Wednesday, 13 August 2025

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाचे विशेष तपासणी अभियान

 सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाचे

विशेष तपासणी अभियान

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे अन्न व्यवसायिकांसाठी 

प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

 

मुंबईदि. १२ :- राज्यातील नागरिकांना सकस व निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासनातर्फे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ व राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली 'सणासुदीचे विशेष तपासणी अभियानराबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत उद्या, १३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटरनरीमन पॉईंटमुंबई येथे अन्न व्यवसायिकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त (अन्न) मंगेश माने यांनी दिली.

यशवंतराव चव्हाण सेंटरयेथे होणाऱ्या  कार्यक्रमाचा शुभारंभ अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात येणार असून या कार्यक्रमास अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री राज्यमंत्री योगेश कदमसचिव  धीरज कुमार आणि  अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त राजेश नार्वेकर तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ घर तसेच आंबडवे परिसर विकसित करण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव तयार करा

 भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ घर तसेच आंबडवे परिसर

विकसित करण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव तयार करा

- सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

 

 मुंबई, दि. 12 : रत्नागिरी जिल्ह्यात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ घर व आंबडवे परिसर विकसित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पहिला व दुसरा टप्पा असे प्रस्ताव तयार करावेत, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले.

                मंत्रालयात आयोजित बैठकीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळ घर व  आंबडवे परिसर विकसित करण्याबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट बोलत होते. यावेळी राज्यमंत्री योगेश कदम, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, दूरदृश्यप्रणालीव्दारे आयुक्त दीपा मुधोळकर, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम.देवेंदरसिंह उपस्थित होते.

                मंत्री श्री. शिरसाट म्हणाले की, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ घर व आंबडवे परिसराचा परिपूर्ण विकास करण्यासाठी तातडीने जिल्हाधिकारी यांनी कार्यवाही करावी. स्मारक तसेच परिसर विकासासाठी बार्टीच्या सहाय्याने  शैक्षणिक उपक्रम देखील या परिसरात सुरू करावे. स्मारकासाठी लागणाऱ्या जागेचे भूसंपादन करण्यासाठी स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन कार्यवाही करावी. ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे असे हे ठिकाण असल्याने त्या दृष्टीने या परिसरात काम करण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची स्थापना करून सर्व कामांची माहिती या समितीसमोर सादर करावी, अशा सूचना मंत्री श्री.शिरसाट यांनी यावेळी दिल्या.

स्मारक उभारण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करणे, स्मारकारसाठी आवश्यक जमीनीचे भूसंपादन करणे, वास्तुविशारद नेमणूक, स्मारकाचे  बांधकाम, प्रकल्पाचे टप्पे, मौजे आंबडवे येथील नागरिकांनाच्या पुनर्वसनाबाबत योग्य ती कार्यवाही करण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही करावी. सर्व कामांसाठी दोन टप्प्यात प्रस्ताव सादर करावेत, असे मंत्री श्री. शिरसाट यांनी सांगितले.

सफाई कामगारांच्या मुलांकरिता अंबरनाथ परिसरातील शाळेचे बांधकाम डिसेंबर पर्यंत पूर्ण करा

 सफाई कामगारांच्या मुलांकरिता अंबरनाथ परिसरातील

शाळेचे बांधकाम डिसेंबर पर्यंत पूर्ण करा

- सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

        मुंबई, दि. 12 : अनुसूचित जाती-जमातीमधील सफाई कामगारांच्या मुलांकरिता अंबरनाथ परिसरातील शाळेचे बांधकाम डिसेंबर पर्यंत पूर्ण करा. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर भव्य कन्हवेन्शन सेंटर उभारण्याची कार्यवाही गतीने करावी, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले.

                मंत्रालयात विविध विषयांच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, आमदार डॉ.बालाजी किणीकर उपस्थित होते.

मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, अनुसूचित जाती-जमातीमधील सफाई कामगारांच्या मुलांकरिता  अंबरनाथ परिसरातील शाळेचे बांधकाम डिसेंबर पर्यंत पूर्ण करावी. उल्हासनगर परिसरात १०० मुले व मुलींचे वसतीगृहाकरिता जागा उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच उल्हासनगर येथे संविधान भवन उभारण्याबाबत संबधित समाजकल्याण आयुक्त यांनी तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

फुलांना शेतमाल नियमानाखाली आणून खरेदी विक्री बाजारपेठेसाठी अत्याधुनिक सोयी-सुविधांयुक्त युक्त जागा उपलब्ध करुन द्यावी

 फुलांना शेतमाल नियमानाखाली आणून खरेदी विक्री बाजारपेठेसाठी

अत्याधुनिक सोयी-सुविधांयुक्त युक्त जागा उपलब्ध करुन द्यावी

- पणन मंत्री जयकुमार रावल

 

मुंबईदि. १२ : राज्यात मोठ्या प्रमाणात फुलांचे उत्पादन होते. जानेवारी आणि फेब्रुवारी वगळता मुंबई हे फुलांचे सर्वात मोठे खरेदी विक्री केंद्र आहे. वर्षभर या ठिकाणी फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात होते. फुल हा शेतमाल नियमनाखाली नसल्याने आणि सर्व सुविधायुक्त स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. बृहन्मुंबईत फुलांची स्वतंत्र बाजारपेठ सुरू करणे आवश्यक आहे. त्यासाठी तातडीने कार्यवाही करुन दादरगोरेगाव अथवा नवी मुंबई येथे अत्याधुनिक सोयी-सुविधांयुक्त फुल बाजारासाठी जागा शोधून ती उपलब्ध करून देण्यात यावीअसे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

मुंबई या देशाच्या आर्थिक राजधानीच्या ठिकाणी शेतकरीव्यापारी आणि ग्राहकांच्या सोयीच्या ठिकाणी एक अत्याधुनिक आणि सोयी सुविधांनी युक्त अशी बाजारपेठ असावी या मागणीसाठी दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनच्या प्रतिनिधींनी मंत्री श्री.रावल यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत आमदार मनिषा चौधरीपणन विभागकृषी उत्पन्न बाजार समितीबृहन्मुंबई महानगरपालिका आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पणन मंत्री श्री.रावल म्हणालेराज्यात मोठ्या प्रमाणात फुलांची शेती केली जाते. मुंबईत फुलांची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. फुल निर्यातीच्याही संधी आहेत. मात्र फुलांची सर्व सुविधायुक्त बाजारपेठ असणे आवश्यक आहे. दादर येथे माँसाहेब मीनाताई ठाकरे फुल बाजारपेठेची अस्तित्वातील जागा लहान असल्याने तिचा पुनर्विकास होणार असल्यास महानगरपालिकेमार्फत तेथे आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. ही जागा अपुरी असल्यास गोरेगाव येथे उपलब्ध असलेल्या जागेत अथवा नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात जागा उपलब्ध करुन देण्यात यावी. परळ येथील कामगार मैदान येथे सकाळी ५ ते ९ या वेळेत जागा उपलब्ध होऊ शकेल काया पर्यायांचाही विचार करण्यात यावाअसेही त्यांनी यावेळी सुचविले.

मुंबई शहर हे देशाची आर्थिक राजधानी आहे. पॉलिहाऊस आणि शेडनेट मध्ये दर्जेदार फुलांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून बृहन्मुंबईमध्ये अत्याधुनिक कट फ्लॉवर्स बाजार असणे गरजेचे आहेअशी मागणी असोसिएशनच्या वतीने यावेळी करण्यात आली.

इच्छुक विद्यार्थ्यांना सहभागी होता यावे यासाठी जास्तीत जास्त शाळांमध्ये स्काऊट गाईडची अंमलबजावणी करावी

 इच्छुक विद्यार्थ्यांना सहभागी होता यावे यासाठी

जास्तीत जास्त शाळांमध्ये स्काऊट गाईडची अंमलबजावणी करावी

- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

 

मुंबई, दि. 12 : विद्यार्थ्यांना बालवयापासूनच मूल्य शिक्षण, स्वावलंबन, शिस्त, संस्कारांच्या माध्यमातून उत्तम भावी नागरिक घडविण्यात स्काऊट, गाईडची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. इच्छुक शालेय विद्यार्थ्यांना यात सहभागी होता यावे यासाठी जास्तीत जास्त शाळांमध्ये स्काऊट गाईडची अंमलबजावणी करावी, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

       राज्यातील जास्तीत जास्त शाळांमध्ये स्काऊट गाईडची अंमलबजावणी करण्याबाबत आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, प्रधान सचिव रणजित सिंह देओल, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव, उपसचिव तुषार महाजन, क्रीडा विभागाचे सहायक संचालक तथा महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस् चे राज्य चिटणीस मिलिंद दिक्षित उपस्थित होते. तर शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह, एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावार हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

मंत्री श्री.भुसे म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या माता पित्यांचा, वडीलधाऱ्यांचा, गुरुजनांचा आदर करणेशिस्त अंगिकारणे आदी बाबी शिकणे आवश्यक आहे. स्काऊट, गाईड, एनसीसी, आरएसपी आदी माध्यमातून अशी शिस्त आणि संस्कार लाभतात. यामुळे इच्छुक विद्यार्थी यापासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी असेही त्यांनी सांगितले. आनंददायी शनिवार अंतर्गत स्काऊट गाईडचा एक तास घेण्याची तसेच ज्या शाळेत स्काऊट गाईडचे विद्यार्थी असतील, तेथे दिल्या जाणाऱ्या गणवेशापैकी एक गणवेश स्काऊट गाईडला अनुरुप असावा, असा प्रयत्न करण्याची सूचनाही त्यांनी दिली.

       राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी स्काऊटचा गणवेश उत्कृष्ट असून तो घातल्यानंतर विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढतो, असे यावेळी नमूद केले. 

समाजातील भेदाभेद दूर करून एकात्म

 समाजातील भेदाभेद दूर करून 

एकात्मतेचा संदेश देणे हा संतांचा धर्म

– मंत्री छगन भुजबळ

मुंबईदि. 12 : महाराष्ट्र ही संतभूमी आहे. संत चोखामेळासंत जनाबाईसंत नामदेव यांसह अनेक संतांनी जात-पात व उच्च-नीच भेद नष्ट करून समतेचा संदेश दिला. संत साहित्याच्या माध्यमातून दयाक्षमाकरुणा आणि प्रेम यांचा प्रसार झाला. समाजातील भेदाभेद दूर करून एकात्मतेचा संदेश देणे हा संतांचा धर्म असल्याचे प्रतिपादन अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

वारकरी साहित्य परिषदेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात मंत्री श्री.भुजबळ बोलत होते. या कार्यक्रमाला मराठी भाषाउद्योग मंत्री उदय सामंतसामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटआमदार संतोष बांगरमाजी आमदार शहाजी पाटीलवारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. विठ्ठल महाराज पाटीलह.भ.प. निवृत्ती महाराज रामदासह.भ.प. नरहरी महाराज चौधरीह.भ.प.रामदास महाराज तसेच राज्यभरातील वारकरी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एस ए च्या नव्याने पूर्ण झालेल्या भारत मुंबई कंटेनर टर्मिनल टप्पा 2 ची पाहणी

 पी एस ए च्या नव्याने पूर्ण झालेल्या भारत मुंबई कंटेनर टर्मिनल टप्पा 2 ची पाहणी केली असून भारत आणि सिंगापूर यांच्यातील दृढचिरस्थायी भागीदारीचे हे प्रतीक आहे.  जवळपास तीन दशकांमध्ये,पी एसने  भारतात एकूण 2.3 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. फेज 1 मुळे कार्यक्षमता वाढली असूनजहाजांचा परतण्याचा वेळ कमी झाला आहे. याचा भारताच्या निर्यात-आयातदारांना फायदा झाला आहे  फेज 2 मुळे टर्मिनलची क्षमता 2.4 दशलक्ष TEUs वरून दुप्पट होऊन 4.8 दशलक्ष TEUs झाली आहेज्यामुळे भारत मुंबई कंटेनर टर्मिनल हे भारतातील सर्वात मोठे स्वतंत्र कंटेनर टर्मिनल बनले आहे. यामुळे आर्थिक विकासाला गती मिळून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. बंदर व्यवस्थापनापलीकडेसिंगापूरच्या कंपन्या भारतातील मेरिटाइम क्षेत्रात जहाजबांधणी आणि हिरव्या शिपिंग उपायांसह विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. सिंगापूर हा भारतातील सर्वात मोठ्या परदेशी थेट गुंतवणुकीच्या स्रोतांपैकी एक आहेआणि अनेक सिंगापूरच्या कंपन्या महाराष्ट्रात विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. मॅपल ट्री इन्व्हेस्टमेंट्स आणि महाराष्ट्र शासन यांच्यातील औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स विकासासाठीचा नवीन सामंजस्य करार या भागीदारीला आणखी मजबूत करेल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.

केंद्रीय बंदरेजहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाचे मंत्री सर्बानंद सोनवाल यांचा व्हिडीओ संदेश दाखविण्यात आला.

Featured post

Lakshvedhi