Friday, 16 May 2025

आपत्कालीन सेवा सुधारणा,जनजागृती व शिक्षण

 आपत्कालीन सेवा सुधारणा

वैजापूर SDH आणि जालना जिल्हा रुग्णालय यांच्यात सुविधा सुधारणा यामध्ये  – डिफिब्रिलेटरईसीजीसर्जिकल किट. 90 प्राथमिक प्रतिसादकर्त्यांचे BTLS प्रशिक्षण आणि WHO च्या Chain of Survival तत्त्वानुसार काम करण्यात येत आहे.

जनजागृती व शिक्षण

सुरक्षित वाहन चालवण्याच्या दृष्टीने दीर्घकालीन डिजिटल मोहीम राबवण्यात येत असून यामध्ये   फेसबुकइंस्टाग्रामट्विटरलिंक्डइन या विविध समाजमाध्यमांवर याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.  तसेच 20252026 मध्ये प्रकल्पाचा विस्तार करून आणखी उपाययोजना राबवली जाणार.

हा उपक्रम हा राष्ट्रीय पातळीवर एक आदर्श मॉडेल ठरत आहे. डेटा-आधारित उपायशासकीय नेतृत्व आणि बहु-हितधारक समन्वयातून रस्ते अपघातातील मृत्यू मोठ्या प्रमाणावर कमी करता येतात हे यातून स्पष्ट झाले आहे.

राज्य शासनासोबत मर्सिडीज-बेंझ इंडियाची समृद्धी महामार्गावरील रस्ता सुरक्षा भागीदारी राष्ट्रीय स्तरावर आदर्श मॉडेल

 राज्य शासनासोबत मर्सिडीज-बेंझ इंडियाची समृद्धी महामार्गावरील

रस्ता सुरक्षा भागीदारी राष्ट्रीय स्तरावर आदर्श मॉडेल

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सुरक्षित प्रवासाच्या दिशेने महत्वाचे पाऊल

 

मुंबई, दि. 15 : महाराष्ट्र शासनासोबत समृद्धी महामार्गावर केंद्रित असलेल्या एका महत्त्वाच्या रस्ते सुरक्षा प्रकल्पावर भागीदारी म्हणून मर्सिडीज- बेंझ इंडिया सीएसआर उपक्रमाद्वारे  सहयोग करत आहे ही निश्चितच स्वागतार्हाय बाब असून हा उपक्रम हा राष्ट्रीय पातळीवर एक आदर्श मॉडेल ठरत आहे. याच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे महाराष्ट्रातील इतर उच्च-धोकादायक मार्गांवर हे मॉडेल लागू करण्याचा मार्ग खुला झाला  असल्याच्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.

समृद्धी महामार्गावर रस्ते सुरक्षा प्रकल्पावर भागीदारी म्हणून सेव्हलाइफ फाऊंडेशनच्या माध्यमातून मर्सिडीज-बेंझ इंडियासोबत झालेल्या सामंजस्य कराराचे (एमओयू) स्वागत करताना  मुख्यंमत्री म्हणाले कीया महामार्गावर दररोज सरसरी 10 लक्ष वाहने प्रवास करतात. त्यादृष्टीने या महामार्गावर रस्ता सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणूनचऑटोमोटिव्ह उद्योग आणि सुरक्षिततेमध्ये आघाडीवर असलेली मर्सिडीज-बेंझ इंडिया या प्रयत्नात  पुढाकार घेऊन भरीव योगदान देऊ इच्छित आहेही बाब आनंदाची आहे. त्याचप्रमाणे  रस्ते सुरक्षेवर या भागीदारीचा सकारात्मक असा आमूलाग्र परिणाम होऊ शकतो. जो  केवळ समृद्धी महामार्गावरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारच्या प्रकल्पांसाठीचा एक आदर्श निर्माण करू शकतो,  असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच यासाठी महाराष्ट्र महामार्ग पोलिस आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळसंबंधित विभाग त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली औपचारिक भागीदारी स्थापित करण्यासाठी तसेच इतर आवश्यक सहकार्य करेलअसे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्र शासनाचा एक महत्वाकंक्षी प्रकल्प असून  महाराष्ट्राला जोडणारा आणि हजारो व्यक्तींसाठी वाणिज्यपर्यटन आणि दैनंदिन प्रवासासाठी जीवनरेखा म्हणून काम करणारा एक्सप्रेस वे आहे. दहा  जिल्ह्यांना जोडणा-या या महामार्गाचे काम गतीने पूर्ण करण्यात आले असून यामुळे कमी वेळात गतीमान प्रवास करण्यासाठीची अतिशय उपुयक्त सुविधा उपलब्ध झाली आहे. समृद्धी महामार्गाचे एकूण ७०१ किमीचे सर्व काम पूर्ण झालेले आहे. पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी (५२० किमी) ११ डिसेंबर २०२२ रोजी तर  दुसरा टप्पा शिर्डी ते भरवीर (८० किमी) २६ मे२०२३ रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तिसरा टप्पा भरवीर ते इगतपुरी (२५ किमी) ४ मार्च२०२४ रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून उर्वरीत इगतपुरी ते आमणे (ता. भिवंडीजि. ठाणे) हा ७६ कि.मी. चा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे.

मर्सिडीज-बेंझ इंडियाएक जबाबदार कॉर्पोरेट नागरिक म्हणूनसुरक्षिततेच्या आपल्या मूल्यांशी बांधिल राहूनसेव्हलाईफ फाउंडेशन (SLF) व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसीयांच्या सहकार्याने "समृद्धी महामार्गावरील शून्य मृत्यू महामार्ग" (ZFC) हा रोड सेफ्टी उपक्रम मार्च 2024 मध्ये सुरू केला आहे. हा उपक्रम 2026 पर्यंत राबवला जाणार आहे.

हा 701 किमी लांबीच्या मुंबई-नागपूर महामार्गावर राबवला जाणारा एक प्रमुख प्रकल्प असूनया मध्ये "रोड सेफ्टीच्या चार ई" – अभियांत्रिकी (Engineering), अंमलबजावणी (Enforcement), आपत्कालीन सेवा (Emergency Care) आणि जनजागृती (Education) यांच्यावर आधारित उपाययोजना राबवली जात आहेत. यामुळे 29 टक्के अपघाती मृत्यूंमध्ये घट (2023 मध्ये 151 मृत्यू2024 मध्ये 107) त्याचप्रमाणे या उपक्रमामुळे  महत्वाच्या मृत्यू भागांची (HFZs) ओळख पटली असून  महामार्गाच्या फक्त 17 टक्के लांबीमध्ये 39 टक्के मृत्यू झाले (डिसेंबर 2024 पर्यंत) आहेत.  सुरक्षित प्रवासासाठी मल्टी-एजन्सी समन्वय द्वारे सलग सुरक्षा ऑडिटउपाययोजना व आपत्कालीन सेवा सुधारणा करण्यात येत असून यामध्ये  प्रमुख घटक हा  समन्वय व भागीदारी आहेयात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC), पोलीसआरोग्य विभाग व इतर संस्थांशी सात सल्लामसलत बैठकांद्वारे सहकार्य घेण्यात येत आहे.

खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राचा सलग तिसरा विजय क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून विजेत्यांचे अभिनंदन

 खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राचा सलग तिसरा विजय

क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून विजेत्यांचे अभिनंदन

 

मुंबई दि १६ – खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावून अभुतपूर्व विजय मिळविला आहे. या ऐतिहासिक यशाचे मानकरी असलेल्या विजेत्यांचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अभिनंदन केले.

 

 बिहार येथे ४ ते १५ मे दरम्यान पार पडलेल्या सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत एकूण १५८ पदकांसह ५८ सुवर्ण, ४७ रौप्य व ५३ कांस्य  पदक मिळवून देशात अव्वल स्थान पटकावले. तिरंदाजी, मल्लखांब, जलतरण, कुस्ती, कबड्डी, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, अॅथलेटिक्स अशा २६ क्रीडा प्रकारांमधील खेळाडूंनी मिळविलेल्या यशाबद्दल क्रीडा मंत्री भरणे यांनी खेळाडुंचे अभिनंदन केले आहे.

 

ही कामगिरी म्हणजे खेळाडूंची मेहनत, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, संघटनांचे योगदान आणि पालकांचे प्रोत्साहन यांचे फलित आहे. राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून मी सर्व खेळाडूंना, प्रशिक्षकांना आणि पालकांना शुभेच्छा देतोअसे त्यांनी संदेशात म्हटले आहे.

खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राची विजेतेपदाची हॅटट्रिक

 खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राची विजेतेपदाची हॅटट्रिक


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पदकांची लयलूट करणाऱ्या खेळाडूंचे अभिनंदन


 


मुंबई, दि. १६:- 'भले शाब्बास!, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपण सर्वांनी महाराष्ट्राच्या क्रीडा गौरवात आणखी भरच घातली आहे. या यशामुळे आपण सर्व खेळाडू महाराष्ट्राचा अभिमान आहात,' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेलो इंडिया युवा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपदाची हॅट्ट्रिकाचा पराक्रम साधणाऱ्या महाराष्ट्राच्या चमुतील खेळाडुंचे अभिनंदन केले आहे.


 


महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी करीत ५८ सुवर्ण, ४७ रौप्य, ५३ कांस्य अशी एकूण १५८ पदकांची लयलूट केल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी अत्यंत आनंद झाल्याचे नमूद केले आहे. तसेच या ७ व्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राने तब्बल ९ स्पर्धा विक्रमांचा पराक्रमही नोंदविणे अभिमानास्पद असल्याचे म्हटले आहे. 


 


'ग्रामीण भागांतून येणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठीची प्रेरणा मिळावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘खेलो इंडिया स्पर्धा’ 2018 पासून सुरू झाली. या स्पर्धेत आतापर्यंत महाराष्ट्राने पाचव्यांदा विजेतेपदावर आपले नाव कोरणे ही बाब आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंच्या गुणवत्तेची चुणूक दाखवणारी आहे. या स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि खेळाडूंच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिलेल्या त्यांच्या कुटुंबीयांचे देखील कौतुक करावे तितके थोडेच आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच या सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

 दिल्या आहेत.


एसटी कर्मचाऱ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी समुपदेशनाबरोबरच विम्याचे कवच,pl share

 एसटी कर्मचाऱ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी

समुपदेशनाबरोबरच विम्याचे कवच

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

मुंबईदि. 15 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागातील चालकवाहक तसेच तांत्रिक कर्मचाऱ्यांचे शारिरिक तसेच मानसिक आरोग्य सुरळीत राहावेत्यांना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य विम्याचे कवच मिळावेयासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्त्वाची पाऊले उचलली आहे. राज्यातील प्रत्येक एसटी महामंडळातील वाहनचालकांसोबत तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी समुपदेशन करण्यात यावेतसेच त्यांच्यासोबतच त्यांच्या कुटुंबियांना देखील विम्याचे कवच मिळावेयासाठी विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यातअशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी  दिल्या.

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना शारीरिक तसेच मानसिक आरोग्याच्या सुविधा मिळाव्यातयासाठी परिवहन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात त्यांच्या दालनात बैठक झालीत्यावेळी ते बोलत होते. यावेळी परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

एसटी महामंडळात आजपर्यंत 30 हजार वाहनचालक, 38 हजार वाहक आहेत. त्याचबरोबर मोठा तांत्रिक कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. या कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता आणि कामाची गती सक्षमरित्या वाढविण्यासाठी त्यांचे वारंवार समुपदेशन करणे आवश्यक असल्याचे मत परिवहन मंत्री श्री.सरनाईक यांनी यावेळी व्यक्त केले. त्याचबरोबरएसटी कर्मचाऱ्यांसमवेत त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना आरोग्यांच्या दृष्टीने विम्याचे छत्र उपलब्ध करून देण्यात यावे. यासाठी त्यांना आरोग्य कार्ड’ देण्यासंदर्भात परिवहन मंत्री श्री.सरनाईक यांनी सांगितले. आरोग्य कार्डद्वारे प्रत्येक कर्मचाऱ्यांना वर्षभरातून दोनदा आरोग्य तपासणी होऊन त्यांना आवश्यक त्या सर्व आरोग्य सेवा-सुविधा मिळाल्या पाहिजेतअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील वाहक-चालक तसेच तांत्रिक कर्मचाऱ्यांना समुपदेशन सोबत विम्याचे कवच या दोन्ही सुविधा सरसकट एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात याव्यात. आरोग्य विमा योजना ही सर्वांना लागू झाली पाहिजे. त्याचप्रमाणे ही सेवा कॅशलेस असावी. प्रत्येक कर्मचाऱ्यांस योग्य उपचार मिळावे आणि उपचार सुरू होण्यापूर्वी विमा कंपनीकडून तात्काळ मंजुरी मिळावीयाबाबत आवश्यक ती उपाययोजना करण्याच्या सूचनाही, मंत्री श्री. सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या

नाशिक येथे सीपेट प्रकल्प स्थापन करण्यासाठी महसूल विभागामार्फत विनामोबदला जमीन

 नाशिक येथे सीपेट प्रकल्प स्थापन करण्यासाठी

महसूल विभागामार्फत विनामोबदला जमीन

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबईदि. 15 : नाशिक जिल्ह्यातील मौजे गोवर्धन येथे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (सीआयपीईटीप्रकल्पासाठी जागा विनामोबदला देण्यासंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निर्णय घेतला.

सीपेट संस्थेच्या नियोजित व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रासाठी नाशिक जिल्ह्यातील मौजे गोवर्धन येथील गट क्र. ३३ मधील १२.३३ हेक्टर शासकीय गायरान जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार श्रीमती सीमा हिरे यांनी महसूल मंत्र्यांकडे केली होती. यासंदर्भात महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

सीपेट ही संस्था केंद्र शासनाच्या अधिनस्त असून सार्वजनिक प्राधिकरणांतर्गत येते. त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट) नियम १९७१ अंतर्गत ही जागा महसूलमुक्त आणि भोगवटा मूल्यविरहित स्वरूपात देण्याचा निर्णय घेण्यात आला. या जमिनीचे मूल्य अंदाजे ३०.३८ कोटी रुपये असूनवित्त विभागाच्या मार्गदर्शक नियमांनुसार याबाबत सहमती घेण्यात आली आहे. यासोबतच कौशल्यरोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागानेही शासनाच्या ५० टक्के सहभागानुसार जागा व आवश्यक बांधकामाची जबाबदारी स्वीकारली असल्याचे महसूल मंत्री श्री.बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.

या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील युवकांसाठी व्यावसायिक प्रशिक्षणाची दारे खुली होणार असूनस्थानिक रोजगार व उद्योजकतेस मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी लवकरच सुरु होईलअशी अपेक्षा महसूल मंत्री श्री.बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केली.

भटक्या समाजासाठी घेण्यात आलेले निर्णय पुढीलप्रमाणे,pl share

 भटक्या समाजासाठी घेण्यात आलेले निर्णय पुढीलप्रमाणे :

 • जात प्रमाणपत्र गृहभेटी आधारावर देण्यात येणार.

• शाळामहाविद्यालयात मंडणगड पॅटर्नप्रमाणे जात दाखले द्यावेत.

• १९६१ पूर्वीचे जात कागदपत्र नसणाऱ्यांना गृहचौकशी आधारे जात प्रमाणपत्र द्यावे.

• भटकंती करणाऱ्या व्यक्तींना नायब तहसिलदारामार्फत ओळखपत्र द्यावे.

• विविध दाखले देण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात यावे.

• १९५२ चा सवयीचा गुन्हेगार कायदा रद्द करण्याबाबत प्रस्ताव द्यावा.

• आधारकार्डसाठी कागदपत्रांचा पर्याय देण्यात यावा.

• तात्पुरते रेशनकार्ड देण्याऐवजी कायमस्वरुपी देण्यात यावे.

• सरकारी किंवा खासगी जमीनीवर वसलेल्या भटके समाजाचे सर्वेक्षण करावे.

• भटक्या समाजाला रेशनकार्ड देण्यात यावे.

• भटक्या समाजाचे जातीनिहाय सर्वेक्षण करण्यात येणार.

• जागा वाटपासाठी वस्तीनिहाय यादी सादर करावी.

• अन्याय अत्याचार प्रतिबंधक व संरक्षण समितीची स्थापना करुन तिची बैठक घेणार.

• भटके विमुक्तांना कसण्यासाठी पट्टे उपलब्ध करुन देणार.

Featured post

Lakshvedhi