Friday, 16 May 2025

भटके विमुक्त समाजाला राज्यात कोठेही मिळणार रेशनिंग जात प्रमाणपत्र आणि आधारकार्डही देण्याचा महत्त्वाचा निर्णय,pl share

 भटके विमुक्त समाजाला राज्यात कोठेही मिळणार रेशनिंग

जात प्रमाणपत्र आणि आधारकार्डही देण्याचा महत्त्वाचा निर्णय

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भटक्या समाजाचे सर्व प्रश्न लावले मार्गी

 

मुंबई दि. १५ : भटके विमुक्त समाजाला जात प्रमाणपत्रआधारकार्डरेशनिंगकार्डसह विविध दाखले देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करावे. तसेच या समाजाला राज्यात कुठेही रेशनिंग दुकानातून धान्य उपलब्ध होईल अशाप्रकारे १५ मागण्यांबाबतचे निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतले.

भटके विमुक्त समाजातील विविध प्रश्नांवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात घेण्यात आलेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. बैठकीला भटके विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष उद्धवराव काळे यांच्यासह राज्यातील भटके विमुक्त समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेभटक्या समाजातील लोकांच्या अडचणी समजून घेऊन १५ प्रश्न तातडीने मार्गी लावले आहेत. गतवर्षी भटक्या समाजाच्या तांड्यावर दिवाळी साजरी केली होती. त्यांच्या घरांचा प्रश्न तातडीने मार्गी लावला. त्यामुळे राज्यभरात कोणत्या जिल्ह्यात कोणत्या गायरान जमीनीवर भटके समाजाची वस्ती आहे. याबाबत पंधरा दिवसात आराखडा सादर करावा. त्यांचाही प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात येईल.

महापशुधन वार्ता'चे प्रकाशन

 'महापशुधन वार्ता'चे प्रकाशन

पशुसंवर्धन विभागाने पशुवैद्यकीय सेवाधोरणात्मक निर्णय व योजनांच्या अंमलबजावणीबाबत जनजागृती करण्यासाठी महापशुधन वार्ता या शिर्षकांतर्गत डिजिटल ई-मासिक सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महापशुधन वार्ता’ या मासिकाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

पशुपालकांना पशुसंवर्धनाच्या व्यवसायाची माहिती सहजपणे उपलब्ध व्हावी व आधुनिक व्यवसाय व्यवस्थापन पद्धतीनुसार पशुपालकाच्या उत्पन्नात भर पडावीया उद्देशाने विभागाने हे ई-मासिक सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक पशुपालकाला हे मासिक एका क्लिकवर उपलब्ध व्हावेयासाठी विभागामार्फत मासिकाच्या अंकाचा 'क्युआर कोडतयार करण्यात आला आहे. या क्युआर कोडचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

लोकसेवक म्हणून पशुसेवा करण्याची उत्तम संधी -

 लोकसेवक म्हणून पशुसेवा करण्याची उत्तम संधी - सचिव डॉ. रामास्वामी एन.

पशुवैद्यकीय शिक्षणानंतर शासन सेवेत पदार्पण करणाऱ्या पशुवैद्यकांना लोकसेवक म्हणून पशुसेवा करण्याची उत्तम संधी प्राप्त होत असते. पशुसंवर्धन विभागाचा आजवरचा गौरव टिकवून ठेवत या विभागाची प्रतिष्ठा आणखी उंचावण्याची सामुहिक जबाबदारी आपणा सर्वांवर आहे. त्यासाठी पशुवैद्यकीय सेवांची उपलब्धता क्षेत्रीय स्तरावर सहजतेने करुन देणे आवश्यक आहे. या कामात समर्पित वृत्तीने सर्वांनी योगदान देत विभागाचा नावलौकीक वाढवावाअसे आवाहन सचिव डॉ. रामास्वामी एन. यांनी केले.

पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या समुपदेशनाने बदल्या पुण्यातील पशुसंवर्धन आयुक्तांच्या कार्यालयात पार पडली बदल्यांची कार्यवाही

  उपस्थितीत

पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या समुपदेशनाने बदल्या

पुण्यातील पशुसंवर्धन आयुक्तांच्या कार्यालयात पार पडली बदल्यांची कार्यवाही

समुपदेशनाने बदल्यांचा निर्णय भविष्यातही कायम राहील – मंत्री पंकजा मुंडे

इच्छित स्थळी सहजतेने बदली झाल्याने अधिकारी झाले खूश!

 

पुणेदि. 15 : पुन्हा एकदा इतिहास घडविताना या ऐतिहासिक क्षणाची मी साक्षीदार होतेयं याचा मला अतिशय आनंद होत आहे. अधिकाऱ्यांचे मनोबल वाढवून भ्रष्टाचारमुक्त धोरण राबविणे यासाठी पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांच्या समुपदेशनाने बदल्या करण्याचा निर्णय मी घेतला. हा निर्णय भविष्यातही कायम राहील. गाव पातळीवर कष्ट करणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद माझ्यासाठी महत्वाचा आहे. तुमच्या बदल्या मनासारख्या केल्या आहेतआता चांगले आणि फ्रेश मनाने काम कराअशा शब्दांत राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

राज्याच्या सर्व भागात मनुष्यबळाचा समतोल साधला जावा आणि बदल्यांची प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडावी यासाठी पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी व सहाय्यक आयुक्त या संवर्गातील बदल्या समुपदेशनाने करण्याचा ऐतिहासिक निर्णय पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी नुकताच घेतला होता. या बदल्यांची प्रक्रिया आजपासून आयुक्त पशुसंवर्धन यांच्या कार्यालयात मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत सुरू झालीत्यावेळी त्या बोलत होत्या. पशुसंवर्धन विभागाचे सचिव एन. रामास्वामीआयुक्त प्रवीण कुमार देवरेअतिरिक्त आयुक्त डॉ. शीतल मुकणे यावेळी उपस्थित होते.

ग्रामविकास मंत्री असताना शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांचा निर्णय मी घेतला होतात्यावेळी त्याचा फायदा अनेक शिक्षकांना जे तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हते त्यांना झाला. आऊट ऑफ बॉक्स जाऊन निर्णय घेण्याची आवड असल्याने आताही पशुसंवर्धन विभागासाठी मी हा निर्णय घेतला. एकदा घेतलेला निर्णय बदलत नाहीत्यामुळे भविष्यातही हा निर्णय कायम राहणार आहे. माझे वडील लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब नेहमी म्हणायचेज्याची पत नाहीऐपत नाही त्यांचा आवाज बनण्यासाठी मी राजकारणात आहेअगदी तोच वारसा घेऊन मी काम करत आहे. माझ्यावर प्रेम करणारे असंख्य लोक आहेतत्यांच्यासाठी तुम्ही काम करतात्यामुळे हा निर्णय घेतला. सर्वसामान्य लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला महत्त्वाचा वाटतो. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी आपल्या परिवारापासून दूर असणारेआदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना यामुळे हवी ती पोस्टींग मिळणार आहे. हव्या त्या ठिकाणी बदल्या झाल्याने तुमच्या चेहऱ्यावर दिसलेला आनंद समाधान देणारा आहे असे मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.

नागपूर गृहनिर्माण क्षेत्र विकास महामंडळास कामठी येथे जागा देण्यास बैठक,pl share

 नागपूर गृहनिर्माण क्षेत्र विकास महामंडळास कामठी येथे जागा देण्यास

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मंजुरी

 

मुंबई दि. 15 :- नागपूर गृहनिर्माण क्षेत्र विकास महामंडळासाठी कामठी येथे आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

 

या संदर्भात महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस उपसचिव अजित कवडेअश्विनी यमगर यांच्यासह महसूल व गृहनिर्माण विभागाचे अधिकारी उपस्थ‍ित होते. तर नागपूर येथून कामठी नगरपालिकेचे व म्हाडाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

 

मंत्री श्री. बावनकुळे म्हणालेकामठी परिसरात ६ हजार घरे बांधणीचे कामठी नियोजन करावे. या घरांसाठी आधार आधारित नोंदणी सुरू करावी. घर बांधणीसाठी सविस्तर आराखडा तयार करावा. तसेच कामठी येथे ६ एकर जागेवर १०० बेडचे सुसज्ज हॉस्पिटल  बांधण्यासाठी आरोग्य विभागाकडे प्रस्ताव सादर करावा.

 

म्हाडाच्या  ज्या जागेवर अतिक्रमण झाले आहे त्या जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी कंपाऊंड घालावे.  कामठी येथील कुंभारी कॉलनी मधील घरे  नियमानुकुल  करून देण्यासाठी येथील रहिवाशांकडून केवळ मुदल देऊन व्याज माफ करावेअशा सूचना महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांनी दिल्या.

 

घरकुल बांधकामासाठी आवश्यक वाळू उपलब्धसाठी महसूल विभागाने काढलेल्या निर्णयाच्या आधारे म्हाडाने त्यांच्या स्तरावर परिपत्रक काढावेअशा सूचना महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांनी दिल्या.

राज्यस्तरीय बाजार समित्यांचे सक्षमीकरण करताना शेतकरी हित व सदस्यांच्या अधिकारांचे रक्षण गरजेचे

 राज्यस्तरीय बाजार समित्यांचे सक्षमीकरण करताना

शेतकरी हित व सदस्यांच्या अधिकारांचे रक्षण गरजेचे

- उपमुख्यमंत्री अजित पवार

 

मुंबईदि. 15 :- राष्ट्रीय नामांकित बाजार अनुषंगाने राज्यस्तरीय बाजारांचा विकास करताना राज्यातल्या शेतकऱ्यांचे हित जपले गेले पाहिजे. बाजार समिती सदस्यांच्या अधिकारांचे रक्षण झाले पाहिजे. बाजार समिती सदस्य जनप्रतिनिधींमधून निवडून येतात. शेतकऱ्यांचेसमाजातील विविध घटकांचे प्रतिनिधीत्व करतात. या सदस्यांचे अधिकार कायम ठेवण्यातच शेतकरी व समाजाचे हित आहे. यातूनच बाजार समित्या अधिक कार्यक्षमबळकट होतील. बाजार समित्यांसदर्भातील निर्णय घेत असताना शेतकऱ्यांते हित सर्वोच्च असावेअसे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्यासंदर्भातील विविध प्रश्नांवर आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातराष्ट्रीय बाजार अनुषंगाने राज्यस्तरीय बाजार विकसित करणेकृषी उत्पन्न बाजार समिती कर सुधारणा करणेकृषी उत्पन्न बाजार समित्यांची देखभाल दुरुस्तीवस्तू व सेवाकराबाबत अडचणीछोटे उद्योग व व्यापाऱ्यांच्या व्यवसाय कराबाबतच्या समस्याकळंबोली येथे स्टीलमार्केटसाठी सिडकोच्या माध्यमातून जमीन उपलब्ध करुन देणे आदी विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला रोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढापणनमंत्री जयकुमार रावलवित्त विभागाचे प्रभारी अपर मुख्य सचिव सौरभ विजयसहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडेराज्य कर आयुक्त आशिष शर्मासिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल (व्हिसीद्वारे)उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुखमहाऊर्जाच्या महासंचालक डॉ. कादंबरी बलकवडेपणन संचालक विकास रसाळफेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष जितेंद्र शहा, ‘एमएएसएसएमएचे अध्यक्ष चंदन भन्सालीनवीमुंबई एपीएमसीचे संचालक सुधीर कोठारी (व्हीसीद्वारे) आदी मान्यवरांसह संबधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला सुरक्षित बाजारपेठ उपलब्ध करत शेतकऱ्यांचे हित जपण्याचेत्यांच्या आर्थिक प्रगतीला हातभार लावण्याचे काम बाजार समित्यांनी सातत्याने केलं आहे. शेतकऱ्यांच्या हितांचे रक्षण राज्यासाठी सर्वोच्च आहे. केंद्र शासनाच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या नवीन 2017 च्या कायद्यातील तरतूदींनुसार महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) या 1963 च्या कायद्यात सुधारणा करुन राष्ट्रीय नामांकित बाजार समिती स्थापन करणेअस्तित्वात असलेल्या बाजार समितीचे रुपांतर राष्ट्रीय नामांकित बाजार समितीमध्ये करण्याचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे. त्यानुसार राष्ट्रीय बाजार समिती स्थापन झाल्यानंतर शासनाकडून त्यासमितीवर नामनिर्देशित व्यक्तींची नियुक्ती होणार आहे. राष्ट्रीय बाजारांच्या अनुषंगाने राज्यस्तरीय बाजारांचा विकास करण्यासंदर्भातही बैठकीत चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुनच यासंदर्भातील निर्णय घ्यावाअसे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

व्यापारी वर्गाकडूनही बैठकीत अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले. जीएसटी आकारणीत सुसुत्रताव्यापाऱ्यांना अकारण होणारा त्रास थांबवण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. करचुकवेगिरी रोखण्यासाठी जीएसटी वसुली पद्धतीत सुधारणांसंदर्भात व्यापारी संघटनांनी केलेल्या मागण्यांवर सकारात्मक विचार केला जाईल. जीएसटी कौन्सिलच्या आगामी बैठकीत व्यापाऱ्यांच्या मागण्या उपस्थित करुन त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. उद्योगव्यापार क्षेत्रात अधिक सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिल्या.

कोयनाधरण प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन आणि जमीनवाटपाच्या प्रस्तावांबाबत विभागीय आयुक्तांनी तातडीने कार्यवाही करावी

 कोयनाधरण प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन आणि जमीनवाटपाच्या

प्रस्तावांबाबत विभागीय आयुक्तांनी तातडीने कार्यवाही करावी

- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

 

मुंबईदि. 15 :- कोयनाधरण प्रकल्पग्रस्तांनी राज्यासाठी केलेला त्याग मोठा आहे. त्यांना पर्यायी जमिन देणे शासनाचे कर्तव्य असूनया धरणग्रस्तांना पर्यायी जमिन देण्यासंदर्भात आलेले प्रस्ताव पुणेसातारासांगलीसोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ तपासून महिनाअखेपर्यंत पुणे विभागीय आयुक्तांकडे पाठवावेत. विभागीय आयुक्तांनी अर्जांची पडताळणी करावी. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात धरणग्रस्तांच्या संघटनांसोबत बैठक घेऊन पात्र धरणग्रस्तांना जमीन वाटपाची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी,  असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

 

कोयना धरणग्रस्तांचे संपूर्ण पुनर्वसन आणि पर्यायी जमिन वाटपाचा प्रश्न प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असून तो सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्याने प्रयत्नशील आहेत. यापूर्वीही अनेकदा बैठका घेऊन त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी दूर केल्या आहेत. आजमितीस सातारा जिल्ह्यात 310 आणि सांगली जिल्ह्यात 215 पात्र प्रकल्पग्रस्तांची यादी तयार असून त्यांना जमिनवाटपाची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. उर्वरीत जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही त्यांच्याकडील प्रस्तावांची तपासणी करुन आपापल्या जिल्ह्यांचे प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठवावेत. विभागीय आयुक्त त्यांच्या स्तरावर निर्णय घेतीलजे प्रश्न शासनस्तरावर सोडवायचे असतीलते शासनाकडे पाठवावेत. त्याबाबत तातडीने निर्णय घेतला जाईलअसा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिला.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीलामदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटीलग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवलेवित्त विभागाचे प्रभारी अपर मुख्य सचिव सौरभ विजयउपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुखकोकणचे विभागीय आयुक्त विजय सुर्यवंशीधरणग्रस्तांचे नेते तथा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकरकोयना धरणग्रस्त-अभयारण्यग्रस्त संग्राम संघटनेचे संघटक चैतन्य दळवी आदींसह प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवारसाताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटीलसांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडेसोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्हीसीद्वारे बैठकीत सहभाग घेतला.

-----००००००---


Featured post

Lakshvedhi