Sunday, 17 August 2025

प्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामकाज करावे · डीपीसीचा निधी अखर्चित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन

 सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू

   - उपमुख्यमंत्री अजित पवार

 

·         विविध विकासकामेयोजनांच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत निर्देश

·         प्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामकाज करावे

·         डीपीसीचा निधी अखर्चित राहणार नाहीयाची दक्षता घेण्याचे आवाहन

·         ॲग्री हॅकेथॉन भरवण्यासाठी सांगली जिल्ह्याने पुढाकार घ्यावा

·         ऊस उत्पादकसाखर कारखानदारांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर करावा

 

            सांगलीदि. 16, (जि. मा. का.) सांगली जिल्हा हा नेतृत्त्व करण्यास संधी देणारा जिल्हा आहे. या जिल्ह्याने अनेक मान्यवरांना नेतृत्त्व करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या एकंदरीत आजपर्यंतच्या कामकाजात या जिल्ह्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. येथील लोकप्रतिनिधींनी विकासाच्या बाबतीत सकारात्मक दृष्टीकोन ठेवला आहे. त्यांना प्रशासनाने चांगली साथ दिली आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावायासाठी राज्य शासन स्तरावर आवश्यक ते सहकार्य सर्वतोपरी करूअशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी आज येथे दिली.

पोलीस शिपाई भरती प्रक्रिया त्या-त्या जिल्हा स्तरावरून राबविण्यात येते. त्यासाठी ओएमआर (OMR) आधारित लेखी परीक्षा

 राज्याच्या पोलीस दलात सन २०२४ दरम्यान रिक्त असलेली व २०२५ मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊनही भरती करण्यात येणार आहेत. भरण्यात येणारी पदांची संख्या अशी,  पोलीस शिपाई – १२ हजार ३९९पोलीस शिपाई चालक – २३४बॅण्डस् मॅन – २५सशस्त्र पोलीस शिपाई – २ हजार ३९३कारागृह शिपाई – ५८०. एकूण १५ हजार६३१. पोलीस शिपाई व कारागृह शिपाई ही पदे गट – क संवर्गातील आहेत. पोलीस शिपाई भरती प्रक्रिया त्या-त्या जिल्हा स्तरावरून राबविण्यात येते. त्यासाठी ओएमआर (OMR) आधारित लेखी परीक्षा घेण्यात येईल.

भरतीसाठी अर्ज मागवणेअर्जाची छाननीत्यावर प्रक्रिया तसेच उमेदवारांची शारिरीक परीक्षात्यातून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा यासाठी अनुषांगिक प्रक्रिया राबविण्याचे अधिकार प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांना देण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली.

महाराष्ट्र पोलीस दलात १५ हजार पदभरती लेखी परीक्षेसाठी ओएमआर प्रणालीचा वापर

महाराष्ट्र पोलीस दलात १५ हजार पदभरती लेखी परीक्षेसाठी ओएमआर प्रणालीचा वापर महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे १५ हजार पदे भरण्यात येणार आहेत. त्याकरिता सन २०२४-२५ च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या भरतीमध्ये सन २०२२ व सन २०२३ मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे व भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.

इच्छुक विद्यार्थ्यांना सहभागी होता यावे यासाठी जास्तीत जास्त शाळांमध्ये स्काऊट गाईडची अंमलबजावणी करावी

 इच्छुक विद्यार्थ्यांना सहभागी होता यावे यासाठी

जास्तीत जास्त शाळांमध्ये स्काऊट गाईडची अंमलबजावणी करावी

- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

 

मुंबई, दि. 12 : विद्यार्थ्यांना बालवयापासूनच मूल्य शिक्षण, स्वावलंबन, शिस्त, संस्कारांच्या माध्यमातून उत्तम भावी नागरिक घडविण्यात स्काऊट, गाईडची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. इच्छुक शालेय विद्यार्थ्यांना यात सहभागी होता यावे यासाठी जास्तीत जास्त शाळांमध्ये स्काऊट गाईडची अंमलबजावणी करावी, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

       राज्यातील जास्तीत जास्त शाळांमध्ये स्काऊट गाईडची अंमलबजावणी करण्याबाबत आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, प्रधान सचिव रणजित सिंह देओल, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव, उपसचिव तुषार महाजन, क्रीडा विभागाचे सहायक संचालक तथा महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस् चे राज्य चिटणीस मिलिंद दिक्षित उपस्थित होते. तर शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह, एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावार हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

मंत्री श्री.भुसे म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या माता पित्यांचा, वडीलधाऱ्यांचा, गुरुजनांचा आदर करणेशिस्त अंगिकारणे आदी बाबी शिकणे आवश्यक आहे. स्काऊट, गाईड, एनसीसी, आरएसपी आदी माध्यमातून अशी शिस्त आणि संस्कार लाभतात. यामुळे इच्छुक विद्यार्थी यापासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी असेही त्यांनी सांगितले. आनंददायी शनिवार अंतर्गत स्काऊट गाईडचा एक तास घेण्याची तसेच ज्या शाळेत स्काऊट गाईडचे विद्यार्थी असतील, तेथे दिल्या जाणाऱ्या गणवेशापैकी एक गणवेश स्काऊट गाईडला अनुरुप असावा, असा प्रयत्न करण्याची सूचनाही त्यांनी दिली.

       राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी स्काऊटचा गणवेश उत्कृष्ट असून तो घातल्यानंतर विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढतो, असे यावेळी नमूद केले. 

पीएसए कंपनीद्वारे नवनिर्मित भारत मुंबई कंटेनर टर्मिनल (बीएमसीटी) फेज-2 ची पाहणी

 या कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंगापूरचे उपपंतप्रधान गान किम येंग आणि सिंगापूरचे परिवहन मंत्री जेफरी सिओ यांच्यासमवेत जेएनपीएउरण येथे लवकरच उद्घाटन होणाऱ्या पीएसए कंपनीद्वारे नवनिर्मित भारत मुंबई कंटेनर टर्मिनल (बीएमसीटी) फेज-2 ची पाहणी करत माहिती घेतली. तसेच प्रत्यक्ष काम करणाऱ्या तांत्रिक टीमशी संवाद साधला. यावेळी जे. एन. पी. ए. चेअरमन उन्मेष वाघ, आमदार महेश बालदी, कोकण विभागीय आयुक्त डॉ विजय सूर्यवंशीजिल्हाधिकारी किशन जावळेमुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसलेमुख्यमंत्री यांचे मुख्य गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसेबंदरेजलमार्ग मंत्रालयाचे सचिव टी. के. रामचंद्रनउप व्यवस्थापकीय संचालक पी. एस. ए. पवित्रम कलाडा आदी उपस्थित होते.

०००

महाराष्ट्र शासन आणि मेपलट्री इन्व्हेस्टमेंट्स प्रा. लि., सिंगापूर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससिंगापूरचे उपपंतप्रधान गान किम येंग आणि सिंगापूरचे परिवहन मंत्री जेफरी सिओ यांच्या प्रमुख उपस्थितीत  महाराष्ट्र शासन आणि मेपलट्री इन्व्हेस्टमेंट्स प्रा. लि.सिंगापूर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे 3,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असूनमुंबईपुणेनागपूर आणि इतर औद्योगिक परिसरात रोजगाराच्या थेट 5,000 संधी उपलब्ध होणार आहेत. या कराराअंतर्गत लॉजिस्टिक्स व वेअरहाऊसिंग पार्कऔद्योगिक पार्क आणि डाटा सेंटर्सची निर्मिती करण्यात येणार आहे.

पी एस ए च्या नव्याने पूर्ण झालेल्या भारत मुंबई कंटेनर टर्मिनल टप्पा 2 ची पाहणी केली

 पी एस ए च्या नव्याने पूर्ण झालेल्या भारत मुंबई कंटेनर टर्मिनल टप्पा 2 ची पाहणी केली असून भारत आणि सिंगापूर यांच्यातील दृढचिरस्थायी भागीदारीचे हे प्रतीक आहे.  जवळपास तीन दशकांमध्ये,पी एसने  भारतात एकूण 2.3 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. फेज 1 मुळे कार्यक्षमता वाढली असूनजहाजांचा परतण्याचा वेळ कमी झाला आहे. याचा भारताच्या निर्यात-आयातदारांना फायदा झाला आहे  फेज 2 मुळे टर्मिनलची क्षमता 2.4 दशलक्ष TEUs वरून दुप्पट होऊन 4.8 दशलक्ष TEUs झाली आहेज्यामुळे भारत मुंबई कंटेनर टर्मिनल हे भारतातील सर्वात मोठे स्वतंत्र कंटेनर टर्मिनल बनले आहे. यामुळे आर्थिक विकासाला गती मिळून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. बंदर व्यवस्थापनापलीकडेसिंगापूरच्या कंपन्या भारतातील मेरिटाइम क्षेत्रात जहाजबांधणी आणि हिरव्या शिपिंग उपायांसह विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. सिंगापूर हा भारतातील सर्वात मोठ्या परदेशी थेट गुंतवणुकीच्या स्रोतांपैकी एक आहेआणि अनेक सिंगापूरच्या कंपन्या महाराष्ट्रात विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. मॅपल ट्री इन्व्हेस्टमेंट्स आणि महाराष्ट्र शासन यांच्यातील औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स विकासासाठीचा नवीन सामंजस्य करार या भागीदारीला आणखी मजबूत करेल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. 

Featured post

Lakshvedhi