Saturday, 16 August 2025

विकसित भारताच्या स्वप्नांमध्ये विकसित महाराष्ट्राचे विशेष योगदान

 विकसित भारताच्या स्वप्नांमध्ये विकसित महाराष्ट्राचे विशेष योगदान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मंत्रालयात 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण

 

मुंबईदि. 15 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश सातत्याने प्रगती करत आहे. केवळ एका दशकामध्ये भारताने जगातल्या अकराव्या अर्थव्यवस्थेपासून चौथ्या मोठ्या अर्थव्यवस्थेपर्यंत मोठी मजल मारली आहे. आज भारताच्या संपूर्ण विकास व्यवस्थेमध्ये महाराष्ट्र राज्य अतिशय वेगाने पुढे जात आहे. विकसित भारताच्या स्वप्नामध्ये विकसित महाराष्ट्र विशेष योगदान देत आहे. देशाची ही विकासगाथा यापुढे थांबणार नाही. प्रधानमंत्री यांनी आत्मनिर्भर भारताचा नारा दिला आहेहा नारा अत्यंत महत्त्वाचा आहे. भारताला आत्मनिर्भर करण्याकरता आपल्या सर्वांना मिळून प्रयत्न करावे लागतीलअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

देशाच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले. या समारंभाप्रसंगी संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी  मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधेमुख्य सचिव राजेश कुमारश्रीमती अमृता फडणवीसवैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष रजनीश सेठमुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेपोलीस महासंचालक रश्मी शुक्लावित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ताराजशिष्टाचार विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकरमुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणीमुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे यांच्यासह विविध विभागांचे अप्पर मुख्य सचिवप्रधान सचिवसचिवभारतीय सेनानौसेनावायुसेनाभारतीय तटरक्षक दलाचे वरिष्ठ अधिकारीवरिष्ठ पोलीस अधिकारीस्वातंत्र्य सैनिक आणि इतर विभागांचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

लेफ्टनंट कमांडर जुई भोपे यांनी केले पंतप्रधान रक्षक दलाचे नेतृत्व

  लेफ्टनंट कमांडर जुई भोपे यांनी केले पंतप्रधान रक्षक दलाचे नेतृत्व

 

नवी दिल्ली१५ : लाल किल्ल्यावर झालेल्या ७९ व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या परेडमध्ये महाराष्ट्राची मुलगी लेफ्टनंट कमांडर जुई भोपे यांनी पंतप्रधान रक्षक दलाच्या पथक प्रमुख म्हणून नेतृत्वाची धुरा सांभाळली.

            मूळच्या नागपूरच्या असलेल्या जुई भोपे यांनी २०१५ साली भारतीय नौदलात प्रवेश केला असून सध्या त्या लेफ्टनंट कमांडर पदावर कार्यरत आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या ऐतिहासिक सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण होत असताना सुरक्षा आणि संचलनाची जबाबदारी असलेल्या पंतप्रधान रक्षक दलाच्या पथकाचे नेतृत्व करण्याचा मान त्यांना मिळाला.

मागील वर्षी झालेल्या गणराज्य दिन परेडमध्येही जुई भोपे यांनी भारतीय नौदलाच्या चित्ररथाचे नेतृत्व केले होते. त्यांचे शिक्षण नागपूर येथील सोमलवार हायस्कूलमध्ये झाले असूनपुढे रायसोनी इंजिनिअरिंग कॉलेजमधून बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग ही पदवी त्यांनी संपादन केली आहे.

देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षा पथकाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी मिळाल्याने लेफ्टनंट कमांडर जुई भोपे यांच्या कार्याचा सर्व स्तरातून गौरव होत आहे.

0000

तिसऱ्या मुंबईत एज्यु सिटी उभारण्यात येणार आहे. ही नवीन मुंबई विमानतळापासून

 मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीअटल सेतूमुळे तिसरी मुंबई उभारण्याची संधी खुली झाली आहे. तिसऱ्या मुंबईत एज्यु सिटी उभारण्यात येणार आहे. ही नवीन मुंबई विमानतळापासून काही मिनिटांच्या अंतरावर असेल. केंद्र सरकारने परदेशी विद्यापीठांना भारतात येण्याची परवानगी दिल्यामुळे जागतिक दर्जाचे शिक्षण येथे देता येणार आहे. येथे ३०० एकर जमिनीवर जगातील सर्वोच्च १२ विद्यापीठांना वसवण्याची योजना असून त्यांना जमिन आणि काही सामायिक पायाभूत सुविधा शासनाकडून दिल्या जातील. आज सात विद्यापीठांशी सामंजस्य करार झाले आहेतत्यापैकी काही विद्यापीठ आपली कॅम्पसेस सुरू करत आहेत. एकूण एक लाख निवासी विद्यार्थी येथे राहतीलत्यामुळे येथे प्रचंड आर्थिक आणि सामाजिक चैतन्य निर्माण होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


महाराष्ट्र हे रेरा लागू करणारे पहिले राज्य असल्याचे सांगत

 महाराष्ट्र हे रेरा लागू करणारे पहिले राज्य असल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले कीएमसीएचआयने दिलेल्या अनेक योग्य सूचनांमुळे आम्ही रेरा कायद्यामध्ये सुधारणा केल्या आणि रेरा कायदा अधिक कार्यक्षम बनवला. रेरा लागू झाल्यामुळे लोकांचा रिअल इस्टेट उद्योगावरचा विश्वास वाढला आहे. रेरा अस्तित्वात आल्यानंतर क्रेडाई एमसीएचआयने दरवर्षी प्रदर्शन आयोजित करण्याची परंपरा सुरू केलीज्यामध्ये नियामकवित्तीय संस्था आणि रिअल इस्टेट क्षेत्र एकत्र येतातत्यामुळे ग्राहकांना विश्वासार्ह व्यवहाराची संधी मिळते. मुंबईत एमसीएचआयचे प्रदर्शन हे देशातील सर्वोत्तम प्रदर्शनांपैकी एक असून यामुळे ग्राहकांशी नातेसंबंध अधिक घट्ट झाले असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. मुंबईसाठी नवीन विकास आराखडा तयार करतेवेळी मुंबईच्या विविधतेमुळे आणि किनारपट्टीवरील शहर असल्याने येथे सीआरझेडलष्करनौदलवन विभाग अशा अनेक नियमांचा प्रभाव आहे. या सर्व अडचणींमधून एक विकास आराखडा तयार करणे आवश्यक होते. यामध्ये संपूर्ण उद्योगक्षेत्र एकत्र आले आणि क्रेडाई-एमसीएचआयने या प्रक्रियेत अग्रणी भूमिका बजावली आहे, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

सी-लिंकला दहिसरपर्यंत आणि नंतर भाईंदरपर्यंत वाढवण्याचे काम

 मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले कीजगभरात उपलब्ध असलेली नवीन तंत्रज्ञान मुंबईत आणायला हवीत. आज बांधकाम क्षेत्रात अशा तंत्रज्ञानामुळे ८० मजली इमारत केवळ १२० दिवसांत बांधली जाऊ शकते. आज मुंबईत मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधेची कामे सुरू आहेत. सध्या बांद्रावर्सोवा सी-लिंक प्रकल्प ६० टक्के पूर्ण झाला आहे आणि पुढील दोन वर्षांत तो पूर्ण होईल. यासोबत सी-लिंकला दहिसरपर्यंत आणि नंतर भाईंदरपर्यंत वाढवण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर वेस्टर्न एक्सप्रेस-वे हा मुंबईतील ६० टक्के वाहतूक उचलत आहे. त्याला समांतर अशी जोडणी सी-लिंकपासून भायंदर -विरारपर्यंत तयार होत असून तो पुढे वाढवण पोर्टपर्यंत करण्यात येणार आहे. या सर्वामुळे उत्तरेकडील संपूर्ण भाग रिअल इस्टेट उद्योगासाठी खुला होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

१०० वर्षं १६१ चौ.फूट घरात राहणाऱ्यांना आता ५०० चौ.फूट जागा मिळत आहे.

 मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले कीसध्या मुंबईत पुनर्विकास मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.  बीडीडी चाळ पुनर्विकासाचा पहिला टप्पा लोकांना सुपूर्द केला आहे. यामध्ये जवळपास १०० वर्षं १६१ चौ.फूट घरात राहणाऱ्यांना आता ५०० चौ.फूट जागा मिळत आहे. हा आशियातील सर्वात मोठा शहरी पुनर्विकास प्रकल्प आहे. मुंबईत पुनर्विकासाबरोबरच स्लम पुनर्विकास हा दुसरा मोठा संधीचा मार्ग आहे. तसेच क्लस्टर डेव्हलपमेंट देखील नवीन संधी निर्माण करत आहे. आज मुंबईत जगातील सर्वोत्तम वास्तुकलाआयकॉनिक इमारतीउत्कृष्ट सुविधा दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.

झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी जलद पुनर्विकास गरजेचा

 झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी जलद पुनर्विकास गरजेचा

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईदि. 15 : मुंबई स्लम-फ्री करायची असेलपुनर्विकास जलद करायचा असेलतर आपल्याला दशकानुदशके चालणारे प्रकल्प नकोत. प्रकल्प सुरू करून वर्ष-सव्वावर्षात प्लॉट तयार करून पुढील एका वर्षात पुनर्वसन इमारत उभी करावीतरच स्लम-फ्री मुंबईचे स्वप्न साकार होईल. तसेच नव्या कल्पनानवे तंत्रज्ञान आणि नवनिर्मितीच्या दृष्टिकोनातून हे परिवर्तन साध्य होऊ शकत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या उपस्थितीत क्रेडाई-एमसीएचआयचे अध्यक्ष म्हणून सुखराज नाहर यांनी कार्यभार स्वीकारला. यावेळी झालेल्या क्रेडाई-एमसीएचआय आयोजित चेंज ऑफ गार्ड’ सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी क्रेडाईचे माजी अध्यक्ष डॉमिनिक रोमलसचिव ऋषी मेहतामाजी सचिव धवल अजमेरामुख्य कार्यकारी अधिकारी केवल वलांभिया तसेच रिअल इस्टेट व्यवसायातील मान्यवर उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi