Saturday, 16 August 2025

सणासुदीच्या कालावधीमध्ये नागरिकांना निर्भेळ सकस व शुद्ध अन्न उपलब्ध करून देण्याला

 सचिव धीरज कुमार म्हणाले कीसणासुदीच्या कालावधीमध्ये नागरिकांना निर्भेळ सकस व शुद्ध अन्न उपलब्ध करून देण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही याची दक्षता अन्न व्यावसायिकांनी घ्यावी. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून जनजागृती, प्रशिक्षण अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. राज्यात पुणेनागपूर, छत्रपती संभाजीनगर तसेच इतर शहरातही अशाप्रकारचे प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता आहे. अन्न व्यवसायिकांनी आपल्यामध्ये असलेल्या कल्पनाविचार आहेत ते कृतीत आणावे. अन्न व औषध प्रशासन मंत्री व राज्यमंत्री यांच्या निर्देशानुसार विभागाने पुढे येऊन काम करावे व अंमलबजावणीमध्ये अग्रस्थानी राहिले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi