Friday, 15 August 2025

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात राज्यातील लखपती दीदी आणि

 स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात राज्यातील लखपती दीदी आणि

बचतगटांच्या महिलांची विशेष उपस्थिती

महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्त आर. विमला यांच्याकडून महिलांचे कौतुक;

अंजना कुंभार यांना राष्ट्रपती भवनात विशेष निमंत्रण

 

नवी दिल्ली14 : राजधानी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमांसाठी राज्यातील लखपती दीदी आणि बचतगटाच्या प्रमुख  आणि आत्मनिर्भर क्लस्टर लेव्हल फेडरेशन (CLF)  पुरस्कार विजेत्या दीदी  अशा एकूण 20 महिला सहभागी होणार आहेत.

आज प्रतिनिधिक स्वरूपात काही लखपती दीदी आणि बचतगटातील महिलांनी कस्तुरबा गांधी स्थित महाराष्ट्र सदन येथे निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांची भेट घेतली. यावेळी या महिलांनी आपली हस्तकलाखाद्यपदार्थ आणि स्थानिक उत्पादने भेट म्हणून निवासी आयुक्तांना दिली.

यंदाच्या स्वातंत्र्य दिन समारंभासाठी सातारा जिल्ह्यातील परळी (ता. सातारा) येथील महिला उद्योजिका अंजना शंकर कुंभार यांना राष्ट्रपती भवनातील विशेष स्वागत समारंभासाठी निमंत्रण मिळाले आहे. तसेचसातारा जिल्ह्यातील लखपती दीदीबचतगट सदस्यांना आणि भंडारा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील आत्मनिर्भर क्लस्टर लेव्हल फेडरेशन (CLF) पुरस्कार विजेत्या दीदी यांना लाल किल्ल्यावरील ध्वजारोहण सोहळ्यासाठी विशेष निमंत्रण प्राप्त झाले आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील  श्रीमती रूपाली सत्यवान जाधव (कारंवडी)श्रीमती जयश्री शिवाजी जांभोडे (नायगांव)श्रीमती शैला शरद पवार (धोंडेवाडी)श्रीमती वैशाली राजेश धर्मे (रेठरे बुद्रुक)श्रीमती स्वप्नाली जितेंद्र जाधव (जांब खुर्द)श्रीमती सुवर्णा पांडुरंग देशमुख (कापील)श्रीमती मंगल सुरेश मारढेकर (कुदळ)श्रीमती रुबिना नसरुद्दीन मुलाणी (कुलालजाई)कुमारी मंगल दादासो हजारे (कोपर्डे हवेली)कुमारी शोभा विजय रांजणे (डापवाडी)श्रीमती छाया अजित कदम (अरळे)श्रीमती अश्विनी संदीप कदम (अरळे)श्रीमती भाग्यश्री मंदार जाधव (ओझर्डे)श्रीमती सरस्वती सुरेश निकम (मुमगासेवाडी) श्रीमती सुजाता चंद्रकांत महांगडे (पारखंडी)भंडारा जिल्ह्यातील श्रीमती उषा राजू कावळे,  श्रीमती रेखा सुधीर चाचणे आणि रत्नागिरी जिल्ह्यातील श्रीमती  आशा संभाजी जाधव श्रीमती प्रज्ञा प्रमोद सुर्वे  यांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi