Wednesday, 6 August 2025

बिहार मतदार यादीत दावे-हरकती सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाचे आवाहन

 बिहार मतदार यादीत दावे-हरकती सादर करण्यासाठी

निवडणूक आयोगाचे आवाहन

मुंबईदि. 5 : बिहारच्या अंतिम मतदार याद्यांमध्ये पात्र मतदार वगळला जाणार नाही आणि अपात्र मतदाराचा समावेश होणार नाहीयाची खात्री करण्यासाठी निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा जनतेला तसेच राजकीय पक्षांना आवाहन केले आहे.

1 ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या मसुदा मतदार यादीतील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी दावा व हरकती 5 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत सादर करता येतात. मात्रआजपर्यंत एकाही राजकीय पक्षाने कोणताही दावा किंवा हरकत नोंदवलेली नाही.

राजकीय पक्षांकडून मिळालेल्या माहितीनुसारराष्ट्रीय पक्ष व राज्य पक्षांकडून एकूण ,६०,८१३ बीएलए (BLA) फॉर्म मिळाले असून त्यातील एकाही प्रकरणावर अद्याप निकाली कार्यवाही झालेली नाही.

याशिवायथेट मतदारांकडून पात्र मतदारांचा समावेश व अपात्र नावे वगळण्यासाठी २,८६४ अर्ज मिळाले आहेततसेच १८ वर्षे पूर्ण केलेल्या नव्या मतदारांकडून फॉर्म-६ सह १४,९१४ अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी कोणताही अर्ज अद्याप निकाली काढलेला नाही.

नियमांनुसारसर्व दावे-हरकती संबंधित ईआरओ/एईआरओ (ERO/AERO) कडून सात दिवसांनंतर निकाली काढल्या जातील. तसेच १ ऑगस्टला प्रसिद्ध झालेल्या मसुदा यादीनंतर कोणतेही नाव केवळ तपासणी करून आणि संबंधित व्यक्तीस न्याय्य संधी दिल्यानंतरच वगळले जाऊ शकतेअसे भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

000

सिंचन प्रकल्पाची कामे गतीने कालमर्यादेत करा,विदर्भ, तापी, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ नियामक मंडळाच्या बैठकीत

  

सिंचन प्रकल्पाची कामे गतीने कालमर्यादेत करा

-         जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

विदर्भतापीकोकण पाटबंधारे विकास महामंडळ नियामक मंडळाच्या बैठकीत

 ८५ विषयांवर चर्चा

 

मुंबईदि.५ :- राज्यात सिंचनाचे क्षेत्र वाढावेशेतीला शाश्वत पाणी उपलब्ध व्हावे यासाठी बांधकामाधीन प्रकल्पांची कामे गतीने व कालमर्यादेत पूर्ण करावीतअशा सूचना जलसंपदा ( विदर्भतापीकोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या.

 

मंत्रालयात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली विदर्भतापी आणि कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या बैठका झाल्या. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरसचिव संजय बेलसरेविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळचे कार्यकारी संचालक राजेश सोनटक्केतापी पाटबंधारे विकास महामंडळचे कार्यकारी संचालक ज. द. बोरकरकोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

नियामक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेल्या कामामुळे सिंचन क्षेत्र वाढणार आहे. त्यानुसार या कामांचे सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार कामास प्राधान्य द्यावे. याबरोबरच विभागाने पाणी पट्टी वसुलीसाठी सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावीअशा सूचनाही जलसंपदा मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी दिल्या.

 

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या ८७ व्या बैठकीत ४२ विषयांवरतापी पाटबंधारे विकास मंडळाच्या  नियामक मंडळाच्या ७१ व्या बैठकीत २५ विषयांवरआणि कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या ८८ व्या बैठकीत १८ विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

००००

. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या उपकेंद्रांच्या धोरणाबाबत सुधारित आराखडा तयार करावा

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या उपकेंद्रांच्या धोरणाबाबत

सुधारित आराखडा तयार करावा

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 

मुंबईदि.५ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठलोणेरे अंतर्गत उपकेंद्राकरिता सार्वजनिक विद्यापीठात प्रत्येक ठिकाणी पाच एकर जागा देण्यासंबंधी केलेली कार्यवाही तसेच ज्या ठिकाणी उपकेंद्राकरिता जागा मिळाली आहे त्याचे भाडे किंवा तत्सम धोरणासंबंधीचा सुधारित आराखडा तयार करावाअसे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

मंत्रालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या विविध प्रश्नांबाबत आयोजित आढावा बैठकीत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील बोलत होते. या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी.वेणुगोपाल रेड्डीउच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकरतंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ.विनोद मोहितकरमहाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ संचालक डॉ. प्रमोद नाईकउच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडेउपसचिव प्रताप लुबाळसहसचिव संतोष खोरगडेडॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणालेडॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या अधिष्ठातासंचालक व सहसंचालक पदाची बिंदूनामावली तपासणी आणि शिक्षकेतर पदांचा आकृतीबंध व पदभरती बाबतची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करावीअसे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्याची तात्काळ नियुक्ती करण्यासंदर्भात सूचना देऊन तसेच विद्यापीठाच्या प्रशासकीय व शैक्षणिक कामकाजाकरिता शासनामार्फत दोन विशेष कार्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठातील पायभूत सोयीसुविधांकरिता भरीव निधी शासनामार्फत उपलब्ध करण्यात येऊन पहिल्या टप्यात मुलांसाठी वर्ग खोल्याअत्याधुनिक लॅब उभारण्यात येणार असल्याचे श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.

तसेच अध्यापकांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर करण्याबाबतप्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्या संबंधित तसेच विद्यापीठातील पायाभूत सुविधाबांधकामेअनुदान आणि विद्यापीठाचे लेखा परीक्षण करण्याबाबत सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.

0000

सोलर प्लेट पाण्याने ओल्या कपड्याने साफ करीत असता शॉक लागून युवकांचा मृत्यू pl share take care.

 सोलर प्लेट पाण्याने ओल्या कपड्याने साफ करीत असता शॉक लागून युवकांचा मृत्यू.

         तरी सर्व सोलर धारकांनी सतर्क व सजग राहणे आवशयक आहे.

सगळी माहिती लक्षात घ्या 🙏🏻

सोलर पॅनेलमध्ये वीज (DC करंट) सतत तयार होत असते

दिवसा सूर्यप्रकाशात ती पूर्णपणे Active असते…

जर हात ओले असतील, कपडे ओले असतील किंवा वायरिंगमध्ये काहीतरी गडबड असेल

तर लगेचच शॉक लागतो… आणि तो शॉक खूप जास्त धोकादायक असतो ⚡


DC करंटमध्ये हात पकडला गेला तर तो सुटत नाही…

म्हणूनच सोलर प्लेट सफाई करताना हे लक्षात ठेवा ⬇️


✅ सकाळी लवकर किंवा संध्याकाळीच साफ करा

✅ सोलर Disconnect स्विच बंद करूनच सफाई करा

✅ ओले कपडे, ओले हात वापरू नका

✅ लोखंडी ब्रश किंवा हाताने थेट पॅनेलला स्पर्श करू नका

✅ रबरचे ग्लोव्हज वापरा

✅ मुलांना सोलर सिस्टिमपासून दूर ठेवा

✅ दर 6 महिन्यांनी वायरिंग आणि कनेक्शन तज्ज्ञांकडून तपासून घ्या


⚠️ लक्षात ठेवा – सोलर वापरणं फायद्याचं आहे, पण योग्य काळजी घेतली तरच!

जरा चुकीनं हाताळलं, की जीव धोक्यात येतो…


👉🏻 सर्व शेतकरी व सोलर वापरणाऱ्यांना नम्र विनंती –

सतर्क राहा, सजग राहा…

मराठी सिनेमांना मल्टीप्लेक्समध्ये अतिरिक्त ‘शोज’ मिळवून देण्यासाठी समिती स्थापन

 मराठी सिनेमांना मल्टीप्लेक्समध्ये अतिरिक्त ‘शोज’ मिळवून देण्यासाठी समिती स्थापन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

·         मराठी सिनेमा जगविण्यासाठी आणि वाढवण्यासाठी सुचवणार उपाययोजना

·         गृहनगरविकासपरिवहनसांस्कृतिक कार्य सचिव आणि मराठी निर्मातेवितरक आणि मल्टिप्लेक्स मालकांचा समावेश.

 

मुंबईदि. ५ : मराठी सिनेमांना मल्टीप्लेक्स मध्ये अतिरिक्त शोज मिळवून देण्यासह या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासन स्तरावर समिती स्थापन करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. समितीने दीड महिन्यात शासनाला अहवाल सादर करावामराठी सिनेमा जगला पाहिजे अशी राज्य शासनाची भूमिका असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

 

मराठी सिनेमांना मल्टिप्लेक्स मध्ये मिळणाऱ्या कमी स्क्रीनतसेच त्यांना कोणतीही माहिती न देता तीन दिवसात सिनेमा थिएटरमधून उतरवणेआठवड्याभराचे शुल्क घेऊन उर्वरित रक्कम परत न करणेतसेच सेन्सॉर बोर्डाकडून मराठी सिनेमांना सेन्सॉर संमतीमराठी सिनेमाच्या खेळांच्या वेळा ऐनवेळी बदलणे अथवा रद्द करणे यासारख्या अनेक प्रश्नांबाबत मराठी सिनेमांचे निर्मातेवितरक आणि विविध पक्षांच्या सिने कर्मचारी संघटनांसमवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मंत्रालयात बैठक झाली.

 

यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलारवैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफपर्यटन मंत्री शंभूराज देसाईपरिवहन मंत्री प्रताप सरनाईकवित्त राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वालगृहराज्यमंत्री योगेश कदमउपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नविन सोनानगरविकास प्रधान सचिव डी. गोविंदराजसांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी आणि इतर विभागांचे अधिकारीमनसे चित्रपट सेनेचे अमेय खोपकरशिवसेना चित्रपट सेनेचे सुशांत शेलारराष्ट्रवादी चित्रपट सेनेचे बाबासाहेब पाटीलव्हिडीओ पॅलेसचे नानूभाई जयसिंघानीवितरक समीर दीक्षितचित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले,  संदीप घुगे हेदेखील उपस्थित होते.

राज्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी प्राधिकरण स्थापन करणार

 राज्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी प्राधिकरण स्थापन करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. 05 : राज्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी "महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण (MSRRA)" स्थापन करण्याची कार्यवाही सुरु करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली. राज्यातील नद्यांचे प्रदूषण कमी करून त्यांचे पुनरुज्जीवन साध्य करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलतनद्यांचे नैसर्गिक प्रवाह राखण्यासाठी आणि पुनरुज्जीवनासाठी हे प्राधिकरण विकासात्मक भूमिका बजावेलअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.       

          मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीला पर्यावरण आणि हवामान बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडेपर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोजवातावरणीय बदल कक्षाचे संचालक अभिजित घोरपडे तसेच सल्लागार संस्थेच्या नमिता रेपे उपस्थित होत्या.

          प्राधिकरणाच्या रचना व संकल्पनेचे पर्यावरण मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी विस्तृत सादरीकरण केले. नदी पुनरुज्जीवनासाठी ‘डीपीआर’ व खोरे व्यवस्थापन योजना मंजूर करणेअतिक्रमणवीजभूसंपादन यासंबंधी अडचणी सोडवणेराष्ट्रीय योजनांसाठी निवडक प्रकल्पांची शिफारस करणे इत्यादी महत्त्वपूर्ण कार्ये प्राधिकरणाद्वारे करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

        प्राधिकरणाचे अध्यक्ष मुख्यमंत्री तर पर्यावरण मंत्री उपाध्यक्ष असणार आहेत. यासोबतच पर्यावरण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कार्यकारी समिती कार्यरत राहील. या राज्यस्तरीय समितीमध्ये तांत्रिक तज्ञवित्तीय व कायदेशीर सल्लागारमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (MPCB) सदस्य सचिव तसेच आयआयटीसारख्या प्रतिष्ठित संस्थांतील तज्ज्ञ सदस्य यांचा समावेश असेल.

        राज्यातील नद्यांचे शाश्वत पुनरुज्जीवन साध्य करण्यासाठी हे प्राधिकरण व्यापक काम करणार आहे. दैनंदिन कामकाजासाठी ‘एमपीसीबी’चे सदस्य सचिव प्रमुख असलेले एक समर्पित सचिवालयही स्थापन करण्यात येणार आहे.

प्रो गोविंदा लीग 2025 वाराणसी महादेव असेंडर्स का 75 लाख रुपये मे हुआ अधिग्रहण 7 से 9 ऑगस्ट तक रोमांच

 प्रो गोविंदा लीग 2025 

वाराणसी महादेव असेंडर्स का 75 लाख रुपये मे हुआ अधिग्रहण

7 से 9 ऑगस्ट तक रोमांच 

मुंबई, 5 अगस्त 2025: 'ग्लोबल वेंचर्स' के तहत काम करने वाली 'अस्पेक्ट स्पोर्ट्स' ने 'प्रो गोविंदा लीग 2025' के लिए 'वाराणसी महादेव असेंडर्स' का अधिग्रहण कर लिया है। पहले यह टीम 'ओम ब्रह्मांड साई गोविंद पथक' (मालाड पश्चिम) के नाम से जानी जाती थी। यह अधिग्रहण ₹74 लाख में हुआ है।

अब यह टीम 'वाराणसी महादेव असेंडर्स' के नए नाम से 7 से 9 अगस्त तक मुंबई के वर्ली स्थित एनएससीआई डोम में होने वाली इस बहुप्रतीक्षित प्रतियोगिता में भाग लेगी।

अस्पेक्ट ग्लोबल वेंचर्स की कार्यकारी अध्यक्षा, श्रीमती अक्षा कंबोज ने इस अधिग्रहण पर बोलते हुए कहा, “हमें ऐसी टीम के साथ प्रो गोविंदा लीग 2025 में हिस्सा लेने पर बहुत गर्व है, जो धैर्य, अनुशासन और गहरी सांस्कृतिक जड़ों का प्रतीक है। वाराणसी महादेव असेंडर्स सिर्फ एक टीम नहीं, बल्कि भारत के युवाओं की भावना का प्रतिनिधित्व करती है, जो परंपरा और टीम वर्क के जरिए आगे बढ़ते हैं।”

यह लीग महाराष्ट्र सरकार द्वारा मान्यता प्राप्त है और यह परिवहन मंत्री प्रताप सरनाईक के विचारों से प्रेरित है। इस लीग का उद्देश्य दही हांडी की सदियों पुरानी परंपरा को एक सुरक्षित, प्रशिक्षित और प्रायोजित पेशेवर खेल में बदलना है।

इस साल के टूर्नामेंट की कुल पुरस्कार राशि ₹1.5 करोड़ है, जिसमें विजेता टीम को ₹75 लाख मिलेंगे। इसके अलावा, प्रत्येक टीम को भागीदारी प्रोत्साहन के रूप में ₹3 लाख दिए जाएंगे, जिससे यह लीग एक गंभीर प्रतिस्पर्धी मंच के रूप में स्थापित होगी। श्रीमती अक्षा कंबोज के स्वामित्व वाली वाराणसी महादेव असेंडर्स अपनी मजबूत भावना और विरासत को राष्ट्रीय स्तर पर पहचान दिलाने के लिए तैयार है।



Featured post

Lakshvedhi