Monday, 9 June 2025

विकास आणि पर्यावरणाचा समतोल राखणारा निर्णय झुडपी जंगलाबाबतच्या निर्णयाने विदर्भाच्या ,नागपुरात झोपडपट्टीधारकांना मालकी हक्क देण्याचाही मार्ग मोकळा

 विकास आणि पर्यावरणाचा समतोल राखणारा निर्णय

झुडपी जंगलाबाबतच्या निर्णयाने विदर्भाच्या विकासाला चालना

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपुरात झोपडपट्टीधारकांना मालकी हक्क देण्याचाही मार्ग मोकळा

 

नागपूरदि. 22 :- झुडपी जंगलाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी आहे. तो विकास आणि पर्यावरणाचा समतोल राखणारा आहे. या निर्णयामुळे विदर्भाच्या विकासाला मोठी चालना मिळेल आणि नागपुरात तर झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देण्याचाही मार्ग मोकळा झाला आहेअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

नागपूर येथे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना ते बोलत होते. ते म्हणाले कीगेल्या 45 वर्षांपासून विदर्भ यासाठी लढा देत होता. त्या लढ्याला आज मोठे यश आले. ज्यावेळी महाराष्ट्र तयार झाला आणि विदर्भ हा सीपी अँड बेरारमधून महाराष्ट्रात आला. त्यावेळी महसुली रेकॉर्डमध्ये झुडपी जंगल असे लिहिले गेले. मध्यप्रदेशात आपला रेकॉर्ड दुरुस्त केला आणि आपल्याकडे 1980 च्या कायद्यात याला जंगलाचा दर्जा मिळाला आणि त्यामुळे विदर्भाचा विकास थांबून गेला होता. नागपूर रेल्वेस्थानक किंवा उच्च न्यायालयाची इमारत ही जुन्या रेकॉर्डनुसार झुडपी जंगल म्हणून होती. त्यामुळे यातून दिलासा मिळाला पाहिजेअशी मागणी होत होती. या निर्णयाअभावी विकासाचेसिंचनाचे प्रकल्प मोठ्या प्रमाणात रखडले होते. 1996 पूर्वी ज्या जमिनींचे वाटप झाले आहेत्याला अपवाद करण्यात आला आहे. 1996 ज्या जमिनी दिल्यात्याबाबत एक प्रक्रिया आखून दिली आहे. त्यानुसारत्या जमिनी केंद्राकडून राज्य शासन मागू शकते.

सर्वांत महत्त्वाची आमची मागणीझोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देण्यासाठी सूट देण्यात यावीही केली होती. यात तकियाचुनाभट्टीजयताळ्यातील रमाबाई आंबेडकर नगरएकात्मता नगरवाडीतील आंबेडकर नगर अशा अनेक झोपडपट्टी आहेतज्यांना मालकी हक्काचे पट्टे मिळत नव्हते. ते आता देता येणार आहेत. त्या झोपड्या झुडपी जंगलाच्या संकल्पनेत येत होत्या. त्यांना आता मालकी हक्काचे पट्टे देण्याची कार्यवाही करता येणार आहेअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

2014 ते 2019 या काळात एक समिती गठीत करुन त्याचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने एक सीईसी तयार केली. राज्य शासनाने तयार केलेला अहवाल एकप्रकारे सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारला आहे. 45 वर्ष विदर्भातील सर्वपक्षीय नेते जी मागणी करीत होतेती मागणी आता मान्य झाली आहे. या निर्णयामुळे सुमारे 70 ते 80 हजार एकर जागेवर वन तयार करावे लागणार आहे. विकास आणि पर्यावरण यात समतोल साधणारा हा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय आहेअसेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

माओवाद हा आता अखेरच्या घटका मोजत आहे. छत्तीसगडमध्ये बसवराजू हा माओवाद्यांचा मोठा नेता होता. कोट्यवधी रुपयांचा पुरस्कार त्याच्या नावावर होता. चंद्राबाबू नायडू यांच्यावरील हल्ला75 सीआरपीएफ जवानांचे मृत्यू असो कीछत्तीसगडमधील अनेक नेत्यांच्या हत्येत हा आरोपी होता. आपल्या सुरक्षा दलांनी त्याचा खात्मा केलेला आहे. माओवादाला संपूर्णत: संपविण्याचा निर्धार आहेअसेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi