Tuesday, 5 August 2025

वर्धा जिल्ह्यातील 'बोर', 'धाम' सिंचन प्रकल्पांच्या नुतनीकरणासाठी ४२८ कोटी ९६ लाख

 वर्धा जिल्ह्यातील 'बोर', 'धामसिंचन प्रकल्पांच्या नुतनीकरणासाठी ४२८ कोटी ९६ लाख

 

            वर्धा जिल्ह्यातील दोन महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्प-बोर मोठा प्रकल्प (ता. सेलू) आणि धाम मध्यम प्रकल्प (ता. आर्वी) यांच्या नुतनीकरणासाठी सुमारे ४२८ कोटी ९६ लाख रुपयांच्या तरतुदीस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

बोर मोठा प्रकल्पासाठी २३१.६९ कोटी

            हा प्रकल्प वर्धा नदीवर १९६७ मध्ये बांधण्यात आला आहे.  बोरी गावाजवळील या धरणाचा साठा १३४.५४२ द.ल.घ.मी असून उपयुक्त पाणी साठा १२३.२१२ द.ल.घ.मी आहे. यामुळे सुमारे १६ हजार १९४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. त्याचा सेलू व समुद्रपूर तालुक्यातील ७७ गावांना सिंचन लाभ होतो. या प्रकल्पाची २४० किमीची कालवा व वितरण व्यवस्था दीर्घकालीन वापरामुळे तसेच वारंवारच्या अतिवृष्टीमुळे जीर्ण झाली आहे. प्रकल्पाची विसर्गक्षमता घटली असून पाणीगळतीत वाढ झाली आहे. त्यामुळे या वितरण प्रणालीचे नुतनीकरण करणे अत्यावश्यक आहे.

            या दुरुस्तीअंतर्गत मुख्य कालवावितरीकाउपवितरिकालघुकालवेतसेच धरणाचे काटछेदसांडवाड्रेन्स व पोहोच रस्त्यांचे पुनर्बांधकाम किंवा योग्य दुरुस्ती करण्यात येणार आहे.  यासाठी २३१ कोटी ६९ लाख रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi