Tuesday, 12 August 2025

स्वातंत्र्य दिनाचा शासकीय कार्यक्रम सकाळी ९.०५ वाजता मार्गदर्शक सूचना

 स्वातंत्र्य दिनाचा शासकीय कार्यक्रम सकाळी ९.०५ वाजता

 

मुंबईदि. ११ : भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन समारंभ शुक्रवारदिनांक १५ ऑगस्ट२०२५ रोजी साजरा करण्यात येणार आहे. राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते मंत्रालयमुंबई येथे तसेच राज्यपाल यांच्या हस्ते पुणे येथे ध्वजारोहण करुन साजरा करण्यात येईल. ध्वजारोहणाचा जिल्ह्याच्या/ विभागाच्या मुख्यालयातील मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी ९.०५ वाजता आयोजित करण्यात यावा. या दिवशी सकाळी ८.३५ ते ९.३५ वाजता या वेळेत इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी ८.३५ वाजे पूर्वी किंवा ९.३५ वाजेनंतर आयोजित करावाअशा सूचना राजशिष्टाचार विभागामार्फत देण्यात आल्या आहेत.

राज्यात स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी खालीलप्रमाणे निदेश देण्यात येत आहेत.

राज्यात सर्व विभागीय/ जिल्हा/ उप विभागीय/ तालुका मुख्यालयात तसेच ग्रामपंचायत मुख्यालय येथे ध्वजारोहण करुन स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात यावा. विभागीय आयुक्त पुणेनागपूरछत्रपती संभाजीनगरनाशिकअमरावती व कोकण यांनी आपापल्या विभागातील तसेच जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्याची योग्य ती व्यवस्था करावी. काही मंत्री महोदय एकापेक्षा अधिक जिल्ह्यांचे पालकमंत्री असल्याने राष्ट्रध्वजारोहण कार्यक्रमासाठी शासनाकडून त्यांच्याकरिता एक जिल्हा निश्चित करुन देण्यात येत आहे. यानुसार त्या जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी त्यांच्याकडून ध्वजारोहण करण्यात येईल. राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत वाजविण्यात येईल व त्यानंतर लगेचच सावधान स्थितीत येऊन राज्यगीत वाजविण्यात येईल.

याप्रसंगी भाषणांचा विषय हा स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व विषद करणारा तसेच उपस्थितांना देशाची एकता व अखंडता अबाधित ठेवण्यासाठी कार्य करण्यासाठी प्रेरित करणारा असावा. संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसिलदार हे अनुक्रमे उपविभागीय मुख्यालय व तालुका मुख्यालय आणि सरपंच किंवा गांव प्रमुख हे ग्रामपंचायत मुख्यालय येथे ध्वजारोहण करतील. समारंभास उपस्थित राहणाऱ्या सर्व व्यक्तींनी राष्ट्रीय पोषाख परिधान करावा.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi