Friday, 15 August 2025

 मुंबईच्या विकासाला नवे पंख:

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण

कोस्टल रोड उद्या पासून २४ तास खुला

लवकरच मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणार

वर्षाला किमान ५० किलोमीटरचे मेट्रो मार्ग उभारण्याचे काम सुरू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. १४ : काही वर्षांपूर्वी आपण मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ हे स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. मेट्रोचे जाळे वेगाने विस्तारात असून वर्षाला किमान ५० किलोमीटरचे मेट्रो मार्ग पूर्ण होत आहेत. तसेच रस्त्यांचे जाळे चांगल्या प्रकारे उभारले जात असून वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका करणाऱ्या दोन महत्त्वाच्या लिंक पुलांचे लोकार्पण करण्यात आले आहे. यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगर प्रवासाच्या वेळेत बचत होणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईकरांसाठी या प्रकल्पांचे लोकार्पण करताना आनंद होत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

वांद्रे येथे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पोडियम येथे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि बृहन्मुंबई महापालिकेच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन व लोकार्पण झाले. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारसांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलारबृहन्मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणीमुंबई प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी उपस्थित होते.

   (१५ ऑगस्ट) मुंबईतील कोस्टल रोड नागरिकांसाठी २४ तास खुला असणार असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीवाहनचालकांनी कोस्टल रोडवर वाहतूक नियमांचे पालन करावेसंपूर्ण कोस्टल रोड सीसीटीव्ही च्या निरिक्षणाखाली आहे. हा मार्ग वाहतुकीच्या दृष्टिकोनातून क्रांतिकारी ठरणार आहे. यात पादचाऱ्यांसाठी प्रेक्षणीय असे वॉकिंग ट्रॅकसायकल ट्रॅक यांचा समावेश आहेअसे फडणवीस यांनी सांगितले.

 मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीपश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी समांतर मार्ग तयार केले जात आहेत. मुंबईतील विविध भागांना जोडणारे टनेल्सलिंक पूल आणि उड्डाणपूल हे वाहतूक सुलभीकरणासाठी उपयुक्त ठरणार आहेत. २०२८-२९ पर्यंत मुंबईत सुरू असलेले विकास प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचे उद्दिष्ट आहे. मुंबईचा विकास करत असताना तो पर्यावरणस्नेही असावा यासाठी आग्रही आहोत. पर्यावरणाकडे दुर्लक्ष करून शाश्वत विकास करता येणार नाही. त्यामुळे विकास प्रकल्प राबवताना पर्यावरणाचा विचार प्रथम केला जात आहे. नव्याने उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पांसाठी परदेशातील तंत्रज्ञानांपेक्षा चांगल्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. लवकरच उपनगरीय रेल्वेतही मेट्रोसारखे वातानुकूलितस्वयंचलित दरवाजे असलेले डबे उपलब्ध होतील. मेट्रो प्रकल्प केवळ वाहतूक सुधारण्यासाठी नसूनरोजगार निर्मितीचाही एक प्रभावी मार्ग आहे. कर्मचाऱ्यांना चांगले निवास व सुविधा दिल्यास त्यांची कार्यक्षमता वाढते. विकासात कोणतीही तडजोड न करतामुंबईच्या प्रगतीचा वेग अधिक वाढवूअसा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मुंबईच्या विकासाला नवे पंख: pl share

 मुंबईच्या विकासाला नवे पंख:

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण

कोस्टल रोड उद्या पासून २४ तास खुला

लवकरच मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणार

वर्षाला किमान ५० किलोमीटरचे मेट्रो मार्ग उभारण्याचे काम सुरू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

दिल्लीतील ‘मऱ्‍हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये 16 ऑगस्टपासून गणेशमूर्ती प्रदर्शन व विक्री

 दिल्लीतील ‘मऱ्‍हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये

16 ऑगस्टपासून गणेशमूर्ती प्रदर्शन व विक्री

 

नवी दिल्ली, 14 : महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या दिल्लीस्थित ‘मऱ्‍हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियमच्या दालनात गणेशमूर्ती प्रदर्शन व विक्रीला यावर्षी  16 ऑगस्ट पासून सुरुवात होणार आहे. हे प्रदर्शन व विक्री 27  ऑगस्ट 2025 पर्यंत सुरू राहणार आहे.

महाराष्ट्रातील मूर्तीकारांच्या कलेला प्रोत्साहन देणेत्यांच्या मूर्तींना दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात बाजारपेठ उपलब्ध करून देणे तसेच दिल्लीतील मराठी आणि अमराठी गणेशभक्तांना दर्जेदार गणेशमूर्ती सहज उपलब्ध करून देण्यासाठी मागील 30 वर्षांपासून हे प्रदर्शन भरवले जाते. दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील  30 पेक्षा अधिक गणेश मंडळांमध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो. यासह मराठी तसेच मराठी कुटुंबात गणेशोत्सव साजरा केला जातो.

यावर्षी एम्पोरियमच्या दालनात सहा इंच ते तीन फूट उंचीच्या एकूण 1,000 शाडूच्या मातीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती उपलब्ध असतील. या मूर्तींची किंमत 600 रुपये ते 30 हजार रुपयांपर्यंत आहे. यासोबतचगणेशमूर्ती सजावटीसाठी लागणारे विविध साहित्यही येथे उपलब्ध आहे. नंदा एस्कोर्टसत्रिभोवनदास झवेरीविविध उद्योजक व मान्यवर दरवर्षी येथून गणेशमूर्ती खरेदी करतात. ठाणे येथील मूर्तिकार मंदार सुर्यकांत शिंदे हे अनेक वर्षांपासून येथे गणेशमूर्ती विक्री व प्रदर्शनासाठी ठेवतात.

बाबा खडकसिंह मार्गवरील ‘मऱ्‍हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये हे प्रदर्शन व विक्री गणेशचतुर्थी 27 ऑगस्ट   2025  पर्यंत दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 7  वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. अधिक माहितीसाठी महामंडळाच्या 011-23363366 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

0000

 

 


वृत्त क्र. 3344


पारंपरिक कुंभार व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत मातीच्या

 प्रेरणादायी यशोगाथा

सातारा जिल्ह्यातील परळी गावातील अंजना शंकर कुंभार यांनी पारंपरिक कुंभार व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत मातीच्या सुबक वस्तूगणेश मूर्तीटेराकोटा शिल्पकलामातीची भांडी आणि खेळणी तयार केली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या उमेद’ अभियानांतर्गत त्यांनी जय सदगुरू कृपा’ नावाचा स्वयंसहाय्य गट स्थापन केलाज्यामध्ये 12 महिला कार्यरत आहेत. या गटाने दीड वर्षांपूर्वी उमेद’ योजनेंतर्गत सहा लाख रुपयांचे कर्ज घेतलेज्याच्या मदतीने त्यांनी आपला व्यवसाय विस्तारला आणि पुणेमुंबईपाटण आणि सातारा येथील बाजारपेठांमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांच्या या यशाची दखल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचली आहे. श्रीमती कुंभार यांना राष्ट्रपती भवनातील विशेष कार्यक्रमासाठी निमंत्रण मिळाले असूनत्या आपल्या पतीसह या समारंभात सहभागी होणार आहेत.

राष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित करण्यासाठी पूर्ण सहकार्य

 निवासी आयुक्त कार्यालयाकडून सहकार्य

सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यशिनी नागराजन यांनी निवासी आयुक्त कार्यालयाकडून बाजारपेठ आणि प्रदर्शनांमध्ये सहभागाची संधी तसेच आवश्यक समर्थनाची विनंती केलेले निवेदन प्रतिनिधींनी यावेळी आर. विमला यांना दिले. श्रीमती विमला यांनी या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत या महिलांना त्यांची उत्पादने राष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित करण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. अशा संधीमुळे ग्रामीण उद्योजकता आणि महिला सक्षमीकरणाला चालना मिळेलअसे त्यांनी नमूद केले.


लखपती दीदींनी आपल्या मेहनतीने आणि कर्तृत्वाने ग्रामीण भारताच्या प्रगतीत मोलाचे योगदान

 निवासी आयुक्त आर. विमला यांनी या दीदींच्या कार्याचे मनापासून कौतुक करत त्यांना या प्रतिष्ठित राष्ट्रीय कार्यक्रमांसाठी मिळालेल्या निमंत्रणाबद्दल हार्दिक अभिनंदन केले. त्या म्हणाल्यालखपती दीदींनी आपल्या मेहनतीने आणि कर्तृत्वाने ग्रामीण भारताच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले आहे. साताऱ्याच्या अंजना कुंभार यांना राष्ट्रपती भवनात आणि इतर दीदींना लाल किल्ल्यावर निमंत्रित केले जाणे हे त्यांच्या यशाचा आणि देशाच्या सक्षमीकरण मोहिमेचा गौरव आहे. महाराष्ट्र सदन त्यांच्या या प्रवासात पूर्ण सहकार्य करेल.

