Tuesday, 19 August 2025

दृष्टी यज्ञ – युनिव्हर्सल स्कूल आय हेल्थ प्रोग्राम' ही अशी योजना

 अंधत्व मुक्त महाराष्ट्र'च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला 'दृष्टी यज्ञ'च्या माध्यमातून बळ

  • आतापर्यंत १,८०० शाळांमधील ७.५ लाख विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी पूर्ण

 

मुंबईदि. १८ : अंधत्व मुक्त महाराष्ट्र करणे हे राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे. शासनामार्फत याबाबत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून शालेय विद्यार्थ्यांच्या नेत्र तपासणीसाठी एप्रिल २०१९ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनवनसाईट एसीलर लक्सोटिका फाउंडेशन आणि रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यात करार करण्यात आला असून आतापर्यंत १९ जिल्ह्यांच्या १८०० शाळांमधील ७.५ लाख विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली आहे.


या मोहिमेच्या माध्यमातून शहरांबरोबरच दुर्गमग्रामीण आणि आदिवासी शाळांतील विद्यार्थ्यांची देखील नेत्र तपासणी करण्यात येत आहे. 'दृष्टी यज्ञ – युनिव्हर्सल स्कूल आय हेल्थ प्रोग्रामही अशी योजना आहे ज्यामधून धूसर दृष्टीमुळे कोणत्याही मुलाचे शिक्षण बंद पडू नये याची दक्षता घेतली जाते. या माध्यमातून राज्यातील हजारो मुलांचे जीवन बदलत आहे.

मोहिमेचे उद्दिष्ट

महाराष्ट्रातील २५ लाख शालेय विद्यार्थ्यांची सखोल नेत्र तपासणी करून दृष्टी दोष असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत चष्मे देणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. यातील पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी झालेल्या जिल्ह्यांमध्ये मुंबईसह ठाणेपालघरसातारानाशिकपुणेनांदेडछत्रपती संभाजीनगरनागपूरसांगलीबीडकोल्हापूरचंद्रपूरसोलापूरअकोलाधुळेजालनाबुलढाणासिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील शाळांचा समावेश आहे.

गजबजलेल्या महानगरांपासून दुर्गम आदिवासी खेड्यांपर्यंतया मोहिमेच्या माध्यमातून अशा शाळांपर्यंत पोहोच साधली आहे जिथे विद्यार्थ्यांना पूर्वी फळा स्पष्ट पाहण्यात अडचण येत होती. मोबाईल तपासणी युनिट्सकुशल पथके आणि जागतिक दर्जाच्या एसीलर लक्सोटिका लेन्स यांनी धूसर दृष्टीची जागा स्पष्टता आणि नवीन आशेने घेतली आहे. परिणामी हे विद्यार्थी आता ताण न घेता वाचतातलक्षपूर्वक आणि नव्या आत्मविश्वासाने अभ्यासात सहभाग घेत आहेत.

हा केवळ नेत्र आरोग्याचा कार्यक्रम नाही तर ती महाराष्ट्राच्या भविष्याची गुंतवणूक आहे. स्वच्छ दृष्टीची हमी देऊनआपण चांगल्या शिक्षणाचेउच्च ध्येयांचे आणि उज्ज्वल भवितव्याचे दरवाजे उघडतो आहोतअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यानिमित्ताने व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi