Monday, 9 June 2025

अवकाळी पावसाने झालेल्या शेत पिकाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा

 अवकाळी पावसाने झालेल्या शेत पिकाच्या नुकसानीचे

 तातडीने पंचनामे करा

- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

 

मुंबईदि. २२ : राज्यात गत काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेत पिकांचे तातडीने पंचनामे करावेतअसे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिले.

मंत्री श्री. जाधव-पाटील म्हणालेनैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांप्रती राज्य शासन संवेदनशील आहे. एप्रिल व मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेत पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी. यासाठी शेत पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत. पंचनामे करण्यासाठी महसूल व कृषी विभागाने पथके गठीत करून ही कार्यवाही गतीने पूर्ण करावी.

मंत्री श्री. जाधव - पाटील म्हणालेअतिवृष्टीपूरअवेळी पाऊसदुष्काळवादळी वारा व गारपीट या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यास शासन नेहमीच प्राधान्य देत आहे. विविध नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीपोटी सन २०२३- २०२४ या वर्षात ५४ लाख ८० हजार पात्र शेतकऱ्यांना ४ हजार ८३३ कोटी (चार हजार आठशे तेहतीस कोटी ) रूपये तर २०२४- २०२५  या आर्थिक वर्षात ६९ लाख ३ हजार शेतकऱ्यांना ६ हजार ९८९ कोटी ( सहा हजार नऊशे एकोणनव्वद) आणि १ एप्रिल २०२५ ते आतापर्यंत ९ लाख ७ हजार शेतकऱ्यांना ९७५ कोटी रुपयांची मदत देण्यात आली असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी सांगितले.

विधवा प्रथांचे निर्मूलन करण्यासाठी राज्यस्तरीय जनजागृती राबवा pl share

 विधवा प्रथांचे निर्मूलन करण्यासाठी राज्यस्तरीय जनजागृती राबवा

- महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

 

            मुंबईदि. २२ : विधवा प्रथांचे निर्मूलन करण्यासाठी मिशन वात्सल्य योजने अंतर्गत जनजागृती करण्यात येते.  मात्र काही प्रमाणात अद्यापही अशा कृप्रथा सुरू असल्याचे निदर्शनास आले असूनया प्रथांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये नव तंत्रज्ञानाचा वापर करून विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रबोधन करावे. तसेच अशा प्रथांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.

विधवा प्रथा बंद करण्याच्या ठरावाच्या धर्तीवर राज्यभर केलेल्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रालयात नुकतेच बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सचिव डॉ. अनुपकुमार यादव, महिला व बाल विकास आयुक्त नैना गुंडे, सह सचिव वी. रा. ठाकूर, सह आयुक्त राहुल मोरे उपस्थित होते.

 मंत्री तटकरे म्हणाल्या कीविधवा महिलांनाही इतर महिलांप्रमाणे सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. या महिलांच्या अधिकारांचे संरक्षण करण्याच्या हेतूने या महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मिशन वात्सल्य योजनेच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.

मात्रआजही काही ठिकाणी विधवा महिलांच्या कपाळावरील कुंकू पुसणेगळ्यातील मंगळसूत्र तोडणेहातातील बांगड्या फोडणेपायातील जोडवी काढली जाणे तसेच विधवा महिलांना समाजातील धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ न देणे यांसारख्या कृप्रथांचे पालन होताना निदर्शनास येत आहे. यामुळे या महिलांच्या मानवी अधिकारांचे उल्लंघन होत आहे.

या प्रथांना आळा घालण्यासाठी गाव पातळीवर तसेच शहरी भागात वॉर्डस्तरावर समिती गठीत करण्यात आल्या आहेत. या कृप्रथांना पूर्णविराम मिळावा म्हणून समितीच्या माध्यमातून व्यापक प्रमाणावर जनजागृतीपर कार्यक्रम घ्यावेत. नागरिकांना विधवा कृप्रथे संबंधित घटना घडताना आढळल्यास संबंधित तालुका व ग्रामस्तरीय समितीला संपर्क साधण्याचे आवाहन मंत्री तटकरे यांनी केले.

 या समितीमध्ये ग्रामसेवकवॉर्ड अधिकारीतलाठीप्राथमिक शिक्षकअंगणवाडी सेविका यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामस्तरीय समितींची संख्या 36 हजार 205 व जिल्हास्तरीय वॉर्डस्तरीय समितींची संख्या 4909 इतकी असूनयामार्फत जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

0000

आपत्ती काळात संपर्कासाठी राज्य, जिल्हा, महापालिका नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक (save and share)

 आपत्ती काळात संपर्कासाठी राज्यजिल्हा,

महापालिका नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक

 

मुंबईदि. २२ :- पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तीमध्ये संपूर्ण राज्यभरातील आपत्ती नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्सून पूर्व तयारी आढावा बैठकीत दिले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तत्काळ संपर्कासाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्र मंत्रालय मुंबईजिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षमहानगरपालिका नियंत्रण कक्ष आणि रेल्वे नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सतीशकुमार खडके यांनी जाहीर केले आहेत.

राज्य आपत्कालीन कार्य केंद्र मंत्रालय, मुंबई

आपत्ती व्यवस्थापन केंद्र - 9321587143दूरध्वनी: 022- 220227990022- 22794229022- 22023039आपत्कालीन संपर्क - 1070

 ई-मेल controlroom@maharashtra.gov.in

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक :-

मुंबई शहर- ०२२-२२६६४२३२मुंबई उपनगर- ०२२-६९४०३३४४ठाणे - ०२२-२५३०१७४० /९३७२३३८८२७पालघर - ०२५२५-२९७४७४/ ०२५२५-२५२०२०रायगड - ०२१४१-२२२०९७रत्नागिरी - ०२३५२-२२२२३३ / २२६२४८सिंधुदुर्ग- ०२३६२-२२८८४७नाशिक - ०२५३-२३१७१५१अहिल्यानगर - ०२४१-२३२३८४४धुळे- ०२५६२-२८८०६६नंदुरबार - ०२५६४-२१०००६, जळगाव - ०२५७-२२१७१९३/२२२३१८०, पुणे - ०२०-२६१२३३७१, सोलापूर - ०२१७-२७३१०१२कोल्हापूर - ०२३१-२६५२९५४, सांगली - ०२३३-२६००५००सातारा- ०२१६२-२३२३४९/२३२१७५छत्रपती संभाजीनगर- ०२४०-२३३१०७७धाराशिव- ०२४७२-२२७३०१, हिंगोली - ०२४५६-२२२५६०, परभणी - ०२४५२-२२६४००,बीड- ०२४४२-२९९२९९नांदेड - ०२४६२-२३५०७७, जालना- ०२४८२-२२३१३२लातूर- ०२३८२-२२०२०४अमरावती- ०७२१-२६६२०२५यवतमाळ - ०७२३२-२४०७२०, वाशिम- ०७२५२-२३४२३८, अकोला- ०७२४-२४२४४४४बुलढाणा- ०७२६२-२४२६८३, नागपूर - ०७१२-२५६२६६८वर्धा- ०७१५२- २४३४४६/२९९०१०चंद्रपूर - ०७१७२- २७२४८०/२५००७७गोंदिया - ०७१८२- २३०१९६, भंडारा- ०७१८४- २५१२२२गडचिरोली- ०७१३२- २२२०३१/२२२०३५

महानगरपालिका नियंत्रण कक्ष क्रमांक

बृहन्मुंबई - ०२२-२२६९४७२५/२७२२७०४४०३/१९१६/९८३३८०६४०९, ठाणे - ०२२-२५३७१०१०/८६५७८८७१०१/ ०२/ ७५०६९४६१५५, नवी मुंबई - ०२२-२७५६७२८१भिवंडी - ०२५२२-२५००४९/२३२३९८कल्याण - ०२५१-२२११३७३मीरा भाईंदर- ०२२-२८१९२८२८/२८११७१०२उल्हासनगर - ०२५१-२७२०१४९/२७२०१४३, वसई-विरार - ०२५०-२३३४५४७पनवेल - ०२२-२७४५८०४०नाशिक - ०२५३-२५७१८७२/२३१७५०५मालेगाव - ०२५५४- २३४५६७अहिल्यानगर-०२४१- २३२९५८१/०२४१- २३२३३७०धुळे- ०२५६२-२८८३२०जळगाव - ०२५७-२२३७६६६पुणे- ०२०-२५५०६८००/१/२/३पिंपरी-चिंचवड - ०२०-६७३३११११सोलापूर - ०२१७-२७४०३३५कोल्हापूर- ०२३१-२५३७२२१सांगली-मिरज-कुपवाड - ०२३३-२९५०१६१छत्रपती संभाजीनगर - ०२४०-१५५३०४परभणी - ०२४५२-२२३१०१नांदेड- ०२४६२-२३४४६१लातूर- ०२३८२-२४६०७७/२४६०७५अमरावती - ०७२१-२५७६४२६अकोला - ०७२४-२४३४४६०नागपूर - ०७१२-२५५१८६६/७०३०९७२२००चंद्रपूर - ९८२३१०७१०१ / ८९७५९९४२७७,  ०७१७२-२५९४०६/२५४६१४

रेल्वे नियंत्रण कक्ष समन्वय अधिकारी

कोकण रेल्वे- बेलापूर हेड क्वाटर कंट्रोल रूम- ९००४४४७१९९

पश्चिम रेल्वे- डेप्युटी पंक्च्युयालिटी - ९००४४९९०९९

मध्य रेल्वे- सेफ्टी काऊंसिलर आपत्ती व्यवस्थापन- ८८२८११००५०

००००

हुंडा, बालविवाह प्रथांचे कायमस्वरूपी निर्मुलन करणार

 हुंडाबालविवाह प्रथांचे कायमस्वरूपी निर्मुलन करणार

या अभियाना अंतर्गत महिला विकास विषयक कार्ये म्हणजेच बालविवाह रोखणेहुंडा पद्धती बंद करणेमहिला संरक्षणगावातील एकल महिलाविधवापरित्यक्ता व निराधार महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.  तसेचमहिला सक्षमीकरण विषयक कार्ये अंतर्गत महिला बचत गटांची निर्मिती व सक्षमीकरणासाठीऔद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मदतीने कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्याचे कार्य करण्यात येणार आहे. तसेच जाणीव जागृती कार्यक्रमांतर्गत कायदेयोजना व त्यांची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा व सुविधा याबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे.  ग्राम सुरक्षा यंत्रणे अंतर्गत आरोग्यशिक्षण व संरक्षणाशी संबंधित असणाऱ्या समित्यांना बाल संरक्षण समितीमहिला आरोग्य व पोषण समितीमहात्मा गांधी तंटा मुक्त ग्राम समित्ती शालेय व्यवस्थापन संदर्भात काम करण्यात येईल.  सामाजिक सुरक्षितते करीता कार्यक्रम अंतर्गत अंधअपंगविकलांग यांना शासनाच्या योजनांमध्ये प्राधान्य देऊन योजना लागू करण्यात येईल. आरोग्य विषयक कार्यक्रमांतर्गत आशा स्वयंसेविका / आरोग्य सेविका समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) यांच्या मदतीने गाव पातळीवर आरोग्य तपासणी करण्यात येईल.  शिक्षण विषयक कार्यक्रमात किशोरवयीन मुली नियमितपणे शाळेत जातील व त्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडणार नाही याची दक्षता समिती घेईल.

 पर्यावरण विषयक कार्यक्रमात ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील खुल्या सार्वजनिक जागेवर ग्रामपंचायतीच्यावतीने नव्याने वृक्ष लागवड करण्याचा प्रयत्न करावा व केलेल्या वृक्ष लागवडीची सातत्याने जोपासना करावी इत्यादी संबंधित कार्ये करण्यात येतील.

०००

विकास आणि पर्यावरणाचा समतोल राखणारा निर्णय झुडपी जंगलाबाबतच्या निर्णयाने विदर्भाच्या ,नागपुरात झोपडपट्टीधारकांना मालकी हक्क देण्याचाही मार्ग मोकळा

 विकास आणि पर्यावरणाचा समतोल राखणारा निर्णय

झुडपी जंगलाबाबतच्या निर्णयाने विदर्भाच्या विकासाला चालना

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपुरात झोपडपट्टीधारकांना मालकी हक्क देण्याचाही मार्ग मोकळा

 

नागपूरदि. 22 :- झुडपी जंगलाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी आहे. तो विकास आणि पर्यावरणाचा समतोल राखणारा आहे. या निर्णयामुळे विदर्भाच्या विकासाला मोठी चालना मिळेल आणि नागपुरात तर झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देण्याचाही मार्ग मोकळा झाला आहेअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

नागपूर येथे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना ते बोलत होते. ते म्हणाले कीगेल्या 45 वर्षांपासून विदर्भ यासाठी लढा देत होता. त्या लढ्याला आज मोठे यश आले. ज्यावेळी महाराष्ट्र तयार झाला आणि विदर्भ हा सीपी अँड बेरारमधून महाराष्ट्रात आला. त्यावेळी महसुली रेकॉर्डमध्ये झुडपी जंगल असे लिहिले गेले. मध्यप्रदेशात आपला रेकॉर्ड दुरुस्त केला आणि आपल्याकडे 1980 च्या कायद्यात याला जंगलाचा दर्जा मिळाला आणि त्यामुळे विदर्भाचा विकास थांबून गेला होता. नागपूर रेल्वेस्थानक किंवा उच्च न्यायालयाची इमारत ही जुन्या रेकॉर्डनुसार झुडपी जंगल म्हणून होती. त्यामुळे यातून दिलासा मिळाला पाहिजेअशी मागणी होत होती. या निर्णयाअभावी विकासाचेसिंचनाचे प्रकल्प मोठ्या प्रमाणात रखडले होते. 1996 पूर्वी ज्या जमिनींचे वाटप झाले आहेत्याला अपवाद करण्यात आला आहे. 1996 ज्या जमिनी दिल्यात्याबाबत एक प्रक्रिया आखून दिली आहे. त्यानुसारत्या जमिनी केंद्राकडून राज्य शासन मागू शकते.

सर्वांत महत्त्वाची आमची मागणीझोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देण्यासाठी सूट देण्यात यावीही केली होती. यात तकियाचुनाभट्टीजयताळ्यातील रमाबाई आंबेडकर नगरएकात्मता नगरवाडीतील आंबेडकर नगर अशा अनेक झोपडपट्टी आहेतज्यांना मालकी हक्काचे पट्टे मिळत नव्हते. ते आता देता येणार आहेत. त्या झोपड्या झुडपी जंगलाच्या संकल्पनेत येत होत्या. त्यांना आता मालकी हक्काचे पट्टे देण्याची कार्यवाही करता येणार आहेअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

2014 ते 2019 या काळात एक समिती गठीत करुन त्याचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने एक सीईसी तयार केली. राज्य शासनाने तयार केलेला अहवाल एकप्रकारे सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारला आहे. 45 वर्ष विदर्भातील सर्वपक्षीय नेते जी मागणी करीत होतेती मागणी आता मान्य झाली आहे. या निर्णयामुळे सुमारे 70 ते 80 हजार एकर जागेवर वन तयार करावे लागणार आहे. विकास आणि पर्यावरण यात समतोल साधणारा हा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय आहेअसेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

माओवाद हा आता अखेरच्या घटका मोजत आहे. छत्तीसगडमध्ये बसवराजू हा माओवाद्यांचा मोठा नेता होता. कोट्यवधी रुपयांचा पुरस्कार त्याच्या नावावर होता. चंद्राबाबू नायडू यांच्यावरील हल्ला75 सीआरपीएफ जवानांचे मृत्यू असो कीछत्तीसगडमधील अनेक नेत्यांच्या हत्येत हा आरोपी होता. आपल्या सुरक्षा दलांनी त्याचा खात्मा केलेला आहे. माओवादाला संपूर्णत: संपविण्याचा निर्धार आहेअसेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

इचलकरंजीसह परिसराच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करु

 इचलकरंजीसह परिसराच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करु

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

713 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटनशुभारंभ व लोकार्पण

 

इचलकरंजी (कोल्हापूर)शहरांच्या विकासाच्या योजनांसाठी राज्य शासन कटिबद्ध असून लोकप्रतिनिधींकडून आलेल्या सर्व प्रस्तावांना न्याय देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्याअनुषंगाने इचलकरंजीसह परिसराच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करुअसे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यांच्याहस्ते इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील 713 कोटी रुपयांहून अधिक विविध विकास कामांचे उद्घाटनशुभारंभ व लोकार्पण करण्यात आले.

 

यावेळी  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकरउच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलखासदार धनंजय महाडिकखासदार धैर्यशील मानेआमदार राहुल आवाडेआमदार अशोकराव मानेआमदार शिवाजीराव पाटीलमाजी मंत्री प्रकाश आवाडेविशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शशिकांत माहुरकरजिल्हाधिकारी अमोल येडगेजिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडितमुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयनइचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटीलउप विभागीय अधिकारी मोसमी चौगुले उपस्थित होत्या. यावेळी पालकमंत्री व जिल्ह्याधिकाऱ्यांनी त्यांना करवीर निवासिनी श्री. अंबाबाई देवीची प्रतिमा भेट दिली.

