विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी महिलांची जोखीम ओळखण्याची नैसर्गिक क्षमता समाजाच्या सुरक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे नमूद केले. ही निरीक्षणक्षमता केवळ घरापुरती मर्यादित नसून, सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः उत्सव आणि गर्दीच्या काळात, अत्यंत प्रभावी ठरते. महिलांचा सहभाग प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्थांच्या कार्यात वाढल्यास गुन्हे रोखणे आणि आपत्ती टाळणे अधिक सोपे होईल, असे त्यांनी सांगितले. गणेशोत्सव काळात नागरिकांना सतर्क राहण्याचे मार्गदर्शन करण्यासाठी महिला दक्षता समित्यांनी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Thursday, 14 August 2025
महिलांची जोखीम ओळखण्याची क्षमता समाजसुरक्षेसाठी महत्त्वाची
महिलांची जोखीम ओळखण्याची क्षमता समाजसुरक्षेसाठी महत्त्वाची
— विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
सणासुदीच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता समित्यांनी सज्ज राहावे
— विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई, दि. १४ : विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या संकल्पनेतून “महिला सुरक्षितता, सणासुदीच्या काळातील कायदा व सुव्यवस्था आणि शहरातील आपत्ती व्यवस्थापन” या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले. या कार्यशाळेला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुंबई पोलीस, मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि महिला दक्षता समित्यांचा यामध्ये सक्रिय सहभाग होता.
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कार्यशाळेत सांगितले की, सणासुदीच्या काळातील कायदा व सुव्यवस्था राखणे, नैसर्गिक आपत्ती किंवा गर्दीच्या ठिकाणी महिलांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. महिला दक्षता समित्यांनी स्थानिक पोलीस स्टेशन, बीट कॉन्स्टेबल आणि सामाजिक संस्थांशी समन्वय साधून सक्रियपणे कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. महिलांवरील अत्याचार प्रतिबंध, स्त्री-पुरुष समानता, स्त्रीभ्रूणहत्या प्रतिबंध, कौटुंबिक हिंसाचार याबाबत जनजागृती करताना कायदेशीर तरतुदींची माहिती देणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मुंबईत १८ ऑगस्ट रोजी ‘जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन’ पीडित महिलांच्या तक्रारींच्या निवारणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष उपक्रम
मुंबईत १८ ऑगस्ट रोजी ‘जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन’
पीडित महिलांच्या तक्रारींच्या निवारणासाठी
जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष उपक्रम
मुंबई, दि. १४ : महिलांना आपले प्रश्न व तक्रारी मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा यासाठी महिला व बाल विकास विभागाच्यावतीने ‘महिला लोकशाही दिन’ जिल्हास्तरावर साजरा केला जातो. यंदा हा उपक्रम १८ ऑगस्ट २०२५ रोजी, सकाळी ११.०० ते दुपारी १.०० या वेळेत, जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे होणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी दिली आहे.
या दिवशी समस्याग्रस्त व पीडित महिलांना शासकीय यंत्रणेकडून तक्रारींचे निवारण करण्यासाठी सुलभ मार्गदर्शन व साहाय्य मिळणार आहे. इच्छुकांनी तक्रार अर्ज विहित नमुन्यात भरून, आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, ११७ बी.बी.डी. चाळ, पहिला मजला, वरळी, मुंबई ४०००१८ येथे सादर करावेत.
न्यायप्रविष्ट प्रकरणे, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्याबाहेरील किंवा अपूर्ण कागदपत्रांसह अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच तक्रार वैयक्तिक स्वरूपाची असणे आवश्यक आहे. महिला व बाल विकास विभागाने सर्व महिलांना लोकशाही दिनाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.
0000
बीडीडीवासियांच्या घरांची स्वप्नपूर्ती वरळी बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील इमारतींचे व सदनिकांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी
बीडीडीवासियांच्या घरांची स्वप्नपूर्ती
वरळी बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील इमारतींचे व सदनिकांची
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी
वरळीतील बीडीडी चाळीत अनेक पिढ्यांपासून राहणाऱ्या कुटुंबांसाठी आजचा दिवस विशेष ठरला. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील बांधकाम पूर्ण झालेल्या दोन पुनर्वसन इमारतीतील सदनिकांच्या वाटप कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी इमारतीची व सदनिकेची पाहणी केली.
यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार मिलिंद देवरा, मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री ॲड.आशिष शेलार, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, गृहनिर्माण व नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर आदी उपस्थित होते. भर पावसात बीडीडी वासियांनी उपस्थित राहून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे स्वागत केले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. शिंदे व उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्यासह सर्व मान्यवरांनी इमारतीच्या 40 व्या मजल्यावर जाऊन सदनिकेची पाहणी केली व कामाबद्दल समाधान व्यक्त केले. मुख्याधिकारी श्री. बोरीकर यांनी प्रकल्पाची माहिती दिली.
