Thursday, 14 August 2025

ग्रंथालय कर्मचाऱ्यांना राज्य कामगार विमा योजनेचा लाभ देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेणार

 ग्रंथालय कर्मचाऱ्यांना राज्य कामगार विमा योजनेचा

लाभ देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेणार

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 

मुंबईदि. १३ : राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या कर्मचाऱ्यांना राज्य कामगार विमा योजना (ESIS) लागू करण्यासाठी नोंदणीसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी दिली.

आज मंत्रालयात यासंदर्भात आयोजित बैठकीला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकरराज्य ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणालेशासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना ही योजना लागू झाल्यानंतर राज्यातील जवळपास २० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना याचा थेट फायदा होईल. यासाठीचा सविस्तर प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठवून यामधील तांत्रिक बाबींची तपासणी राज्य कामगार विमा योजनेतील  ग्रंथालय कर्मचाऱ्यांना कसा लाभ मिळवता येईल  या संदर्भात निर्णय घेण्यात येईल.

तसेचकोल्हापूर जिल्हा ग्रंथालयाला राजाराम महाविद्यालयात इमारतीसाठी जागा आणि निधी उपलब्ध करून देण्यासाठीही सकारात्मक निर्णय घेतला जाईलअसेही मंत्री श्री. पाटील यांनी बैठकीत सांगितले.

अवयवदान प्रबोधन चळवळ निरंतर सुरू ठेवू, अवयवदानाचे महत्त्व घराघरात पोहोचवूया.

 अवयवदान प्रबोधन चळवळ निरंतर सुरू ठेवू,

अवयवदानाचे महत्त्व घराघरात पोहोचवूया.

- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

 

            मुंबईदि. 13 : "अवयवदान  प्रबोधन चळवळ  निरंतर सुरू ठेवूमरणोत्तर अवयवदानाचे महत्त्व घराघरात पोहोचवू आणि पुढील वर्षीच्या अवयवदान पंधरवड्यात उत्कृष्ट कार्यासाठी एकमेकांचे अभिनंदन करण्याची संधी निर्माण करू,"  असे आवाहन  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

            सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागमहाराष्ट्र शासन आणि झेडटीसीसी यांच्या संयुक्त विद्यमाने अवयवदान पंधरवड्यानिमित्त राज्यातील जिल्हा आरोग्य अधिकारीजिल्हा शल्य चिकित्सकआरोग्य  विभागाचे उपसंचालक तसेच इतर खासगी रुग्णालयाच्या प्रमुखांचे प्रशिक्षण कार्यक्रम सायन मुंबई येथे आयोजित केला होता.  

            राज्यात 3 ते 15 ऑगस्टदरम्यान अवयवदान पंधरवडा साजरा केला जात आहे. या कालावधीत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागवैद्यकीय शिक्षण विभागविविध सेवाभावी संस्था व खासगी रुग्णालये अवयवदान मोहिमेचा प्रचार-प्रसार करत आहेत. लोकांनी अंधश्रद्धा व अनावश्यक भीती न बाळगता मरणोत्तर अवयवदानासाठी पुढे यावे व ही चळवळ गतिमान करावी, असे मंत्री श्री. आबिटकर यांनी यावेळी सांगितले.

            सध्या अवयव प्रतिक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या मोठी असल्याने जनप्रबोधनाची गती अधिक वाढवण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी राज्यभर सर्व पालकमंत्र्यांच्या हस्ते अवयव दात्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात येणार आहे. या उपक्रमाला सर्व माध्यमांतून प्रसिद्धी मिळावीजेणेकरून अवयवदात्यांच्या योगदनाचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचेलही प्रबोधन चळवळ निरंतर सुरू ठेवूआपल्या सर्वांच्या कामाचे सातत्याने मूल्यमापन करू आणि पुढील वर्षीच्या पंधरवड्यात उत्कृष्ट कार्यासाठी एकमेकांचे अभिनंदन करण्याची संधी निर्माण करूअसा संकल्पही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

विकसित महाराष्ट्र २०४७ करिता मांडलेल्या संकल्पना राज्याच्या दीर्घकालीन विकास आराखड्यासाठी उपयुक्त

 विकसित महाराष्ट्र २०४७ करिता मांडलेल्या संकल्पना

राज्याच्या दीर्घकालीन विकास आराखड्यासाठी उपयुक्त

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र २०४७ बिग आयडियाज ब्रेनस्टॉर्मिंग कार्यशाळा संपन्न

 

मुंबईदि. १३ : विकसित महाराष्ट्र २०४७ - बिग आयडियाज ब्रेनस्टॉर्मिंग कार्यशाळेत मांडण्यात येणाऱ्या संकल्पना या महाराष्ट्र राज्याच्या दीर्घकालीन विकास आराखड्यासाठी उपयुक्त आहेत. या कार्यशाळेतील चर्चेतून मांडलेल्या संकल्पना पुढील २०-२५ वर्षांसाठी प्रभावी दस्तावेज तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्धार असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

सह्याद्री अतिथिगृह येथे नियोजन विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या विकसित महाराष्ट्र २०४७ - बिग आयडियाज ब्रेनस्टॉर्मिंग कार्यशाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेविकसित भारत घडवण्यासाठी महाराष्ट्राने सर्वाधिक चांगली कामगिरी करणे आवश्यक आहे. त्यामुळेच नीती आयोगाने महाराष्ट्राबाबत विशेष लक्ष दिले आहे. या संवाद प्रक्रियेतून राज्याच्या विकासाला चालना देणाऱ्या मोठ्या कल्पना’ समोर येतीलअसा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम म्हणालेव्हिजन तयार करण्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर तयारी झाली आहे. मंत्रालयातील विविध विभागाच्या सचिवांसह लाखो लोकांच्या सूचना मिळाल्या आहेत. त्या माहितीतून त्याची प्रकरणे (चॅप्टर्स) तयार झाले असून ते सध्या मसुदा अवस्थेत आहेत. राज्याचे रूपांतर घडवून आणण्यासाठी काही मोठ्या कल्पनाजलद अंमलबजावणी योग्य उपाय सुचवणे हे या कार्यशाळेचे मुख्य उद्दिष्ट होते. ही चर्चा सचिवांनी आजवर जे काम केले आहेत्याचाच एक भाग आहे. या सर्व कल्पना एकत्र करूनत्या योजनामध्ये समाविष्ट केल्या जातील आणि त्याचा पहिला मसुदा सादर करण्यात येईलअसे श्री. सुब्रह्मण्यम यांनी सांगितले.

या कार्यशाळेत रोजगार संधीपायाभूत सुविधासक्षमीकरण आणि जीवनमानाची गुणवत्तासंस्थात्मक क्षमता आणि सुशासन या प्रमुख चार मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.


विकसित भारताचे स्वप्न, विकसित महाराष्ट्राची साथ

 विकसित भारताचे स्वप्नविकसित महाराष्ट्राची साथ

गेल्या दशकात देशासह महाराष्ट्राचा वेगवान विकास

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईदि. १३ : गेल्या दहा वर्षांमध्ये भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगतीचे नवे शिखर गाठले आहे. ११व्या क्रमांकावर असलेली भारताची अर्थव्यवस्था आता चौथ्या क्रमांकावर पोहोचली असूनही भरारी प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील दूरदर्शी धोरणांमुळे शक्य झाली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध देशांच्या वाणिज्य दूतांसोबत आयोजित स्नेहभोजनाच्या कार्यक्रम प्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

 विविध देशांचे वाणिज्यदूत आणि अधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधानांनी शाश्वत विकासाचे ध्येय समोर ठेवत भारताला केवळ प्रगत राष्ट्र बनवण्याचे नव्हेतर संपूर्ण जगाच्या विकासाचे इंजिन बनवण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीगेल्या दशकात पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व गुंतवणूक झाली आहे. नव्या रस्त्यांचे जाळेआंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळबुलेट ट्रेन प्रकल्पवाय-फाय सिटीज आणि स्मार्ट सिटी योजनेतून शहरांचे रूपांतर घडवले जात आहे. या कालखंडात तब्बल २५ कोटी नागरिक दारिद्र्यरेषेच्या वर आले असूनही एक ऐतिहासिक कामगिरी आहे. रोजगारनिर्मितीडिजिटल सेवांचा विस्तार आणि कृषीउत्पादन व सेवा क्षेत्रातील सुधारणांनी सामान्य नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवले असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीदेशाच्या एकूण प्रगतीत महाराष्ट्राचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र देशाचे आर्थिक ग्रोथ इंजिन आहे आणि गेल्या दशकात या राज्यानेही विकासाच्या दिशेने भरारी घेतली आहे. परकीय गुंतवणुकीबाबत महाराष्ट्र देशात अग्रेसर असून४०% पेक्षा जास्त एफडीआय महाराष्ट्रात झाली आहे. मुंबई ही देशाची स्टार्टअप राजधानी बनली आहे. पुणेनाशिकछत्रपती संभाजीनगरनागपूरसारख्या शहरांमध्येही स्टार्टअप्सना प्रोत्साहन देणारी पर्यावरणनिर्मिती करण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञानऔद्योगिक क्षेत्रकृषी प्रक्रिया उद्योगआणि हरित ऊर्जा या क्षेत्रांमध्ये विशेष भर देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

राजशिष्टाचार मंत्री श्री. रावल म्हणाले कीभारताने जागतिक स्तरावर आपल्या संबंधांना आणखी बळकट केले आहे. विविध देशांसोबत द्विपक्षीय करारसंरक्षणव्यापारआणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढले आहे. यामुळे भारताची भूमिका जागतिक व्यासपीठावर अधिक महत्त्वाची झाली आहे.

आजचा दिवस "विकसित भारत" या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणारा आहे. त्याचबरोबर "विकसित महाराष्ट्र" हे देखील त्याचे अभिन्न अंग आहे. या दोन्ही ध्येयांच्या पूर्ततेसाठी सर्वच देशांच्या प्रतिनिधींची सोबत महत्त्वाची आहे.

दौंड, फुलंब्री, खेड-आळंदी मतदार संघातील जलसिंचनाच्या कामाचा आढावा

 दौंडफुलंब्रीखेड-आळंदी मतदार संघातील जलसिंचनाच्या कामाचा आढावा

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज सह्याद्री अतिथी गृह येथे दौंडफुलंब्रीखेड-आळंदी मतदार संघातील जलसिंचनाच्या कामाचाही आढावा घेतला. या यावेळी आमदार राहुल कुलआमदार श्रीमती अनुराधा चव्हाणआमदार बाबाजी काळे उपस्थित होते.

लोकप्रतिनिधींनी मांडलेले मुद्दे महत्वाचे असल्याचे सांगून जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील म्हणालेसिंचन क्षेत्र अधिक वाढावे यासाठी सिंचन प्रकल्पांची कामे कालमर्यादेत व दर्जेदार झाली पाहजेत. निकृष्ट काम करणाऱ्यांची कोणत्याही प्रकारे गय केली जाणार नाही.

कालवा वितरण व्यवस्थाकोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे बॅरेज बंधाऱ्यात रूपांतरण या  विषयी बैठकीत चर्चा करण्यात येऊन या कामांबाबत जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

ताजनापूर उपसा सिंचन टप्पा-१ सुप्रमासाठी प्रस्ताव सादर करावा

 ताजनापूर उपसा सिंचन टप्पा-१ सुप्रमासाठी प्रस्ताव सादर करावा

- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

 

मुंबईदि. १३ :-  ताजनापूर उपसा सिंचन टप्पा-१ मधील अस्तित्वात असलेल्या घटकांचा वापर करून प्रस्तावित १३ गावांच्या योजनेचे संकल्पन तातडीने पूर्ण करावे. तदनंतर या योजनेच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करावा. या प्रस्तावास शासनस्तरावरून मंजुरी दिली जाईल असे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.

जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथी गृह येथे ताजनापूर उपसा सिंचन टप्पा-१ (ता. शेवगाव जि. अहिल्यानगर)  या बंद असलेल्या योजनेच्या शिल्लक असलेल्या पाण्यातून शेवगाव पाथर्डी मतदार संघातील पूर्व भागातील दुष्काळग्रस्त/टंचाईग्रस्त गावांचा समावेश करून योजना पुनश्च सुरू करणे संदर्भात बैठक झाली. बैठकीस आमदार श्रीमती मोनिका राजळेजलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरसचिव संजय बेलसरे आदी उपस्थित होते.

ताजनापूर टप्पा-१ चालू करुन त्यामध्ये अतिरिक्त १३ गावांचा समावेश करणेबाबतच्या प्रस्तावास शासनाची तत्वतः मान्यता प्राप्त  आहे. या योजनेद्वारे शेवगाव तालुक्यातील १३ गावातील  साठवण तलाव व बंधारे गुरूत्वीय पाईप वितरण प्रणालीव्दारे भरून देणे नियोजित असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

या बैठकीत ताजनापूर उपसा सिंचन योजना टप्पा-२ मधील कामांच्या सद्यस्थितीचाही आढावा घेण्यात आला.

क्षारपड जमिनीचा सर्व्हे करावा

 क्षारपड जमिनीचा सर्व्हे करावा

तत्पूर्वी पलूस (जि. सांगली) तालुक्यातील क्षारपड जमीन सुधारणा करण्यासाठी उपाय योजनांबाबत सह्याद्री अतिथी गृह येथे बैठक झाली  या बैठकीस आमदार विश्वजीत कदम उपस्थित होते.

क्षारपड जमीन सुधारणेसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेचे सुधारित मापदंड करण्याची कार्यवाही सुरू आहे. तत्पूर्वी पाटबंधारे महामंडळांनी क्षारपड जमिनीचा सर्व्हे करावाअशा सूचना या बैठकीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.

पाण्याचा निचरा न झाल्याने जमिनी क्षारपड प्रमाण वाढते ही चिंतेची बाब आहे. जमिनीतून पाण्याचा निचरा होण्यासाठी निचरा कॅनॉल स्वच्छ ठेवण्यासाठी महामंडळस्तरावर सर्वसमावेशक योजना राबवावीअशा सूचनाही जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांनी दिल्या. या बैठकीत  कडेगांव (जि. सांगली) तालुक्यातील ढाणेवाडी गावास पाणी उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात आला

Featured post

Lakshvedhi