Tuesday, 5 August 2025

हत्तीणीची निगा राखण्यासाठी डॉक्टरांसह पथक तयार करणार

 हत्तीणीची निगा राखण्यासाठी डॉक्टरांसह पथक तयार करणार

नांदणी मठाच्या परंपरा आणि स्थानिक जनतेच्या भावनांचा विचार करून कायदेशीर प्रक्रिया मार्गाने माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीणीला पुन्हा मठात परत आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, गेल्या 34 वर्षांपासून माधुरी हत्तीण नांदणी मठात आहे. माधुरी पुन्हा मठात यावी ही जन भावना आहे. ही जन भावना लक्षात घेऊन राज्य शासन पुनर्विचार याचिका दाखल करेल. मठानेही आपल्या याचिकेमध्ये राज्य शासनाचाही समावेश करावा. तसेच वन विभागाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र सविस्तर भूमिका मांडण्यात येईल. यामध्ये केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या निकषाप्रमाणे व उच्चस्तरीय समितीने सुचविलेल्या सर्व मुद्द्यांचे निराकरण करण्यात येईल. हत्तीणीची निगा राखण्यासाठी डॉक्टरसह राज्य शासन एक पथक तयार करून आवश्यक ती सर्व मदत करेल. आवश्यक वाटल्यास रेस्क्यू सेंटरसारखी व्यवस्थाही करण्यात येईल व त्या प्रमाणे सुविधा देण्यात येतील आदी बाबींचा समावेश करून या बाबी तपासण्यासाठी सर्वोच्च न्यायालयास स्वतंत्र समिती नेमण्याची विनंतीही राज्य शासनामार्फत या याचिकेमध्ये करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. तसेच या प्रकरणात नागरिकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

       महाराष्ट्रातील जे हत्ती बाहेर नेण्यात आले, अशा सर्व हत्तींची माहिती वन विभागाने गोळा करावी, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा, अशी भूमिका मांडली. यावेळी खासदार धैर्यशील माने, खासदार विशाल पाटील, आमदार सर्वश्री आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, विश्वजीत कदम, सतेज पाटील, अशोक माने, सदाभाऊ खोत, राहुल आवाडे, अमल महाडिक, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार प्रकाश आवाडे, नांदणी मठाचे पूज्य स्वस्तीश्री जिनसेन महास्वामीजी, जैन अल्पसंख्याक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्य जीव) श्रीनिवास राव, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे आदीसह जैन स्वामी व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

00000

आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार राज्य शासनही सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार

 माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीणीला नांदणी मठात परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

 राज्य शासनही सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 5 : नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) माधुरी हत्तीण पुन्हा नांदणीत यावी, अशी जन भावना आहे. ही जनभावना लक्षात घेऊन नांदणी मठाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी. राज्य शासनही स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयात हत्तीणीला परत देण्यासंदर्भात भूमिका मांडेल, असे सांगून याप्रकरणी राज्य शासन पूर्णपणे मठाच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

       मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली  नांदणी मठ (ता. शिरोळ, जिल्हा कोल्हापूर) येथील माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीणीच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्य शासनाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, वन मंत्री गणेश नाईक, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह नांदणी मठाचे प्रतिनिधी तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

राज्यातील ७० औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम होणार सुरू

 राज्यातील ७० औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम होणार सुरू

- मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. ३० : केंद्रीय कौशल्य  विकास आणि उद्योजकता विभागाच्या प्रशिक्षण महासंचालक यांनी राज्यातील ७०  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आय.टी.आय.) नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता दिली आहे. तसेच चेंबूर येथे शासकीय उच्चस्तरीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थापनेसाठी मान्यता देण्यात आली आहे. काळानुरूप बदलत्या अभ्यासक्रमामुळे रोजगाराच्या संधीमध्ये वाढ होवून यामुळे महाराष्ट्रातील आय.टी.आय मध्ये क्रांती घडणार आहे, असे कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

