Tuesday, 5 August 2025

शासन मालकीच्या चिंचोळ्या, अयोग्य आकाराच्या, लँड लॉक्ड भुखंडाच्या वितरणाचे धोरण

 (महसूल विभाग)

शासन मालकीच्या चिंचोळ्याअयोग्य आकाराच्या,

लँड लॉक्ड भुखंडाच्या वितरणाचे धोरण

शासनाच्या मालकीच्या चिंचोळ्यास्वतंत्ररीत्या बांधकामास अयोग्यउपयुक्त आकार नसलेल्या (shape), सुलभ पोहोच मार्ग नसलेल्या किंवा लँड लॉक्ड स्वरूपातील शासकीय किंवा नझूल जमिनींच्या वाटपासाठी धोरणास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. अशा प्रकारच्या जमिनी भूखंडधारकांना त्यांच्या विद्यमान धारणाधिकाराच्या स्वरूपानुसारच देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे घराच्या मागील बाजूस असलेल्या बोळकांड्यासफाई गल्ल्या (Conservancy Lane) किंवा अन्य उपयुक्ततेअभावी वापरात न आणलेल्या जमिनी अधिकृतपणे लागूपड धारकांच्या मालकीत येणार आहेत.

महसूल व वन विभागाच्या ९ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार हे धोरण स्पष्ट करण्यात आले असून१९७१ मधील महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनींची विल्हेवाट) नियमांतर्गत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या नियम ३७अ नुसार ही प्रक्रिया राबवली जाणार आहे.

कोणत्या जमिनींचा समावेशशासनाच्या नव्या निर्णयात पुढील स्वरूपाच्या जमिनींचा समावेश आहे: बांधकामास अयोग्य असलेल्या छोट्या किंवा चिंचोळ्या जागा. उपयुक्त आकार नसलेल्या किंवा विकृत shape असलेल्या भूखंड. सुलभ पोहोच मार्ग नसलेले भूखंड. चारही बाजूंनी घेरलेल्या (land-locked) शासकीय किंवा नझूल जमिनी

जमिनी कोणत्या अटींवर मिळणार?

(१)       एकच लगतचा भूखंडधारक असेल: जर संबंधित भूखंडधारकाने भूखंड भाडेपट्ट्याने घेतलेला असेलतर नव्याने दिली जाणारी जमीनही त्याच दराने भाडेपट्ट्याने दिली जाईल. जर भूखंड कब्जेहक्काने (वर्ग-२) घेतलेला असेलतर संबंधित जमीन प्रचलित बाजार दरानुसार पूर्ण किंमत घेऊन दिली जाईल. जर भूखंड भोगवटादार वर्ग-१ ने घेतलेला असेलतर त्याला जमिनीची संपूर्ण किंमत + २५% अधिमूल्य (एकूण १२५%) आकारून जमीन दिली जाईल.

(२)       एकाहून अधिक भूखंडधारकांची मागणी असेल तर? : एकाच्या नावे जमीन देण्यासाठी सर्व शेजारच्या भूखंडधारकांची लेखी सहमती आवश्यक असेल. सहमती नसल्यास लिलाव घेतला जाईल आणि सर्वोच्च बोली लावणाऱ्या धारकास जमीन देण्यात येईल. वर्ग-१ धारकाने लिलावात भाग घेतल्यासलिलाव दर किंवा १२५% अधिमूल्य – यापैकी जो जास्तत्या दराने जमीन मिळेल.

प्रमुख अटी व निकष: ही योजना फक्त महानगरपालिका व नगरपरिषद क्षेत्रात लागू होणार आहे. मुंबईत जिल्हाधिकाऱ्यांना शासनाची पूर्वमान्यता घ्यावी लागणार. भूखंडाचे क्षेत्र मूळ भूखंडाच्या १०% पेक्षा जास्त नसावे. भूखंडावरील FSI इतरत्र वापरलेला नसावा. जमिनीखाली किंवा वरून जात असलेल्या दूरध्वनी केबल्सविद्युत तारा इ. बाबत स्पष्टता आवश्यक.

भूखंडाचा विकास स्थानिक प्राधिकरणाच्या विकास नियमानुसारच करावा लागेल.

महत्व कायहा निर्णय घेतल्यामुळे अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या लहानशाउपयोगात न येणाऱ्या शासकीय जमिनी अधिकृतपणे लागूपड धारकांच्या मालकीत येणार असूनयामुळे अतिक्रमणतक्रारी आणि कायदेशीर वादांनाही आळा बसेल. शिवाय शहरी विकासाला अधिक शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध दिशा मिळणार आहे.

000


वाढवण बंदर ‘फ्रेट कॉरिडॉर’ ने हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाला जोडणार १०४. ८९८ किलोमीटरचा शिघ्रसंचार द्रुतगती महामार्ग, अंतर, वेळ, इंधनाची बचत pl share

 वाढवण बंदर फ्रेट कॉरिडॉर’ ने हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे

महाराष्ट्र समृध्दी महामार्गाला जोडणार

१०४. ८९८ किलोमीटरचा शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गअंतरवेळइंधनाची बचत

पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर (तवा) आणि हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्ग यांना फ्रेट कॉरिडॉर या शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गाने भरवीर (ता. चांदवडजि. नाशिक) येथे यांना जोडण्यात येणार आहे. या १०४. ८९८ किलोमीटरच्या शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. 

हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हाती घेण्यात येईल. प्रकल्पाकरिता हूडकोकडून १ हजार ५०० कोटी रुपयांचे कर्ज उभारण्यात येणार आहे. या कर्जासह २ हजार ५२८ कोटी ९० लाख रुपयांच्या तरतूदीस देखील मंत्रिमंडळाने मान्यता दिली. प्रकल्पाचे काम ३ वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहे.

वाढवण ट्रान्सशिपमेंट हे बंदर वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड च्या माध्यमातून बांधले जात आहे. वाढवण बंदराच्या माध्यमातून जलमार्गे होणारी आंतरराष्ट्रीय मालवाहतूक देशातील सर्व भागापर्यंत वेगाने व किफायतशीर किंमतीमध्ये पोहोचण्याच्या दृष्टीने हे बंदर हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाला जोडण्याचा हा प्रस्ताव आहे. केंद्र शासनाच्या भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने सागरमाला प्रकल्पांतर्गत सध्या वाढवण बंदर ते तवा (रा.म.४८) पर्यंत ३२. कि.मी. महामार्गाचे काम हाती घेतले आहे. समृध्दी महामार्गावरुन वाढवण बंदराकडे जाण्याकरीता भरवीर-आमणे (समृध्दी महामार्ग) ते वडोदरा-मुंबई द्रुतगती मार्गावरून जावे लागते. त्यामुळे जवळजवळ ८२ कि.मी. लांबीचा अनावश्यक प्रवास करावा लागतो. वाढवण बंदराच्या भविष्यातील मोठयाप्रमाणावरील वाहतूक वर्दळीचा विचार करता विदर्भमराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील वाहतूक वर्दळीस उपयुक्त अशा महामार्गाची निर्मिती अत्यंत आवश्यक आहे. हा शिघ्रसंचार द्रूतगती महामार्ग पालघर जिल्ह्यातील डहाणूविक्रमगडजव्हार आणि मोखाडा या आणि नाशिक जिल्ह्यातील त्रंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यातून जाणार आहे.  या महामार्गामुळे तवा भरवीर हे वडोदरा - मुंबई एक्सप्रेस मार्गे अंतर समृद्धी महामार्ग १८३.४८ किमी ऐवजी १०४.८९८ किमी होणार आहे. त्यामुळे वाहतुकीच्या अंतरात ७८.५८२ किमी बचत होणार आहे. वाढवण बंदर ते भरवीर हा प्रवास सद्याच्या ४ - ५ तासावरून साधारणतः १ ते १.५ तासावर येईलयामुळे वाहतुकीच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. दळणवळण गतीमान झाल्याने पालघरनाशिक जिल्ह्यांमधील लघुमध्यम व अवजड उद्योग कारखानेकृषी-विषयक संस्थाशिक्षणसंस्थाआयटी कंपन्याकृषी उद्योग केंद्रांना याचा लाभ होणार आहे. यातून स्थानिकांना उत्तम रोजगार व उत्तम बाजारपेठ उपलब्ध होईल.

००००


 

महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण-२०२५ जाहीर पाच वर्षात १.२५ लाख उद्योजक घडवणार, ५० हजार स्टार्टअप्सचे उद्दीष्ट

 महाराष्ट्र स्टार्टअपउद्योजकता आणि नाविन्यता धोरण-२०२५ जाहीर

पाच वर्षात १.२५ लाख उद्योजक घडवणार५० हजार स्टार्टअप्सचे उद्दीष्ट

 

महाराष्ट्र स्टार्टअपउद्योजकता आणि नाविन्यता धोरण२०२५ ला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या धोरणामुळे राज्यात येत्या पाच वर्षात १.२५ लाख उद्योजक घडतील आणि ५० हजार स्टार्टअप्स् सुरू होतील असे नियोजन आहे. यामुळे देशातील सर्वाधिक यामुळे राज्यात स्टार्टअप आणि युनिकॉर्न्स राज्यात स्थापन  होण्याबरोबरच रोजगार निर्मिती आणि नाविन्यता क्क्षेत्रात राज्याची जागतिक स्तरावर ओळख निर्माण होईल. यात शहरी व ग्रामीण भागांतील तसेच महिलांच्या आणि युवकांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सना विशेष प्रोत्साहन दिले जाईल.           

महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक स्टार्टअप उद्योग आहेत.  ३१ मे२०२५पर्यंत राज्यातील स्टार्टअप उद्योगांची संख्या २९ हजार १४७ आहे. देशाच्या एकूण स्टार्टअपच्या संख्येत १८ टक्के स्टार्टअप महाराष्ट्रात आहेत.  स्टार्टअप उद्योगांना अधिक प्रभावी परिसंस्था तयार करण्यासाठी कालसुसंगत नवीन धोरण आखण्यात आले आहे. या धोरणात नवोपक्रमउद्योजकगुंतवणुकदार यांच्यासाठी प्रभावी इकोसिस्टम विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. या धोरणातील एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे मुख्यमंत्र्यांचा महा-फंडज्यामध्ये ५०० कोटी रुपयांचा निधी असूनयामार्फत सुरुवातीच्या टप्प्यातील २५ हजार उद्योजकांना मार्गदर्शनइन्क्युबेशन आणि आर्थिक मदत दिली जाणार आहे.

सुव्यवस्थित पायाभूत सुविधांसाठी राज्यभर ITI, पॉलिटेक्निक व शैक्षणिक संस्थांमध्ये मायक्रो इन्क्युबेटर उभारले जातील. तसेचप्रत्येक प्रशासकीय विभागात प्रादेशिक नवप्रवर्तन आणि उद्योजकता हब्स स्थापन करण्यात येतील. हे हब AI, डीपटेकफिनटेकमेडटेकसायबर सुरक्षा आणि शाश्वतता यांसारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करतील. महाराष्ट्र इनोव्हेशन सिटी’ या ३०० एकरावरील नगरीत स्टार्टअप्सकॉर्पोरेटशैक्षणिक संस्था आणि सरकार यांना एकत्र आणले जाईल. ही इनोव्हेशन सिटी संशोधन व नवप्रवर्तनाचा केंद्रबिंदू असेल.

महाराष्ट्र स्टार्टअप वीकअंतर्गत निवडलेले स्टार्टअप्स थेट शासन विभागांसोबत काम करू शकतील आणि त्यांना २५ लाखांपर्यंतच्या पायलट वर्क ऑर्डर्स दिल्या जातील. तसेचपेटंट नोंदणीउत्पादन गुणवत्ता प्रमाणपत्रेदेशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमध्ये सहभाग यासाठी आर्थिक भरपाई दिली जाईल. तसेच सार्वजनिक संस्था व इतर विश्वासार्ह ग्राहकांकडून वर्क ऑर्डर्स प्राप्त झालेल्या स्टार्टअप्सना कर्ज सहाय्यासाठी खास यंत्रणा निर्माण केली जाईल.

 राज्यातील प्रत्येक विभागाने आपल्या वार्षिक निधीपैकी ०.५% रक्कम नवप्रवर्तन व उद्योजकता प्रोत्साहनासाठी राखीव ठेवणे बंधनकारक असेल. सर्व योजना महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मार्फत राबविल्या जातील.

या धोरणात नागरिकस्टार्टअप्सशैक्षणिक संस्थाइन्क्युबेटर्सगुंतवणूकदार व विषयतज्ज्ञांचा सक्रिय सहभाग घेण्यात आला आहे. त्यांच्या अभिप्रायावर आधारित प्रादेशिक इन्क्युबेशन समर्थनसुलभ प्रोत्साहन प्रक्रियाडिजिटल साक्षरता व उद्योजकीय कौशल्यविकास यासारख्या बाबी समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

            महाराष्ट्र स्टार्टअपउद्योजकता आणि नाविन्यता धोरणांतर्गत कौशल्यरोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागास नोडल विभाग म्हणून मान्यता देण्यात आली. या धोरणाची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत करण्यासही मान्यता देण्यात आली. धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी नाविन्यता सोसायटीस प्रत्येक आर्थिक वर्षात निधी उपलब्ध करून देण्यासही मान्यता देण्यात आली.  याचबरोबर सर्व विभागांना उपलब्ध होणाऱ्या एकूण निधीतील ०.५ टक्के निधी उद्योजकता व नाविन्यतेच्या प्रोत्साहनासाठी उपलब्ध करून देण्यासही मान्यता देण्यात आली.

                        महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीची २०१७ मध्ये स्थापना करण्यात आली आहे.  नवीन धोरणाच्या  प्रभावी अंमलबजावणीसाठी सोसायटीचे बळकटीकरण केले जाईल. सोसायटीचे सर्वसाधारण सभा (जनरल बॉडी) आणि नियामक मंडळ (गव्हर्नर कौन्सिल) असे घटक असतील.  सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतील. या सभेच्या सदस्यपदी उद्योगनियोजनवित्तकृषिसार्वजनिक आरोग्यवैद्यकीय शिक्षणमाहिती व तंत्रज्ञाननगर विकासपर्यावरणपरिवहनशालेय शिक्षणउच्च व तंत्रशिक्षण इत्यादी विभागांचे सचिवप्रधान सचिव यांचा समावेश असेल.  उद्योग संघटनाउद्योग आणि विविध क्षेत्रातील तज्ञांचा देखील सदस्य म्हणून समावेश केला जाईल. सर्वसाधारण सभेने घेतलेल्या विविध निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी नियामक मंडळ असेल. 

            आर्टिफिशियल इंटेलिजन्सफिनटेकॲग्रीटेकमेडटेकसेमीकंडक्टर्ससायबर सुरक्षाबायोटेकस्पेसटेकब्लॉकचेनक्वांटम कंप्यूटिंगस्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चरमोबिलिटीडीपटेक यासारख्या उच्च क्षमतेच्या क्षेत्रांना प्राधान्य देण्याचे उद्दिष्ट्ये या धोरणात आहे.

२०२३-२४ चे उत्कृष्ट ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक पुरस्कार जाहीर · १२ ऑगस्ट २०२५ रोजी पुरस्कार वितरण

 २०२३-२४ चे उत्कृष्ट ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालय

कार्यकर्ता व सेवक पुरस्कार जाहीर

·         १२ ऑगस्ट २०२५ रोजी पुरस्कार वितरण

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

 

मुंबईदि २९ : राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालयांना देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार आणि ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक  यांना दिले जाणारे डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार जाहीर करण्यात आले  आहेत. दि. १२ ऑगस्ट २०२५ रोजी पाटकर सभागृहएसएनडीटी महिला विद्यापीठ,मुंबई येथे पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची केली.

सन २०२३-२४ या वर्षासाठीचे हे पुरस्कार असून यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार शहरी विभागात चार आणि ग्रामीण विभागात तीन उत्कृष्ट ग्रंथालयांना त्यांच्या वर्गवारीनुसार जाहीर करण्यात आले आहे. शहरीभागासाठी रोख रक्कम अनुक्रमे  एक लाख ते २५ हजार रुपयेग्रामीण भागासाठी ७५ हजार ते २५ हजार अनुक्रमे आणि सन्मानचिन्ह प्रमाणपत्र असे स्वरूप आहे.

डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता (ग्रंथमित्र) पुरस्कार राज्यस्तरावर दोघांना पुरस्कार रक्कम ५०हजार आहेत.  विभागस्तरावर पाच जणांना जाहीर झाले आहेत. तर डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार हे विभागस्तरावर सहा जणांना जाहीर झाले आहे. या सर्व पुरस्कारासाठी रोख २५ हजार रुपयेसन्मानचिन्हप्रमाणपत्र असे स्वरूप आहे.

या पुरस्कार सोहळ्याचे वितरण लवकरच करण्यात येणार आहे

उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार

शहरी विभाग :

 सार्वजनिक वाचनालयशिवाजी चौककल्याण पश्चिमता.कल्याणजि.ठाणे

  सर्वात्मक वाचनालयबापू बंगला स्टॉपइंदिरानगरनाशिक

 ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयवाघापूरता.जि.यवतमाळ

 मा. शिल्पकार ल. ना. भालेराव सार्वजनिक वाचनालयपंचवटीनाशिक

ग्रामीण विभाग

१) स्व. समीर (तात्या) सोनटक्के वाचनालयचोराखळीता. कळंबजि. धाराशिव

२)बलराम सार्वजनिक वाचनालयफुलउमरीता. मानोराजि. वाशिम

३) प्रगती सार्वजनिक वाचनालयसिल्ली (आंबाडी) जि. भंडारा

डॉ. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार

राज्यस्तरीय ग्रंथालय कार्यकर्ता (ग्रंथमित्र)

१) श्री. धनंजय वसंतराव पवारअध्यक्षश्री. गुणवंतराव रामचंद्र पाटील सार्वजनिक वाचनालयहासाळापो. बुधोडाता. औसाजि. लातूर

 राज्यस्तरीय ग्रंथालय सेवक (ग्रंथमित्र)

१) श्रीमती श्रध्दा अशोक आमडेकरग्रंथपालश्री सदगुरु लोकमान्य वाचनालय देवरुखतालुका संगमेश्वरजिल्हा-रत्नागिरी

विभागस्तरीय पुरस्कार

१) अमरावती: श्री. रामभाऊ पंढरी मुळेसचिवछत्रपती शाहू सार्वजनिक वाचनालयमु. पो. हनुमान नगरअकोलाता.जि. अकोला.

२) छत्रपती संभाजीनगर:  श्री. खंडेराव साहेबराव सरनाईकअध्यक्षश्री संत ज्ञानेश्वर सार्वजनिक वाचनालयकेंद्रा बु.ता. सेनगावजि. हिंगोली.

३) नाशिक: श्री. राहुलकुमार मालजी महिरेअध्यक्षबौध्दवासी शांताई महिरे वाचनालयआखाडेमु.पो. आखाडेता. साक्रीजि.धुळे

 

४) पुणे: श्री. दत्तात्रय सखाराम देशपांडेअध्यक्षज्ञानदा मोफत वाचनालयजरळीता. गडहिंग्लजजि. कोल्हापूर

५) मुंबई: श्री. सुभाष सीताराम कुळकर्णीअध्यक्षप्रा. माणिकराव कीर्तने वाचनालय वाशीनवी मुंबई

डॉ. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय सेवक पुरस्कार

१) अमरावती: श्री. अनंत श्रीराम सातवग्रंथपालसरस्वती वाचनालयपातुर्डा बु.ता.संग्रामपूरजि.बुलडाणा

२) छत्रपती संभाजीनगर: श्री. सूर्यकांत कमलाकर जाधवग्रंथपालविवेकानंद वाचनालयआलमलाता. औसाजि. लातूर

३)नागपुर: श्री. खेमचंद अंताराम डोंगरवारग्रंथपाल,श्रीमती सोनाबाई सितारामजी खुणे सार्वजनिक वाचनालयनवेगाव / बांधता.अर्जुनी मोरगावजि. गोंदिया

४)नाशिक: श्री. चिंतामण संतोष उगलमुगलेग्रंथपालओंकार नगर सार्वजनिक वाचनालयओंकारनगरपेठ रोडता.जि. नाशिक

५)पुणे: श्रीमती रुपाली यशवंत मुळेग्रंथपालश्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालयसातारा.

६)मुंबई: श्री. संजय काशिनाथ शिंदेग्रंथपालनगर वाचन मंदिरमालवणजि. सिंधुदुर्ग

राज्यातील जनतेचे सामाजिकशैक्षणिक व सांस्कृतिक जीवन समृद्ध करण्यासाठी व वाचन संस्कृती वृध्दींगत होण्यासाठी  शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे योगदान लाभावेयासाठी ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावाया ग्रंथालयांकडून राज्यातील जनतेला अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने शासनाकडून दरवर्षी हे पुरस्कार देण्यात येत असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले

महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेस ॲडव्होकेट अकॅडमीसाठी ठाण्यातील जमीन

 महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेस ॲडव्होकेट अकॅडमीसाठी ठाण्यातील जमीन

महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदमुंबई यांना ॲडव्होकेट अकॅडमी स्थापन करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील मौजे कळवा येथे जमीन देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

या निर्णयानुसार मौजे कळवाता.जि. ठाणे येथील स.नं. 226क्षेत्र 1-01-90 हे.आर. ही जमीन महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेस ॲडव्होकेट अकॅडमीसाठी दिली जाणार आहे.  महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील सुमारे दोन लाख वकीलांसाठी ही संस्था काम करते. वकील वर्गासाठी विविध कल्याणकारी राबविणेकायद्यातील सुधारणांना उत्तेजन देणेवकीलांसाठी प्रशिक्षण वर्गचर्चासत्रपरिसंवाद आणि परिषदा या माध्यमातून आवश्यक मार्गदर्शन करणेमहिलांसाठी कायदेविषयक शिबिरे आयोजित करणे असे अनेक उपक्रम ही संस्था राबविते. सध्या ही संस्था मुंबई उच्च न्यायालयाच्या आवारातील छोट्याशा जागेत कार्यरत आहे. या संस्थेने मागणी केल्यानुसार कळवा येथील जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वर्धा धाम मध्यम प्रकल्पासाठी १९७.२७ कोटी मंजूर

 धाम मध्यम प्रकल्पासाठी १९७.२७ कोटी मंजूर

            धाम प्रकल्पाचे बांधकाम १९८६ मध्ये पूर्ण झाले असून जुने कालवेवितरिकालघुकालवे आता जीर्ण अवस्थेत आहेत. गोदावरी खोऱ्यातील वर्धा जिल्ह्यातील महाकाळी गावाजवळील धाम नदीवर हा प्रकल्प उभारण्यात आला असून याद्वारे ७ हजार ९० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते.

            धरणाची एकूण लांबी १ हजार ६६३ मीटर असूनमुख्य कालवा व उपवितरिकालघुकालव्यासह वितरण व्यवस्था २३० किमी आहे. या प्रकल्पातून विसर्गक्षमता घटली असूनसंरचनांमधून पाणीगळती होऊ लागली आहे. त्यामुळे धरणसांडवाकालवेबांधकाम संरचनाधरण माथा रस्ता आणि धरणाकडे जाणारा पोहोच रस्ता यांचीही दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी १९७ कोटी २७ लाख रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली. ही दोन्ही कामे विशेष दुरुस्ती योजनेंतर्गत होणार आहे.

*** 


वर्धा जिल्ह्यातील 'बोर', 'धाम' सिंचन प्रकल्पांच्या नुतनीकरणासाठी ४२८ कोटी ९६ लाख

 वर्धा जिल्ह्यातील 'बोर', 'धामसिंचन प्रकल्पांच्या नुतनीकरणासाठी ४२८ कोटी ९६ लाख

 

            वर्धा जिल्ह्यातील दोन महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्प-बोर मोठा प्रकल्प (ता. सेलू) आणि धाम मध्यम प्रकल्प (ता. आर्वी) यांच्या नुतनीकरणासाठी सुमारे ४२८ कोटी ९६ लाख रुपयांच्या तरतुदीस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

बोर मोठा प्रकल्पासाठी २३१.६९ कोटी

            हा प्रकल्प वर्धा नदीवर १९६७ मध्ये बांधण्यात आला आहे.  बोरी गावाजवळील या धरणाचा साठा १३४.५४२ द.ल.घ.मी असून उपयुक्त पाणी साठा १२३.२१२ द.ल.घ.मी आहे. यामुळे सुमारे १६ हजार १९४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. त्याचा सेलू व समुद्रपूर तालुक्यातील ७७ गावांना सिंचन लाभ होतो. या प्रकल्पाची २४० किमीची कालवा व वितरण व्यवस्था दीर्घकालीन वापरामुळे तसेच वारंवारच्या अतिवृष्टीमुळे जीर्ण झाली आहे. प्रकल्पाची विसर्गक्षमता घटली असून पाणीगळतीत वाढ झाली आहे. त्यामुळे या वितरण प्रणालीचे नुतनीकरण करणे अत्यावश्यक आहे.

            या दुरुस्तीअंतर्गत मुख्य कालवावितरीकाउपवितरिकालघुकालवेतसेच धरणाचे काटछेदसांडवाड्रेन्स व पोहोच रस्त्यांचे पुनर्बांधकाम किंवा योग्य दुरुस्ती करण्यात येणार आहे.  यासाठी २३१ कोटी ६९ लाख रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे.

Featured post

Lakshvedhi