Friday, 8 August 2025

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिदिनानिमित्त मुंबईत खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभचे आयोजन

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिदिनानिमित्त

मुंबईत खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभचे आयोजन

 मंत्री श्री.लोढा म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त मुंबईत 'ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभचेआयोजन करण्यात आले आहे. येत्या १३ ते २२ ऑगस्ट दरम्यान कुर्ला येथे जामसाहेब मुकादम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मैदानातमुंबईकरांना पारंपरिक खेळांचा थरार पाहायला मिळणार आहे. या क्रीडा महाकुंभच्या माध्यमातून लेझिमफुगडी आणि लगोरीविटी दांडूसह शिवकालीन पारंपरिक खेळांना पूनर्वैभव मिळवून देणार आहे.

            पारंपरिक खेळांच्या या क्रीडा महाकुंभात कब्बडीखो-खोलगोरीलेझीमरस्सीखेच,मल्लखांबपावनखिंड दौडकुस्ती,पंजा लढवणेविटी-दांडू,दोरीच्या उड्याफुगडी आणि योग या क्रीडा प्रकारात महिला आणि पुरुष गटातील सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे.  कुर्ला येथे जामसाहेब मुकादम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मैदानात होणाऱ्या या क्रीडा महाकुंभात ही जनतेने सहभागी व्हावे असे आवाहनही मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

दरम्यान ज्या संस्थांना आणि क्रीडा मंडळांना यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी ९८६७०६६५०६ अथवा ९७६८३२७७४५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे क्रीडा भारतीकडून सांगण्यात आले आहे

मंत्रालयातील ‘उमेद’ विशेष विक्री प्रदर्शनाला भेट ‘लाडक्या बहिणीं’नी मंत्री श्री.गोरे यांना बांधली राखी

 ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची मंत्रालयातील उमेद’ विशेष विक्री प्रदर्शनाला भेट

लाडक्या बहिणींनी मंत्री श्री.गोरे यांना बांधली राखी



 

मुंबईदि. 7 : ग्रामीण भागातील महिलांना स्वयंपूर्ण आणि उद्योजक बनविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या विशेष विक्री प्रदर्शनास ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी भेट दिली.

 

या प्रदर्शनात महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे निरीक्षण करतमंत्री श्री. गोरे यांनी महिलांशी संवाद साधून त्यांना प्रेरणा दिली.

 

ग्रामीण महिलांना मुंबईत व्यासपीठ

राष्ट्रीय हातमाग दिन आणि रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या प्रदर्शनात पालघरपनवेलकर्जतपेण आणि जळगाव जिल्ह्यांतील एकूण 10 महिला बचत गटांनी सहभाग घेतला. या गटांनी तयार केलेल्या वस्तूंमध्ये आकर्षक राख्यापौष्टिक लाडूपारंपरिक तोरणहस्तनिर्मित दागिनेजामजेली आणि ज्यूस यांचा समावेश आहे. तसेच, ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाअंतर्गत भारतीय राष्ट्रध्वज "तिरंगा" देखील विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे.

 

मंत्र्यांकडून महिलांना मार्गदर्शन आणि आश्वासन

प्रत्येक स्टॉलला भेट देत मंत्री श्री. गोरे यांनी उत्पादनांची माहिती घेतली आणि महिलांना विक्री व ब्रँडिंगसंबंधी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले कीया उपक्रमांद्वारे ग्रामीण महिलांना आर्थिक संधी उपलब्ध होत असूनशासनाची भविष्यातही अशीच साथ राहणार आहे.

 

या भेटीदरम्यान उमेदच्या लाडक्या बहिणींनी मंत्री श्री.गोरे यांना राखी बांधली. या वेळी उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागरअवर सचिव धनवंत माळीतसेच इतर मान्यवर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Thursday, 7 August 2025

इतिहासाचे विकृतीकरण खपवून घेतले जाणार नाही,‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाचे पुनर्परीक्षण करावे - राज्य शासनाची केंद्र सरकारला विनंती

 इतिहासाचे विकृतीकरण खपवून घेतले जाणार नाही

- सांस्कृतिक कार्यमंत्री मंत्री ॲड.आशिष शेलार

खालिद का शिवाजी’ चित्रपटाचे पुनर्परीक्षण करावे

- राज्य शासनाची केंद्र सरकारला विनंती

 

मुंबईदि. 7 : इतिहासाचे विकृतीकरण कोणत्याही परिस्थितीत मान्य केले जाणार नाही, असे ठाम प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केले. खालिद का शिवाजी’ या चित्रपटाबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत राज्य शासनाने या चित्रपटाचे तातडीने पुनर्परीक्षण करण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली आहे.

