ – युनिव्हर्सल स्कूल आय हेल्थ प्रोग्रामही अशी योजना आहे ज्यामधून धूसर दृष्टीमुळे कोणत्याही मुलाचे शिक्षण बंद पडू नये याची दक्षता घेतली जाते. या माध्यमातून राज्यातील हजारो मुलांचे जीवन बदलत आहे.

मोहिमेचे उद्दिष्ट

महाराष्ट्रातील २५ लाख शालेय विद्यार्थ्यांची सखोल नेत्र तपासणी करून दृष्टी दोष असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत चष्मे देणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. यातील पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी झालेल्या जिल्ह्यांमध्ये मुंबईसह ठाणेपालघरसातारानाशिकपुणेनांदेडछत्रपती संभाजीनगरनागपूरसांगलीबीडकोल्हापूरचंद्रपूरसोलापूरअकोलाधुळेजालनाबुलढाणासिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील शाळांचा समावेश आहे.

गजबजलेल्या महानगरांपासून दुर्गम आदिवासी खेड्यांपर्यंतया मोहिमेच्या माध्यमातून अशा शाळांपर्यंत पोहोच साधली आहे जिथे विद्यार्थ्यांना पूर्वी फळा स्पष्ट पाहण्यात अडचण येत होती. मोबाईल तपासणी युनिट्सकुशल पथके आणि जागतिक दर्जाच्या एसीलर लक्सोटिका लेन्स यांनी धूसर दृष्टीची जागा स्पष्टता आणि नवीन आशेने घेतली आहे. परिणामी हे विद्यार्थी आता ताण न घेता वाचतातलक्षपूर्वक आणि नव्या आत्मविश्वासाने अभ्यासात सहभाग घेत आहेत.

हा केवळ नेत्र आरोग्याचा कार्यक्रम नाही तर ती महाराष्ट्राच्या भविष्याची गुंतवणूक आहे. स्वच्छ दृष्टीची हमी देऊनआपण चांगल्या शिक्षणाचेउच्च ध्येयांचे आणि उज्ज्वल भवितव्याचे दरवाजे उघडतो आहोतअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यानिमित्ताने व्यक्त केला आहे.

आदिवासी शाळांतील विद्यार्थ्यांची देखील नेत्र तपासणी दृष्टी यज्ञ'च्या माध्यमातून बळ

 'अंधत्व मुक्त महाराष्ट्र'च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला 'दृष्टी यज्ञ'च्या माध्यमातून बळ

  • आतापर्यंत १,८०० शाळांमधील ७.५ लाख विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी पूर्ण

 

मुंबईदि. १८ : अंधत्व मुक्त महाराष्ट्र करणे हे राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे. शासनामार्फत याबाबत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून शालेय विद्यार्थ्यांच्या नेत्र तपासणीसाठी एप्रिल २०१९ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनवनसाईट एसीलर लक्सोटिका फाउंडेशन आणि रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यात करार करण्यात आला असून आतापर्यंत १९ जिल्ह्यांच्या १८०० शाळांमधील ७.५ लाख विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली आहे.


या मोहिमेच्या माध्यमातून शहरांबरोबरच दुर्गमग्रामीण आणि आदिवासी शाळांतील विद्यार्थ्यांची देखील नेत्र तपासणी करण्यात येत आहे. 'दृष्टी यज्ञ – युनिव्हर्सल स्कूल आय हेल्थ प्रोग्रामही अशी योजना आहे ज्यामधून धूसर दृष्टीमुळे कोणत्याही मुलाचे शिक्षण बंद पडू नये याची दक्षता घेतली जाते. या माध्यमातून राज्यातील हजारो मुलांचे जीवन बदलत आहे.

मीराबाईंच्या भजनाचे गायन आणि विवेचन करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष बक्षीस जाहीर

 मीराबाईंच्या भजनाचे गायन आणि विवेचन करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष बक्षीस जाहीर

उपस्थित विद्यार्थ्यांपैकी मीराबाईंच्या भजनाचे वाचन आणि विवेचन करणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रुपये दहा हजार रोख बक्षीस दिले.

राज्यातील एकल महिलांच्या सबलीकरण आणि सशक्तीकरणासाठी राज्य शासन त्यांना पेन्शन आणि व्यवसाय उभारण्यासाठी मदत करण्याच्या विचारात आहे. तसेच डॉ.होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये होणाऱ्या नाविन्यपूर्ण विविध कोर्सेस आणि उपक्रमांचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कौतुक केले.

कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धाराचे काम धार्मिक भावना आणि परंपरेचा आदर करूनच

 कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धाराचे काम

धार्मिक भावना आणि परंपरेचा आदर करूनच

- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

 

मुंबईदि. 18 : कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम करताना परंपरागत वास्तूंच्या संवर्धनात शासन कोणत्याही प्रकारचा तडजोडीचा मार्ग स्वीकारणार नाही. या ठिकाणी पुरातात्त्विक मूल्य आहेस्थापत्यशास्त्रीय मूल्य आहे. हे आस्थेचेश्रद्धेचे आणि निष्ठेचे स्थान आहे. त्यामुळे धार्मिक भावना आणि परंपरेचा आदर करूनच मंदिर जीर्णोद्धाराची कामे केली जातीलअसे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले.

 

कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धार कामासंदर्भात सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांच्या अध्यक्षतेखाली पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीप्रभादेवी येथे बैठक झाली. या बैठकीस आमदार राणा जगजितसिंह पाटीलआमदार श्रीकांत भारतीयसांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णीधाराशिवचे जिल्हाधिकारी पुजारापुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालक डॉ.तेजस गर्गेतसेच मंदिराचे महंतपुजारी आणि भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकारी श्रीलक्ष्मी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होत्या.

 

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार म्हणाले कीगाभाऱ्याच्या मजबुतीकरणासोबतच धार्मिक परंपरा आणि श्रद्धेला बाधा न आणता उपाय शोधण्यावर शासनाचा भर आहे. मंदिराच्या कळसाबाबत तसेच गाभाऱ्याच्या दुरुस्तीबाबत एएसआय (पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग) तज्ज्ञांचीआय.आय.टी. तज्ज्ञांची मदत घेण्यात यावी. त्याचबरोबर अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी बाह्य तज्ज्ञांची मदत घेतली जावी. याबाबतचा संपूर्ण अहवाल 30 दिवसात तात्काळ तयार करण्यात यावाअशाही सूचना श्री.शेलार यांनी दिल्या.

दरम्यानमंदिर परिसरातील अन्य सुरू असलेली कामे थांबविण्याची आवश्यकता नसल्याचेही सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांनी स्पष्ट केले.

 

कुलस्वामिनीचे हे परंपरागतधार्मिक आणि सांस्कृतिक स्थान आहे. त्यामुळे श्रद्धापरंपरा आणि विज्ञान यांचा समन्वय साधत संवर्धनाची दिशा ठरवली जावी. संवाद आणि समन्वयातून या विषयावर निर्णय घेतला जावा. याबाबतचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेने पुढील दिशा ठरविली जाणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi