Thursday, 14 August 2025

स्वातंत्र्य दिनाचा शासकीय कार्यक्रम सकाळी ९.०५ वाजता

 स्वातंत्र्य दिनाचा शासकीय कार्यक्रम सकाळी ९.०५ वाजता

 

मुंबईदि. ११ : भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन समारंभ शुक्रवारदिनांक १५ ऑगस्ट२०२५ रोजी साजरा करण्यात येणार आहे. राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते मंत्रालयमुंबई येथे तसेच राज्यपाल यांच्या हस्ते पुणे येथे ध्वजारोहण करुन साजरा करण्यात येईल. ध्वजारोहणाचा जिल्ह्याच्या/ विभागाच्या मुख्यालयातील मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी ९.०५ वाजता आयोजित करण्यात यावा. या दिवशी सकाळी ८.३५ ते ९.३५ वाजता या वेळेत इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी ८.३५ वाजे पूर्वी किंवा ९.३५ वाजेनंतर आयोजित करावाअशा सूचना राजशिष्टाचार विभागामार्फत देण्यात आल्या आहेत.

राज्यात स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी खालीलप्रमाणे निदेश देण्यात येत आहेत.

राज्यात सर्व विभागीय/ जिल्हा/ उप विभागीय/ तालुका मुख्यालयात तसेच ग्रामपंचायत मुख्यालय येथे ध्वजारोहण करुन स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात यावा. विभागीय आयुक्त पुणेनागपूरछत्रपती संभाजीनगरनाशिकअमरावती व कोकण यांनी आपापल्या विभागातील तसेच जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्याची योग्य ती व्यवस्था करावी. काही मंत्री महोदय एकापेक्षा अधिक जिल्ह्यांचे पालकमंत्री असल्याने राष्ट्रध्वजारोहण कार्यक्रमासाठी शासनाकडून त्यांच्याकरिता एक जिल्हा निश्चित करुन देण्यात येत आहे. यानुसार त्या जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी त्यांच्याकडून ध्वजारोहण करण्यात येईल. राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत वाजविण्यात येईल व त्यानंतर लगेचच सावधान स्थितीत येऊन राज्यगीत वाजविण्यात येईल.

याप्रसंगी भाषणांचा विषय हा स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व विषद करणारा तसेच उपस्थितांना देशाची एकता व अखंडता अबाधित ठेवण्यासाठी कार्य करण्यासाठी प्रेरित करणारा असावा. संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसिलदार हे अनुक्रमे उपविभागीय मुख्यालय व तालुका मुख्यालय आणि सरपंच किंवा गांव प्रमुख हे ग्रामपंचायत मुख्यालय येथे ध्वजारोहण करतील. समारंभास उपस्थित राहणाऱ्या सर्व व्यक्तींनी राष्ट्रीय पोषाख परिधान करावा.

दिवसभरातून विविध कार्यक्रम जसे वृक्षारोपणआंतरशालेयआंतरमहाविद्यालय वाद-विवाद स्पर्धाप्रश्नमंजूषा/ देशभक्तीपर निबंध व कविता स्पर्धांचे आयोजन करावे. निवडक विद्यार्थी/ विद्यार्थीनीचे देशभक्तीपर गाणे/भाषणे आयोजित करावीत. शासकीय इमारतीवर विद्युत रोषणाई करावीएखाद्या विषयाचा Webinar आयोजित करावादेशभक्तीपर मोहीम राबविण्यात यावीतसेच देशभक्तीपर किंवा राष्ट्रीय एकात्मतेसंबंधातील गाण्यांचा प्रचार करावा.

गुत्ती येथील सौरऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण; विविध योजनांचे लाभ वाटप

 गुत्ती येथील सौरऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पणविविध योजनांचे लाभ वाटप

मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना २.० अंतर्गत जळकोट तालुक्यातील गुत्ती येथे उभारण्यात आलेल्या पाच मेगावॉट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. या प्रकल्पामुळे ७७२ शेतीपंपांना दिवसा वीज मिळणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या लातूर जिल्हा : वाटचाल प्रगतीकडे’ या विशेष पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच महिला बचतगटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी उमेद अंतर्गत तयार करण्यात आलेल्या हिरकणी हाट’ लोगोचे अनावरण यावेळी करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या व्हॉट्सअप चॅटबॉटचे उपक्रमालाही यावेळी मुख्यमंत्री यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. उमेद अंतर्गत तुळजाई उद्योग समुहास २ कोटी ५ लक्ष रूपयाचा धनादेशतसेच रमाई घरकुल लाभार्थ्यांना घरकुलाची चावी यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

महाराष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. पुष्पगुच्छशाल व स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याची प्रतिकृती देऊन उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन उद्धव फड यांनी केले. माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

*****


दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा

  

दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

मुंबईदि. १२ : मुंबई महानगर क्षेत्रांत प्रवेश करताना मीरा-भाईंदर शहराच्या वेशीवर असलेल्या दहिसर टोल नाक्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन अनावश्यक इंधनाचा अपव्यय होतो. तसेच वाहनांच्या प्रदुषणामुळे पर्यावरणाची देखील हानी होते. त्यासाठी दहिसर टोल नाका पुढे २ किलोमीटर अंतरावरील वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

मंत्री श्री. सरनाईक म्हणालेउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील अनेक टोल नाके रद्द केले तसेच सर्व टोल नाक्यावरील लहान वाहनांना टोलमाफी केली. या निर्णयाचे सर्वसामान्य जनतेने स्वागत केले आहे. दहिसर टोल नाक्यामुळे मिरा भाईंदर शहरातील १५ लाख स्थानिक नागरिकवाहनचालकतसेच मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. यामुळे प्रवासाचा वेळ वाढत असून इंधनाचा विनाकारण अपव्यय होत आहे.

परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कीमीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीतील हा टोल नाका शहराच्या आत असल्यानेवाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी हा टोल नाका २ किलोमीटर अंतरावरील वेस्टर्न हॉटेलसमोर हलवावा. यामुळे मीरा-भाईंदर व मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक सुलभ होईल.

या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच बैठक घेऊन हा प्रश्न सोडवला जाईल अशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे ही मागणी मान्य झाल्यासस्थानिक नागरिकांना टोलमुक्त प्रवासाचा लाभ मिळेल आणि वाहतुकीवरील ताण कमी होईलअसा विश्वासही परिवहन मंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता २० गंभीर आजारांसाठी मदत: pl share

 २० गंभीर आजारांसाठी मदत:

 

• कॉक्लियर इम्प्लांट (वय वर्षे २ ते ६)

• हृदययकृतकिडनीफुफ्फुसबोन मॅरो प्रत्यारोपण

• कर्करोग (शस्त्रक्रियाकेमोथेरपीरेडिएशन)

• रस्ते अपघात

• बालकांच्या शस्त्रक्रिया

• हिप व गुडघा रिप्लेसमेंट

• मेंदूचे आजारडायालिसिसअस्थिबंधन

• बर्न/विद्युत अपघातग्रस्त रुग्ण

• नवजात शिशुंचे आजार इ.

आवश्यक कागदपत्रे:

• रुग्णाचे आधार कार्ड व रेशन कार्ड

• रुग्ण दाखल असल्यास जिओ टॅग फोटो (अनिवार्य)

• तहसील उत्पन्नाचा दाखला (1.60 लाखांपेक्षा कमी)

• वैद्यकीय रिपोर्ट व खर्चाचे प्रमाणपत्र

• एफआयआर (अपघातग्रस्तांसाठी)

• झेडटीसीसी पावती (अवयव प्रत्यारोपणासाठी)

सर्व कागदपत्रे PDF स्वरूपात खालील ईमेलवर पाठवा:

aao.cmrf-mh@gov.in

अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक: 9321 103 103


नागपूर विभागातील १,५८२ रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १३.८१ कोटींची मदत

  

नागपूर विभागातील १,५८२ रुग्णांना

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १३.८१ कोटींची मदत

 

मुंबई, दि. १२ : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष मोठा आधार बनला आहे. नागपूर विभागात मागील सात महिन्यांत तब्बल १५८२ रुग्णांना १३ कोटी ८१ लाख २० हजार रुपयांची वैद्यकीय मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार पेपरलेस आणि डिजिटल प्रणालीजिल्हा कक्षांची स्थापना करण्यात आली असल्याने रुग्णांना मंत्रालयात येण्याची गरज भासत नाही. रुग्णांनी प्रथम महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनाआयुष्मान भारतराष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम किंवा धर्मादाय रुग्णालयांच्या योजनांचा लाभ घ्यावा. जर या योजनांद्वारे उपचार शक्य नसतीलतर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकडे संलग्न असणाऱ्या रुग्णालयातून अर्ज करता येतो. यामुळे शासकीय योजनांचा वापर होतो आणि निधी खऱ्या गरजू रुग्णांपर्यंत पोहोचतो.

संपूर्ण राज्यात पेपरलेस प्रणालीजिल्हा कक्षांची स्थापना आणि विविध सकारात्मक बदलांमुळे गरजू रुग्णांपर्यंत वेळेत मदत पोहोचत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार कक्षाचे कामकाज पारदर्शक पद्धतीने राबवले जात असून निधी खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचत आहे. यापुढेही जास्तीतजास्त गरजू रुग्णांना मदत केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी कळविले आहे.

 

नागपूर विभागातील मदतीचा आढावा

(१ जानेवारी ते ३१ जुलै २०२५)

 

जिल्हा   रुग्णसंख्या   मदत रक्कम

नागपूर  1396         12,16,82,000

वर्धा        41           39,55,000

भंडारा     31           29,35,000

गोंदिया    50           39,00,000

चंद्रपूर      54          47,48,000

गडचिरोली  9           9,00,000

रक्षाबंधन निमित्त प्रवासी वाहतुकीतून एसटीला १३७ कोटी रुपयांचे उत्पन्न

 रक्षाबंधन निमित्त प्रवासी वाहतुकीतून

एसटीला १३७ कोटी रुपयांचे उत्पन्न

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

मुंबईदि. १२ : यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे ८ ते ११ ऑगस्ट २०२५ या चार दिवसांमध्ये प्रवाशी वाहतुकीतून एसटीला १३७.३७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे ११ ऑगस्टला एका दिवशी तब्बल ३९ कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळाले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षातील हे विक्रमी उत्पन्न आहेअशी माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

      मंत्री श्री. सरनाईक म्हणालेदरवर्षी एसटीला रक्षाबंधन आणि भाऊबीज (दिवाळी ) या दोन दिवसात विक्रमी उत्पन्न मिळत असते. कारणया दिवशी भाऊ बहिणीकडे किंवा बहिण भावाकडे असे प्रवासी दळणवळण मोठ्या प्रमाणामध्ये होते. परिणामीगेली कित्येक वर्ष रक्षाबंधन सणाच्या कालावधी एसटीला त्या वर्षातील विक्रमी उत्पन्न मिळत आले आहे. यंदा रक्षाबंधन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी एसटीला प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी ३०.०६ कोटी रुपये,  रक्षाबंधन दिवशी म्हणजे शनिवारी ३४.८६ कोटी व दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी ३३.३६ कोटी रुपये तर सोमवारी तब्बल ३९.९ कोटी इतके विक्रमी उत्पन्न एसटीला मिळाले आहे. रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने ८ ते ११ ऑगस्ट या ४ दिवसात १ कोटी ९३ लाख प्रवाशांनी एसटीमधून सुरक्षित प्रवास केला आहे. त्यामध्ये महिला प्रवाशांची संख्या तब्बल ८८ लाख आहे.

                रक्षाबंधन सणानिमित्त एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल एसटी महामंडळाचे अध्यक्ष व परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी आभार मानले आहेत. तसेच आपल्या घरी सण असून देखील कर्तव्याला प्राधान्य देत अत्यंत मेहनतीने काम करुन विक्रमी उत्पन्न आणणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे मंत्री श्री. सरनाईक यांनी अभिनंदन केले आहे.

राष्ट्रीय अनुसूचित जाती मागासवर्ग वित्तीय विकास महामंडळ (NSCFDC), राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्तीय विकास महामंडळ (NSKFDC) यांच्या योजना pl share

 राष्ट्रीय अनुसूचित जाती मागासवर्ग वित्तीय विकास महामंडळ (NSCFDC), राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्तीय विकास महामंडळ (NSKFDC) यांच्या योजना राज्यातील महामंडळामार्फत राबविण्यात येतात. यासाठी राष्ट्रीय महामंडळाकडून राज्य महामंडळास कर्ज स्वरूपात निधी उपलब्ध करून दिला जातो. या कर्जनिधीमधून मुदती कर्ज योजनाबीज भांडवल योजना लघुऋण वित्त योजनातसेच शैक्षणिक कर्ज योजना राबविल्या जातात.

या योजना राबविण्यासाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळास ६०० कोटीसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळास १०० कोटीआणि संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळास ५० कोटी रुपयांच्या शासन हमीस पाच वर्षांची मुदतवाढ देण्यात आली.  यामुळे प्रलंबित कर्ज प्रकरणे निकाली निघतील त्याचबरोबर नवीन लाभार्थ्यांनाही कर्ज मिळेल.

Featured post

Lakshvedhi