Sunday, 8 June 2025

सभी सरकारी कार्यालयों में शुरू होगा सौर ऊर्जा का उपयोग

 सभी सरकारी कार्यालयों में शुरू होगा सौर ऊर्जा का उपयोग

                                        – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

            पुणे, 8 जून: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने घोषणा की कि राज्य के सभी शासकीय (सरकारी) कार्यालयों में दिसंबर 2025 तक सौर ऊर्जा का उपयोग शुरू किया जाएगा और प्रधानमंत्री सूर्य घर योजना को राज्य में प्रभावी रूप से लागू किया जाएगा।

            मुख्यमंत्री श्री. फडणवीस यह वक्तव्य महाऊर्जा (महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण) की नई प्रशासनिक इमारत के उद्घाटन के अवसर पर दे रहे थे। इस कार्यक्रम में विधान परिषद की उपसभापति डॉ.नीलम गोऱ्हेविधानसभा के उपाध्यक्ष अण्णा बनसोडेअपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावेसांसद मेधा कुलकर्णीसांसद श्रीरंग बारणेविधायक उमा खापरेविधायक भीमराव तापकीरपुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर रामप्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदीजिलाधिकारी जितेंद्र डूडीमहाऊर्जा की महानिर्देशक डॉ.कादंबरी बलकवडेमहाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी के निदेशक विश्वास पाठकऊर्जा दक्षता ब्यूरो के सचिव मिलिंद देवरेअतिरिक्त महानिर्देशक डॉ.त्रिगुण कुलकर्णी सहित अनेक गणमान्य व्यक्ति उपस्थित थे।

            मुख्यमंत्री फडणवीस ने कहा कि महाऊर्जा के लिए दो प्रमुख लक्ष्य निर्धारित किए गए हैंसभी सरकारी कार्यालयों में सौर ऊर्जा का व्यापक उपयोग और प्रधानमंत्री सूर्य घर योजना से जुड़ी राज्य की योजना को लागू करना। पहले चरण में 100 यूनिट तक और दूसरे चरण में 300 यूनिट तक बिजली उपभोग करने वाले सभी उपभोक्ताओं को सौर ऊर्जा से जोड़ने का लक्ष्य है। 300 यूनिट तक बिजली खपत करने वाले उपभोक्ताओं का बिल शून्य करने का प्रयास है। उन्होंने विश्वास व्यक्त किया कि महाऊर्जा इन दोनों लक्ष्यों को प्रभावी रूप से पूरा करेगी।

 


सर्व शासकीय कार्यालयात सौर ऊर्जेचा वापर सुरू करणार

 सर्व शासकीय कार्यालयात सौर ऊर्जेचा  वापर सुरू करणार

                                                                        -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाऊर्जा नवीन प्रशासकीय इमारतीचे उदघाटन

 

            पुणे, दि. 8:  राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात डिसेंबर 2025 पर्यंत सौर ऊर्जेचा वापर सुरू करणार असून प्रधानमंत्री सूर्य घर योजना राज्यात प्रभावीपणे राबविणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

      महाऊर्जाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, खासदार मेधा कुलकर्णी, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, आमदार भीमराव तापकीर, महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, महाऊर्जाच्या महासंचालक डॉ.कादंबरी बलकवडे, महाराष्ट्र राज्य वीज कंपनीचे संचालक विश्वास पाठक,  ऊर्जा दक्षता ब्युरोचे सचिव मिलिंद देवरे, अतिरिक्त महासंचालक डॉ.त्रिगुण कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

      मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, महाऊर्जासाठी येत्या काळात  दोन उद्दिष्टे महत्वाची आहेत. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौर ऊर्जेचा वापर करण्याला गती द्यावी लागेल. प्रधानमंत्री सुर्यघर योजना यशस्वी झाली असून त्या योजनेशी संलग्न असलेली राज्याची योजना सुरू करून पहिल्या टप्प्यात 100 युनिटपर्यंतचे सर्व ग्राहक  आणि दुसऱ्या टप्प्यात 300 युनिटपर्यंतचे सर्व ग्राहक सौर ऊर्जेवर आणायचे आहेत. 300 युनिटपर्यंत वीजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांचे वीज देयक शून्यावर यावे, असा प्रयत्न आहे. ही दोन्ही उद्दिष्टे पूर्ण करण्यासंदर्भात महाऊर्जा हे काम चांगल्यारितीने करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

राज्यात प्राथमिक आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करणार

 राज्यात प्राथमिक आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करणार

                                                                -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुष्पलता डी. वाय. पाटील रुग्णालयाचे उद्घाटन

 

 पुणेदि. 8 : प्राथमिक आरोग्यावर भर दिल्यास विशेषोपचार असलेल्या संदर्भ सेवांवरील ताण कमी होतो. त्यामुळे संपूर्ण राज्यात प्राथमिक आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यादृष्टीने राज्यातील आरोग्य सेवेची पुर्नरचना करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहेअसे त्यांनी यावेळी नमूद केले.

मावळ तालुक्यातील आंबी- तरंगवाडी येथे पुष्पलता डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणेआमदार सुनील शेळकेडी. वाय. पाटील विद्यापीठनवी मुंबईचे अध्यक्ष तथा कुलपती डॉ. विजय पाटीलडी. वाय. पाटील विद्यापीठ कोल्हापूरचे कुलपती संजय पाटीलडी. वाय. पाटील विद्यापीठनवी मुंबईच्या उपाध्यक्ष तथा उपकुलपती डॉ. शिवानी पाटीलमाजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडेउद्योजक रामदास काकडे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणालेराज्य शासनाच्या विविध योजना नीटपणे राबविण्याचे काम विद्यापीठाच्या माध्यमातून करण्यात येते. महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून 5 लाख रुपयांपर्यंत उपचार मोफत करण्यात येतात. आरोग्यसेवेच्या क्षेत्रात विमा आणि सेवेची खात्री या माध्यमातून गरीब रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. राज्यात प्राथमिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासह द्वितीयस्तरीय आरोग्य सेवाही बळकट करण्यात येणार आहेत. विशेषोपचारासाठी शासकीय रुग्णालयेविद्यापीठांची आणि खाजगी रुग्णालये आहेत. आरोग्याच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा प्रयत्न आहे. गेल्या काही वर्षात 10 वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले असून प्रत्येक जिल्ह्यात असे महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. मुलींना वैद्यकीय शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती करण्याचा निर्णयही शासनाने घेतला. यातून शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विस्तार आणि गुणवत्ता दिसून येत आहे. विद्यापीठाने असेच कार्य सुरू करून नवनवीन ठिकाणी रुग्णालय आणि शैक्षणिक संकुल उभे करावे. त्यामागे समाजसेवेची भूमिका असल्याने शासनातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल.

महाराष्ट्रात शिक्षणाच्या क्षेत्रात मोठी क्रांती आणण्याचे आणि तंत्रशिक्षणवैद्यकीय शिक्षण क्षेत्रात संधी मिळवून देण्याचे काम करणाऱ्यांमध्ये डॉ. डी. वाय. पाटील हे एक अग्रणी नाव असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेमहाराष्ट्रात उच्च शिक्षणाच्या खासगीकरणामुळे डॉ.डी.वाय.पाटील आणि त्यांच्यासारख्या व्यक्तींनी संस्था उभ्या केल्या आणि उच्च शिक्षणाचा विस्तार झाला. त्यामुळे अनेकांना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. राज्यात सात खासगी विद्यापीठे या कुटुंबाने सुरू केली आणि गुणवत्तापूर्ण अभ्यासक्रम सुरू केले. गुणवत्तेला धक्का न लावता उत्तम शिक्षण देण्यासाठी डी.वाय.पाटील यांच्या कुटुंबाने चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. या वाटचालीत पुष्पलता पाटील यांचे संस्कार महत्वाचे ठरले असल्याने त्यांचे नाव रुग्णालयाला देण्यात आले आहे.

