सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू
- उपमुख्यमंत्री अजित पवार
· विविध विकासकामे, योजनांच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत निर्देश
· प्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामकाज करावे
· डीपीसीचा निधी अखर्चित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन
· ॲग्री हॅकेथॉन भरवण्यासाठी सांगली जिल्ह्याने पुढाकार घ्यावा
· ऊस उत्पादक, साखर कारखानदारांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर करावा
सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : सांगली जिल्हा हा नेतृत्त्व करण्यास संधी देणारा जिल्हा आहे. या जिल्ह्याने अनेक मान्यवरांना नेतृत्त्व करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या एकंदरीत आजपर्यंतच्या कामकाजात या जिल्ह्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. येथील लोकप्रतिनिधींनी विकासाच्या बाबतीत सकारात्मक दृष्टीकोन ठेवला आहे. त्यांना प्रशासनाने चांगली साथ दिली आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी राज्य शासन स्तरावर आवश्यक ते सहकार्य सर्वतोपरी करू, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी आज येथे दिली.
No comments:
Post a Comment