Wednesday, 11 June 2025

पुणे महानगरपालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांना तातडीने योग्य प्रमाणात पाणीपुरवठा करा

 पुणे महानगरपालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या

गावांना तातडीने योग्य प्रमाणात पाणीपुरवठा करा

-  सभापती प्रा.राम शिंदे

अर्थसंकल्पीय अधिवेशन 2025 मधील "लक्षवेधी" वर विधान भवनात बैठक

 

मुंबईदि. 10 :-  पुणे महानगरपालिकेने शहरातील पाणीपुरवठा योग्य प्रमाणात होण्यासाठी सन-2018 मध्ये 24x7 योजना आणून देखील अद्याप कात्रजकोंढवायेवलेवाडीपिसोळी या विभागात अपुऱ्या प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. शहरात अनेक ठिकाणी अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना आंदोलन करावे लागत आहे. ही बाब गंभीर असून पुणे महापालिकाहद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांना तातडीने योग्य प्रमाणात पाणीपुरवठा होईल या दृष्टिने कार्यवाही करण्यात यावीअसे निदेश महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले.

विधानपरिषदेचे सदस्य योगेश टिळेकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन 2025 मध्ये "लक्षवेधी" च्या माध्यमातून या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. यासंदर्भात सभापती प्रा.राम शिंदे यांच्या दालनात बैठक घेण्यात आलीत्यावेळी हे निर्देश देण्यात आले.

            या बैठकीस विधानपरिषदेचे सदस्य आमदार योगेश टिळेकरविधानमंडळाचे सचिव (3) डॉ.विलास आठवलेपुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम (दूरदृष्य प्रणालीद्वारे)अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटेउप सचिव नगरविकास श्रीमती प्रियंका छापवाले उपस्थित होते.

            सद्य:स्थितीत पुणे मनपास 14 टीएमसी पाणी देण्याचा करार करण्यात आला आहे. नवीन 34 गावांकरीता पाणीपुरवठा योजना तयार करतांना 21 टीएमसी पाणी उपलब्ध करुन देण्याचा करार करावा. सन 2018 मध्ये सुरु झालेली ही पाणीपुरवठा योजना अद्याप अपुरी असून गांभीर्याने नियोजन करुन लवकरात लवकर पाणी प्रश्न सोडवावा, असे निर्देश सभापती प्रा. शिंदे यांनी दिले.

कोकण वसाहत व शांतीदूत सहकारी गृहनिर्माण संस्थेचा रखडलेला पुनर्विकास पूर्ण करावा

 कोकण वसाहत व शांतीदूत सहकारी गृहनिर्माण संस्थेचा

रखडलेला पुनर्विकास पूर्ण करावा

- गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

 

मुंबई, दि. 10 : ठाणे जिल्ह्यातील कल्याण (पश्चिम) भागातील एलआयजी -1 कोकण वसाहत आणि मौजे चिकनघर शांतीदूत सहकारी गृहनिर्माण संस्था येथील रखडलेला पुनर्विकास रखडलेला असल्याच्या तक्रारी आहेत. विकासकाने पुनर्विकास करून नागरिकांना त्यांच्या हक्काची घरे मिळवून द्यावी. विकासकाकडून होत असलेला विलंब बघता म्हाडाच्या माध्यमातून विकास करण्यासाठी नियमानुसार कारवाई करावीअशा सूचना गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिल्या.

 मंत्रालयात एल.आय.जी 1 कोकण वसाहत व मौजे चिकनघर शांतीदूत सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या रखडलेल्या पुनर्विकासाबाबत बैठकीचे आयोजन राज्यमंत्री डॉ. भोयर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. बैठकीस आमदार नरेंद्र पवारउपसचिव अजित कवळेकोकण मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती गायकरउपनिबंधक अभिजीत देशपांडेमुख्य अभियंता शिवकुमार आडे आदींसह याभागातील नागरिक उपस्थित होते.

 परिसरातून आलेल्या नागरिकांनी प्रकल्पाबाबत तक्रारी केल्या. यावेळी राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी सर्व नागरिकांचे म्हणणे ऐकून घेत प्रश्नावर नियमानुसार तोडगा काढण्याबाबत यंत्रणेला सूचित केले.

वानाडोंगरी येथील गृहनिर्माण प्रकल्पाची प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करा

 वानाडोंगरी येथील गृहनिर्माण प्रकल्पाची


प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करा


- गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर


 


मुंबई, दि. 10 : वानाडोंगरी येथील प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून गृहनिर्माण प्रकल्पातील रस्ता, सांडपाणी प्रक्रिया याबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. या तक्रारींची तातडीने दखल घ्यावी. या संपूर्ण प्रकरणाची म्हाडाद्वारे संपूर्ण चौकशी करून अहवाल सादर करावा, असे निर्देश गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिल्या.


 मंत्रालयात वानाडोंगरी (ता. हिंगणा, जि. नागपूर) येथील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पाबाबत केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन राज्यमंत्री डॉ. भोयर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या बैठकीस आमदार विकास ठाकरे, उपसचिव अजित कवळे, मुख्य अभियंता शिवकुमार आडे, म्हाडाच्या नागपूर मंडळाचे मुख्य अधिकारी महेश मेघमाळे, कार्यकारी अभियंता रूपेश तोटेवार उपस्थित होते.


 वानाडोंगरी नगर परिषदेने प्रकल्पासाठी दिलेले पत्र व यंत्रणेने दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्राची चौकशी करावी. गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करताना अटी – शर्तीनुसार सर्व सुविधा विकासकांनी द्यायला पाहिजे. विकासकांनी नियमानुसार काम करावे, असेही राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी

अकोले व संगमनेर तालुक्यातील सिंचन प्रकल्पाच्या कामांना गती द्यावी

 अकोले व संगमनेर तालुक्यातील

सिंचन प्रकल्पाच्या कामांना गती द्यावी

-          जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

 

मुंबईदि. 10 :- अकोले व संगमनेर तालुक्यातील सिंचन प्रकल्पाच्या कामांना गती द्यावी. या दोन्ही तालुक्यातील  सिंचन क्षेत्र वाढावे यासाठी सिंचन प्रकल्प व योजनांच्या कामांचे सर्वेक्षण करून या बाबतचा सविस्तर प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या.

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अकोले मतदारसंघातील जलसंपदा विभागातील विकास कामे आणि संगमनेर तालुक्यातील साकुर व पठार भागातील जलनियोजन संदर्भात मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस आमदार डॉ.  किरण लहामटेआमदार अमोल खताळजलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरगोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवारमुख्य अभियंता  तथा सह सचिव संजीव टाटू आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. विखे - पाटील म्हणालेआमदार डॉ. किरण लहामटे आणि आमदार अमोल खताळ यांनी सिंचनासाठी पाणी उपलब्ध होण्याबाबत ज्या योजनाप्रकल्पाची कामे सुचवली आहेत त्या योजना व कामांचा जलसंपदा विभागाने अभ्यास करावा. ज्या योजनाच्या कामांचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे  त्याचे सर्वेक्षण करून आराखडा तयार करावा. अकोले व संगमनेर मधील सिंचन प्रकल्पांची साठवण क्षमताप्रत्यक्ष होत असलेलला पाणी साठा याबाबतही अधिकाऱ्यांनी अहवाल सादर करावा.

या बैठकीत आमदार डॉ. किरण लहामटे आणि आमदार अमोल खताळ  यांनी  उपस्थित केलेले  विविध मुद्दे व कामांचा आढावा घेण्यात आला. त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे व कामे प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांनी या कामाचे सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार कालबद्ध पद्धतीने कामे पूर्ण करावीतअशा सूचनाही जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांनी यावेळी दिल्या.

बैठकीत मेळावणे बंधाराबिताका पाणी वळण बंधाराभंडारदराशिळवंडीबलठणपाडोशी  बुडीत बंधारे बांधणेनिमगाव भोजापूर धरण पाण्याचे योग्य नियोजनसाकुर पठार भागातील पाणी प्रश्न आणि  निळवंडे डावा व उजवा कालवा यासह अन्य विषयांचाही आढावा घेण्यात आला.

पुणे शहरातील कात्रज कोंढवा रस्त्याचे काम

 पुणे शहरातील कात्रज कोंढवा रस्त्याचे काम

हिवाळी अधिवेशनापूर्वी पूर्ण करावे

सभापती प्रा.राम शिंदे

मुंबईदि. 10 :- पुणे शहरातील कात्रज कोंढवा रस्त्याच्या कामासाठी राज्य शासनाने 140 कोटी रुपये उपलब्ध करुन दिल्यानंतर देखील वर्षभरात सदर काम झाले नाही, हिवाळी अधिवेशनापूर्वी हे काम पूर्ण करावे आणि कामाच्या विलंबास दोषी असणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करावी, असे निर्देश सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले.

विधानपरिषदेचे सदस्य योगेश टिळेकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात 7 मार्च, 2025 रोजी "विशेष उल्लेखाद्वारे" हा प्रश्न उपस्थित केला होता. यासंदर्भात बैठक घेण्यात आलीत्यावेळी हे निर्देश देण्यात आले.

 या बैठकीस विधानपरिषदेचे सदस्य योगेश टिळेकरविधानमंडळाचे सचिव (3) डॉ.विलास आठवलेपुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम (दूरदृष्य प्रणालीद्वारे)अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटेउप सचिव नगरविकास श्रीमती प्रियंका छापवाले उपस्थित होते.

सन 2018 मध्ये कात्रज कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम मंजूर झाले आहेमागील सात वर्षात हे काम पूर्ण झालेले नाही. यामुळे भूसंपादनाच्या खर्चात वाढ झाली आहे. शासनाकडे मागणी केलेल्या निधीपैकी 140 कोटी रुपये एक वर्षापूर्वी प्राप्त झाले आहेत परंतु भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली नाही. निधी मिळून सुद्धा विनियोग न होणे ही बाब गंभीर असून दोषींवर कारवाई प्रस्तावित करावी आणि हे काम हिवाळी अधिवेशनापूर्वी पूर्ण करुन अहवाल सादर करावा, असे निर्देश सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले.

धरणातील पाणीसाठा समाधानकारक

 धरणातील पाणीसाठा समाधानकारक

राज्यातील सर्व प्रमुख धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला पाणीसाठा असल्याचे आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगण्यात आले. जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी माहिती दिली.

धरणाचे नावसध्याचा पाणी साठागेल्या वर्षीचा साठा - गोसीखुर्द ४.६४ टीएमसी (८.६७)तोतलाडोह १८.७९ (१८.१४)ऊर्ध्व वर्धा ८.८५ (८.८७)जायकवाडी २२.६०(२.९९)मांजरा १.६३(०.००)ऊर्ध्व तापी हातनूर ५.३२(२.६३)गंगापूर २.५०(२.४८)कोयना १७.३६(१०.००)खडकवासला०.८४(१.०३)उजनी १८.७२(०.००)भातसा ९.९५(८.१७)धामणी ३.११(१.७७).

००००

मोसमी पाऊस तीन चार दिवसांत सक्रिय

 मोसमी पाऊस तीन चार दिवसांत सक्रिय

मोसमी पाऊस येत्या तीन ते चार दिवसांत पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. दक्षिण व्दीपकल्पीय भारताच्या भूभागातील कर्नाटकात १२ ते १५ जून दरम्यान आणि कोकण आणि गोवा येथे १३ ते १५ जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहेअशी माहिती वेधशाळेच्या संचालक शुभांगी भुते यांनी सादरीकरणाद्वारे दिली. त्यांनी सांगितले कीमोसमी पावसाच्या मार्गक्रमणासाठी अनुकूल वातावरण निर्मिती होण्याची शक्यता येत्या तीन ते चार दिवसांत आहे. त्यानुसार मध्य महाराष्ट्रात १२ जून रोजी मराठवाड्यातील काही भागात १२ ते १४ जून दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणगोवा येथे १२ आणि १५ जून दरम्यान मुसळधार तर १३, १४ जून रोजी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात १३ ते १५ जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत मच्छिमारांनी समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाऊ नये. वीजांच्या गडगडाटांसह वादळ होत असताना खुल्या मैदानावर काम करु नयेवीजा होताना झाडांच्या खाली आसरा घेऊ नयेइलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वीज पुरवठा खंडित करुन ठेवावाओढातलावनदी आदी पाण्याच्या स्त्रोतातून तत्काळ बाहेर पडावेवीज वहन करणाऱ्या सर्व वस्तूंपासून दूर राहावेअशा सूचना त्यांनी दिल्या.

Featured post

Lakshvedhi