            महाराष्ट्रातील ७० शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये सोलर टेक्निशियन (इलेक्ट्रिक)ईव्ही मेकॅनिक (इलेक्ट्रिक व्हेईकल) हे नवीन अभ्यासक्रम शिकविण्यात येणार आहेत. पर्यावरण संवर्धनावर आधारित योजना राबविण्यार राज्य शासनाचा भर असून राज्यात सौर ऊर्जाशी निगडीत तंत्रज्ञानांची व सोलर टेक्निशियन तसेच मेकॅनिक इलेक्ट्रिक व्हेईकलची गरज लक्षात घेवून या क्षेत्रातील टेक्निशियन मागणी वाढणार आहे. त्यानुषंगाने दोन नवीन अभ्यासक्रमाची मागणी व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाने केंद्रीय कौशल्य  विकास आणि उद्योजकता विभागाच्या प्रशिक्षण महासंचालक  यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य विकास विभाग नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर आणि  मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या सूचना व सल्ल्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये काळानुरूप अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. सध्या राज्यातील ७० औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये हा अभ्यासक्रम शिकविण्यात येणार आहे. ज्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रमांची मागणी करतील त्यांना मंजूरी देण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल, असेही मंत्री श्री.लोढा यांनी सांगितले.

              केंद्रीय कौशल्य  विकास आणि उद्योजकता विभागाच्या प्रशिक्षण महासंचालक यांनी  अनसूचित जातीतील व नवबौध्द घटकातील प्रशिक्षणार्थ्यींचे सामाजिक सक्षमीकरण व उन्नतीसाठी चेंबूर  येथे शासकीय उच्चस्तरीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थापनेसाठी मान्यता देण्यात दिली आहे.  या संस्थेत सन २०२५-२६ साठी रेफ्रिजरेशन ॲण्ड एअर कंडिशनिंग टेक्निशीयनइलेक्ट्रिशियनवायरमनआय. ओ. टी. टेक्निशियन (स्मार्ट सिटी)इलेक्ट्रीक मेकॅनिक हे अभ्यासक्रम शिकविले जाणार आहेत.

ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी कार्यवाही करावी

 ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये

सीसीटीव्ही बसविण्यासाठी कार्यवाही करावी

— ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे

मुंबईदि. ३० : ठाणे जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांतील वर्ग खोल्यांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याची कार्यवाही करण्यात यावीअसे निर्देश ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह शाळेतील गुणवत्तापूर्ण व्यवस्थापनासाठी सीसीटीव्ही उपयुक्त ठरेलअसेही त्यांनी सांगितले.

ग्रामविकास मंत्री श्री. गोरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीस आमदार किसन कथोरेआमदार सुरेश म्हात्रेआमदार सुलभा गायकवाडग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवलेजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगेउपसचिव प्रशांत पाटील यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.गोरे यांनी सांगितले कीजिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षाउपस्थिती व शैक्षणिक शिस्त यामध्ये सकारात्मक बदल होईल. सीसीटीव्ही बसवण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून नियोजन करण्यात यावे. ठाणे जिल्हा परिषदेने राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक करत त्यांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर भर देण्याचे आवाहन केले.तसेचजिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनातील विभागीय चौकशा वेळेत पूर्ण व्हाव्यात यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांना सूचना दिल्या जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शाळांचे दुरुस्ती कामे प्राधान्याने पूर्ण करावीतत्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईलअसेही त्यांनी नमूद केले. आरोग्यशिक्षणरस्ते विकास आणि आवास योजना या बाबींमध्ये ठाणे जिल्ह्यात उल्लेखनीय काम होत असूनयेत्या काळात उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी अधिक गतीने काम करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

उद्योगांच्या सर्व परवानग्या आता मैत्री पोर्टलवर ऑनलाईन मिळणार

 उद्योगांच्या सर्व परवानग्या आता मैत्री पोर्टलवर ऑनलाईन मिळणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईदि. 30 : महाराष्ट्र राज्य हे उद्योग क्षेत्रांमुळे 1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे यशस्वीपणे वाटचाल करत आहे. त्यामुळे उद्योगांना पाणीपुरवठावीजरस्ते व कनेक्टिव्हिटीपर्यावरण मंजुरीवन परवानग्यामजूर कायदेजमीनचे वाटप या सर्व सोयी सुविधा तात्काळ उपलब्‍ध करून दिल्या पाहिजे. उद्योगधंद्यांना सर्व परवानग्‌या ऑनलाईन मिळाल्या पाहिजेयासाठी मैत्री पोर्टल एकिकृत करून त्यावरच सर्व परवानग्या द्याव्यात. त्याचबरोबरउद्योजकांना शासकीय विभागांसदर्भात काही अडचणी असतीलतर त्यासंदर्भात निनावी तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावीअसे स्पष्ट ‍निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विविध विषयांशी संबंधित मुद्यांवर बैठक झाली. या बैठकीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेपर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

पद्म पुरस्कार-2026 साठी नामांकन सादर करण्यासाठी अंतिम मुदत; 15 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढवली https://padmaawards.gov.in/AboutAwards.aspx

 पद्म पुरस्कार-2026 साठी नामांकन सादर करण्यासाठी अंतिम मुदत;

15 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढवली

नवी दिल्ली30 : पद्म पुरस्कार 2026 साठी नामांकन/शिफारशी सादर करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2025 वरून वाढवून 15 ऑगस्ट 2025 पर्यंत करण्यात आली आहे. या पुरस्कारांसाठी नामांकन/शिफारशी केवळ राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल (https://awards.gov.inवर ऑनलाईन स्वीकारल्या जातील. सन 2026 च्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कार-2026 साठी नामांकन प्रक्रिया 15 मार्च 2025 पासून सुरू झाली आहे.

पद्मश्रीपद्म भूषण आणि पद्म विभूषणहे पुरस्कार देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक आहेत. 1954 मध्ये स्थापितहे पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केले जातात. उत्कृष्ट कार्यासाठी हे पुरस्कार प्रदान केले जातात. कलासाहित्य आणि शिक्षणखेळवैद्यकसमाजसेवाविज्ञान आणि अभियांत्रिकीसार्वजनिक कार्यनागरी सेवाव्यापार आणि उद्योग यासारख्या सर्व क्षेत्रांमध्ये विशिष्ट आणि असाधारण उपलब्धी/सेवांसाठी हे पुरस्कार दिले जातात. जातव्यवसायपद किंवा लिंग यांचा भेद न करता सर्व व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र आहेत. मात्रडॉक्टर आणि शास्त्रज्ञ वगळता इतर सरकारी कर्मचारीतसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये काम करणारे कर्मचारीया पुरस्कारांसाठी पात्र नाहीत.

भारत सरकारने पद्म पुरस्कारांना लोकांचे पद्म बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना नामांकन/शिफारशी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिक स्वतःलाही नामांकन करू शकतात. विशेषतः महिलासमाजातील दुर्बल घटकअनुसूचित जाती आणि जमातीदिव्यांग व्यक्ती आणि समाजासाठी निस्वार्थ सेवा करणाऱ्या प्रतिभावान व्यक्तींची ओळख करून त्यांच्या उत्कृष्टता आणि उपलब्धींना मान्यता देण्यासाठी ठोस प्रयत्न करण्याचे आवाहन आहे.

            नामांकन/शिफारशींमध्ये पोर्टलवर उपलब्ध असलेल्या नमुन्यात सर्व संबंधित तपशील असावेतयामध्ये नामित व्यक्तीच्या संबंधित क्षेत्रातील विशिष्ट आणि असाधारण उपलब्धी/सेवांचा स्पष्ट उल्लेख असलेला 800 शब्दांचा वर्णनात्मक उद्धरण (citation) समाविष्ट असावा.

यासंदर्भातील सविस्तर माहिती गृह मंत्रालयाच्या संकेतस्थळावर (https://mha.gov.in) ‘पुरस्कार आणि पदक’ या शीर्षकाखाली आणि पद्म पुरस्कार पोर्टलवर (https://padmaawards.gov.inउपलब्ध आहे. पुरस्कारांशी संबंधित अधिक माहिती आणि नियम https://padmaawards.gov.in/AboutAwards.aspx या लिंकवर उपलब्ध आहे.

Featured post

Lakshvedhi