Sunday, 8 June 2025

जमिनीचे क्षारीकरण रोकण्यासाठी पाण्याचा जपून वापर महत्त्वाचा

 जमिनीचे क्षारीकरण रोकण्यासाठी पाण्याचा जपून वापर महत्त्वाचा


राज्यात ज्या ठिकाणी पाणी नाही तेथील वेगळे प्रश्न आहेत. ज्याठिकाणी शाश्वत पाणी आहे त्याठिकाणी वेगळे प्रश्न तयार झाले आहे. पाण्याच्या मोकाट वापरामुळे सुपिक जमिनी या क्षारयुक्त झाल्याने‍ शेतीसाठी कायमच्या अयोग्य होण्याच्या मार्गावर आहे. राज्यात तापी खोऱ्यामध्ये खारपानपट्टयातून वेगळे आव्हान आहे. यावर प्रभावी मात करण्यासाठी मोकाट पाण्याचा वापर बंद करुन ठिबक सिंचनसारखे उच्च कृषी तंत्रज्ञान वापरणे, मोकाट कॅनल ऐवजी पाईपलाईनने शेतात पाणी पोहोचविणे याशिवाय गत्यंतर नसल्याचे त्यांनी सांगितले.


 

बळीराजा योजना अंतर्गत 20 हजार गावांचे बदलले चित्र

 बळीराजा योजना अंतर्गत 20 हजार गावांचे बदलले चित्र

 

विदर्भ आणि मराठवाड्यातील सिंचनाचा अनुशेष हा अनेक वर्षांपासून राहिलेला आहे. पाणी नाही म्हणून सिंचन योजना नाही. सिंचना योजना नाही म्हणून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी नाही. यादुष्ट चकरामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या म्हणजे विदर्भ असे चित्र तयार झाले होते. ते दूर करण्यासाठी आपण पाण्याचा नियोजनावर अधिक भर दिला. 2014 मध्ये मी मुख्यमंत्री झाल्यावर बळीराजा योजना आणली. यात 90 योजना साकारल्या. जलयुक्त शिवार योजना राबवित जलसंवर्धन कार्यक्रमावर आपण भर दिला. शासनाच्या विविध योजना एकत्रित करीत जिल्हाधिकाऱ्यांना या योजनेचे प्रमुख केले. या योजनेच्या माध्यमातून राज्यात लोकसहभागातून व्यापक चळवळ निर्माण झाली. लोकांनी गावांगावांमधून सुमारे 700 कोटी रुपये एवढा निधी जलसंधारणासाठी लोकसहभागातून उभा केला. या क्रांतीकारी निर्णयातून सुमारे 20 हजार गावांमध्ये पाण्याचे चित्र बदलल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु

 नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु

-  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

तीन दिवसीय विदर्भ पाणी परिषदेस प्रारंभ

   बळीराजा योजना अंतर्गत 20 हजार गावांचे बदलले चित्र

तापी पुनर्भरण व वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प देईल शेतीला शाश्वत पाणी

 

नागपूर,दि.07 :  महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मोठ्या धरणासमवेत नदीजोड प्रकल्पजलसंधारणजलपूनर्भरणपाण्याचा पूनर्रवापर व इतर लहान मोठ्या प्रकल्पाची जोड देणे आवश्यक आहे. यादृष्टीने आपण पश्चिमी वाहिनीतील नद्यांचे  समुद्रात वाहून जाणाऱ्या पाण्यापैकी 54 टी.एम.सी. पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याचा निश्चय केला आहे. याचबरोबर नळगंगा-वैनगंगा नदीजोड प्रकल्पाद्वारे विदर्भातील अर्वषणग्रस्त भागात पाणी आणत आहोत. तापी खोऱ्यातील जे पाणी गुजरात मार्गे समुद्रात वाहून जाते त्यातील 35 टी.एम.सी. पाणी तापी खोऱ्यातच राहीलअसे नियोजन केले आहे. या प्रकल्पातून भविष्यातील महाराष्ट्र हा दुष्काळाचा आव्हानावर यशस्वी मात करुन उभा राहिलेला महाराष्ट्र म्हणून ओळखला जाईलअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि जनकल्याणकारी समिती नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वनामती सभागृह येथे तीन दिवसीय विदर्भ पाणी परिषदेच्या उद्घाटन समारंभात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी आमदार डॉ. परिणय फुकेराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरेगोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारेमहाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटीललक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अतुल वैद्यवनामतीच्या संचालक डॉ. वसुमना पंतविदर्भ सिंचन विकास महामंडळाचे संचालक राजेश सोनटक्केभूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे उपसंचालक डॉ. चंद्रकांत भोयरराष्ट्रीय मृदा विज्ञान ब्युरो नागपूरचे संचालक डॉ. नितीन पाटीलप्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावारकृषी सहसंचालक डॉ. उमेश घाटगेकुलसचिव डॉ. राजू हिवसे आदि मान्यवर उपस्थित होते.  

मिठी नदी पुनरुज्जीवनासाठी काम करणार

 मिठी नदी पुनरुज्जीवनासाठी काम करणार – सिद्धेश कदम

महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम म्हणाले कीएकल वापर प्लास्टिक कमी करण्यासाठी जनतेची साथ आवश्यक आहे. त्याचबरोबर सध्या समुद्राचे पाणी काळे होत आहे. हा रंग बदलण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. मुंबईतील मिठी नदीच्या पुनरुज्जीवनासाठीही आम्ही काम करत आहोत.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. ढाकणे यांनी प्रास्ताविकात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. पर्यावरण संवर्धनासाठी शासनाकडून प्रयत्न होत आहेत. मात्रनागरिकांनीही सहभाग घेणे आवश्यक आहे. विभागाच्या वतीने राज्यात २२ मार्चपासून विविध उपक्रम सुरू असून आतापर्यंत सुमारे एक हजाराहून अधिक जनजागृतीपर कार्यक्रम झाले आहेत. पर्यावरण परिषदेतील तज्ज्ञांच्या सूचनांचा विचार केला जाईलअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

वातावरणीय बदल कृती आराखडा व महापर्यावरण ॲपचे अनावरण

 

वातावरणीय बदल कृती आराखडा व महापर्यावरण ॲपचे अनावरण

यावेळी मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य वातावरणीय बदल कृती आराखडामाझी वसुंधरा अभियान ६.० टूल किट चे तसेच सल्फरडाय ऑक्साईड इमिशन ट्रेडिंग स्किमच्या संकल्पनेचे अनावरण करण्यात आले. प्रदूषणासंदर्भातील तक्रारीसाठी तयार करण्यात आलेल्या 'महा पर्यावरणॲप्लिकेशनचे अनावरणही मंत्री श्रीमती मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आयोजित विविध परिसंवादामध्ये विविध विषयांवर तज्ज्ञांनी सहभाग घेऊन चर्चा केली.

0000

प्लास्टिक मुक्त अभियानाच्या जनजागृतीसाठी सांस्कृतिक कार्य विभाग सहकार्य करणार -

 प्लास्टिक मुक्त अभियानाच्या जनजागृतीसाठी

सांस्कृतिक कार्य विभाग सहकार्य करणार - मंत्री ॲड.आशिष शेलार

सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार म्हणाले कीपर्यावरण विभागाने महापर्यावरण हे अप्लिकेशन सुरू करून महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. विकसितसंपन्नसमृद्ध व दिशादर्शक कामे करणारे महाराष्ट्र हे देशातील महत्त्वाचे राज्य आहे. त्यामुळे राज्य वातावरणीय बदल कृती आराखडा हा देशासाठी दिशादर्शक ठरणार आहे.

पर्यावरण हा विषय उपदेश नसून आत्मचिंतनाचाआत्मबोधाचागुणवत्ता प्रसाराचा विषय आहे. पर्यावरण रक्षणाची भूमिका संत ज्ञानेश्वरांनी पहिल्यांदा मांडली. ज्ञानेश्वरांनी पर्यावरण पोषणाचा विचार मांडला. हा विचार गावागावत पोचविण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग पर्यावरण विभागाबरोबर काम करेलअसेही सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी यावेळी सांगितले.

पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपाययोजना - जयश्री भोज

पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज म्हणाल्या कीराज्यात वातावरणीय बदलामुळे होणारे विविध परिणाम लक्षात घेतापर्यावरण व वातावरणीय बदल विभाग पर्यावरण विषयक विविध अधिनियमांच्या अंमलबजावणी बरोबरच विविध उपाययोजना राबवत आहे. वातावरणीय कृती आराखड्याची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठीराज्य वातावरणीय कृती कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बांबू लागवडीस शेतकऱ्यांना उद्युक्त करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्स गठित करण्यात आला आहे. याशिवाय माझी वसुंधरा अभियानराज्याचे परिसंस्था आधारित अनुकूलन धोरणमानवनिर्मित देवराई व घनवने निर्माण करणेकार्बन बाजारपेठ सुविधा कक्षसर्क्युलर इकॉनॉमी धोरणविद्युत वाहन धोरण आदीच्या माध्यमातून कामे करण्यात येत आहेत.

पर्यावरण संवर्धनाची सुरूवात स्वतःपासून करा - पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांचे

 पर्यावरण संवर्धनाची सुरूवात स्वतःपासून करा

- पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांचे आवाहन

  • पर्यावरण परिषदेत तज्ज्ञांचे विचारमंथन

 

मुंबईदि. ६ : एकल वापरातील प्लास्टिक हा असूर असून त्याला पूर्णतः नष्ट करण्यासाठी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या माध्यमातून कार्य करत आहोत. या कामात जनतेचा सहभाग आवश्यक आहे. यासाठी नागरिकांनी पर्यावरण संवर्धनाची सुरुवात स्वतःपासून करावीअसे आवाहन पर्यावरणीय व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

            जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण व वातावरणीय बदल विभागमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या विद्यमाने पर्यावरण परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्यमाहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलारमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदमपर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोजमंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे आदी उपस्थित होते.

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या कीगेल्या काही काळापासून होत असलेले वातावरणातील बदल हे गंभीर व अंतर्मुख करणारे आहे. त्यामुळे एकल वापर प्लास्टिक वापरावर बंदीसाठी अभियान सुरू केले. अशा अभियानात लोकसहभाग असेल तर हे उपक्रम यशस्वी होतात. एकल वापर प्लास्टिक मुक्त परिसराच्या अभियानाची सुरुवात मंत्रालयापासून केली. बदलती जीवनशैली व वातावरणातील बदलांमुळे कर्करोगासारखे आजार आज मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. त्याचबरोबर तंत्रज्ञान वाढले तसे त्याचे दुष्परिणामही दिसून येत आहेत. यासर्वांपासून पर्यावरण वाचविण्याची सुरूवात प्रत्येकाने स्वतःपासून करावी. आजच्या पिढीने प्लास्टिक बाटल्या न वापरणेएकल वापराच्या प्लास्टिक ऐवजी कापडी पिशव्या वापरणे अशी पाऊले उचलली तर पुढच्या पिढीसाठी चांगले जीवन मिळेल.

            पुढील पाच वर्षात एकल वापराचे प्लास्टिक पूर्णतः बंद करण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर अशी उत्पादने तयार करणाऱ्यांविरुद्ध पोलीस कारवाईसाठी प्रयत्न करणार आहे. मात्रनागरिकांनीच स्वयंस्फूर्तीने एकल प्लास्टिक वापरणे बंद केले तरच अशी उत्पादने तयार करणे आपोआप बंद होईलअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

मी स्वतः आलेल्या अभ्यागताना बुकेसाडी किंवा शाल ऐवजी अकरा कापडी पिशव्या द्यावेतअसे आवाहन करते. त्यातून जमा होणाऱ्या पिशव्या वापरण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहेअसेही मंत्री श्रीमती मुंडे यांनी यावेळी सांगितले.

Featured post

Lakshvedhi