यावेळी आयुक्त आर. विमला यांनी सांगितले कीत्यांनी उमेद’ अभियानामध्ये चार वर्षे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून महिलांसोबत काम केलेले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गटांच्या आत्मनिर्भरतेसाठी काम करण्यात आलेज्यामुळे सुमारे 5 लाख बचतगट (Self-Help Groups) तयार झाले आणि 50 लाख महिलांना जोडले गेले. या प्रयत्नांमुळे 18 लाख महिला शेतकरी आणि उद्योजक म्हणून उदयास आल्या. आज हे यश पाहून त्यांना खूप आनंद झालाअशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात राज्यातील लखपती दीदी आणि

 स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात राज्यातील लखपती दीदी आणि

बचतगटांच्या महिलांची विशेष उपस्थिती

महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्त आर. विमला यांच्याकडून महिलांचे कौतुक;

अंजना कुंभार यांना राष्ट्रपती भवनात विशेष निमंत्रण

 

नवी दिल्ली14 : राजधानी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमांसाठी राज्यातील लखपती दीदी आणि बचतगटाच्या प्रमुख  आणि आत्मनिर्भर क्लस्टर लेव्हल फेडरेशन (CLF)  पुरस्कार विजेत्या दीदी  अशा एकूण 20 महिला सहभागी होणार आहेत.

आज प्रतिनिधिक स्वरूपात काही लखपती दीदी आणि बचतगटातील महिलांनी कस्तुरबा गांधी स्थित महाराष्ट्र सदन येथे निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांची भेट घेतली. यावेळी या महिलांनी आपली हस्तकलाखाद्यपदार्थ आणि स्थानिक उत्पादने भेट म्हणून निवासी आयुक्तांना दिली.

यंदाच्या स्वातंत्र्य दिन समारंभासाठी सातारा जिल्ह्यातील परळी (ता. सातारा) येथील महिला उद्योजिका अंजना शंकर कुंभार यांना राष्ट्रपती भवनातील विशेष स्वागत समारंभासाठी निमंत्रण मिळाले आहे. तसेचसातारा जिल्ह्यातील लखपती दीदीबचतगट सदस्यांना आणि भंडारा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील आत्मनिर्भर क्लस्टर लेव्हल फेडरेशन (CLF) पुरस्कार विजेत्या दीदी यांना लाल किल्ल्यावरील ध्वजारोहण सोहळ्यासाठी विशेष निमंत्रण प्राप्त झाले आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील  श्रीमती रूपाली सत्यवान जाधव (कारंवडी)श्रीमती जयश्री शिवाजी जांभोडे (नायगांव)श्रीमती शैला शरद पवार (धोंडेवाडी)श्रीमती वैशाली राजेश धर्मे (रेठरे बुद्रुक)श्रीमती स्वप्नाली जितेंद्र जाधव (जांब खुर्द)श्रीमती सुवर्णा पांडुरंग देशमुख (कापील)श्रीमती मंगल सुरेश मारढेकर (कुदळ)श्रीमती रुबिना नसरुद्दीन मुलाणी (कुलालजाई)कुमारी मंगल दादासो हजारे (कोपर्डे हवेली)कुमारी शोभा विजय रांजणे (डापवाडी)श्रीमती छाया अजित कदम (अरळे)श्रीमती अश्विनी संदीप कदम (अरळे)श्रीमती भाग्यश्री मंदार जाधव (ओझर्डे)श्रीमती सरस्वती सुरेश निकम (मुमगासेवाडी) श्रीमती सुजाता चंद्रकांत महांगडे (पारखंडी)भंडारा जिल्ह्यातील श्रीमती उषा राजू कावळे,  श्रीमती रेखा सुधीर चाचणे आणि रत्नागिरी जिल्ह्यातील श्रीमती  आशा संभाजी जाधव श्रीमती प्रज्ञा प्रमोद सुर्वे  यांचा समावेश आहे.

Featured post

Lakshvedhi