पुष्पलता डी. वाय. पाटील रुग्णालयात अत्यंत आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या परिसराला वरदान ठरेल असे रुग्णालय उभे करण्यात आले आहे. औद्योगिक वसाहत आणि परिसरातील सामान्य माणसाला कमी खर्चात चांगले उपचार देण्यासाठी या रुग्णालयाचा फायदा होणार आहे. डॉ.विजय पाटील यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 70 खाटा आरक्षित ठेवल्या आहेत. आतापर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधीने संदर्भित केलेले 12 ते 15 हजार रुग्णांवर उपचार इथे करण्यात आले आहेअसेही मुख्यमंत्री म्हणाले.

 

 प्रास्ताविकात कुलपती डॉ.पाटील यांनी रुग्णालयाची माहिती दिली. रुग्णालयात सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या सर्व सुविधा पुरविण्यात येतील. केंद्र आणि राज्य शासनाने सुरू केलेल्या आयुष्मान भारतमहात्मा फुले जन आरोग्य योजनेचा परिसरातील नागरिकांना लाभ घेता येईलअशी ग्वाही त्यांनी दिली. रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णांना चांगली सेवा द्यावीअसे आवाहनही त्यांनी केले.

पुष्पलता डी.वाय.पाटील धर्मादाय रुग्णालय 600 खाटांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त मल्टीस्पेशालिटी रुग्णालय असून येथे विविध सेवा उपलब्ध आहेत. आंबीमावळतळेगाव भागातील जनतेला या रुग्णालयातून आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहेत. रुग्णालयाने स्वतःचा ऑक्सिजन प्रकल्प उभारला आहे.

 

छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे”ला मुख्यमंत्री दाखवणार हिरवा झेंडा सीएसएमटी स्थानकावरून सकाळी 6.30 वा होणार रवाना pl share.

 छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वेला मुख्यमंत्री दाखवणार हिरवा झेंडा

सीएसएमटी स्थानकावरून सकाळी 6.30 वा होणार रवाना

       मुंबई दि. 8: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाचा आणि समृद्ध वारशाचा अनुभव देणारी छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वेला उद्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिरवा झेंडा दाखवून रवाना करणार आहेत. उद्या जून 2025 रोजी सकाळी 6.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून ही रेल्वे रवाना होणार आहे.

IRCTC, रेल्वे मंत्रालयआणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने चालवली जाणारी ही विशेष पाच दिवसांच्या या  सहलीमध्ये राज्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणांचा समावेश आहे. ही रेल्वे  रायगड किल्लाशिवनेरी किल्लाप्रतापगड किल्लापन्हाळा किल्लालाल महालकसबा गणपतीशिवसृष्टी या ठिकाणांना भेट देणार आहे.

ही यात्रा प्रवाशांना शिवरायांच्या जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यांचा आणि त्यांच्या कार्याचा अनुभव देईल. सोयीसुविधासांस्कृतिक समृद्धी आणि सहजतेवर भर देणारी ही रेल्वे प्रवाशांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरेल.

00000

जॉन डिअर’ने तंत्रज्ञान आधारित स्मार्ट मशिन्स महाराष्ट्रात तयार करून त्या जगात निर्यात कराव्या

 जॉन डिअरने तंत्रज्ञान आधारित स्मार्ट मशिन्स महाराष्ट्रात तयार करून त्या जगात निर्यात कराव्या

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जॉन डिअर इंटेलिजेंट सोल्युशन्सच्या सणसवाडी प्रकल्पाचे उद्घाटन

       पुणे, दि. 8 :  जॉन डिअर इंडिया या पुण्यातील प्रकल्पाने  मेक इन महाराष्ट्रला महत्व दिले असून त्यांनी कृषी क्षेत्राला समृद्ध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना संपन्न करण्यासाठी उन्नत तंत्रज्ञानावर आधारीत स्मार्ट मशिन्सच्या उत्पादनात पुढाकार घ्यावा आणि असे तंत्रज्ञान महाराष्ट्रात तयार करून जगात निर्यात करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

       शिरुर औद्योगिक वसाहत क्षेत्रात जॉन डिअर इंटेलिजेंट सोल्युशन्सच्या सणसवाडी प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पीएमआरडीएचे आयुक्त  दीपक सिंगला, पोलीस अधिक्षक संदीप गिल, राजेश सिन्हा, मुकुल वासने, देवेंद्र बहीरट आदी उपस्थित होते.

       महाराष्ट्रासह भारत आणि पूर्ण जगात जॉन डिअरने आपले मूल्य कायम ठेवत प्रगती साधली असल्याचे नमूद करून  मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, हवामान बदलामुळे कृषी क्षेत्रावर परिणाम होत आहे. जॉन डिअरसारख्या उद्योगसंस्था नवे तंत्रज्ञान उपलब्ध करून चांगले कार्य करीत आहेत. कृत्रिम बुद्धीमत्तेचा कृषी क्षेत्रातही उपयोग सुरू झाला असून कृषी प्रक्रियेत अनुकूल बदल घडवून उत्पादनात गुणात्मक बदल घडवून आणण्यासाठी शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होत आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रात त्यामुळे खूप चांगले बदल घडून येतील, असे ते म्हणाले.

       नुकत्याच पुणे येथे झालेल्या कृषी हॅकॅथॉनमध्ये अनेक चांगल्या कल्पना पुढे आल्या. या कल्पनांना उत्पादनात बदलून ही उन्नत तंत्रज्ञानाची क्रांती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची क्षमता जॉन डिअरमध्ये आहे. उद्योगसंस्थेला  बाजारातील महत्व कायम ठेवण्यासाठी नाविन्याचा शोध घ्यावा लागतो आणि जॉन डिअर त्यात आघाडीवर आहे. जॉन डिअरने स्मार्ट मशिन्सची ही क्रांती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी आणि  स्मार्ट मशिन्स इथे तयार करून जगात निर्यात करावेत. महाराष्ट्रात संस्थेच्या विस्तारात राज्य शासन सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली..

       मुख्यमंत्री पुढे म्हणाले,  70 टक्के महिलांना रोजगार देण्याच्या धोरणामुळे जॉन डिअर संस्था यशस्वी ठरत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांच्या मेक इन इंडिया’, ‘डिझाईन इन इंडीया आणि मेक फॉर द वर्ल्ड या तिन्ही गोष्टी जॉन डिअर इंडियाने अनुसरल्या आहेत. राज्यातून  9 देशात निर्यात केली जात आहे. संस्थेचा 80 टक्के महसूल हा निर्यातीतून मिळत आहे. डिझाईनींगच्या क्षेत्रात भारतात त्यासाठी आवश्यक  गुणवत्ता उपलब्ध आहे. जॉन डिअरकडून उत्पादनाचे डिझाईनींग आणि प्रमाणिकरण इथे होत आहे.  या दोन बाबी प्रत्येक उद्योगासाठी महत्वाच्या आहेत. संस्था  या दोन्ही गोष्टी इथेच करीत असल्याने ती खऱ्या अर्थाने भारतीय आणि महाराष्ट्रातील संस्था आहे.

       जॉन डिअरकडून शेतकऱ्यांसाठी चांगले तंत्र उपलब्ध करून देण्यात येत आहे. अन्य क्षेत्राच्या तुलनेत कृषी क्षेत्रात उन्नत तंत्रज्ञान, ऑटोमेशन आणि कृत्रिम बुद्धीमत्तेची जास्त गरज आहे. यामुळे शेतीच्या परंपरागत पद्धतीच्या कामात बदल होईल, शेतीच्या कामात अधिक अचूकता येईल आणि हे तंत्रज्ञान उत्पादन, उत्पादकता यावर परिणाम करणारे असेल. जॉन डिअर इंडियाच्या केंद्रस्थानी याच बाबी आहेत. पेरणीपासून कापणी पश्चात कृषी प्रक्रियेपर्यत संपूर्ण कृषीकार्यात जॉन डिअरने चांगले तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

       प्रास्ताविकात राजेश सिन्हा यांनी प्रकल्पाची माहिती दिली. उद्योगांसाठी महाराष्ट्रात चांगले वातावरण असल्याने जॉन डिअर इंडियाने राज्यात पाचवी मोठी गुंतवणूक केली आहे. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून चांगले उत्पादन करण्यात शेतकऱ्यांना नव्या प्रकल्पामुळे मदत होणार आहे. गेल्या सात वर्षात कृषी आणि रस्ते निर्माण क्षेत्रात जॉन डिअरने भारतात योगदान दिले आहे. पुणे येथे होणारे उत्पादन पुर्णत: भारतात निर्मित असल्याचे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जॉन डिअर इंडियाच्या नव्या प्रकल्पाची पाहणी केली आणि माहिती घेतली.

आमची प्रक्रिया पारदर्शक आणि उत्तरदायित्वपूर्ण आहे भारत निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

  

आमची प्रक्रिया पारदर्शक आणि उत्तरदायित्वपूर्ण आहे

भारत निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

 

मुंबई, 8 : भारत निवडणूक आयोगाने काँग्रेस पक्षाला 24 डिसेंबर 2024 रोजी सविस्तर उत्तर पाठवले असूनत्यात त्यांच्या उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर स्पष्ट आणि तपशीलवार स्पष्टीकरण दिले आहे. या अधिकृत पत्रव्यवहारानंतरही काँग्रेस नेते श्री. राहुल गांधी यांनी माध्यमांद्वारे पुन्हा शंका आणि आरोप मांडल्याने आयोगाने याबाबत खेद व्यक्त केला आहे.

आयोगाने म्हटले आहे की, "निवडणूक आयोग एक स्वतंत्र आणि संविधानिक संस्था आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा त्याच्या नेत्याने आयोगाशी थेट पत्राद्वारे संपर्क साधल्यासआम्ही निश्चितच उत्तर देतो आणि देत आलो आहोत."

श्री. राहुल गांधी यांनी थेट आयोगाशी संवाद साधण्याऐवजी वारंवार माध्यमांतून आरोप करणे हे आश्चर्यकारक आणि खेदजनक असल्याचे आयोगाचे मत आहे. त्यांनी माध्यमांमध्ये प्रश्न उपस्थित करण्याऐवजी थेट निवडणूक आयोगाशी पत्राद्वारे संपर्क साधावाअशी अपेक्षा आयोगाने व्यक्त केली आहे.

"निवडणूक आयोगाकडे विचारलेल्या अधिकृत प्रश्नांना उत्तर देण्याची आमची प्रक्रिया पारदर्शक आणि ठोस आहे," असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

हा संवाद माध्यमांमधून न करता थेट आयोगाशी केल्यासलोकशाही प्रक्रियेस अधिक बळकटी मिळेल आणि संवाद अधिक परिणामकारक ठरेलअसे भारत निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

52% of Maharashtra’s Power to Come from Renewable Sources by 2030

 52% of Maharashtra’s Power to Come from Renewable Sources by 2030

Fadnavis mentioned that issues hindering solar energy production are being prioritized and resolved. A recent agreement with a Russian government company for thorium-based energy is expected to be a game-changer for India’s energy sector.

He said these developments will help prevent environmental degradation and help fulfill the vision of generating 50% of total electricity from renewable sources by 2030. In fact, 52% of Maharashtra's power is expected to come from renewable sources by that time.


Other Highlights

  • CM Fadnavis released MahaUrja’s progress report at the event.
  • He also visited an exhibition on non-conventional energy solutions.
  • The event began with a tree plantation drive at the MahaUrja campus led by the Chief Minister.

Features of the New MahaUrja Building

The new building located in Aundh, Pune, is designed on the concepts of:

  • Green Building,
  • Super ECBC (Energy Conservation Building Code), and
  • Net Zero Energy.

It includes:

  • Porotherm blocks, double-glazed windows, ceramic mesh,
  • Radiant cooling system, earth tunnel tube system, venturi effect,
  • Two-stage evaporation system, solar tubes, and
  • 290 kW grid-connected solar power plant.

Featured post

Lakshvedhi