Tuesday, 5 August 2025

आदिवासी विकास विभागांतर्गत पूर्ण कामांचा प्रलंबित दायित्व निधी तातडीने वितरित करावा

 आदिवासी विकास विभागांतर्गत पूर्ण कामांचा

प्रलंबित दायित्व निधी तातडीने वितरित करावा

- उपमुख्यमंत्री अजित पवार

          मुंबई, दि. 29 : आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत पूर्ण झालेल्या कामांचा प्रलंबित दायित्व निधी तातडीने वितरित करावा, तसेच त्याबाबतच्या मागणीचा प्रस्ताव आदिवासी विकास विभागाने वित्त विभागाकडे सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिले.

आदिवासी विकास विभागाच्या विविध प्रलंबित विषयांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार भीमराव केराम, नितीन पवार, आमश्या पाडवी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.राजेश देशमुख, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, अर्थसंकल्पात एकूण रकमेच्या प्रमाणात अनुसूचित जाती, जमातींना निधीचे वितरण निकषाप्रमाणे करण्यात येते. आदिवासी विकास विभागांतर्गत वसतिगृहांची कामे दर्जेदार झाली पाहिजे, त्याप्रमाणे त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

            यावेळी भौतिकदृष्ट्या पूर्ण व प्रगतीपथावरील रस्ते व पुलांची कामे, लेखाशीर्ष 3054 अंतर्गत कामे, ठक्कर बाप्पा योजना, शासकीय आदिवासी विभागातील इमारतींची बांधकामे, अधिसंख्य झालेल्या जागेवर विशेष भरती, राज्यभरातील आदिवासी आश्रम शाळेमध्ये रोजंदारीवर, तासिकेवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

००००

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तिन्ही राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण करावे

 पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी

तिन्ही राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण करावे

- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

 

मुंबई, दि. २९ :- पुणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६० (नाशिक फाटा ते खेड), राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ (हडपसर ते यवत), तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८डी (तळेगाव–चाकण–शिक्रापूर) या तिन्ही प्रमुख राष्ट्रीय महामार्गाचे तातडीने रुंदीकरण करावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्राद्वारे केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

            उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पुणे महानगर आणि औद्योगिक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता पुणे परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६० (नाशिक फाटा ते खेड) – सध्या चार लेन असलेला हा रस्ता सहा लेनमध्ये रुपांतर करावा, राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ (हडपसर ते यवत) – विद्यमान चार लेन रस्त्याचे सहा लेनमध्ये रूपांतर करावा, तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८डी (तळेगाव–चाकण–शिक्रापूर) – सध्या दोन लेन असलेला मार्ग सहा लेन करण्याची आवश्यकता आहे. या तिन्ही मार्गांवर शिक्षण संस्था, औद्योगिक पट्टा, वसाहती, रुग्णालये, पेट्रोलियम आणि वाहन उद्योग तसेच व्यापारी हब असल्यामुळे वाहतुकीचा ताण प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. रस्त्यांवर सतत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून वाहनचालकांच्या सुरक्षेवरही प्रश्न निर्माण झाले आहेत.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की, या मार्गांवरील प्रवास करणाऱ्या वाहनांच्या संख्येची कमाल मर्यादा ओलांडली आहे. अशा परिस्थितीत या महामार्गावर तत्काळ लेन वाढवण्याचे काम करण्यात यावे, जेणेकरून येत्या काळात उभारल्या जाणाऱ्या एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या कामासाठीही पर्यायी मार्ग उपलब्ध होऊ शकेल.

हे तिन्ही महामार्ग पुणे शहराच्या प्रवेशद्वारांशी जोडले गेलेले असल्यामुळे, बाह्य भागातील मोठ्या प्रमाणावर वाहने शहरात प्रवेश करताना मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते. यामुळे या मार्गांवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. तसेच, तळेगाव–चाकण–शिक्रापूर मार्गावरील रुंदीकरणाच्या कामास सध्या चालू असलेल्या एलिव्हेटेड हायवे निविदेच्या अंतिम टप्प्यापर्यंत तात्पुरता पर्याय म्हणूनही उपयोग होईल.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रस्तावास मान्यता देऊन आवश्यक निधी आणि प्रशासकीय मंजुरी तातडीने मिळवून देण्याची विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे, जेणेकरून पुणे औद्योगिक परिसरातील वाहतूक समस्या दूर होण्यास मदत होईल.

गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी आणि नरिमन पाँईट येथे ‘पर्यटन सुरक्षा दल’ नेमणार

 गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी आणि नरिमन पाँईट येथे

 ‘पर्यटन सुरक्षा दल’ नेमणार

-पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

मुंबई दि. ४ : पर्यटन स्थळांच्या ठिकाणी ‘सुरक्षा दल’ हा पर्यटन विभागाकडून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. मुंबईतील पर्यटनस्थळावरती सुरक्षेच्या दृष्टीने गेट वे ऑफ इंडिया आणि गिरगाव चौपाटी, नरिमन पाँईट येथे  ‘पर्यटन सुरक्षा दल’ नेमण्याची कार्यवाही करा, असे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

यासंदर्भात मंत्री श्री. देसाई यांच्या निवासस्थानी मेघदूत येथे बैठक झाली. बैठकीस पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पयटन संचालक डॉ.बी.एन.पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक चंद्रशेखर जयस्वाल यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

       मंत्री श्री. देसाई म्हणाले, सध्या महाबळेश्वर येथे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ‘पर्यटन सुरक्षा दल’ हा उपक्रम सुरू आहे. टप्प्या-टप्प्याने या उपक्रमाची राज्यात व्याप्ती वाढविण्यात येत आहे. मुंबईत पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देत असून पर्यटकांना सुरक्षा दिल्यास सुरक्षित पर्यटन होऊन पर्यटन वाढीला चालना मिळेल. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे हे लक्षात घेऊन
 गेट वे ऑफ इंडिया
, गिरगाव चौपाटी, नरिमन पाँईट येथे 
‘पर्यटक सुरक्षा दल’ नेमण्यात यावेत. राज्यात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पर्यटन सुरक्षा दलासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी दिल्या.

००००००

प्रो गोविंदा लीग 2025 वाराणसी महादेव असेंडर्स का 75 लाख रुपये मे हुआ अधिग्रहण 7 से 9 ऑगस्ट तक रोमांच

 प्रो गोविंदा लीग 2025 

वाराणसी महादेव असेंडर्स का 75 लाख रुपये मे हुआ अधिग्रहण

7 से 9 ऑगस्ट तक रोमांच 



मुंबई, 5 अगस्त 2025: 'ग्लोबल वेंचर्स' के तहत काम करने वाली 'अस्पेक्ट स्पोर्ट्स' ने 'प्रो गोविंदा लीग 2025' के लिए 'वाराणसी महादेव असेंडर्स' का अधिग्रहण कर लिया है। पहले यह टीम 'ओम ब्रह्मांड साई गोविंद पथक' (मालाड पश्चिम) के नाम से जानी जाती थी। यह अधिग्रहण ₹74 लाख में हुआ है।

अब यह टीम 'वाराणसी महादेव असेंडर्स' के नए नाम से 7 से 9 अगस्त तक मुंबई के वर्ली स्थित एनएससीआई डोम में होने वाली इस बहुप्रतीक्षित प्रतियोगिता में भाग लेगी।

अस्पेक्ट ग्लोबल वेंचर्स की कार्यकारी अध्यक्षा, श्रीमती अक्षा कंबोज ने इस अधिग्रहण पर बोलते हुए कहा, “हमें ऐसी टीम के साथ प्रो गोविंदा लीग 2025 में हिस्सा लेने पर बहुत गर्व है, जो धैर्य, अनुशासन और गहरी सांस्कृतिक जड़ों का प्रतीक है। वाराणसी महादेव असेंडर्स सिर्फ एक टीम नहीं, बल्कि भारत के युवाओं की भावना का प्रतिनिधित्व करती है, जो परंपरा और टीम वर्क के जरिए आगे बढ़ते हैं।”

यह लीग महाराष्ट्र सरकार द्वारा मान्यता प्राप्त है और यह परिवहन मंत्री प्रताप सरनाईक के विचारों से प्रेरित है। इस लीग का उद्देश्य दही हांडी की सदियों पुरानी परंपरा को एक सुरक्षित, प्रशिक्षित और प्रायोजित पेशेवर खेल में बदलना है।

इस साल के टूर्नामेंट की कुल पुरस्कार राशि ₹1.5 करोड़ है, जिसमें विजेता टीम को ₹75 लाख मिलेंगे। इसके अलावा, प्रत्येक टीम को भागीदारी प्रोत्साहन के रूप में ₹3 लाख दिए जाएंगे, जिससे यह लीग एक गंभीर प्रतिस्पर्धी मंच के रूप में स्थापित होगी। श्रीमती अक्षा कंबोज के स्वामित्व वाली वाराणसी महादेव असेंडर्स अपनी मजबूत भावना और विरासत को राष्ट्रीय स्तर पर पहचान दिलाने के लिए तैयार है।

----------------------

मुंबईत प्रो गोविंदा लीग २०२५ चा ७ ऑगस्ट पासून थरार pl share



 मुंबईत प्रो गोविंदा लीग २०२५ चा ७ ऑगस्ट पासून थरार 


मुंबई, ५ ऑगस्ट २०२५ : ' ग्लोबल व्हेंचर्स 'अंतर्गत कार्यरत असलेल्या ‘अस्पेक्ट स्पोर्ट्स'च्या वतीने बहुप्रतिक्षित 'प्रो गोविंदा लीग २०२५' साठी पूर्वी ओम ब्रह्डमांड साई गोविंद पथक (मालाड पश्चिम) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संघाचे आता ७४ लाख रुपयात अधिग्रहण केले असून त्यानंतर या पथकाचे वाराणसी महादेव अॅसेन्डर्स नावाने रिब्रॅंड करण्यात आले आहे. मुंबईतील वरळी येथील एनएससीआय डोम येथे ७ ते ९ ऑगस्ट डार्विन ही स्पर्धा पार पडणार आहे.

या अधिग्रहणावर बोलताना अस्पेक्ट ग्लोबल व्हेंचर्सच्या कार्यकारी अध्यक्षा श्रीमती अक्षा कंबोज म्हणाल्या की, “धैर्य, शिस्त आणि सखोल मुळे असलेल्या सांस्कृतिक मूल्यांचे मूर्त स्वरूप असलेल्या संघासह प्रो गोविंदा लीग २०२५ मध्ये सहभागी होण्याचा आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो. वाराणसी महादेव अॅसेन्डर्स म्हणजे निव्वळ संघ नसून परंपरा आणि सांघिक कार्याद्वारे उदयास येणाऱ्या भारताच्या युवकांच्या भावनेचे प्रतिनिधित्व करतो.

महाराष्ट्र सरकारची अधिकृत मान्यता लाभलेल्या प्रो गोविंद लीगचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही लीग, शतकानुशतके जुनी परंपरा सुरक्षितता, प्रशिक्षण आणि प्रायोजकत्वाद्वारे समर्थित व्यावसायिक, दूरचित्रवाणीवरील क्रीडा स्पर्धेत रूपांतरित करून दहीहंडीच्या खेळात क्रांती घडवून आणणार आहे.

या मोसमाचे एकूण बक्षीस मूल्य १.५ .कोटी रुपयांचे असून ज्यात विजेत्यांसाठी ७५ लाख रुपयांचा  समावेश करण्यात आला आहे. तसेच प्रत्येक संघासाठी ३ लाख रुपयांचा सहभाग प्रोत्साहन मूल्यासह, एक गंभीर स्पर्धात्मक व्यासपीठ म्हणून लीगची स्थिती मजबूत करते. श्रीमती अक्षा कंबोज यांच्या मालकीची वाराणसी महादेव अॅसेन्डर्स ही संस्था त्यांची प्रबळ भावना आणि वारसा राष्ट्रीय प्रकाशझोतात आणण्यासाठी सज्ज येत्या गोविदात सज्ज होत आहे.


शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचे निर्णय घेणार

 शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचे निर्णय घेणार

- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

 

 

             मुंबई, दि. 05 : शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून राज्यातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सर्वसमावेशक धोरणे राबविणार असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. कृषिमंत्री श्री.भरणे यांनी मंत्रालयातून कामकाजास सुरवात केली, त्यावेळी ते बोलत होते.

             कृषिमंत्री श्री. भरणे म्हणाले की, मी स्वत: शेतकऱ्याचा मुलगा असून शेती व शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय हाच माझा प्राधान्याचा विषय असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी क्षेत्राचा विकासासाठी निर्णय घेण्यात येतील.  कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

      यावेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  

00000

कबुतरे वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील मनाचा पुढाकार पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवा

 कबुतरे वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील मनाचा पुढाकार

पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवा

                                                                         -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

             मुंबई, दि. 5 : कबुतरांचे जीव वाचविणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे, या तिन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. कबूतरखाना अचानक बंद करणे योग्य नाही, कबूतरखान्याबाबत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करताना पर्यायी उपाययोजना करण्यात याव्यात. कबूतरखाना परिसरात कबुतरांच्या खाद्यपुरवठ्यावर निर्बंध आल्याने  उपासमारीची वेळ त्यांच्यावर ओढवू नये, यासाठी पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत महानगरपालिकेने कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत आपल्या संवेदनशील मनाची पुन्हा एकदा ओळख देत कबुतरांचे प्राण वाचवून नागरिकांचे आरोग्य सांभाळण्यासाठी पुढाकार घेतला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात कबुतरखान्याच्या प्रश्नासंदर्भात बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, वन मंत्री गणेश नाईक, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा,   आमदार कालिदास कोळंबकर, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, कबुतरांच्या आरोग्यपूर्ण देखभालीसाठी आणि नागरी आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही यासाठी कोणत्या वेळेत खाद्यपुरवठा व्हावा आणि कोणत्या वेळेत नाही याबाबत  नियमावली तयार करण्यात यावी. शहरात विविध ठिकाणी कबुतरांच्या मोठ्या संख्येमुळे श्वसनविषयक त्रास, विष्ठेमुळे होणारे प्रदूषण आणि सार्वजनिक स्वच्छतेच्या समस्या निर्माण होतात. परंतू याबाबत कबुतरखान्याच्या आरोग्यविषयक दुष्परिणामांचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करणे आवश्यक असून, त्यासाठी संबंधित तज्ज्ञांच्या मदतीने अभ्यास अहवाल तयार करावा. कबुतरांच्या विष्ठेचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. यासंदर्भात विष्ठा साफ करण्यासाठी उपलब्ध असलेल्या तांत्रिक उपायांचा विचार करावा. या संदर्भात माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्याशी चर्चा केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 कबुतरखान्याशी संबंधित मुद्यांवर सध्या उच्च न्यायालयात रिट याचिकेवर सुनावणी सुरू आहे. या विषयावर हायकोर्टात राज्य शासन आणि मुंबई महानगरपालिकेने आपली भूमिका मांडावी. गरज भासल्यास याप्रकरणी न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर, आवश्यकतेनुसार राज्य शासन सर्वोच्च न्यायालयातही आपली भूमिका मांडेल.  मुंबई महापालिकेला पक्षीगृह उभारण्याची व त्याची देखभाल करण्याची सूचनाही मुख्यमंत्री श्री.  फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

Featured post

Lakshvedhi