Friday, 11 July 2025

बदलत्या सकारात्मक विचारधारेचा युवा धोरणात समावेश परिवर्तन घडवेल

 बदलत्या सकारात्मक विचारधारेचा

युवा धोरणात समावेश परिवर्तन घडवेल

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

        मुंबईदि. १० : विकसित भारत २०४७ च्या दृष्टीने सुधारित युवा धोरणाची आखणी करावी. नव्या आव्हानांना सामोरे जाणाऱ्या युवकांच्या बदलत्या विचारसरणीचा समावेश युवा धोरणात केल्यास परिवर्तन शक्य आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

विधानभवन येथे राज्याच्या सुधारित युवा धोरणासाठी गठित समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवारक्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा समितीचे अध्यक्ष दत्तात्रय भरणेआमदार अमोल मिटकरीश्रीकांत भारतीयसंतोष दानवेराजेश पवारआशुतोष काळेप्रवीण दटकेदेवेंद्र कोठेसुहास कांदेडॉ. बाबासाहेब देशमुखप्रकाश सुर्वेवरुण सरदेसाईरोहित पाटीलयुवा बिरादरीचे संस्थापक पद्मश्री क्रांती शाहआयुक्त शीतल तेली तसेच राज्य व राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेते उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीयुवकांचे विचारत्यांच्या अपेक्षा समजून घेत धोरण आखले गेले तर ते समर्पक ठरेल. शहरी व ग्रामीण भागातील युवकांना समान संधी मिळावी यासाठी प्रशिक्षणसुविधा आणि योजनांचा समावेश असलेले समतोल धोरण तयार करणे आवश्यक आहे. युवक कल्याण विभागाबरोबरच अन्य विभागांनीही हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. शाळामहाविद्यालयेसोशल मीडिया आणि सेवा क्षेत्रातील प्रतिनिधींनाही धोरणात सहभागी करून त्यांच्या सूचना समाविष्ट करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी आज दिले.

बैठकीत आमदार आणि निमंत्रित सदस्यांनीही सूचना मांडत समृद्ध धोरणासाठी योगदान दिले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi