क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे म्हणाले की, देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात योग दिवस सुरू करून देशी क्रीडा प्रकार जगभरात पोहोचवला. पारंपरिक देशी खेळांना त्यांनी विशेष महत्त्व दिले आहे. देशातील पारंपरिक खेळांना प्रोत्साहन दिल्यास सध्याच्या आभासी आणि मोबाईलच्या वापराकडे वळलेल्या तरुणाईला वेळीच आवरता येईल. यासाठी देशी खेळ आणि खेळाडूंना शासकीय स्तरावर मान्यता देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर प्राथमिक शाळांमध्ये लंगडी, दोरीच्या उड्या, लगोरी यासारख्या खेळांना अनिवार्य करण्यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल. तसेच दरवर्षी शासकीय स्तरावर पारंपरिक देशी खेळांच्या स्पर्धा भरविण्यात येतील, असे मंत्री अॅड. कोकाटे यांनी यावेळी सांगितले.
मान्यवरांच्या उपस्थितीत यावेळी लाठीकाठी, मल्लखांब आणि तलवारबाजी य साहसी खेळांच्या प्रात्यक्षिक ही सादर करण्यात आले. क्रीडा महाकुंभ येत्या २२ ऑगस्ट पर्यंत असणार असून २० हजार स्पर्धक १८ विविध देशी खेळांच्या माध्यमाने मैदान गाजवणार आहेत.
No comments:
Post a Comment