Wednesday, 16 July 2025

मैंदर्गीतील शासकीय जमिनीवरील अनधिकृत गाळ्यांबाबत बैठक घेणार

 मैंदर्गीतील शासकीय जमिनीवरील 

अनधिकृत गाळ्यांबाबत बैठक घेणार

– राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबईदि. १५ : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी नगर परिषदेच्या हद्दीतील शासकीय जमिनीवर अनधिकृत व्यावसायिक गाळ्यांच्या प्रकरणावर लवकरच बैठक आयोजित केली जाईलअशी माहिती नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक व औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य सचिन कल्याण शेट्टी यांनी याबाबत लक्षवेधी सूचना सभागृहात मांडली होती.

नगरपरिषदेकडून अतिक्रमण केलेल्या २५ अतिक्रमणधारकांना नोटीस देऊन अतिक्रमण आणि अनधिकृत धार्मिक बॅनरपोस्टर्स इत्यादी नगरपरिषदेकडून हटविण्यात आले आहेत. या तक्रारीच्या अनुषंगाने बैठक घेऊन कारवाई करण्यात येईल, असेही राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी यावेळी सांगितले.

पीक विमा लाभापासून वंचित शेतकऱ्यांच्या तक्रारींचे पुनरावलोकन करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

 पीक विमा लाभापासून वंचित शेतकऱ्यांच्या तक्रारींचे

पुनरावलोकन करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

- कृषी राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल

 

मुंबईदि. १५ : पीक विमा संदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारींचे पुनरावलोकन करून  शेतकऱ्यांना विमा मदतीसाठी पात्र ठरवण्याचे योग्य तो निर्णय घेण्यात यावा असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येतीलअसे कृषी राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

विधानसभा सदस्य डॉ. राहुल आहेर यांनी नाशिक जिल्ह्यातील चांदवड व देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पीक विमा संदर्भात विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली.

कृषी राज्यमंत्री ॲड. जयस्वाल यांनी सांगितलेचांदवड तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेतला असून ज्यांची नुकसानीच्या पूर्व सूचना दिलेल्या आहेत अशा सर्व शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्ती अंतर्गत घेण्यात आलेले पंचनामे गृहीत धरून नुकसान भरपाई देण्याबाबत पडताळणी करावी.  विमा कंपनीसोबत बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या दाव्यांबाबत नियमानुसार तपासणी करावी. नाशिक जिल्ह्यातील रब्बी हंगामातील कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत कांदा पिकासाठी सहभाग घेतला आहे अशा शेतकऱ्यांना काढणी पश्चात नुकसान या बाबीअंतर्गत सर्वेक्षण करून नुकसान भरपाई अदा करण्याबाबत नियमानुसार कार्यवाही करावी अशा सूचना पीक विमा कंपनीला देण्यात आल्याचेही राज्यमंत्री ॲड. जयस्वाल यांनी सांगितले.

पीक विमा योजनेअंतर्गत चांदवड तालुक्यात सन २०२४-२५ च्या खरीप व रब्बी हंगाममध्ये २०.५६ कोटी इतकी नुकसान भरपाई मंजूर आहे त्यापैकी १८.३२ कोटी रक्कम वितरित करण्यात आली असून उर्वरित नुकसान भरपाईच्या वितरणाची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. तर देवळा तालुक्यात सन २०२४-२५च्या खरीपी व रब्बी  हंगामात ११.१४ कोटी इतकी पीक नुकसानीची रक्कम मंजूर असून त्यापैकी १०.४६ कोटी नुकसान भरपाई रक्कम वितरित करण्यात आली आहे. उर्वरित रक्कम वितरणाची कार्यवाही प्रगतीपथावर आहे.

नाशिक जिल्ह्यातील स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत नाकारलेल्या कांदा पीक नुकसानीच्या सूचनांची पडताळणी करून  २ हजार ८८ सूचना संबंधित विमा कंपनीकडे पुन्हा पात्र केल्या असून नुकसान भरपाईची परिगणना चालू आहे. ही परिगणना पूर्ण झाल्यानंतर नुकसान भरपाई देण्यात बाबत पुढील कार्यवाही करण्यात येईलअसेही कृषी राज्यमंत्री ॲड. जयस्वाल यांनी यावेळी सांगितले.

सारा नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थी आत्महत्या घटनेची चौकशी सुरू

 सारा नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थी आत्महत्या घटनेची चौकशी सुरू

- गृहराज्यमंत्री योगेश कदम

मुंबई दि. १५ :- पनवेल (जि. रायगड) येथील सारा नर्सिंग कॉलेज मधील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या घटनेची घटनेची सखोल चौकशी केली जाईल,  असे  गृह राज्यमंत्री (शहरे) यांनी विधानसभेत प्रश्नोत्तर तासावेळी सांगितले.

विधानसभा सदस्य संतोष बांगर यांनी यासंदर्भात आज विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता.

गृहराज्यमंत्री श्री. कदम यांनी सांगितलेसारा नर्सिंग कॉलेज येते विद्यार्थी आत्महत्या ही घटना दुर्दैवी आहे. या घटनेचा तपास सुरू आहे. यातील आरोपी  फरार असून या  घटनेच्या तपासाच्या अनुषंगाने काही फोन रेकॉर्ड्स पोलिसांच्या हाती लागले असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच या महाविद्यालयास देण्यात आलेल्या परवानगी संदर्भात संबंधित विभागाकडून माहिती घेतली जाईलअसेही राज्यमंत्री श्री. कदम यांनी सांगितले.

प्रेरणा विद्यालय मतिमंद मुलांची निवासी शाळेचा अनुदान प्रस्ताव ऑक्टोबरपर्यंत पाठवा

 प्रेरणा विद्यालय मतिमंद मुलांची निवासी शाळेचा

अनुदान प्रस्ताव ऑक्टोबरपर्यंत पाठवा

- दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे

मुंबईदि. १५ : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथील प्रेरणा विद्यालय मतिमंद मुलांची निवासी शाळेच्या अनुदान संदर्भातील परिपूर्ण प्रस्ताव ऑक्टोबरपर्यंत पाठवावाअसे दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी प्रश्नोत्तरच्या तासावेळी सांगितले.

विधानसभा सदस्य सत्यजित देशमुख यांनी प्रेरणा विद्यालय मतिमंद मुलांची निवास शाळेच्या अनुदान संदर्भात विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री. सावे यांनी सांगितलेकासेगाव ( ता. वाळवा जि. सांगली)  येथील दानिश सामाजिक व शैक्षणिक चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेमार्फत २००८ पासून वाटेगाव येथे ही निवासी शाळा सूरू आहे. या शाळेस ३ जून २००९ अन्वये २५ निवासी विद्यार्थी संख्येवर कायमस्वरूपी विनाअनुदान तत्वावर मान्यता देण्यात आली आहे. या शाळेच्या नोंदणीपत्राचे नूतनीकरण ३१ मार्च २०२८ पर्यंत वैद्य आहे. संस्थेने १८ ऑगस्ट २००४ शासन निर्णयाच्या आकृतीबंधानुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मानधन तत्वावर नियुक्ती केली आहे.

शासन निर्णय १६ जुलै २००४ मधील मार्गदर्शक सूचनानुसार निवासी शाळा व उपक्रमास १५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याचा अनुदान निर्धारणासाठी विचार करता येईल अशी तरतूद आहे. या तरतुदीनुसार सदर संस्थेने प्रस्ताव सादर केला होता. तथापि या प्रस्तावात त्रुटी असल्याने हा प्रस्ताव त्रुटींच्या पूर्ततेसाठी परत पाठवण्यात आल्याचे मंत्री श्री. सावे यांनी सांगितले. ऑक्टोबर अखेर प्रस्ताव प्राप्त झाल्यास जानेवारीमध्ये अनुदान देण्यासंदर्भात कार्यवाही होत असल्याने हा प्रस्ताव ऑक्टोबर पूर्वी प्रस्ताव सादर करावाअसेही मंत्री श्री. सावे यांनी सांगितले.

सीसीटीव्ही प्रकल्पांमध्ये एकसंधता आणण्यासाठी विशिष्ट कार्यप्रणाली

 सीसीटीव्ही प्रकल्पांमध्ये एकसंधता आणण्यासाठी विशिष्ट कार्यप्रणाली

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            मुंबईदि.१५:- राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शासन सातत्याने काम करीत आहे. तसेच गुन्हे सिद्धता वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानासह सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात येत आहे. राज्यात  सीसीटीव्ही प्रकल्पांमध्ये एकसंधता आणण्यासाठी गृह विभागामार्फत  विशिष्ट कार्यप्रणाली तयार करण्यात येईलअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तरेच्या तासावेळी सांगितले.

विधानसभा सदस्य रवी शेठ पाटील यांनी रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील शहरी भागात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे दुरुस्ती संदर्भात विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य सर्वश्री प्रशांत बंबभास्कर जाधवप्रशांत ठाकूरमहेश शिंदे आणि श्रीमती श्रीजया चव्हाण यांनी उपप्रश्न विचारून सहभाग घेतला.

मुख्यमंत्री श्री.  फडणवीस म्हणालेराज्यात अनेक शहरात व अन्य ठिकाणी पोलीस विभागजिल्हा नियोजन समिती तसेच सीएसआर फंडातून आवश्यकतेनुसार बसवण्यात येतात. या सीसीटीव्हींच्या देखभाल दुरुस्ती आणि सनियंत्रणासाठी  करण्यात येणाऱ्या कार्यक्रमालेमध्ये  सीसीटीव्ही वॉरंटी कालावधीदेखभाल व दुरुस्तीची स्पष्ट जबाबदारीफायबर कनेक्टिव्हिटीतील अडथळेतसेच पोलीस विभाग व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांमधील समन्वय यांचा समावेश असेल.

या प्रश्नाच्या उत्तरात गृहराज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर यांनी सांगितलेरत्नागिरी येथील बंद सीसीटीव्ही कॅमेरा संदर्भात रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून पाठपुरावा करण्यात येत असून या संदर्भात संबंधित कंपनीच्या प्रतिनिधी सोबत बैठक घेण्यात आली आहे. बंद सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याच्या सूचना पोलीस विभागामार्फत देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रायगड येथील बंद असलेले शेती सीसीटीव्ही कॅमेरे सूरू करणे संदर्भात एक बैठक घेतली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

०००००

A Pillar of Public-Oriented Social Institutions Lost

 A Pillar of Public-Oriented Social Institutions Lost

CM Devendra Fadnavis Pays Tribute to Dr. Deepak Tilak, Great-Grandson of Lokmanya Tilak and Trustee of Kesari

Mumbai, July 16: “The passing of Dr. Deepak Tilak, who carried forward the multifaceted legacy of Lokmanya Tilak in Maharashtra’s social landscape, has resulted in the loss of a guiding, public-spirited figure and a pillar of several social institutions,” said Chief Minister Devendra Fadnavis in a heartfelt condolence message. He paid tribute to Dr. Deepak Jayant Tilak, great-grandson of Lokmanya Tilak, trustee of the daily Kesari, and Vice-Chancellor of Tilak Maharashtra Vidyapeeth.

In his condolence message, the Chief Minister noted that Dr. Tilak ably carried forward the rich legacy passed down by Lokmanya Tilak and his grandson, the late Jayant Tilak. Though he remained largely distant from active politics, Dr. Tilak responsibly shouldered the work initiated by Lokmanya Tilak through Kesari, and significantly contributed to the fields of education and social service. Through these efforts, he became a foundational figure for many social organizations, trusts, and institutions.

Thanks to his initiative, many social, educational, cultural, and sports-related endeavors garnered support from the community. A scholar and researcher in the fields of management and journalism, Dr. Tilak inspired countless young minds to pursue research in these areas. His impactful contribution through Tilak Maharashtra Vidyapeeth has enriched the education sector.

With Dr. Deepak Tilak’s passing, the state has lost a towering figure who was a guiding light in the realms of social service, education, and culture. His demise is a deep loss to these sectors. His family, associates from various institutions and organizations, and numerous social activists have suffered a profound loss. “We share in their grief and pray that they find strength in this difficult time. May his soul attain peace,” the Chief Minister added in his tribute.

0000


Governor Radhakrishnan visits Annual Jatra at Raj Bhavan's Sri Gundi temple

 Governor Radhakrishnan visits Annual Jatra at Raj Bhavan's Sri Gundi temple

 

Mumbai, July 16 The Governor C. P. Radhakrishnan had the darshan and performed arti at the historic Sri Gundi Devi Mandir in the Raj Bhavan complex on the occasion of the Annual Jatra of the Goddess on Tuesday (15th Jul).

            The Governor garlanded the murti of Goddess Sri Gundi and had the darshan of Durga Mata, Mahalaxmi, Lord Shiva, Lord Rama and Hanuman deities in the temple premises. The annual jatra of the Sri Gundi temple in Raj Bhavan is held on Tuesday immediately following the Guru Purnima Day.

            Secretary to the Governor Dr. Prashant Narnaware, Deputy Secretary to the Governor S. Ramamoorthy, staff and officers of Raj Bhavan and State police were present on the occasion.

 

Featured post

Lakshvedhi