सचिव धीरज कुमार म्हणाले की, सणासुदीच्या कालावधीमध्ये नागरिकांना निर्भेळ सकस व शुद्ध अन्न उपलब्ध करून देण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही याची दक्षता अन्न व्यावसायिकांनी घ्यावी. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून जनजागृती, प्रशिक्षण अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. राज्यात पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर तसेच इतर शहरातही अशाप्रकारचे प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता आहे. अन्न व्यवसायिकांनी आपल्यामध्ये असलेल्या कल्पना, विचार आहेत ते कृतीत आणावे. अन्न व औषध प्रशासन मंत्री व राज्यमंत्री यांच्या निर्देशानुसार विभागाने पुढे येऊन काम करावे व अंमलबजावणीमध्ये अग्रस्थानी राहिले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Saturday, 16 August 2025
गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याची शासनाची भूमिका
गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याची शासनाची भूमिका
- मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल
मुंबई, दि. १३ : गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याची शासनाची भूमिका असून प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वते प्रयत्न केले जातील. या प्रकल्पग्रस्तांना नियमाप्रमाणे सर्व लाभ देण्यात यावेत अशा सूचना मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दिल्या. मंत्रालयात आज गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांसदर्भात आयोजित बैठकीवेळी राज्यमंत्री ॲड. जयस्वाल बोलत होते.
यावेळी पुनर्वसन उपसचिव श्री. बागडे, गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता जयंत गवळी यांच्यासह संबंधित अधिकारी, प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. तर नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, भंडारा जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांना शासनाच्या नियमाप्रमाणे मिळणारे मात्र प्रलंबित असेलेले सर्व लाभ लवकरात लवकर देण्याच्या सूचना देऊन राज्यमंत्री ॲड. जयस्वाल म्हणाले की, धरणग्रस्तांचे दाखले देण्याची प्रक्रिया गतीने करावी. वाढीव कुटुंबांचा लाभ नियमानुसार देण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. पुनर्वसीत गावातील नागरी सुविधा पूर्ण कराव्यात. तसेच पर्यटन, मासेमारी आणि गाळपेरीबाबत स्थानिक प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देण्याचा प्रस्ताव तयार करावा अशा सूचनाही राज्यमंत्री ॲड. जयस्वाल यांनी दिल्या.
बालविवाह प्रथा समुळ नष्ट करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणार
बालविवाह प्रथा समुळ नष्ट करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणार
- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
मुंबई, दि. 13 : बालविवाह प्रथा समुळ नष्ट करण्याच्या दृष्टीने शासन धोरणात्मक निर्णय घेणार आहे. बालविवाह प्रथेमुळे शाळेतून मुलींचे प्रमाण कमी होणे, कमी वयात गर्भधारणा आणि कुपोषण अशा समस्या वाढतात या सर्व दुष्परिणामांना आळा बसण्यासाठी बालिका पंचायतच्या सहभागाने बालप्रथेविरोधात अभियान राबविणे गरजेचे असल्याचे मत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले.
बालविवाह प्रथा राज्यातून समुळ नष्ट करण्याच्या दृष्टीने आज मंत्रालयात युनिसेफ संस्थेसोबत चर्चा करण्यात आली. यावेळी युनिसेफचे राज्याचे मुख्य अधिकारी संजय सिंग, बालसंरक्षण तज्ज्ञ अल्पा वोरा, न्युट्रीशीयन तज्ज्ञ राजी नायर उपस्थित होते.
मंत्री तटकरे म्हणाल्या की, बालकांच्या सुरक्षेसाठी आणि बालविवाहास प्रतिबंध घालण्यासाठी मुलींच्या सहभागातून बालिका पंचायत राबविण्यात येते. याचबरोबर मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे यासाठी लेक लाडकी योजना राबविण्यात येत असून, या योजनेचे अनुदान थेट शाळेचे शुल्क भरण्यासाठी देता येईल का यासंदर्भात् सकारात्मक विचार करण्यात येत आहे. जेणेकरून या योजनेचा थेट संबंधित लाभार्थी मुलींना फायदा होईल आणि शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहन मिळेल.