काल शिवसमर्थ प्रतिष्ठानचे संघटक निलेश भिसे यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांची भेट घेऊन चित्रपटाविरोधातील तक्रार व निवेदन सादर केले. या चित्रपटात इतिहासाची मोडतोड करून जनभावना दुखावणारे दृश्य आणि संवाद असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर बोलताना मंत्री ॲड.शेलार म्हणाले कीचित्रपट परिनिरीक्षण मंडळ हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. या चित्रपटाच्या पुनर्परीक्षणाबाबत केंद्र सरकारशी तातडीने पत्रव्यवहार करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. गरज पडल्यास संबंधित केंद्रीय मंत्री व अधिकाऱ्यांशीही चर्चा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

राज्य शासनाला या चित्रपटाविरोधात मोठ्या प्रमाणावर निवेदने व तक्रारी प्राप्त झाल्या असूनछत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी चुकीची व विकृत माहिती देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. चित्रपटातील अनेक संवादांवर इतिहास अभ्यासक व शिवप्रेमींनी तीव्र आक्षेप नोंदवले आहेतअसेही मंत्री ॲड.शेलार यांनी स्पष्ट केले.

या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण विभागाचे सचिव यांना पत्र पाठवून त्यात चित्रपटाचे पुनर्परीक्षणदिलेल्या प्रमाणपत्राचा पुनर्विचार आणि पुनर्परीक्षण होईपर्यंत चित्रपटाचे प्रदर्शन थांबवावे अशी विनंती केली आहे.

मंत्री ॲड.शेलार पुढे म्हणाले कीया चित्रपटाला केंद्रीय सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र कसे मिळालेपरीक्षण समितीने चित्रपटाचा योग्य अभ्यास केला होता कायासंदर्भात चौकशी व्हावी. तसेच हा चित्रपट कान्स चित्रपट महोत्सवासाठी कसा निवडला गेलायामध्ये कोणता खोडसाळपणा झाला आहे काहे तपासले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारी निवेदने अनेक संस्थासंघटना व इतिहास अभ्यासकांकडून देण्यात आली असूनशासन या सर्व तक्रारींचे गांभीर्याने परीक्षण करत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अमेरिकेच्या वाढीव टॅरिफबाबत उच्चस्तरीय बैठक

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली

अमेरिकेच्या वाढीव टॅरिफबाबत उच्चस्तरीय बैठक

 

मुंबईदि. ७ : अमेरिकेने वाढवलेल्या टॅरिफचा महाराष्ट्रावर काय परिणाम होऊ शकतोयाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली.

 

या बैठकीस मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीणसिंह परदेशी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी.गुप्तानियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवराऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्लाराज्यकरवस्तू व सेवा कर आयुक्त आशिष शर्माउद्योग सचिव डॉ.पी. अन्बळगन‘मित्रा’चे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल तसेच‘मित्रा’चे अर्थ तज्ज्ञ संजीव सक्सेनामुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक सत्यनारायण कोठे आणि अर्थतज्ञ ऋषी शाह यांनाही निमंत्रित करण्यात आले होते.

 

या बैठकीत जीडीपीरोजगारवाणिज्य आदी महत्वाच्या मुद्द्यांवर प्राथमिक चर्चा करण्यात आली. अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे राज्यातील निर्यातप्रधान उद्योगांवर संभाव्य परिणामतसेच जागतिक बाजारातील स्पर्धात्मकतेवर होणारे परिणाम याचा अभ्यास करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

 

राज्यातील उद्योगांचे हित आणि अर्थव्यवस्था बळकट ठेवण्यासाठी केंद्र सरकारशी तातडीने समन्वय साधून आवश्यक उपाययोजना आखण्यात येतील. या अनुषंगाने केंद्र सरकारकडून मार्गदर्शन घेण्यात येईलअसे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

 

राज्यातील उद्योगांचे हित जोपासण्यासाठी आणि अर्थव्यवस्था बळकट ठेवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहेअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध कराव्यात

 खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध कराव्यात

-         क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे

 

मुंबई, दि.: खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी कामगिरी करता यावी यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यात सातत्य राखण्याचे निर्देश क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले.