 

यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते शहापूर पोलीस स्टेशनच्या कोनशिलेचे अनावरण झालेतसेच त्यांनी नूतन इमारतीची पाहणीही केली. उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेइचलकरंजी व परिसराच्या विकासाबद्दल जे काही प्रस्ताव येतील त्याला तातडीने मान्यता देण्यात येईल. यावेळी आमदार राहुल आवाडे यांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे कौतुकही त्यांनी केले. यावेळी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील 713 कोटी रुपयांहून अधिक विविध विकास कामांचे ऑनलाईन उद्घाटनशुभारंभ व लोकार्पण झाल्याची घोषणा त्यांनी केली.

 

यात 130.60 कोटी रुपयांच्या केंद्र शासन पुरस्कृत लघु व मध्यम नगरांसाठी नागरी पायाभूत सुविधा विकास योजनाअंर्गत इचलकरंजी शहरातील वाढीव कबनूर व शहापूर भागासाठी भूयारी गटार योजना राबविणे व 18 द.ल.ली. क्षमतेचे मलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण, 488.67 कोटी रुपयांच्या नगरोत्थान महाभियान अंतर्गत अस्तित्वातील भूयारी गटार योजनेचे बळकटीकरण करणे व योजना विकसित करणे या कामाचे उद्घाटन, 31.37 कोटी रुपयांच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत शहरात विविध ठिकाणी एकूण सहा पाण्याच्या टाक्या उभारणेपंपिंग मशीन तसेच दाबनलिका टाकणे इ. कामांचे उद्घाटन, 59 कोटींच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत 10 रस्ते कामांचे भूमिपूजन, 4 कोटींच्या शहापूर पोलीस स्टेशनचे उद्घाटनतसेच इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील नर्सिंग कॉलेजचे उद्घाटन करण्यात आले.

 

 याचबरोबर संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ राज्य निवृत्तीवेतन योजनेतील हजार 200 लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप तर हजार बांधकाम कामगारांना भांडी व इतर साहित्य वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी काही लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात मंजुरी पत्राचे व साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमानंतर शहरातील श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेस सदिच्छा भेट दिली.

 

मौसम अलर्ट: 14 जून तक तापमान में वृद्धि; कुछ स्थानों पर ही गरज के साथ बारिश की संभावना किसानों से बुआई में जल्दबाजी न करने की अपील

 मौसम अलर्ट: 14 जून तक तापमान में वृद्धिकुछ स्थानों पर ही गरज के साथ बारिश की संभावना

किसानों से बुआई में जल्दबाजी न करने की अपील

मुंबई, 9 जून : महाराष्ट्र में पिछले लगभग दो हफ्तों से मॉनसून की प्रगति पूरी तरह से रुकी हुई है और यह कम से कम 15 जून तक धीमी ही रहने की संभावना है। इस कारणराज्य के अधिकांश हिस्सों में तापमान में वृद्धि होने का अनुमान हैहालांकि पश्चिमी तटीय क्षेत्र इससे कुछ हद तक अछूता रहेगा।

विदर्भमराठवाड़ा और खानदेश क्षेत्रों में अधिकतम तापमान सामान्य से अधिक रहने का अनुमान है। विशेष रूप से पूर्वी विदर्भ में तापमान 45 डिग्री सेल्सियस तक पहुँच सकता हैजबकि विदर्भ के कई हिस्सों में तापमान 40 डिग्री सेल्सियस से अधिक रहने की संभावना है। इसी तरहमराठवाड़ा और खानदेश के कई क्षेत्रों में अधिकतम तापमान 40 डिग्री सेल्सियस के आसपास रहने का अनुमान है।

राज्य में 14 जून तक व्यापक या मॉनसूनी बारिश की कोई संभावना नहीं है। बारिश मुख्य रूप से दोपहर के बाद गरज-चमक के साथ कुछ ही स्थानों पर होगीजिसकी संभावना इस सप्ताह की शुरुआत में दक्षिण मराठवाड़ा और दक्षिण-मध्य महाराष्ट्र में अधिक है। राज्य के अन्य हिस्सों में छिटपुट बारिश की ही संभावना है।

इस दौरान अधिकतम तापमान ऊँचा रहने और व्यापक मॉनसूनी बारिश की अनुपस्थिति को ध्यान में रखते हुएकृषि विभाग की ओर से किसानोंविशेषकर वर्षा आधारित खेती करने वाले किसानों से बुआई या रोपाई में जल्दबाजी न करने की अपील की गई है।

Featured post

Lakshvedhi