Tuesday, 12 August 2025

तलावातील गाळ काढण्यासाठी नियोजनबद्ध कृती कार्यक्रम तयार करावा

 तलावातील गाळ काढण्यासाठी नियोजनबद्ध कृती कार्यक्रम तयार करावा

- मत्स्योत्पादन व बंदरे मंत्री नितेश राणे

राज्यातील मत्स्योत्पादन वाढीसाठी विभागातील सर्वांनी प्रयत्न करण्याचे निर्देश

मुंबईदि. ११ : राज्यात मत्स्योत्पादन वाढीसाठी मोठ्या संधी आहेत. यंदाच्या हंगामामध्ये राज्यात ४७ टक्के मत्स्योत्पादन वाढ झाली आहे. येत्या हंगामामध्ये आणखी वाढ अपेक्षित असून त्यासाठी विभागातील सर्वच अधिकारी-कर्मचारी यांनी प्रयत्न करावेत. तसेच राज्यातील तलावामध्ये गाळ काढल्यास गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकते. त्यामुळे तलावातील गाळ काढण्यासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करावा अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.

मंत्रालयात मत्स्यव्यवसाय हंगामाविषयी आढावा बैठक झाली. त्यावेळी मंत्री श्री.राणे यांनी या सूचना दिल्या. यावेळी मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडेमत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश पाठक उपस्थित होते. तर राज्यातील प्रादेशिक उपायुक्तसर्व सहायक आयुक्त दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

      ड्रोन सर्वेक्षण सुरू केल्यानंतर सागरी मत्स्योत्पादनात चांगली वाढ झाली असल्याचे सांगून मंत्री राणे म्हणाले कीतलावातील गाळ काढल्यानंतर गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादन वाढणार आहे. हा गाळ काढण्यासाठी जलसंपदा विभागाशी समन्वयाने कार्यक्रम आखावा. तलावांवर असलेली अतिक्रमणे काढण्यात यावी. कोणतेही नियमबाह्य काम होणार नाही याची अधिकारी यांनी दक्षता घ्यावी. जितकी चांगली शिस्त राहील तितके चांगले उत्पादन वाढेल. त्यामुळे सर्वच अधिकाऱ्यांनी मत्स्योत्पादन वाढीसाठी दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे, असे मंत्री श्री.राणे यांनी सांगितले.

कुस्तीगीर खाशाबा जाधव पारंपारिक क्रीडा महाकुंभ २०२५’चे क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेत होणार उद्घाटन

 कुस्तीगीर खाशाबा जाधव पारंपारिक क्रीडा महाकुंभ २०२५चे

क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेत होणार उद्घाटन

कौशल्यरोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांची विशेष उपस्थिती

 

मुंबईदि. ११ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या पुण्यतिथीनिमित्त "कुस्तीगीर खाशाबा जाधव पारंपारिक क्रीडा महाकुंभ २०२५" चे आयोजन  महाराणा प्रताप शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाकुर्ला क्रीडा संकुलात करण्यात आले आहे. पारंपारिक खेळांचे जतन आणि प्रसार करणाऱ्या या महाकुंभचे उद्घाटन १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वाजता क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेत होणार आहे. यावेळी कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढाकुस्तीगीर खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजीत खाशाबा जाधव यांची विशेष उपस्थिती असणार  आहे.

कौशल्य विकास विभाग आणि क्रीडाभारती यांच्या संयुक्त विद्यमाने "कुस्तीगीर खाशाबा जाधव पारंपारिक क्रीडा महाकुंभ २०२५" चे आयोजन १३ ते २२ ऑगस्ट दरम्यान कुर्ला येथील क्रीडा संकुलात करण्यात आले आहे.  या महाकुंभात एकूण १६ प्रकारच्या पारंपारिक खेळांच्या स्पर्धा होणार असूनमल्लखांबकबड्डीखो-खोभालाफेकविटी - दांडूकुस्तीलगोरी,  लंगडीरज्जूमलखांबपारंपारिक धाव स्पर्धा इत्यादी स्पर्धांचा समावेश असणार आहे. पारंपारिक खेळांचे जतन आणि प्रसार हे या स्पर्धांचे वैशिष्ट्य आहे. कुस्तीगीर खाशाबा जाधव पारंपारिक क्रीडा महाकुंभमध्ये युवक-युवतींमध्ये शारीरिक तंदुरूस्तीसंघभावना आणि स्पर्धात्मकता वाढवण्याच्या हेतूने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

मागील वर्षी या उपक्रमात जवळपास एक लाखांहून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. यंदादेखील राज्यातील विविध जिल्ह्यातून खेळाडू यात सहभागी होणार आहेत. या महाकुंभ कालावधीत खेळाडूंना पारंपरिक खेळांविषयी मार्गदर्शनही केले जाणार आहे.

रेल्वे बोगी कारखान्यातील रोजगारासाठी स्थानिकांना प्राधान्य द्या

 रेल्वे बोगी कारखान्यातील रोजगारासाठी स्थानिकांना प्राधान्य द्या

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

•          लातूर जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा

•          जुन्या सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्तीला गती देण्याचे निर्देश

•          शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला रेल्वेची जागा देण्याबाबत तोडगा काढणार

लातूरदि. ११ (जिमाका) : लातूर जिल्ह्यात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी रेल्वे बोगी कारखान्याची उभारणी करण्यात आली आहे. या कारखान्यात लवकरच वंदे भारत रेल्वेच्या बोगींचे उत्पादन सुरू होणार असूनयामुळे सुमारे दहा हजार रोजगार निर्माण होतील. यामध्ये स्थानिक युवक-युवतींना प्राधान्य द्यावेअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या जिल्ह्यातील विकासकामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरेआमदार विक्रम काळेआमदार संभाजी पाटील-निलंगेकरआमदार संजय बनसोडेआमदार अभिमन्यू पवारआमदार रमेश कराडमाजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकरमाजी आमदार गोविंद केंद्रेविशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमापजिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगेजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीनापोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्रीमती मानसी उपस्थित होते. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत लातूर शहर वाढीव पाणीपुरवठा योजनाजिल्हा रुग्णालय आदीबाबत यावेळी आढावा घेण्यात आला.

रेल्वे बोगी कारखान्यासाठी स्थानिक स्तरावर कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यातील आयटीआय आणि पॉलिटेक्निक संस्थांमध्ये आवश्यक ट्रेड्स सुरू करून युवकांना प्रशिक्षण द्यावे. यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेलअसे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला रेल्वेची जागा हस्तांतरित करण्याबाबत रेल्वे प्रशासनासोबत बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढला जाईलअसेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

उदगीर येथील शासकीय दूध भुकटी प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील. मदर डेअरीच्या सहकार्याने हा प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव सादर करावात्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईलअसे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नमूद केले. जिल्ह्यातील सिंचन क्षमता वाढवण्यासाठी जुन्या सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्तीची कामे गतीने पूर्ण करावीत. घरणीतिरू आणि देवर्जन या प्रकल्पांतून जलवाहिनींद्वारे सिंचनासाठी पाणी वितरण करण्याबाबत उपयुक्तता तपासून प्रस्ताव सादर करावाअसे त्यांनी सांगितले. तसेचहाडगा आणि मसलगा सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्तीची कामे तात्काळ पूर्ण करावीत. पांदण रस्त्यांवरील विद्युत खांब तातडीने हटवून रस्त्यावरील अडथळे दूर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले.

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक विकासकामांची माहिती दिली. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी जिल्ह्यात सुरु असलेली विकासकामेतसेच प्रस्तावित कामांविषयी माहिती सादर केली.

पाईट-खेड येथील अपघाताची घटना दुर्दैवी; अपघातग्रस्तांना शासनाकडून सर्वोतोपरी मदत

 पाईट-खेड येथील अपघाताची घटना दुर्दैवी;

अपघातग्रस्तांना शासनाकडून सर्वोतोपरी मदत

उपमुख्यमंत्री अजित पवार

 

अपघातातील जखमींवर तातडीने उपचार सुरु;

मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत

उपमुख्यमंत्री अजित पवार

 

मुंबईदि. 11 :- पुणे जिल्ह्यातील पाईट (ता. खेड) येथे श्री क्षेत्र कुंडेश्वराच्या दर्शनासाठी जात असताना महिलांना घेऊन जाणारी पिकअप गाडी खोल दरीत कोसळून झालेला अपघात अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. या अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावेततसेच अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यात यावीयासाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या माता-भगिनींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मृतांच्या कुटुंबीयांप्रती सहसंवेदना व्यक्त करतया कठीण प्रसंगात शासन त्यांच्या सोबत ठामपणे उभे असेउपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

 

आपल्या संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात कीपाईट येथे झालेल्या या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रशासनपोलीस व आरोग्य विभागाने तातडीने बचाव व मदतकार्य सुरू केले. जखमींना जवळच्या शासकीय तसेच खाजगी रुग्णालयात दाखल करून तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत. जखमींना आवश्यक सर्व वैद्यकीय मदत व उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन मदत व बचावकार्य वेगाने पार पाडण्याचे आदेश दिले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. राज्य शासन या संकटाच्या काळात अपघातग्रस्त नागरिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची माहितीउपमुख्यमंत्री अजित पवार दिली आहे.

स्वातंत्र्य दिनाचा शासकीय कार्यक्रम सकाळी ९.०५ वाजता मार्गदर्शक सूचना

 स्वातंत्र्य दिनाचा शासकीय कार्यक्रम सकाळी ९.०५ वाजता

 

मुंबईदि. ११ : भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन समारंभ शुक्रवारदिनांक १५ ऑगस्ट२०२५ रोजी साजरा करण्यात येणार आहे. राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते मंत्रालयमुंबई येथे तसेच राज्यपाल यांच्या हस्ते पुणे येथे ध्वजारोहण करुन साजरा करण्यात येईल. ध्वजारोहणाचा जिल्ह्याच्या/ विभागाच्या मुख्यालयातील मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी ९.०५ वाजता आयोजित करण्यात यावा. या दिवशी सकाळी ८.३५ ते ९.३५ वाजता या वेळेत इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी ८.३५ वाजे पूर्वी किंवा ९.३५ वाजेनंतर आयोजित करावाअशा सूचना राजशिष्टाचार विभागामार्फत देण्यात आल्या आहेत.

राज्यात स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी खालीलप्रमाणे निदेश देण्यात येत आहेत.

राज्यात सर्व विभागीय/ जिल्हा/ उप विभागीय/ तालुका मुख्यालयात तसेच ग्रामपंचायत मुख्यालय येथे ध्वजारोहण करुन स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात यावा. विभागीय आयुक्त पुणेनागपूरछत्रपती संभाजीनगरनाशिकअमरावती व कोकण यांनी आपापल्या विभागातील तसेच जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्याची योग्य ती व्यवस्था करावी. काही मंत्री महोदय एकापेक्षा अधिक जिल्ह्यांचे पालकमंत्री असल्याने राष्ट्रध्वजारोहण कार्यक्रमासाठी शासनाकडून त्यांच्याकरिता एक जिल्हा निश्चित करुन देण्यात येत आहे. यानुसार त्या जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी त्यांच्याकडून ध्वजारोहण करण्यात येईल. राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत वाजविण्यात येईल व त्यानंतर लगेचच सावधान स्थितीत येऊन राज्यगीत वाजविण्यात येईल.

याप्रसंगी भाषणांचा विषय हा स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व विषद करणारा तसेच उपस्थितांना देशाची एकता व अखंडता अबाधित ठेवण्यासाठी कार्य करण्यासाठी प्रेरित करणारा असावा. संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसिलदार हे अनुक्रमे उपविभागीय मुख्यालय व तालुका मुख्यालय आणि सरपंच किंवा गांव प्रमुख हे ग्रामपंचायत मुख्यालय येथे ध्वजारोहण करतील. समारंभास उपस्थित राहणाऱ्या सर्व व्यक्तींनी राष्ट्रीय पोषाख परिधान करावा.

15ऑगस्ट स्वतंत्रदिन कार्यक्रम आयोजनाबाबत......pl share

 दिवसभरातून विविध कार्यक्रम जसे वृक्षारोपणआंतरशालेयआंतरमहाविद्यालय वाद-विवाद स्पर्धाप्रश्नमंजूषा/ देशभक्तीपर निबंध व कविता स्पर्धांचे आयोजन करावे. निवडक विद्यार्थी/ विद्यार्थीनीचे देशभक्तीपर गाणे/भाषणे आयोजित करावीत. शासकीय इमारतीवर विद्युत रोषणाई करावीएखाद्या विषयाचा Webinar आयोजित करावादेशभक्तीपर मोहीम राबविण्यात यावीतसेच देशभक्तीपर किंवा राष्ट्रीय एकात्मतेसंबंधातील गाण्यांचा प्रचार करावा.

राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत सूचना

 राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासनाच्या दिनांक ५ डिसेंबर१९९१ आणि दिनांक ११ मार्च१९९८ च्या परिपत्रकान्वये दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. ध्वजारोहणाची रंगीत तालीम घेतली जाईल याचीही दक्षता घ्यावीराष्ट्रध्वज चांगल्या स्थितीत असल्याची व सूर्यास्तास उतरवला जाईल याचीही दक्षता घेण्यात यावी.

Featured post

Lakshvedhi