 

सह्याद्री अतिथीगृह येथे क्रीडा व युवक कल्याण विभागाचा पदभार घेतल्यानंतर क्रीडा मंत्री श्री. कोकाटे यांनी आढावा घेतला. यावेळी अपर मुख्य सचिवश्री. अनिल डिग्गीकर,आयुक्त शीतल तेली-उगलेउपसचिव सुनील पांढरेसहसंचालक सुधीर मोरेउपसंचालक संजय सबनीसउपसंचालक उदय जोशीउपसंचालक माणिक पाटीलशालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अवर सचिव अशोक दमय्यावार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

 

क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले कीशालेय स्तरावरच विविध क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी पोषक वातावरण तयार करण्यात यावे. अद्ययावत क्रीडा सुविधाप्रशिक्षकस्पर्धांची संधी यांची पूर्तता करावी. खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच जे खेळाडू शासनाचे प्रतिनिधित्व करतात त्यांना विविध क्रीडा स्पर्धांतील यशानंतर बक्षीस प्राप्त करण्यास परवानगी देण्यासंदर्भात कार्यवाही करावी.

 

जास्तीत जास्त प्रशिक्षक निर्माण व्हावेत, जेणेकरून गुणवत्ताधारक खेळाडू वाढतील. प्रशिक्षकांसाठी नव्या योजना तयार कराव्यात. खेळाडूंना शासकीय नोकरीत असलेल्या आरक्षणासंदर्भात पारदर्शक प्रणाली राबविण्यासाठी समन्वयाने काम करावे, जेणेकरून खेळाडूंवर अन्याय होणार नाही. युवकांच्या कल्याण संदर्भातील योजना राबविण्याबाबत युवकांकडून जास्तीत जास्त सूचना मागवून त्यावर सकारात्मक विचार करावा असे निर्देशही त्यांनी दिले.

 

राज्यात एकूण 162 क्रीडा संकुल पूर्ण असून138 क्रीडा संकुल प्रगतीपथावर आहेत.इतर ठिकाणी क्रीडा संकुल अद्ययावत सुविधांसह पूर्ण करण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याची माहिती यावेळी सादरीकरणात देण्यात आली.  एकूण 8 निवासी व एक अनिवासी क्रीडा प्रबोधिनी कार्यान्वित17 क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण दिले जाते19 वर्षापर्यंत राज्य व राष्ट्रीय स्तरावरील प्राविण्यप्राप्त खेळाडूंची निवड करण्यात येतेसद्यस्थिती त एकूण 348 खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत. क्रीडा प्रबोधिनीचे खेळाडू राष्ट्रीयआंतरराष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त करणारे आहेत. तसेच युवक कल्याण उपक्रम अंतर्गत युवा पुरस्कारयुवा वसती गृहयुवा प्रशिक्षण शिबीरयुवा विकास निधीयुवा दिन व युवा सप्ताहाचे आयोजनयुवा प्रशिक्षण केंद्राची स्थापनाजिल्हास्तर युवक कल्याणसमाजसेवा शिबीर आयोजन अशा विविध योजना राबविण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

००००

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणात सहभाग वाढविण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा

 अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणात सहभाग वाढविण्यासाठी

योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा

 – अल्पसंख्याक विकास मंत्री माणिकराव कोकाटे

 

मुंबईदि. 7 : अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणातील सहभाग वाढवण्यासाठी तसेच त्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले.

अल्पसंख्याक व औकाफ विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुलेजैन अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधीविभागाचे सचिव रूचेश जयवंशीआयुक्त प्रतिभा इंगळेउपसचिव मिलिंद शेणॉय यांच्यासह विभागीय अधिकारी उपस्थित होते.

अल्पसंख्याक विकास मंत्री कोकाटे म्हणाले कीअल्पसंख्याक विद्यार्थी शालेय शिक्षणापासून वंचित राहू नये आणि जास्तीत जास्त विद्यार्थी उच्च शिक्षणापर्यंत पोहोचावेत यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. शिष्यवृत्ती योजनांचा लाभ अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. तसेच शैक्षणिकसामाजिकआर्थिककौशल्य विकास व पायाभूत सुविधा योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी.

यावेळी विभागाच्या विविध उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. सध्या राज्यात २६ ठिकाणी मुलींसाठी वसतीगृहे कार्यरत असून तीन ठिकाणी बांधकाम प्रगतीपथावर आहे. नव्याने एका वसतीगृहास मान्यता देण्यात आली आहे. अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचे मराठी भाषेवरील प्रभुत्व वाढवण्यासाठी मराठी फाउंडेशन वर्गही सुरू करण्यात आले आहेत.

स्पर्धा परीक्षांसाठी मुंबईनागपूरछत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या केंद्रांमध्ये प्रत्येकी १० अनिवासी महिला उमेदवारांना दरमहा चार हजार रुपयांचे विद्यावेतन दिले जात आहे. तसेच वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आहारभत्ता दिला जातो.

छत्रपती संभाजीनगरनागपूर आणि अमरावती विभागातील १५ जिल्ह्यांमध्ये एकूण २८०० महिला बचतगट तयार केले जाणार असूनया महिलांना कौशल्य विकास सोसायटीमार्फत प्रशिक्षण दिले जाणार आहे. निवासी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात ५० उमेदवारांना तीन महिन्यांचे प्रशिक्षण खासगी संस्थेमार्फत देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

राज्य अल्पसंख्याक आयोगराज्य उर्दू अकादमीराज्य हज समितीराज्य वक्फ बोर्डजैन समाज अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळराज्य पंजाबी साहित्य अकादमी यांच्या कार्याचा आढावाही यावेळी घेण्यात आली. योजनांची अंमलबजावणी अधिक परिणामकारक करण्याचे निर्देश अल्पसंख्याक विकास मंत्री कोकाटे यांनी यावेळी दिले.

राज्यातील आरोग्य प्रयोगशाळा व रुग्णवाहिका सेवांचा सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांकडून आढावा

 राज्यातील आरोग्य प्रयोगशाळा व रुग्णवाहिका सेवांचा

सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांकडून आढावा

 

मुंबईदि. ७ : आरोग्य भवन येथे राज्यातील आरोग्य प्रयोगशाळा१०२ रुग्णवाहिका सेवा व आरोग्य विभागाच्या परिवहन सेवेचा सविस्तर आढावा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतला.

 

बैठकीत जलजन्य आजारांच्या पार्श्वभूमीवरराज्यातील आरोग्य संस्थांच्या परिसरातील जलस्रोतांचे पाणी शुद्ध व सुरक्षित असल्याची खात्री करण्यासाठी ग्रामपंचायतींना रेड कार्ड’ व ग्रीन कार्ड’ देऊन जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच सर्व जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा आयपीएचएस (IPHS) मानकांनुसार सुसज्ज असाव्यातआधुनिक उपकरणे व प्रशिक्षित कर्मचारी असावेत आणि परिसर स्वच्छ असावायावर भर देण्यात आला.

 

मंत्री श्री. आबिटकर यांनी खासगी रुग्णालयातील रुग्णांनी देखील सरकारी प्रयोगशाळेत तपासण्या कराव्यातयासाठी प्रयोगशाळांचा दर्जा उंचावण्याचे निर्देश दिले. यामुळे शासनाला अतिरिक्त निधी मिळेलअसेही त्यांनी सांगितले.

 

१०२ टोल फ्री रुग्णवाहिका सेवेसंदर्भात मंत्री श्री.बाबिटकर यांनी सूचना देताना सांगितले कीजननी शिशु सुरक्षा कार्यक्रमांतर्गत वापरात असलेल्या रुग्णवाहिका केवळ महिला व बालकांसाठी न वापरताआपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत इतर रुग्णांसाठीही वापरल्या जाव्यात. १०२ कॉल सेंटरचे योग्य प्रकारे मॉनिटरिंग करण्याचेही आदेश देण्यात आले.

 

यावेळी राज्यातील आरोग्य यंत्रणेतील रिक्त पदांच्या भरतीची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. सर्व सूचना त्वरित अंमलात आणून आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम व लोकाभिमुख करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

 

बैठकीस आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडेअतिरिक्त संचालक डॉ. सुनिता गोल्हाईत तसेच आरोग्य विभागातील अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi