Wednesday, 4 June 2025

टियर 2 आणि 3 शहरांचा औद्योगिक कायापालट

 टियर 2 आणि 3 शहरांचा औद्योगिक कायापालट

मुंबईठाणे आणि पुणे या पारंपरिक औद्योगिक केंद्रांपलीकडेराज्य शासनाने आता टियर २ आणि 3 शहरांमध्ये औद्योगिक गुंतवणुकीचा वेग वाढवला आहे. छत्रपती संभाजीनगर हे आता ईव्ही (इलेक्ट्रिक व्हेईकल) उद्योगाचे केंद्र बनले असून अनेक मोठ्या कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. या ठिकाणी आर्थिक वाढीसाठी पूरक वातावरण तयार होत आहे. गडचिरोली हे देशातील नवीन स्टील सिटी म्हणून उभारले जात आहेजिथे १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. नागपूरनाशिक आणि धुळे यांसारख्या शहरांमध्येही माहिती तंत्रज्ञानउत्पादन आणि अन्य क्षेत्रातील मोठी गुंतवणूक होत आहे. या सर्व शहरांमध्ये केवळ उद्योगच नव्हेतर दर्जेदार पायाभूत सुविधास्वच्छतापाणीपुरवठारस्तेकरमणुकीच्या सुविधा यावर भर देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

वाढवण बंदराभोवती नवीन शहर

 वाढवण बंदराभोवती नवीन शहर

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘चौथी मुंबई’ ही संकल्पना वाढवण बंदराभोवती विकसित केली जात आहे. येथे भारतातील सर्वात मोठे बंदर आणि नवीन विमानतळ उभारले जाणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विमानतळाला मंजुरी दिली असून त्याचे पुढील सर्वेक्षण सुरु आहे. तसेच बुलेट ट्रेनआणि कोस्टल रोड वाढवणपर्यंत नेण्याचीही योजना असल्याने हा भाग एक मोठं शहरी केंद्र बनेलअसे श्री. फडणवीस यावेळी  म्हणाले.

दावोस आर्थिक परिषदेदरम्यान महाराष्ट्राने १६ लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक आकर्षित केली

 १६ लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक

दावोस आर्थिक परिषदेदरम्यान महाराष्ट्राने १६ लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक आकर्षित केली असल्याचेही त्यांनी नमूद केले.  यापैकी निम्म्याहून अधिक गुंतवणूक उत्पादन क्षेत्रात आहेहे लक्षवेधी असून मेक इन इंडियाचा प्रत्यक्ष परिणाम राज्यात दिसून येत आहे. उत्पादन व औद्योगिक विकास हेच राज्याच्या प्रगतीचे केंद्रबिंदू असूनमेक इन इंडिया योजनेमुळे महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहे.

राज्याच्या गतीमान विकासाला प्राधान्य देत विविध क्षेत्रात महाराष्ट्र यशस्वी घोडदौड करत आहे. मुंबईच्या सागरकिनारी मर्यादित विस्तारक्षेत्र लक्षात घेता चौथी मुंबई’ ही संकल्पना महत्वाची ठरणार आहे. अटल सेतू या २२ किमी लांबीच्या सागरी पुलामुळे मुंबई आणि नवी मुंबई यांच्यात जलद संपर्क साधला गेला असूनयामुळे या भागातील अंतर्गत परिसर मुंबईचा विस्तार मानला जात आहे. या भागात सध्या नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात असून ते ऑगस्टमध्ये सुरू होईल. या संपूर्ण पट्ट्यात एक तीनपट मोठे नवे शहर विकसित करण्याचा विचार आहेजिथे विविध सकंल्पना (थीम) असलेली शहरे उभारली जातील. यामध्ये एज्यू-सिटी’ (विद्यापीठ नगरी)  ज्यात दहा  आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांचा समावेश असेल ,जिथे मोठ्या संख्यने विद्यार्थी उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण घेतील. तसेच स्पोर्ट्स सिटी’, ‘मेडिसिन सिटी’, ‘नॉलेज सिटी’, आणि इनोव्हेशन सिटी’ अशा संकल्पनांचा समावेश असेल. राज्यात सायबर सुरक्षा केंद्र अत्याधुनिक स्वरुपात सुर करावयाचे नियोजन असून या केंद्राच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारीच्या विविध प्रकारांवर एकत्मिक पद्धतीने नियंत्रण ठेवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

संरक्षण उत्पादनासाठी महाराष्ट्र केंद्रबिंदू · वाढवण बंदराभोवती नवीन शहर · टियर 2 आणि 3 शहरांचा औद्योगिक कायापालट · महाराष्ट्र २०२९ चा कृती आराखडा

 आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठीही महाराष्ट्र महत्वाचे केंद्र

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         संरक्षण उत्पादनासाठी महाराष्ट्र केंद्रबिंदू

·         वाढवण बंदराभोवती नवीन शहर

·         टियर 2 आणि 3 शहरांचा औद्योगिक कायापालट

·         महाराष्ट्र २०२९ चा कृती आराखडा लवकरच

 

मुंबईदि. ४ : महाराष्ट्र आता केवळ भारतातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठीही महत्त्वाचे केंद्र बनत आहेआणि भविष्यातील उद्योग आणि नाविन्यतेसाठी राज्य तयार होत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी केले.

हॉटेल ताज पॅलेस येथे  बँक ऑफ अमेरिकातर्फे आयोजित २०२५ इंडिया कॉन्फरन्समध्ये : एक्सेलेटरिंग ग्रोथमहाराष्ट्रा @वन ट्रिलीयनया कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते.

संरक्षण उत्पादनाचा केंद्रबिंदू

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीमेक इन इंडिया या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या धोरणाचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला झाला आहे.  तसेच नुकतेच यशस्वी झालेले ऑपरेशन सिंदूर ने भारतीय संरक्षण उत्पादनक्षमता किती प्रगत झाली आहेहे दाखवून दिले आहे.  उत्तर प्रदेश व तमिळनाडूमध्ये संरक्षण उद्योगाचे क्लस्टर्स असले तरी खऱ्या अर्थाने भारतातील संरक्षण उत्पादनाचे केंद्र महाराष्ट्रच आहे. महाराष्ट्राने या क्षेत्रात मोठी घोडदौड केली असूनराज्य आज मोठ्या प्रमाणावर संरक्षण उत्पादनाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

देशातील सुमारे ६० % डेटा सेंटर क्षमता आता महाराष्ट्रात आहे. मुंबई ही आधीच देशाची प्रमुख फिनटेक राजधानी झाली आहेतसेच महाराष्ट्र हे स्टार्टअपसाठी देखील एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे.

जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या संधींबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीजगभरातील गुंतवणूकदार आता सुरक्षित पर्याय शोधत आहेत, जे जागतिक पुरवठा साखळीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतीलआणि भारत या संधीसाठी सर्वात योग्य स्थानावर आहे. महाराष्ट्र शासन या संधीसाठी पूर्णतः सज्ज आहे.

Paraguay President calls for international cooperation to fight drug mafia in Latin America

 Paraguay President calls for international cooperation

to fight drug mafia in Latin America

 

Maharashtra Governor C. P. Radhakrishnan hosted a reception in honour of the President of the Republic of Paraguay Santiago  Peña Palacios upon his arrival in Raj Bhavan, Mumbai on his first State Visit to Maharashtra on Wed (4 Jun).

President Santiago Peña who is on a 3 day visit to India, expressed his deep admiration for all that he has witnessed during his visit to India. 

He expressed hope that India, as the world’s fourth-largest economy and largest democracy, will play an even more significant role on the global stage in the years ahead.

Highlighting Paraguay’s strengths as the 'food basket of Latin America', the President emphasized that his country has much to offer and is keen to build strong partnerships with India in the areas of agriculture, green energy, etc.

The President noted that the two nations share many common values and interests, forming a solid foundation for enhanced cooperation across multiple sectors.

The Paraguayan President said Paraguay is not involved in any war or conflict . He told the Governor that Latin America is suffering from organised crime and drug trafficking. He said Latin America is a large producer of drugs although Europe is the consumer. He called for international cooperation to fight the menace of the drug mafia.

President Santiago Pena said in the year 1955, during a session of the United Nations General Assembly, Paraguay had paid a special tribute to Mahatma Gandhi, recognizing his philosophy of non-violence (Ahimsa) and his immense contribution to the global struggle for peace and justice.

The President of Paraguay was accompanied by Foreign Minister Ruben Ramirez Lezcano, Ambassador of Paraguay in India Fleming Raul Duarte Ramos, National Senator of Paraguay Natalicio Chase, Member of Parliament Miguel del Puerto, Governor of the Department of Amambay Juan Acosta and other representatives.

The Governor hosted a State Banquet in honour of the Paraguayan President and his delegation. Chairman of Maharashtra Legislative Council Ram Shinde, Minister of Protocol Jaykumar Rawal, Chief of Staff, M G & G area Maj Gen Bikramdeep Singh, Flag Officer Commanding Maharashtra Area Rear Admiral Anil Jaggi and invitees were present.

0000

भारतभेटीने प्रभावित झाल्याची पॅराग्वे राष्ट्राध्यक्ष सँटियागो पेना यांची भावना पॅराग्वेच्या राष्ट्राध्यक्षांचे राजभवन येथे स्वागत

 भारतभेटीने प्रभावित झाल्याची पॅराग्वे राष्ट्राध्यक्ष सँटियागो पेना यांची भावना

पॅराग्वेच्या राष्ट्राध्यक्षांचे राजभवन येथे स्वागत

संघटित गुन्हेगारीड्रग माफियांचे संकट दूर करण्यासाठी पॅराग्वेला सहकार्याची अपेक्षा

 

मुंबई, दि. 4 : तीन दिवसांच्या भारतभेटीवर आलेले पॅराग्वे प्रजासत्ताकाचे अध्यक्ष सँटियागो पेना पॅलासिओस यांचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्य शासनाच्या वतीने राजभवनमुंबई येथे स्वागत केले.

जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून उदयास आलेल्या भारताने आगामी काळात जागतिक पटलावर महत्त्वाची भूमिका बजावावीअशी अपेक्षा राष्ट्राध्यक्ष सँटियागो  पेना यांनी यावेळी व्यक्त केली.

भारत दौऱ्यात पाहिलेल्या प्रत्येक गोष्टींनी आपण प्रभावित झाल्याची भावना यावेळी अध्यक्ष  पेना यांनी व्यक्त केली.

दक्षिण अमेरिका खंडातील 'अन्नधान्याचे कोठारम्हणून पॅराग्वे ओळखला जाते असे नमूद करून पेना यांनी भारतासोबत कृषीनवीकरणीय ऊर्जा यांसह विविध क्षेत्रात भागीदारी करण्याची इच्छा व्यक्त केली.

पॅराग्वेची लोकसंख्या ६ दशलक्ष आहे परंतु आपला देश १० कोटी लोकांसाठी अन्नधान्य निर्माण करतो. पॅराग्वे १०० टक्के नवीकरणीय ऊर्जा वापरतो तसेच निर्मित ऊर्जेपैकी  ५० टक्के ऊर्जा निर्यात देखील करतो असे त्यांनी सांगितले.

संघटित गुन्हेगारी तसेच ड्रग माफियांमुळे दक्षिण अमेरिका त्रस्त असून ड्रग्ज माफियांचे आव्हान संपविण्यासाठी सर्व देशांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. 

सन १९५५ मध्ये पॅराग्वेने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली होती व आपल्या स्वातंत्र्यलढ्यात गांधीजींच्या अहिंसेच्या तत्वज्ञानाचा पुरस्कार केला होता अशी आठवण अध्यक्ष पेना यांनी सांगितली. 

पॅराग्वेच्या राष्ट्राध्यक्षांचे स्वागत करताना राज्यपालांनी पॅराग्वेने भारताशी व्यापार वाढविण्यासाठी अधिक प्रयत्न करावे असे सांगितले. पॅराग्वेने आपल्या स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधींची अहिंसेची मूल्ये अवलंबल्याबद्दल राज्यपालांनी संतोष व्यक्त केला. 

यावेळी पॅराग्वेचे परराष्ट्रमंत्री रुबेन रामिरेझ लेझकानोपॅराग्वेचे भारतातील राजदूत फ्लेमिंग रॉल डुआर्टे रामोसराष्ट्रीय संसद सदस्य नतालिसिओ चेसखासदार मिगेल डेल पुएर्तोअमांबाय प्रांताचे गव्हर्नर जुआन अकोस्टा आणि इतर प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीनंतर राज्यपालांनी पॅराग्वेचे राष्ट्राध्यक्ष तसेच त्यांच्या शिष्टमंडळाच्या सन्मानार्थ स्नेहभोजन आयोजित केले.

स्नेहभोजनाला महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदेराजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावलमहाराष्ट्रगोवा व गुजरात प्रभागाचे मुख्य अधिकारी मेजर जनरल बिक्रमदीप सिंहमहाराष्ट्र नौदल प्रभागाचे ध्वज अधिकारी  रिअर ऍडमिरल अनिल जग्गी तसेच इतर निमंत्रित उपस्थित 

महामार्गांसह सर्वच नागरी क्षेत्रामध्ये स्वच्छ शौचालये सर्वांची जबाबदारी,pl share

 महामार्गांसह सर्वच नागरी क्षेत्रामध्ये

स्वच्छ शौचालये सर्वांची जबाबदारी

- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

 

मुंबईदि. 4 : राज्यातील सर्व महामार्गावरील धाबेहॉटेलमॉल या ठिकाणांसह सर्व सार्वजनिक शौचालये स्वच्छ आणि सुस्थितीत असणे ही सर्वच विभागांची जबाबदारी असून त्यासाठी सर्वांनीच दक्ष असले पाहिजे असे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळुन) शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी सांगितले.

            मंत्रालयात महिला शौचालयांसंदर्भात बैठक झाली. बैठकीस आमदार चित्रा वाघसार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुतेराज्य परिवहन महामंडळाचे महा व्यवस्थापक दिनेश महाजननगर विकास विभागाचे उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांच्यासह महिला बाल विकास विभागग्रामविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            महामार्गालगत शौचालयांची विशेषतः महिलांसाठीच्या शौचालयाची व्यवस्था चांगली असणे गरजेचे असल्याचे सांगून सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले म्हणाले कीमहिला शौचालयांच्या स्वच्छतेबाबत आणि अन्य तक्रारीसंदर्भात क्युआर प्रणाली विकसीत करण्याविषयी आराखडा तयार करावा. क्युआर कोडच्या माध्यमातून प्राप्त तक्रारींवर संबंधित विभागस्तरावरील अधिकारी तातडीने कारवाई करतील. महामार्गावर उभारण्यात आलेल्या शौचालयांच्या देखभाल दुरुस्तीचा प्रश्न निर्माण होतो. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सीएसआरच्या माध्यमातून 400 शौचालये उभारण्यात येणार आहेत. महिला बाल विकास विभागामार्फत या शौचालयांचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे. शौचालयांमध्ये चांगल्या प्रकारचे एक्झॉस्ट फॅन पाण्याची व्यवस्था, सॅनिटरी पॅड व्हेंडिग मशिन्स बसवणे यासारख्या सुविधांही उपलब्ध करुन देण्यात यावी, अशा सूचनाही सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले यांनी दिल्या.

महामार्गालगत असलेल्या पेट्रोलपंपावर पुढील बाजूस शौचालय उभारण्याचा नियम करण्यात आला आहे. त्याशिवाय त्यांना परवानगी देण्यात येणार नसल्याचे सांगून सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले म्हणाले कीसार्वजनिक शौचालयाविषयी नगरिकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी चांगली शौचालये उभारावीत आणि त्याच्या देखभालीची व्यवस्थाही निर्माण करावी. शहरांमध्ये उभारण्यात येणाऱ्या शौचालयांचे चांगले डिझाईन स्विकारुन त्यानुसार बांधकाम करावे. त्यामध्ये खेळती हवा असावीसमोर भिंत उभारावी. सध्या अस्तित्वात असलेल्या शौचालयांमध्ये अशा प्रकारे परिवर्तन करता येईल. सर्वच संबंधित विभागांनी शौचालयांच्या स्वच्छतेसाठी कडक उपाययोजना कराव्यात. शौचालयांच्या तपासणीसाठी पथकांची निर्मिती करावी. एसटी महामंडळाने त्यांच्या बसगाड्यांना दिलेल्या थांब्याच्या ठिकाणी शौचालये सुस्थितीत असल्याची वारंवार खात्री करावी.

            राज्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 1 लाख 60 हजार शौचालये उभारण्यात येत आहेत.  यापैकी 83 हजार शौचालये ही महिलांसाठी असणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच समुह विकास अधिकारी यांच्यामार्फत शौचालयांची तपासणी करुन त्याच्या देखभालीचे मूल्यमापन करून एखाद्या ठिकाणी स्वच्छता होत नसल्यास संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याची कारवाई करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

0000

Featured post

Lakshvedhi