Friday, 11 July 2025

Mमहाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे ,२४ वर्षे मुदतीचे १५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

 महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे

,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

 

मुंबईदि. १० : महाराष्ट्र शासनाच्या २३ वर्षे मुदतीच्या १,५०० कोटींच्या रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईलअशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

            अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

१५ जुलै२०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे  मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस् १५ जुलै२०२५ रोजी संगणकीय प्रणालीनुसाररिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर प्रणालीनुसार सकाळी  १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर प्रणालीनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान १६ जुलै२०२५   रोजी रोखीनेबँकर्स धनादेश/प्रदान आदेशडिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी २३ वर्षांचा असूनरोख्यांचा कालावधी १६ जुलै२०२५  पासून सुरू होईलतर कर्जरोख्याची परतफेड दिनांक १६ जुलै२०४७  रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा  लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक जानेवारी १६ आणि जुलै १६ रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

            शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम१९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतीलअशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

०००००

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

वृत्त क्र. 2856

 

महाराष्ट्र शासनाचे २४ वर्षे मुदतीचे

१५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

 

मुंबईदि.१० : महाराष्ट्र शासनाच्या २४ वर्षे मुदतीच्या १५०० कोटींच्या  रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईलअशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

१५ जुलै२०२५  रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे  मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस् १५ जुलै२०२५  रोजी संगणकीय प्रणालीनुसाररिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर प्रणालीनुसार सकाळी  १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर प्रणालीनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान १६ जुलै२०२५ रोजी रोखीनेबँकर्स धनादेश/प्रदान आदेशडिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वे


शिक्षण, रोजगार, राष्ट्रप्रेमाला प्राधान्य

 

शिक्षण, रोजगार, राष्ट्रप्रेमाला प्राधान्य

          यावेळी क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले कीयुवकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन विविध उपक्रम राबवित आहे. शहरीग्रामीण आणि आदिवासी भागातील युवकांच्या गरजा ओळखूनदेश-विदेशातील युवकांबाबतच्या धोरणांचा अभ्यास करूनप्रत्यक्ष संवादातून उपाययोजना आखल्या जातील.

नवे सुधारित युवा धोरण यामध्ये शिक्षणरोजगारउद्योजकताबौद्धिक व सामाजिक विकासस्टार्टअपआर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) याबरोबरच जबाबदारीची जाणीवराष्ट्रप्रेमनेतृत्वगुण रुजवणे यावर भर दिला जाणार आहे. यासाठी राज्य व जिल्हास्तरावरील योजनायुवा प्रशिक्षण केंद्रयुवा पुरस्कारवसतीगृहेमहोत्सवव्यक्तिमत्व विकास उपक्रमयुवा निधी आणि युवा प्रतिष्ठा निर्देशांक आदी बाबींचा समावेश केला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

000

बदलत्या सकारात्मक विचारधारेचा युवा धोरणात समावेश परिवर्तन घडवेल

 बदलत्या सकारात्मक विचारधारेचा

युवा धोरणात समावेश परिवर्तन घडवेल

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

        मुंबईदि. १० : विकसित भारत २०४७ च्या दृष्टीने सुधारित युवा धोरणाची आखणी करावी. नव्या आव्हानांना सामोरे जाणाऱ्या युवकांच्या बदलत्या विचारसरणीचा समावेश युवा धोरणात केल्यास परिवर्तन शक्य आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

विधानभवन येथे राज्याच्या सुधारित युवा धोरणासाठी गठित समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवारक्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा समितीचे अध्यक्ष दत्तात्रय भरणेआमदार अमोल मिटकरीश्रीकांत भारतीयसंतोष दानवेराजेश पवारआशुतोष काळेप्रवीण दटकेदेवेंद्र कोठेसुहास कांदेडॉ. बाबासाहेब देशमुखप्रकाश सुर्वेवरुण सरदेसाईरोहित पाटीलयुवा बिरादरीचे संस्थापक पद्मश्री क्रांती शाहआयुक्त शीतल तेली तसेच राज्य व राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेते उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीयुवकांचे विचारत्यांच्या अपेक्षा समजून घेत धोरण आखले गेले तर ते समर्पक ठरेल. शहरी व ग्रामीण भागातील युवकांना समान संधी मिळावी यासाठी प्रशिक्षणसुविधा आणि योजनांचा समावेश असलेले समतोल धोरण तयार करणे आवश्यक आहे. युवक कल्याण विभागाबरोबरच अन्य विभागांनीही हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. शाळामहाविद्यालयेसोशल मीडिया आणि सेवा क्षेत्रातील प्रतिनिधींनाही धोरणात सहभागी करून त्यांच्या सूचना समाविष्ट करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी आज दिले.

बैठकीत आमदार आणि निमंत्रित सदस्यांनीही सूचना मांडत समृद्ध धोरणासाठी योगदान दिले.

हिंजवडी परिसरातील गर्दी कमी होण्यास मदत होणार,मेट्रोचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करा

 मेट्रोचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करा - उपमुख्यमंत्री अजित पवार

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था भक्कम झाली तर हिंजवडी परिसरातील गर्दी कमी होण्यास मदत होणार यासाठी मेट्रोची कामेही त्वरित होणे आवश्यक आहे. मेट्रो स्टेशनची कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले.

मेट्रो लॅंडिंगमुळे रस्ता छोटा होईलयासाठी एमआयडीसीपीएमआरडीएमेट्रो यांनी एकत्र समन्वयाने विषय मार्गी लावावाअसे निर्देशही श्री. पवार यांनी दिले.

‘पीएमआरडीए’चे आयुक्त श्री. म्हसे यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

हिंजवडीकरांच्या समस्या रस्ता रूंदीकरणाच्या कामांना प्राधान्य द्यावे

 रस्ता रूंदीकरणाच्या कामांना प्राधान्य द्यावे

सूर्या हॉस्पिटल ते माण गावठाणम्हाळुंग ते हिंजवडी फेज एकशनि मंदिर वाकड ते मरूनजीनांदे ते माण या रस्त्यांच्या रूंदीकरणाच्या कामाला संबंधित यंत्रणांनी प्राधान्य द्यावे. शिवाजीनगर ते हिंजवडी कॉरिडॉरचा आराखडा तयार करावा. वाकड-बालेवाडी भागात सार्वजनिक वाहतूक केंद्र उभारावेयामुळे प्रवासी विभागले जावून गर्दी नियंत्रणात राहील. रस्त्यावरील गर्दी रोखता येईल. यासाठी फूटपाथचा विषयी दोन्ही ‘मनपा’ने प्राधान्याने मार्गी लावावा. पाटीलवस्ती ते बालेवाडीरोड येथील भूसंपादनाबाबत महिनाभरात काम करावेअसे निर्देशही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.

पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी योग्य प्रवाहासाठी नियोजन करावे. त्याठिकाणी ड्रेनेज लाईन टाकण्याची कामे हाती घ्यावी. सर्व कामांसाठी विभागीय आयुक्त यांनी समन्वय करून बैठका घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्या. 

हिंजवडीकरांच्या समस्या सोडविण्यासाठी नियोजनाचा बृहत आराखडा सादर करा

 हिंजवडीकरांच्या समस्या सोडविण्यासाठी

नियोजनाचा बृहत आराखडा सादर करा

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 10 : पुण्यातील हिंजवडी ‘आयटी’ पार्क परिसरातील वाहतूक कोंडीपूरस्थिती तसेच पिण्याच्या पाण्यासह सर्व समस्या सोडविण्यासाठी पुणे ‘मनपा’पिंपरी चिंचवड ‘मनपा’पुणे महानगर विकास प्राधिकरण आणि ‘एमआयडीसी’ने योग्य समन्वयाने नियोजन करावे. उपलब्ध संसाधनाद्वारे नागरिकांना चांगली सेवा देण्यास प्राधान्य द्यावे. विविध समस्यांवर तोडगा काढून कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी बृहत आराखडा सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

हिंजवडी ‘आयटी’ पार्कमधील विविध समस्यांबाबत विधानभवनमध्ये आयोजित बैठकीत मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारनगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळसर्वश्री आमदार शंकर जगतापशंकर मांडेकरमहेश लांडगेनगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असिमकुमार गुप्ताप्रधान सचिव गोविंदराजविभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवारजिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपुणे मनपा आयुक्त नवलकिशोर रामपिंपरी चिंचवड मनपाचे आयुक्त शेखर सिंहपुणे महानगर विकास प्राधिकरण आयुक्त योगेश म्हसेजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटीलउद्योग विकास आयुक्त पी. वेलारासू यांच्यासह विविध विभागाचे अधिकारीहिंजवडी येथील रहिवासी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीहिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडीमुळे हजारो आयटी अभियंतेनागरिक त्रस्त झाले आहेत. पावसाळ्यात वाहतूक कोंडीत भर पडते ही समस्या सोडविण्यासाठी या भागांत रस्तेरिंगरोडउड्डाणपूलसार्वजनिक वाहतूकपार्किंग यंत्रणामेट्रोची प्रलंबित कामे मार्गी लागण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या. कस्पटेवस्ती ते हिंजवडी फेज ३ पर्यंतचा रस्ता वेगळा केल्यास वाहतूक कोंडी कमी होईलसर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे करावेत. म्हाळुंगे आयटी सीटीचा प्रस्ताव त्वरित मंजूर करावा. रस्ते रूंदीकरणासाठी योग्य मोबदला देवून लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून भूसंपादन करावे. हिंजवडी एलिव्हेटेड मार्गाचे काम सहा पदरी करून याबाबत १५ दिवसात निर्णय घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

काटोल, नरखेड आणि मोवाड शहरातील पाणी पुरवठा योजनांना गती द्यावी

 काटोलनरखेड आणि मोवाड शहरातील

पाणी पुरवठा योजनांना गती द्यावी

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

 

मुंबईदि. १० : काटोलनरखेड आणि मोवाड शहरांतील नागरिकांना नियमित पाणी मिळावे यासाठीच्या पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करावीअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

विधानभवन येथे काटोलनरखेड व मोवाड नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेबाबत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते. बैठकीत आमदार चरणसिंग ठाकूरआशिष देशमुखजलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरप्रधान सचिव गोविंदराजअभिषेक कृष्णाइ. रविंद्रन तसेच सचिव अश्विनी भिडे उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीया तीनही शहरांतील पाणीटंचाईची समस्या दूर करणे हे करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. नागरिकांना दररोज नियमित पाणी मिळावेयासाठी पायाभूत सुविधा योजनांना गती देण्यात यावी. या कामांमध्ये अडथळे निर्माण होणार नाहीतयाची दक्षता घ्यावी. नगरोत्थान योजनेअंतर्गत उपलब्ध निधीचा प्रभावी वापर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Featured post

Lakshvedhi