इतर राज्यापेक्षा महाराष्ट्रात बाल विवाहाचे प्रमाण कमी असून, यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविले जातात. ज्या राज्यात बालविवाह रोखण्यासाठी अभियान यशस्वी ठरले आहे अशा राज्यांचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. बालविवाह प्रथा समुळ नष्ट केल्यास, किशोरवयीन मुलींचे सक्षमीकरण, उच्च शिक्षणात त्यांचे वाढते प्रमाण, कमी वयातील गर्भधारणेस आळा बसणे तसेच कुपोषण रोखण्यास सहकार्य लाभणार आहे.
अमेरिकेने टेरिफ वाढ केल्याच्या पार्श्वभूमीवर मत्स्योत्पादनांसाठी नवीन बाजारपेठांकडे लक्ष केंद्रीत करावे
अमेरिकेने टेरिफ वाढ केल्याच्या पार्श्वभूमीवर मत्स्योत्पादनांसाठी
नवीन बाजारपेठांकडे लक्ष केंद्रीत करावे
देशांतर्गत बाजारातही मत्स्य विक्री वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत
- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे
मुंबई, दि. 13 : अमेरिकेने भारतीय उत्पादनांवर मोठ्या प्रमाणावर टेरिफ वाढवले आहे. त्यामुळे भारतीय उत्पादने अमेरिकेत महाग होऊन त्याची मागणी घटण्याची शक्यता आहे. देशातून मोठ्या प्रमाणावर मत्स्योत्पादन अमेरिकेत निर्यात केले जाते. या टेरिफ वाढीच्या पार्श्वभूमीवर मत्स्योत्पादनासाठी नवनवीन बाजारपेठांकडे लक्ष केंद्रीत करावे. तसेच देशांतर्गत बाजारातही मत्स्यविक्री आणि मत्स्य पुरवठा वाढण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.
अमेरिकेने केलेल्या टेरीफ वाढीचा मत्स्योद्योग, आंबा आणि काजू निर्यातीवर होणाऱ्या परिणांमाविषयी आढावा घेण्यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी मंत्री राणे यांनी सूचना दिल्या. या बैठकीस मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. एन रामास्वामी, मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश पाठक, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
टेरीफ वाढीमुळे होणाऱ्या परिणामांचा विचार करून सागरी उत्पादन विकास प्राधिकरणाची बैठक आयोजित करावी असे सूचित करुन मंत्री राणे म्हणाले की, इतर देशातील बाजारांचा विचार करत असतानाच देशांतर्गत बाजारातही जास्तीत जास्त मासळी विशेषतः कोळंबी विक्रीसाठी कशी आणता येईल. यासाठी शासनस्तरावरून कशा स्वरुपे योजना आणता येईल. तसेच निर्यातदारांना कशा प्रकारे मदत करता येईल याचा प्रारुप आराखडा सादर करण्यात यावा. तसेच देशांतर्गत बाजारपेठेत मासळी पुरवठा वाढवण्याविषयी या व्यवसायातील खासगी संस्थांशी बैठक आयोजित करावी. आंबा निर्यातीसोबतच देशातील महत्वाच्या शहरांमध्ये जसे दिल्ली, बेंगलोर, ग्वाल्हेर, जबलपूर येथे आंबा महोत्सवाचे आयोजन करून आंब्याची देशांतर्गत मागणी वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना मंत्री राणे यांनी यावेळी दिल्या.
राज्यात 'अपना भांडार'च्या माध्यमातून खरेदी विक्रीची साखळी उभारणार
राज्यात 'अपना भांडार'च्या माध्यमातून
खरेदी विक्रीची साखळी उभारणार
- पणन मंत्री जयकुमार रावल
मुंबई, दि. 13 : राज्यात महाराष्ट्र सहकारी ग्राहक महासंघाच्या माध्यमातून शेतकरी आणि ग्राहक या दोन्ही घटकांचा लाभ होईल, या उद्देशाने 'अपना भांडार' या नावाने बहुउद्देशीय ग्राहक भांडारे चालवली जातात. भविष्यात सर्व जिल्ह्यांमध्ये अशी भांडारे उभारून खरेदी-विक्रीची साखळी उभारण्यात येईल, असे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
महाराष्ट्र सहकारी ग्राहक महासंघाच्या कामकाजाचा मंत्री श्री.रावल यांनी मुंबईतील महासंघाच्या कार्यालयात जाऊन आढावा घेतला. यावेळी महासंघाच्या प्राधिकृत समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव भोसले, कार्यकारी संचालक विकास रसाळ, महासंघाचे संचालक जयसिंग गिरासे, संचालक गोकुळ परदेशी यांच्यासह संबंधित पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.
पणन मंत्री श्री.रावल म्हणाले, महासंघाच्या मालकीच्या जागांचा पुनर्विकास करुन त्या सुस्थितीत करुन घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे जेथे भाडेतत्वावर जागा आहेत, त्यांची मालकी मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत. जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती, बचत गटांसाठी उभारले जाणारे मॉल्स आदी ठिकाणी ‘अपना भांडार’ सुरू करण्यात यावेत तसेच याठिकाणी महिला बचत गटांच्या उत्पादनांना सहभागी करुन घ्यावे. राज्यात ग्राहक महासंघाच्या माध्यमातून खरेदी विक्रीची प्रभावी साखळी तयार करून राज्यात एक ब्रँड निर्माण करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
ग्राहक भांडारांचा सप्टेंबरमध्ये मेळावा
राज्यातील ग्राहक भांडारांना ऊर्जितावस्था मिळावी, ज्या संस्था उत्कृष्ट काम करीत आहेत, त्यांचे काम इतरांना प्रेरणादायी ठरावे, या उद्देशाने सर्व ग्राहक भांडारांचा मेळावा सप्टेंबर महिन्यात नाशिक येथे आयोजित करण्यात यावा, असे निर्देश पणन मंत्री श्री.रावल यांनी महासंघाला दिले. यामध्ये इतर राज्यांमध्ये चांगले काम करणाऱ्या संस्थांचे, इ कॉमर्स जाणणाऱ्या व्यक्ती, संस्थांचे, आधुनिक तंत्रज्ञानाचे सहकार्य घ्या, असेही त्यांनी सांगितले.
प्रारंभी कार्यकारी संचालक श्री. रसाळ यांनी महासंघाच्या कार्याची सविस्तर माहिती दिली
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेसाठी तालुकास्तरावर समिती नेमावी
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेसाठी
तालुकास्तरावर समिती नेमावी
- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
· शाळेच्या मुख्याध्यापकांनी या योजनेचे प्रस्ताव स्वतः पाठवण्याची कार्यवाही करावी
मुंबई, दि. 12 : राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेच्या पात्रतेस मान्यता देणारी सध्याची जिल्हास्तरीय समिती ऐवजी तालुकास्तरावर समिती स्थापन करावी. जेणेकरून या योजनेचे प्रस्ताव लवकर मार्गी लागतील. तसेच संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी असे प्रस्ताव स्वतः तयार करून पाठवावेत, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.
मंत्रालयात या विषयी झालेल्या बैठकीत मंत्री श्री.भुसे बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, प्रधान सचिव रणजित सिंह देओल, संचालक कृष्णकुमार पाटील, उपसचिव तुषार महाजन यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदानाच्या योजनेत सुटसुटीतपणा असावा असे सांगून मंत्री श्री.भुसे म्हणाले की, यासाठी कमीत कमी कागदपत्रांची मागणी असावी. हे सानुग्रह अनुदान सध्या असलेल्या रकमेऐवजी वाढवून देण्याचा प्रस्ताव तीन आठवड्यात सादर करावा. या योजनेचा निधी वर्षाच्या सुरुवातीस मिळण्याविषयीच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करावा. गडचिरोली आणि नाशिक जिल्ह्यात विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू आणि काही विद्यार्थी जखमी झाले आहेत, या प्रकरणाचे प्रस्ताव तातडीने मागवून घ्यावेत, अशा सूचना मंत्री श्री.भुसे यांनी दिल्या.
०००००
. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार
डॉ. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार
राज्यस्तरीय ग्रंथालय कार्यकर्ता (ग्रंथमित्र)
१) श्री. धनंजय वसंतराव पवार, अध्यक्ष, श्री. गुणवंतराव रामचंद्र पाटील सार्वजनिक वाचनालय, हासाळा, पो. बुधोडा, ता. औसा, जि. लातूर
राज्यस्तरीय ग्रंथालय सेवक (ग्रंथमित्र)
१) श्रीमती श्रध्दा अशोक आमडेकर, ग्रंथपाल, श्री सदगुरु लोकमान्य वाचनालय देवरुख, तालुका संगमेश्वर, जिल्हा-रत्नागिरी
विभागस्तरीय पुरस्कार
१) अमरावती : श्री. रामभाऊ पंढरी मुळे, सचिव, छत्रपती शाहू सार्वजनिक वाचनालय, मु. पो. हनुमाननगर, अकोला, ता.जि. अकोला.
२) छत्रपती संभाजीनगर : श्री. खंडेराव साहेबराव सरनाईक, अध्यक्ष, श्री संत ज्ञानेश्वर सार्वजनिक वाचनालय, केंद्रा बु., ता. सेनगाव, जि. हिंगोली.
३) नाशिक : श्री. राहुलकुमार मालजी महिरे, अध्यक्ष, बौध्दवासी शांताई महिरे वाचनालय, आखाडे, मु.पो. आखाडे, ता. साक्री, जि.धुळे
४) पुणे : श्री. दत्तात्रय सखाराम देशपांडे, अध्यक्ष, ज्ञानदा मोफत वाचनालय, जरळी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर
५) मुंबई : श्री. सुभाष सीताराम कुळकर्णी, अध्यक्ष, प्रा. माणिकराव कीर्तने वाचनालय वाशी, नवी मुंबई
डॉ. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय सेवक पुरस्कार
१) अमरावती : श्री. अनंत श्रीराम सातव, ग्रंथपाल, सरस्वती वाचनालय, पातुर्डा बु., ता.संग्रामपूर, जि.बुलडाणा
२) छत्रपती संभाजीनगर : श्री. सूर्यकांत कमलाकर जाधव, ग्रंथपाल, विवेकानंद वाचनालय, आलमला, ता. औसा, जि. लातूर
३)नागपूर : श्री. खेमचंद अंताराम डोंगरवार, ग्रंथपाल, श्रीमती सोनाबाई सितारामजी खुणे सार्वजनिक वाचनालय, नवेगाव / बांध, ता.अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया
४)नाशिक : श्री. चिंतामण संतोष उगलमुगले, ग्रंथपाल, ओंकार नगर सार्वजनिक वाचनालय, ओंकारनगर, पेठ रोड, ता.जि. नाशिक
५)पुणे : श्रीमती रुपाली यशवंत मुळे, ग्रंथपाल, श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालय, सातारा.
६)मुंबई : श्री. संजय काशिनाथ शिंदे, ग्रंथपाल, नगर वाचन मंदिर, मालवण, जि. सिंधुदुर्ग
ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, या ग्रंथालयांकडून राज्यातील जनतेला अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाकडून दरवर्षी उत्कृष्ट ग्रंथालयांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
या समयी पुरस्कार प्राप्त परिचय पुस्तिकेचे व राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या सन 2023 च्या मराठी ग्रंथसूचीचे प्रकाशन मान्यवराच्या हस्ते करण्यात आले.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...