Saturday, 16 August 2025

उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार ग्रामीण विभाग

 ग्रामीण विभाग

१) स्व. समीर (तात्या) सोनटक्के वाचनालयचोराखळीता. कळंबजि. धाराशिव

२)बलराम सार्वजनिक वाचनालयफुलउमरीता. मानोराजि. वाशिम

३) प्रगती सार्वजनिक वाचनालयसिल्ली (आंबाडी) जि. भंडारा

उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार शहरी विभाग :

 उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार

शहरी विभाग :

 सार्वजनिक वाचनालयशिवाजी चौककल्याण पश्चिमता.कल्याणजि.ठाणे

  सर्वात्मक वाचनालयबापू बंगला स्टॉपइंदिरानगरनाशिक

 ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयवाघापूरता.जि.यवतमाळ

 मा. शिल्पकार ल. ना. भालेराव सार्वजनिक वाचनालयपंचवटीनाशिक

सामाजिक उत्तरदायित्व निधीतून ग्रंथालयाचे बळकटीकरण करावे

 सामाजिक उत्तरदायित्व निधीतून ग्रंथालयाचे बळकटीकरण करावे

- विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

राज्यातील जनतेचे सामाजिकशैक्षणिक व सांस्कृतिक जीवन समृद्ध करण्यासाठी व वाचन संस्कृती वृध्दींगत होण्यासाठी वाचन चळवळ अधिक समृद्ध केली पाहिजे. ज्या ग्रंथालयांच्या इमारती जुन्या झाल्या आहेत त्यांच्या नवीन बांधकामांसाठी अनुदानात शासनाने वाढ करावी तसेच ग्रंथालयांमध्ये तंत्रज्ञानावर आधारित पुस्तकांचा समावेश असावा. आणि पालकमंत्र्यांच्या निधीतील  एक टक्के निधी ग्रंथालय चळवळीसाठी द्यावाअसे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

ग्रंथालयांच्या अनुदानात ४० टक्के वाढ करण्यासाठी शासन सकारात्मक

 ग्रंथालयांच्या अनुदानात ४० टक्के वाढ करण्यासाठी 

शासन सकारात्मक

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील


  • सन 2023-24 चे उत्कृष्ट ग्रंथालय, उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक पुरस्काराचे वितरण

मुंबई, दि. 12 : आजच्या डिजिटल युगात ग्रंथालय चळवळ टिकेल का असा प्रश्न पडतो पण आजची तरुण मंडळी अधिक ग्रंथालयाकडे वळली आहे. विविध वाचन उपक्रमात सक्रिय सहभाग घेत आहेत, त्यासाठी ग्रंथालयांना पुस्तकांनी समृद्ध करावंअसे आवाहन करून ग्रंथालयांच्या अनुदानात 40 टक्के वाढ करण्यासाठी शासन सकारात्मक आहे, असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

एसएनडीटी महिला विद्यापीठ, पाटकर सभागृह येथे सन २०२३-२४ चे उत्कृष्ट ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक पुरस्कार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यावेळी अपर मुख्य सचिव बी वेणूगोपाल रेड्डी, राज्य ग्रंथालय संचालक अशोक गाडेकरउपसचिव अमोल मुत्याल, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले,  यंदा ग्रंथ प्रदर्शन माध्यमातून जवळपास ४० कोटी पुस्तकांची विक्री झाली. १० लाख वाचकांनी या ग्रंथ प्रदर्शनास भेट दिली. यामध्ये ४ लाख शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते. ग्रंथालय चळवळ टिकावी आणि पुढे वाढत जावी यासाठी  एक तास शांतता... पुणे वाचत आहे१५ दिवसात पुस्तक वाचून परीक्षण लिहिणे यासारखे अनेक उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये  ३ लाख ७५ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या विद्यार्थ्यांनी पुस्तक परीक्षण सुद्धा लिहिले.

वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी प्रदर्शनेपुस्तक परीक्षणकविता वाचन यासारखे कार्यक्रम राबविण्यात यावीत. ग्रंथालय चळवळीच्या विकासासाठी मान्यता रद्द झालेल्या २ हजार नवीन ग्रंथालयांना मान्यता देण्यात येणार आहे. तसेच ज्या सार्वजनिक वाचनालयाला  5075 व 100 वर्षे पूर्ण झाली आहेत त्यांना विशेष अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

तन-मनाने सुदृढ करणाऱ्या देशी खेळांचे पुनरुज्जीवन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे

 ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक देशी क्रीडा महाकुंभाची मराठमोळे ढोल आणि लेझिमाच्या तालावर अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संदेश ऐकवण्यात आला. या संदेशात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी म्हटले की, आजच्या यांत्रिक युगात मुलांची शारीरिक हालचाल कमी होत चालली असताना तन-मनाने सुदृढ करणाऱ्या देशी खेळांचे पुनरुज्जीवन कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे करण्यात येत आहेही महत्त्वपूर्ण बाब आहे. यानिमित्त मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे तसेच विभागाचे हार्दिक अभिनंदन! महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा एक महत्त्वपूर्ण भाग असलेल्या देशी खेळांना मैदाने उपलब्ध करून खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा विभागाचा उपक्रम अत्यंत उल्लेखनीय असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी संदेशात म्हटले आहे

देशी क्रीडा प्रकार जगभरात पोहोचवला. पारंपरिक देशी खेळांना त्यांनी विशेष महत्त्व दिले

 क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे म्हणाले की,  देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात योग दिवस सुरू करून देशी क्रीडा प्रकार जगभरात पोहोचवला. पारंपरिक देशी खेळांना त्यांनी विशेष महत्त्व दिले आहे. देशातील पारंपरिक खेळांना प्रोत्साहन दिल्यास सध्याच्या आभासी आणि मोबाईलच्या वापराकडे वळलेल्या तरुणाईला वेळीच आवरता येईल. यासाठी देशी खेळ आणि खेळाडूंना शासकीय स्तरावर मान्यता देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर प्राथमिक शाळांमध्ये लंगडीदोरीच्या उड्यालगोरी यासारख्या खेळांना अनिवार्य करण्यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल. तसेच दरवर्षी शासकीय स्तरावर पारंपरिक देशी खेळांच्या स्पर्धा भरविण्यात येतील, असे मंत्री अॅड. कोकाटे यांनी यावेळी सांगितले. 

मान्यवरांच्या उपस्थितीत यावेळी लाठीकाठीमल्लखांब आणि तलवारबाजी य साहसी खेळांच्या प्रात्यक्षिक ही सादर करण्यात आले. क्रीडा महाकुंभ येत्या २२ ऑगस्ट पर्यंत असणार असून २० हजार स्पर्धक १८ विविध देशी खेळांच्या माध्यमाने मैदान गाजवणार आहेत. 

पारंपरिक देशी खेळाडूंना शासकीय नियुक्त्यांबाबत प्रयत्न करणार

  पारंपरिक देशी खेळाडूंना शासकीय नियुक्त्यांबाबत प्रयत्न करणार

- क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे

दरवर्षी पारंपरिक खेळांच्या स्पर्धा शासकीय पातळीवर झाल्या पाहिजेत

मंत्री मंगलप्रभात लोढा

ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक देशी क्रीडा महाकुंभ उद्घाटन

 

मुंबई, दि. १३ : पारंपरिक देशी खेळाडूंना शिव छत्रपती पुरस्कारशासकीय लाभ आणि नियुक्त्यांबाबत शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी कुर्ला येथे ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक देशी क्रीडा महाकुंभ उद्घाटन कार्यक्रमात दिले. ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या नावाने दरवर्षी पारंपरिक खेळांच्या स्पर्धा शासकीय पातळीवर झाल्या पाहिजेत, असे मत कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले.

मंत्री ॲड.कोकाटे आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत या क्रीडा महाकुंभचे उद्घाटन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर देशी खेळांच्या मैदानाचे लोकार्पण करण्यात आले. भारतीय परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या देशी मैदानी खेळांच्या खेळाडूंना शासकीय लाभ मिळण्याबाबतची मागणी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली होती.

मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणालेमहाराष्ट्राचे सुपुत्र कुस्तीपटू ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांनी प्रतिकूल परिस्थितीत ऑलिम्पिक पदक मिळवून देशाचे नाव उज्ज्वल केले. या महाराष्ट्राच्या सुपुत्राच्या नावाने दरवर्षी पारंपरिक खेळांच्या स्पर्धा शासकीय पातळीवर झाल्या पाहिजेत. खेळाडूंना शासकीय सवलती मिळाल्या पाहिजेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.

Featured post

Lakshvedhi