चावी मिळालेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य
चावी मिळालेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य - उपमुख्यमंत्री अजित पवार
बीडीडी चाळ पुनर्विकास योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील घरांचे वितरण हा भावनिक क्षण आहे. जुन्या १६० चौरस फूट घरांतून आता ५०० चौरस फूट सुसज्ज घरात जायला मिळत आहे. चावी हातात घेतलेल्या प्रत्येक रहिवाशाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, बीडीडी चाळ या ‘मिनी भारताने’ देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, क्रांतिकारकांची प्रेरणा, तसेच सामाजिक-राजकीय घडामोडींचे हे केंद्र राहिले आहे. वासुदेव बळवंत फडके यांसारखे क्रांतिकारी येथे घडले. ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या ‘बटाट्याची चाळ’ मधून उभा राहिलेला चाळीचा जिवंत इतिहास आजही स्मरणात आहे.
या प्रकल्पातील दर्जेदार बांधकाम, जागेचा सुयोग्य वापर आणि रहिवाशांच्या विश्वासाला पात्र राहण्याचे काम केले गेले आहे. या प्रकल्पाप्रमाणेच धारावीकरांचे सुसज्ज घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि मुंबईतील सामान्य नागरिकांचे राहणीमान उंचावण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. रहिवाशांनी घरे कोणत्याही मोहात न पडता विकू नये. ही आपल्या कष्टाची कमाई आहे आणि ती जपावी. मुंबई शहरात राबविण्यात येत असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांना तसेच पुनर्विकासाच्या प्रकल्पांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिली.
राज्य शासनाने मेट्रो नेटवर्क, अटल सेतूसारखे महामार्ग प्रकल्प, खड्डेमुक्त रस्ते आणि शहर सुशोभीकरणाच्या कामांना
राज्य शासनाने मेट्रो नेटवर्क, अटल सेतूसारखे महामार्ग प्रकल्प, खड्डेमुक्त रस्ते आणि शहर सुशोभीकरणाच्या कामांना गती दिली आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी होणार असून मुंबई-एमएमआरचा विकास वेगाने होईल. गृहनिर्माण धोरणानुसार गिरणी कामगार, झोपडपट्टी रहिवासी, विद्यार्थी, नोकरदार महिला सर्व घटकांचा समावेश करण्यात आला आहे. गृहनिर्माणाच्या क्लस्टर विकासामुळे मोकळी जागा, खेळाची मैदाने, सोसायटी सुविधा उपलब्ध होत आहेत. धारावी पुनर्विकास हा गृहनिर्माण पुनर्विकासातील सर्वात मोठा टप्पा ठरणार आहे, जो जगभरातून पाहायला लोक येतील.
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प गुणवत्तापूर्ण पुनर्विकासाचा नवा आदर्श
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प गुणवत्तापूर्ण पुनर्विकासाचा नवा आदर्श - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मागील तीन-चार पिढ्यांपासून बीडीडी चाळीत राहणाऱ्या हजारो कुटुंबांच्या हक्काच्या घराचे स्वप्न आता वास्तवात उतरत आहे. केवळ घर नव्हे, तर उत्तम दर्जा, आधुनिक सुविधा आणि दीर्घकालीन टिकाऊपणा हे या पुनर्विकासाचे वैशिष्ट्य ठरत आहे. हा प्रकल्प पुनर्विकासाचा नवा आदर्श आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, बांधकामातील ' सेलेबल कंपोनंट' सारखीच उच्च गुणवत्ता थेट रहिवाशांच्या घरांसाठी ठेवण्यात आली आहे. या इमारती पुढील १०० वर्षे टिकाव्यात, १२ वर्षे मेंटेनन्स मुक्त राहाव्यात यासाठी उत्कृष्ट साहित्य व तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. जागेचा पुरेपूर वापर, सुयोग्य आराखडे आणि रहिवाशांच्या गरजा लक्षात घेत बांधकाम करण्यात आले आहे. ब्रिटिश काळात कामगारांसाठी बांधलेल्या बीडीडी चाळीमध्ये देशभरातील विविध भागांतून आलेल्या लोकांनी आयुष्य घालवले. या परिसराने कामगार चळवळी, सामाजिक आंदोलनं, सांस्कृतिक घडामोडी अनुभवलेल्या आहेत. आज त्या ठिकाणीच, आधुनिक इमारती, मोकळी जागा, गार्डन, मैदान, क्लब हाऊससारख्या सुविधा देऊन एक ‘वॉक टू वर्क’ संकल्पना प्रत्यक्षात आणली जात आहे. या सदनिकांचे मालकी हक्क महिलांच्या नावे असावे, यासाठी काही तरतूद करावी, अशा सूचनाही यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...