Wednesday, 6 August 2025

समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करणे हा इतरांना प्रेरणा देण्याचा मार्ग

 समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना

सन्मानित करणे हा इतरांना प्रेरणा देण्याचा मार्ग

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

 

मुंबईदि. ६ समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करणे हा केवळ गौरव नव्हेतर समाजातील इतरांनाही प्रेरणा देण्याचा मार्ग आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

मेघाश्रेय या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने मुंबईत आयोजित सर्वोत्तम नागरिक सन्मान’ सोहळ्यात राज्यपाल श्री. राधाकृष्णन प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमास महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदेमाहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलारमुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रवींद्र कुलकर्णीराज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरेउपसचिव एस. रामामूर्तीमेघाश्रेय संस्थेच्या संस्थापिका सीमा सिंह आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात पद्म पुरस्कार विजेतेमान्यवर शास्त्रज्ञनामवंत क्रीडापटूसमाजसुधारकशिक्षकआरोग्य तज्ज्ञ आणि आरोग्य नवोन्मेषकज्येष्ठ पत्रकारचित्रपटसृष्टीतील मान्यवर कलाकारतसेच बीज माता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहिल्या नगरच्या श्रीमती राहीबाई पोपरे आणि हिवरे बाजारचे परिवर्तन घडवणारे पोपटराव पवार यांच्यासारख्या उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.

सर्व सन्मानित व्यक्तींनी समाजाला उज्ज्वलतेच्या दिशेने नेण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या कर्तृत्वातून प्रेरणा घ्या आणि देशाच्या विकासात योगदान द्याअसे आवाहन राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी यावेळी केले.

भारत आज आंतरराष्ट्रीय चर्चांमध्ये निर्णायक भूमिका बजावत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने आत्मविश्वासाने वाटचाल केली असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले कीविकास हा सर्वसमावेशी असावा. अनुसूचित जाती-जमातीमहिलांपासून ते दिव्यांग व तृतीयपंथीयांसह सर्व समाजघटकांचा विकास झाल्यास 'विकसित भारतहे स्वप्न साकार होईल. विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर सक्षम करण्यासाठी राज्यातील विद्यापीठांमध्ये जर्मनफ्रेंचजपानीइटालियनकोरियन अशा परदेशी भाषा अभ्यासक्रमात समाविष्ट कराव्यातयासाठी कुलगुरूंना प्रोत्साहन दिले आहेअसेही त्यांनी यावेळी नमूद केले.

मेघाश्रेय संस्थेच्या श्रीमती सीमा सिंग यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि बालशिक्षणासाठी दिलेले योगदान उल्लेखनीय असल्याचे राज्यपालांनी यावेळी नमूद केले. सन्मान मिळालेल्या मान्यवरांचे  कार्य समाजासाठी दीपस्तंभ’ ठरत असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

यावेळी सर्वोत्तम नागरिक सन्मान कॉफीटेबल बुकचे प्रकाशन राज्यपाल श्री.राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकरपद्मविभूषण विजय भाटकरज्येष्ठ संगीतकार व गायक पद्मश्री शंकर महादेवनचित्रपट निर्माता इम्तियाज अलीज्येष्ठ हृदयरोग तज्ज्ञ पद्मविभूषण डॉ. अश्विन मेहतापत्रकार नाविका कुमारप्रा. रवींद्र कुलकर्णीज्येष्ठ गायक कुमार शानूअभिनेता व दिग्दर्शक अजिंक्य देवजिगर सचिन  बॉक्सिंग खेळाडू विजेंद्र सिंगबीज माता पद्मश्री राहिबाई पोपरेशिक्षण तज्ज्ञ डॉ. इंदू सहानीपद्मश्री पोपटराव पवारमहिला चळवळीतील डॉ. वर्षा देशपांडेहनुमान केंद्रे आदींना सर्वोत्तम नागरिक पुरस्काराने गौरविण्यात आले.

महाॲग्री एआय धोरण’ या विषयी 'दिलखुलास’ कार्यक्रमात प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांची विशेष मुलाखत

 ‘महाॲग्री एआय धोरण’ या विषयी 'दिलखुलास’ कार्यक्रमात

प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांची विशेष मुलाखत

 

मुंबईदि. 6 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलासकार्यक्रमात "महाॲग्री एआय धोरण" चे नियोजन व अंमलबजावणी या विषयावर कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

 

'दिलखुलासकार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार दि. 8शनिवार दि. 9सोमवार दि. 11 आणि मंगळवार दि. 12 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘News On AIR’ मोबाईल अॅपवर ऐकता येणार आहे. ही मुलाखत कृषी विभागाचे उपसचिव श्रीकांत आंडगे यांनी घेतली आहे.

 

कृषी विभागाने "महाॲग्री एआय धोरण 2025-2029" नुकतेच जाहीर केले आहे. या धोरणात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआयआणि अन्य नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानांचा वापर कसा करण्यात येणारधोरणासाठी डिजिटल पायाभूत सुविधा कशा उभारल्या जाणारया धोरणाचा उद्देशस्वरूप, "विकसित भारत 2047" सारख्या राष्ट्रीय उपक्रमांशी सुसंगत असलेले धोरणातील उपक्रमराज्यात या धोरणाची अंमलबजावणी कशा प्रकारे करण्यात येणार आहे. याबाबत कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांनी 'दिलखुलासकार्यक्रमातून माहिती दिली आहे.

 

कुसुंबा-दोंडाईचा-शहादा-खेडकोचरा ते सेंधवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरी द्रुतगती महामार्ग करावा

 कुसुंबा-दोंडाईचा-शहादा-खेडकोचरा ते सेंधवा राष्ट्रीय महामार्ग

चौपदरी द्रुतगती महामार्ग करावा - पणनमंत्री जयकुमार रावल यांची मागणी

 

नवी दिल्ली, 6: कुसुंबा-दोंडाईचा-शहादा-खेडकोचरा ते सेंधवा या राष्ट्रीय महामार्गच्या चौपदरी द्रुतगती महामार्गात रूपांतरची मागणीधुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन केली. तसेच,सारंगखेडा येथील तापी नदीवरील नवीन पूल बांधण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची विनंतीही केली.

 

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशला जोडणारा कुसुंबा-दोंडाईचा-शहादा-खेडकोचरा ते सेंधवा हा राष्ट्रीय महामार्ग सध्या दोनपदरी आहे. वाढती वाहतूकवारंवार होणारी कोंडी आणि अपघातांचे वाढते प्रमाण यामुळे या मार्गाचे चौपदरीकरण अत्यंत आवश्यक बनले आहे. याबाबत जयकुमार रावल यांनी नितीन गडकरी यांच्याशी सविस्तर चर्चा करून हा महामार्ग द्रुतगती चारपदरी मार्गात विकसित करण्याची मागणी केली.  याशिवायसारंगखेडा येथील तापी नदीवरील  नव्या आधुनिक पुलाच्या बांधकामाला गती देण्याची मागणीही त्यांनी केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या दोन्ही मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तात्काळ तयार करण्याचे निर्देश दिले.

 

या प्रकल्पाच्या पूर्णत्वामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईलस्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेलअशी आशा पणनमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केली.

0000

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवराहाटी जमीन नोंद प्रकरणी राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून आढावा

 रत्नागिरीसिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवराहाटी जमीन नोंद प्रकरणी

 राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून आढावा

 

मुंबईदि. 6 :  रत्नागिरीसिंधुदुर्ग जिल्ह्यात देवराहाटी म्हणून नोंद असलेल्या जमिनीवर पारंपरिक जुन्या मंदिर व परिसरात विकास कामे करण्यासाठी या संदर्भातील वन विभागमहसूल विभागाकडे  असलेल्या जमिनींच्या नोंदीन्यायालयास सादर केलेले अहवाल या बाबतचा सविस्तर आढावा महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतला.

 

राज्यमंत्री श्री. कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीस रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या महसूल व संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

राज्यमंत्री श्री. कदम यांनी सांगितलेरत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवराहाटी जमीन म्हणून नोंद असलेल्या जमिनीवर पारंपरिक जुनी मंदिरे असल्याने या मंदिरांचा जीर्णोद्धार करणेनव्याने बांधकाम करणेसभागृहसभामंडपबगीचा करणेनळपाणी योजनाअंगणवाडी शाळाव्यायामशाळास्वच्छता गृह  अशी विकासाची कामे करण्यास अडचण निर्माण होत आहेत. त्यामुळे या जमिनींच्या नोंदी संदर्भात वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्यात यावा.  वन व महसूल विभागाने त्यांच्याकडील या संदर्भातील नोंदी तपासून विकास कामे करण्यासाठी उपाययोजना कराव्यातअसेही त्यांनी सांगितले.

आंबडवे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पुनर्विकासाचा आराखडा तयार करा

 आंबडवे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पुनर्विकासाचा

 आराखडा तयार करा

-         राज्यमंत्री योगेश कदम

 

मुंबईदि. 6 : रत्नागिरी जिल्ह्यातील मौजे आंबडवे (ता. मंडणगड) येथे असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वसमावेशक असा आराखडा तयार करावाअशा सूचना गृह (शहरे)महसूलग्रामविकास व पंचायत राजअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण आणि अन्न  व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिल्या.

 

मौजे आंबडवे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या विकास संदर्भात राज्यमंत्री श्री. कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात त्यांच्या समिती कक्षात बैठक झाली. बैठकीस रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंहदापोलीचे उपविभागीय अधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशीसार्वजनिक बांधकाम विभागाचे सहसचिव सो. ना. बागुल यांच्यासह रत्नागिरी जिल्हा समाजकल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

राज्यमंत्री श्री. कदम म्हणालेमौजे आंबडवे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे स्मारक सामाजिकऐतिहासिक आणि प्रेरणादायी वारसा आहे. या स्मारकाचा विस्तार व पुनर्विकास करताना स्मारक परिसरातील काही घरांचे व कुटुंबांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे.  या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी महसूल व समाजकल्याण विभागाने पर्यायी जागा शोधावीअशा सूचनाही राज्यमंत्री श्री. कदम यांनी यावेळी दिल्या.

लोकसंख्येच्या निकषावर पात्र असणाऱ्या बंजारा लमाण तांड्यांना महसुली ग्रामपंचायतचा दर्जा देणार

 लोकसंख्येच्या निकषावर पात्र असणाऱ्या बंजारा लमाण तांड्यांना

 महसुली ग्रामपंचायतचा दर्जा देणार

ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे

 प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या विभागीय आयुक्तांना सूचना

 

मुंबई, दि. 6 : राज्यातील विविध महसूल विभागात लोकसंख्येच्या निकषावर पात्र असलेल्या बंजारा लमाण तांड्यांना महसुली ग्रामपंचायतचा दर्जा देण्याचा प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. याबाबत अमरावतीछत्रपती संभाजी नगरनाशिक विभागीय आयुक्तांना थेट दूरध्वनी द्वारे सूचना दिल्या.

 

संत सेवालाल बंजारा/ लमाण तांडा समृद्धी योजनाबाबत मंत्री श्री. गोरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी ग्रामविकास विभागाचे सहसचिव वी श.बोंदरेबंजारा/ लमाण तांडा समृद्धी

योजनेच्या राज्यस्तरीय समितीचे अशासकीय सदस्य महंत जितेंद्र महाराजश्रावण चव्हाण तसेच समाज संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

मंत्री श्री. गोरे म्हणालेविविध महसुली विभागामध्ये याबाबत जिल्हा अथवा पंचायत समिती स्तरावर प्रलंबित आहेत. महसुली गावाचा दर्जा देण्याचे अधिकार विभागीय पातळीवर दिलेले आहेत. शासनाने तांडांच्या विकासासाठी यापूर्वी दिलेल्या 139 कोटी रुपये निधीतील झालेल्या कामांच्या खर्चाचा आढावा घेतला जाईल. प्रत्येक तांड्यावर स्मशानभूमी व सभागृह उभारण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार असून महसुली गावाचा दर्जा देण्यासाठी पात्र असलेल्या तांड्यांच्या प्रस्तावांना मान्यता देताना कोणतेही तडजोड केली जाऊ नये.

 

बैठकीमध्ये समाजाच्या विविध मागण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. यासह राज्य विभागीय व जिल्हास्तरीय समितीतील सदस्यांना ओळखपत्र देणेशासन निर्णयातील लमाण या नावाऐवजी '' लभाणा "अशी सुधारणा करणे यासाठी कार्यवाही केली जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

 

राज्यामध्ये 3900 तांडे असून यातील अनेक तांड्यांना महसुली दर्जा नाही विशेषता 700 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या तांड्यांना महसुली ग्रामपंचायत दर्जा मिळावा यासाठी प्रस्ताव जिल्हा अथवा पंचायत समिती स्तरावर प्रलंबित आहेत. जवळपास 400 तांड्यांची लोकसंख्या 700 पेक्षा जास्त आहे, अशी माहिती बैठकीमध्ये देण्यात आली.

मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचाय पुरस्कार pl share

 पुरस्कार रचना (एकूण २४५.२० कोटी) :

 ग्रामपंचायतींसाठी देण्यात येणारे पुरस्कार- तालुकास्तरिय पुरस्कार:-

प्रत्येक तालुक्यात ३ ग्रामपंचायतीना पुरस्कार प्रथम रुपये १५ लाखद्वितीय रुपये १२ लाखतृतीय रुपये ८ लाख

विशेष पुरस्कार: प्रत्येकी तालुक्यातील २ ग्रामपंचायतींना प्रत्येकी रुपये ५ लाख

जिल्हास्तरीय पुरस्कार

प्रत्येक जिल्ह्यात ३ ग्रामपंचायतीना पुरस्कार. प्रथम रू ५० लाखद्वितीय रू ३० लाखतृतीय रुपये २० लाख

विभागस्तरीय पुरस्कार-

प्रत्येक विभागात ३ ग्रामपंचायतीना पुरस्कार. प्रथम रुपये १कोटीद्वितीय रुपये ८० लाखतृतीय रुपये ६० लाख

 

राज्यस्तरीय पुरस्कार राज्यात ३ ग्रामपंचायती

 प्रथम रू ५ कोटीद्वितीय रुपये ३ कोटीतृतीय रुपये २ कोटी

 

विभाग आणि राज्यस्तरावर पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदासाठीही आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहे.

 

पंचायत समित्यांना देण्यात येणारे पुरस्कार

विभागस्तरीय पुरस्कार-

प्रत्येक विभागात ३ पंचायत समित्या पुरस्कार. प्रथम १ कोटीद्वितीय ७५ लाखतृतीय ६० लाख

 

राज्यस्तरीय पुरस्कार

राज्यात ३ पंचायत समित्यांना पुरस्कार

प्रथम २ कोटीद्वितीय १.५ कोटीतृतीय १.२५ कोटी

 

जिल्हा परिषदांना देण्यात येणारे पुरस्कार

राज्यात ३ जिल्हा परिषदांना पुरस्कार

प्रथम ५ कोटीद्वितीय ३ कोटीतृतीय २ कोटी

अभियानाची अंमलबजावणी आणि वेळापत्रक:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्याने १७ सप्टेंबर २०२५ पासून शुभारंभ होणार आहे. या अभियानाचा कालावधी १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ असा आहे.

अभियानाची पूर्वतयारी:

राज्यस्तरीय कार्यशाळा: २१ ऑगस्टपुणे

जिल्हास्तरीय प्रशिक्षण: २५३० ऑगस्ट

तालुकास्तरीय प्रशिक्षण: १५ सप्टेंबर

ग्रामस्तर सभा व तयारी: ६१० सप्टेंबर

 

ग्रामस्तरावर विशेष ग्रामसभा घेऊन ग्रामस्तरीय समित्या स्थापन केल्या जातील. तालुका स्तरावर प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी संपर्क अधिकारी नेमण्यात येईल.

*अभियानाचे मूल्यमापन:*

एकूण १०० गुणांच्या आधारे मूल्यांकन केले जाणार आहे. यामध्ये पारदर्शक प्रशासनआरोग्यशिक्षणमहिला सक्षमीकरणरोजगारपर्यावरणकर वसुलीलोकसहभाग या बाबींचा समावेश आहे.

तंत्रज्ञानाचा वापर:

प्रत्येक ग्रामपंचायतीकडून दररोज कामाचा अहवाल विशेष App आणि वेबसाईटवर भरला जाईल. यासाठी आधीच प्रशिक्षण देण्यात येईल.

प्रसार व जनजागृती:

प्रत्येक गावात प्रचारासाठी कार्यशाळापोस्टरबॅनरसोशल मिडियायशोगाथा फिल्म्सतांत्रिक सल्लागारइत्यादी माध्यमांचा वापर केला जाणार आहे. व्यापक जनजागृतीसाठी स्वतंत्र निधीची तरतूद आहे.

ही योजना केवळ स्पर्धा नाहीतर ग्रामीण महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाचे आंदोलन आहे. प्रत्येक गावपंचायत आणि नागरिकाने हे अभियान आपले समजून काम केले तर गावाचा चेहरामोहराच बदलू शकतो. त्यामुळे "मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान" ग्रामीण विकासाच्या दिशेने शासनाचे एक दूरदृष्टीपूर्ण पाऊल आहेअसे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi