Sunday, 4 May 2025

डिजिटल माध्यमांसाठी नाविन्यता आणि सातत्य आवश्यक

 डिजिटल माध्यमांसाठी नाविन्यता आणि सातत्य आवश्यक

- डॉली सिंग

·         "Connecting Creators, Connecting Countries" चर्चासत्र

 

मुंबईदि. ३ : स्पर्धात्मक डिजिटल युगात स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी चांगली संहिताविषयांची प्रभावी मांडणीव्हिज्युअलचा योग्य वापर याबरोबरच  नाविन्यता आणि सातत्य असणे आवश्यक असतेअसे मत सोशल मीडिया इन्फ्लुएंसर व कंटेंट क्रिएटर डॉली सिंग यांनी व्यक्त केले.

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटर येथे जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषदेत "Connecting Creators, Connecting Countries" या चर्चासत्रात त्या बोलत होत्या. यावेळी देश-विदेशातील नामवंत सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि लोकप्रिय कंटेंट क्रिएटर सहभागी झाले होते.

डिजिटल माध्यमात आपली ओळख निर्माण करण्यासाठी करण्यासाठी प्रेक्षकांशी संवाद साधणे आणि त्यांच्या प्रतिसादाला उत्तर देणे तेवढेच महत्वाचे आहे. यामध्ये नाविन्यता आणि नियमित  दर्जेदार मजकूर अपलोड  करणे गरजेचे असते,असे श्रीमती सिंग यांनी यावेळी सांगितले.

सोशल मीडियावरील पोस्टसाठी आवश्यक व्हिडिओमजकूर,विषय मांडण्याची पद्धतसंपादनाची शैली आणि सादरीकरणाची पद्धत हे सर्व घटक वेगळेपण सिद्ध करतात. तसेच कोणतीही प्रसिद्धी करण्यापूर्वी सोशल मीडियावर शॉर्ट व्हिडिओटीझर किंवा ट्रेलर प्रसिद्ध करणे आवश्यक असते तरच त्या इव्हेंटबाबत उत्सुकता निर्माण होते आणि प्रेक्षक जोडले जातात असे सांगून डॉली सिंग यांनी स्वतःच्या अनुभवातून कंटेंट निर्मितीच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला.

0000

ओटीटी क्रांती ; वैयक्तिकरण, तंत्रज्ञान आणि कथांवर स्ट्रीमिंगचे भविष्य नेटफ्लिक्स, सोनी, जिओ हॉटस्टारचे वरिष्ठ अधिकारी, तज्ज्ञांचे मत

 ओटीटी क्रांती ; वैयक्तिकरणतंत्रज्ञान आणि कथांवर स्ट्रीमिंगचे भविष्य

नेटफ्लिक्ससोनीजिओ हॉटस्टारचे वरिष्ठ अधिकारी, तज्ज्ञांचे मत

·         'ओटीटी रिव्होल्युशन: हाऊ एआयपर्सनलिझेशन अँड इंट्रॅक्टिवे कंटेंट अ चेंजिंग स्ट्रीमिंग लॅन्डस्केप'  विषयावर चर्चासत्र

 

मुंबईदि. ३ : ओटीटी विश्वात तंत्रज्ञानवैयक्तिकरण आणि सर्जनशीलता यांचा संगम आता प्रेक्षकांच्या सवयी आणि पसंती बदलतो आहेअसे मत वेव्हज परिषदेत सहभागी झालेल्या आघाडीच्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद - २०२५ मध्ये 'ओटीटी रिव्होल्युशन: हाऊ एआयपर्सनलिझेशन अँड इंट्रॅक्टिवे कंटेंट अ चेंजिंग स्ट्रीमिंग लॅन्डस्केप'  या विषयावर पॅनल चर्चा आयोजित करण्यात आली होती. यावेळी लायनस्गेट प्ले एशियाचे अध्यक्ष रोहित जैन यांच्या सूत्रसंचालनाखाली झालेल्या या चर्चेत जिओ हॉटस्टारचे चीफ प्रोडक्ट ऑफिसर भरत रामसोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव बॅनर्जीनेटफ्लिएक्स इंडियाचे उपाध्यक्ष (कन्टेन्ट) मोनिका शेरगिलएशिया पॅसिफिक आणि मिनी प्राइम व्हिडिओचे उपाध्यक्ष गौरव गांधीहंगामा डिजिटल मीडिया एंटरटेनमेंट लिमिटचे व्यवस्थापकीय संचालक नीरज रॉय यांनी सहभाग घेतला.

प्रेक्षकासाठी योग्य कंटेंट

गौरव बॅनर्जी यांनी सांगितले कीग्राहक काय पाहतोकाय शोधतोत्याच्या आवडीवरुनच आम्ही पुढील कंटेंट सुचवतो. प्राईम व्हिडिओमिनी टीव्ही यासारख्या प्लॅटफॉर्म्सवर ग्राहकांचा प्रवास एकसंध ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. भाषेच्या विविधतेतून प्रेक्षकांची रुची वाढवण्यासाठी सबटायटल्सडब्स महत्त्वाच्या ठरतात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नेटफ्लिक्सचार आधुनिक तंत्रज्ञान आणि सर्जनशीलता यावर भर

नेटफ्लिक्सवरील प्रत्येक वापरकर्त्याचा अनुभव वेगळा असतोकारण आमचे उत्पादन सतत प्रेक्षकांच्या वर्तनावर अवलंबून असते. वैयक्तिकीकरण आणि कंटेंट डिस्कवरी यामध्ये समतोल राखतनवीन शैली आणि ट्रेंड्स प्रेक्षकांसमोर ठेवण्याचे काम अल्गोरिदम करत असते. हे एक सर्जनशील माध्यम आहेअसे मत नेटफ्लिक्सच्या कंटेंट उपाध्यक्षा मोनिका शेरगिल यांनी मांडले.

जिओहॉटस्टारचा अनोखा क्रिकेट टू कंटेंट’ फॉर्म्युला

जिओहॉटस्टारचे भरत राम यांनी आयपीएलसारख्या मोठ्या इव्हेंटनंतर प्रेक्षकांना इतर कंटेंटकडे वळवण्याची रणनीती मांडली. जर कोणी तमिळ कमेंट्री निवडलीतर त्याच्या होमपेजवर तमिळ कंटेंट जास्त दिसतेअसे त्यांनी सांगितले. वापरकर्त्याचे डिवाइसभाषा आणि लोकेशन यावरून वैयक्तिक शिफारसी केल्या जातात. यामागे प्रेक्षक वर्षभर टिकून राहावाहेच अंतिम उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सोनीचा भर कथांवर

सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव बॅनर्जी यांनी सांगितले कीवैयक्तिकरणाबरोबरच कथांवर आपला सहज विश्वास बसतो. आपण कथा सांगणाऱ्या संस्कृतीतून आलो आहोत. ज्या भाषावेळ आणि प्रदेश यांच्या सीमा पार करतात. पुष्पा २ आणि छावा सारख्या यशस्वी चित्रपटांचा दाखला देतत्यांनी हे चित्रपट ब्लॉकबस्टर ठरवून बनवत नाहीतती वेळभावना आणि सर्जनशील दृष्टी ठरवत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

नव्या ओटीटी पर्वाची सुरुवात

या चर्चेतून स्पष्ट झाले कीओटीटी क्षेत्र आता केवळ कंटेंट तयार करणारे राहिलेले नाहीतर एक स्मार्टगुंतवणूक करणारेआणि सांस्कृतिकदृष्ट्या सजग माध्यम बनले आहे. वैयक्तिक अनुभवभाषिक विविधता आणि कथांची सार्वत्रिक शक्ती हाच या नव्या ओटीटी पर्वाचा मूलमंत्र ठरत आहेत.

०००

स्पर्धात्मक युगात ‘ए.आय.’चा वापर गरजेचा चर्चासत्रात तज्ज्ञांचा सूर ·

 स्पर्धात्मक युगात ‘ए.आय.’चा वापर गरजेचा

चर्चासत्रात तज्ज्ञांचा सूर

·         ए.आय. कसे परिवर्तन घडवित आहे’ विषयावर चर्चासत्र

 

मुंबईदि. ३ : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (ए.आय.) टूल्सचा आता प्रत्येक क्षेत्रात वापर होत आहे. ए.आय. टूल्स शिकण्यास अतिशय सोपे असून यापुढे प्रत्येक क्षेत्रात ‘ए.आय.’चा वापर केल्यास आपल्या क्षेत्रात काम करणे सोपे जाईलअसे मत चित्रपट निर्मितीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणाऱ्या निर्मात्यांच्या चर्चासत्रामधे व्यक्त करण्यात आले.

जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित वेव्हज् परिषदेमध्ये चित्रपट निर्मितीमध्ये ए.आय. कसे परिवर्तन घडवित आहे’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्रात व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनलचे उपाध्यक्ष चैतन्य चिंचलीकरन्यूरल गॅरेजचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार नाटेकरचित्रपट निर्माता राघवेंद्र नाईक यांनी सहभाग घेतला.

या चर्चासत्रात ‘ए.आय.’चा चित्रपट निर्मितीतील वापराबाबत चर्चा करण्यात आली. ‘ए.आय.’च्या सहाय्याने पटकथासंवाद लिहिणे अधिक वेगवान बनले आहे. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने व्हिज्युअल इफेक्ट्स अधिक वास्तवदर्शी आणि कमी खर्चात तयार करता येतात. ‘ए.आय.’ च्या मदतीने संपादन प्रक्रियाऑडिओ आणि व्हिज्युअल डबिंग अतिशय सुलभ झाले असून अधिक भाषांमध्ये डबिंग करणे सुद्धा सहज शक्य झाले असल्याचे सहभागी निर्मात्यांनी सांगितले.

‘ए.आय.’च्या कोणत्या टूलचा वापर करावायाबाबत श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना श्री.चिंचलीकर यांनी अनेक टूल्स उपलब्ध असून ‘ए.आय.’चा वापर करताना सुरुवातीला मोफत उपलब्ध असलेल्या विविध टूल्सचा वापर करावा त्यातून आपल्याला सुलभ असणारी टूल्स विकत घ्यावेअसा सल्ला दिला.

 


स्थानिक विषयावरील आशयघन निर्मिती जागतिक स्तरावर प्रभावशाली ठरेल

 स्थानिक विषयावरील आशयघन निर्मिती


जागतिक स्तरावर प्रभावशाली ठरेल


- डिबेरा रिचर्ड्स


· टेलिव्हिजन आणि ऑनलाइन क्युरेटेड कंटेंट (OCC) उद्योगाच्या आर्थिक योगदानावरील MPA अहवाल विषयावर परिसंवाद


 


मुंबई, दि. ३ : मनोरंजनाच्या स्पर्धेत यशस्वी होत दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी कोणत्याही माध्यमातून व्यक्त होताना आशयघन मांडणी महत्वाची बाब आहे.त्यादृष्टीने स्थानिक विषयावरील सकस आशय निर्मिती जागतिक स्तरावर प्रभावशाली ठरते, असे मत ज्येष्ठ निर्मितीतज्ञ श्रीमती डिबेरा रिचर्ड्स यांनी व्यक्त केले.


बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित "वेव्हज २०२५, दृकश्राव्य मनोरंजन समिट"मध्ये टेलिव्हिजन आणि ऑनलाइन क्युरेटेड कंटेंट (OCC) उद्योगाच्या आर्थिक योगदानावरील MPA अहवाल या विषयावर आयोजित परिसंवादात श्रीमती रिचर्ड्स बोलत होत्या. या परिसंवादात केलेय डे, केवीन वज्झ, डिबेरा रिचर्ड्स ,केयटीलीन यार्नल, जस्टीन वाररोके हे तज्ञ सहभागी झाले होते. या परिसंवादाचे सूत्रसंचालन उर्मिला वेणूगोपालन यांनी केले.


"मोशन पिक्चर असोसिएशन (MPA) टेलिव्हिजन आणि ऑनलाइन क्युरेटेड कंटेंट (OCC) उद्योगाच्या आर्थिक योगदानावरील अहवाल या क्षेत्राच्या नवोपक्रम, रोजगार निर्मिती आणि डिजिटल अर्थव्यवस्थेवरच्या वाढत्या प्रभावावर प्रकाश टाकतो. या अनुषंगाने या परिसंवादात बदल्यात काळात टेलीव्हीजन आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सक्षम ठरणार आहे यासंदर्भात चर्चा करण्यात आली.


 यामध्ये प्रामुख्याने ग्राहकांना कोणत्या माध्यमातून आपल्याला अपेक्षित आशय ग्रहण करण्याची इच्छा होते हे ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी ग्राहकांचा असणार आहे, असे मत व्यक्त करण्यात आले. त्याचवेळी ग्राहकांकडून टेलिव्हिजन,ओटीटी, किंवा त्यांना उपलब्ध असलेल्या कोणत्याही स्क्रीनवर ते आपल्या आवडीनुसार आवश्यक तो मजकूर,आशय बघतील, ऐकतील, यामध्ये महत्वाची ठरणारी गोष्ट आहे ती‌ त्या आशयाची गुणवत्ता आणि दर्जा, कारण आशय जितका‌ आकर्षक, उपयुक्त आणि माहितीपूर्ण पद्धतीने मांडला जाईल, त्यानुसार त्याला ग्राहकांची पसंती आणि बाजारपेठेत आपले स्थान बळकट करणे शक्य होईल, त्यामुळे उत्कृष्ट आशय निर्मितीसाठी प्रयत्न झाले पाहिजेत असे मत व्यक्त झाले.


त्याचप्रमाणे मनोरंजनाच्या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी आणि दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी आशयाची संपन्नता सर्वाधिक महत्वपूर्ण ठरणारी बाब आहे. हे लक्षात घेऊन स्थानिक ग्राहकांच्या आवडीनिवडी, गरजा आणि त्यातील आशय निर्मितीचे मूल्य समजून घेणे आवश्यक आहे. याठिकाणी हे ठळकपणे समजून घेण्याची आवश्यकता आहे की स्थानिक पातळीवर जे प्रभावी, लक्षवेधक असते आणि ग्राहकांना भावते ते जागतिक पातळीवरही प्रकर्षाने यशस्वी ठरते. लोकल ते ग्लोबल हे सूत्र आशय निर्मिती करताना मध्यवर्ती असले पाहिजे असे मत यावेळी परिसंवादात सहभागी तज्ञांनी व्यक्त केले.


000

आयआयसीटी’च्या स्थापनेतून माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात भारताला जागतिक नेतृत्व बनवण्याचा प्रधानमंत्री यांचा दृष्टिकोन

 ‘आयआयसीटी’च्या स्थापनेतून माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात

भारताला जागतिक नेतृत्व बनवण्याचा प्रधानमंत्री यांचा दृष्टिकोन

- माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

 

मुंबईदि. 3 :- भारताच्या एव्हीजीसी-एक्सआर परिसंस्थेला सक्षम बनवण्याच्या दिशेने एक मोठी झेप घेतमाहिती आणि प्रसारण मंत्रालयानेफिक्की आणि सीआयआयच्या सहकार्यानेकेवळ एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्रासाठी समर्पित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) - एक राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राची स्थापना केली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या धोरणात्मक सहकार्याला औपचारिकरित्या हिरवा झेंडा दाखवला.

त्यांनी माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात जागतिक नेतृत्व बनण्याच्या भारताच्या क्षमतेवर भर दिला आणि सांगितले कीतंत्रज्ञान आणि व्यवस्थापन शिक्षणात आयआयटी आणि आयआयएम ज्या प्रकारे मापदंड बनले आहेत त्याचप्रमाणे आयआयसीटी या  क्षेत्रातील एक प्रमुख संस्था बनण्याच्या मार्गावर आहे.

वेव्हज 2025 च्या उद्घाटनप्रसंगी करण्यात आलेल्या घोषणेला मुंबईत सुरू असलेल्या वेव्हज शिखर परिषदेदरम्यान केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी औपचारिक रूप दिले. केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्रातील व्यावसायिक बनू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठे जागतिक दर्जाचे शिक्षण आणि प्रशिक्षण केंद्र म्हणून स्वतःला प्रस्थापित करण्यासाठी आयआयसीटी भारतातील आयआयटी आणि आयआयएमच्या नमुन्याचे अनुसरण करेल.

"चित्रपट आणि मनोरंजन विश्वात  पूर्णपणे नवीन असा उपक्रम सुरू करणे. हा (उपक्रम) माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात भारताला जागतिक नेतृत्व बनविण्याचा प्रधानमंत्री यांच्या दूरदृष्टिकोन असल्याचे वैष्णव म्हणाले. सहकार्य करण्याची तयारी दर्शविणाऱ्या उद्योग भागीदारांचे त्यांनी  मनापासून आभार मानले. आघाडीच्या जागतिक कंपन्यांनी अभ्यासक्रम विकासइंटर्नशिपशिष्यवृत्तीस्टार्टअपना  निधीपुरवठा  आणि नोकरी मिळवून देण्यासाठी मदत करण्यासाठी आयआयसीटीसोबत भागीदारी करण्यास सहमती दर्शवल्याचे त्यांनी जाहीर केले.

"या उपक्रमासाठी आमच्यासोबत भागीदारी करण्याची तयारी दर्शविल्याबद्दल मी सर्व उद्योग भागीदारांचे आणि त्यांच्या वरिष्ठ व्यवस्थापनाचे त्यांनी आभार मानले. ते म्हणाले, ही संस्था उभी करण्यात  आणि दीर्घकालीन वाढ टिकवून ठेवण्यास मदत करतील. मला आशा आहे की आयआयसीटी  (AVGC-XR) क्षेत्रासाठी एक मोठी शैक्षणिक पायाभूत सुविधा बनेल. आम्ही आमच्या देशातील आयआयटी आणि आयआयएमसाठी तयार केलेल्या निकषांचे पालन करूजेणेकरून ती जागतिक दर्जाची संस्था बनेल ," असे केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी सांगितले.

दीर्घकालीन सहकार्यासाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या काही कंपन्यांमध्ये जिओ स्टार ,ऍडोब गुगल आणि युट्युब मेटा वाकॉममायक्रोसॉफ्ट  आणि एनव्हीआयडीआयए (NVIDIA)  यांचा समावेश आहे.

या समारंभात उपस्थित असलेल्या उद्योजकांमध्ये रिचर्ड केरिस, (उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक  मीडिया अँड एंटरटेनमेंटएनव्हीडिया)संजोग गुप्ता (सीईओस्पोर्ट्स अँड लाईव्ह एक्सपिरीयन्सेसजिओ स्टार)माला शर्मा (उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक - एज्युकेशनअ‍ॅडोब)प्रीती लोबाना (कंट्री हेड आणि उपाध्यक्षगुगल इंडिया)राजीव मलिक (वरिष्ठ संचालकवॅकॉम)संदीप बांदीबेकर (सेल्स प्रमुखराज्य सरकार आणि आरोग्यसेवा)संदीप बांदीवडेकर (संचालकमेनस्ट्रीम सर्व्हिसेस पार्टनर्समायक्रोसॉफ्ट) आणि सुनील अब्राहम (संचालकसार्वजनिक धोरणमेटा) यांचा समावेश होता.

आयआयसीटीचे संचालक मंडळाचे  सदस्य आणि नियामक परिषदेचे  सदस्य आशिष कुलकर्णीबिरेन घोषमानवेंद्र शुकुलमुंजाल श्रॉफचैतन्य चिंचलीकर आणि सुभाष सप्रू आज उपस्थित  होते. आयआयसीटीच्या कार्यकारी चमूमध्ये आयआयसीटीचे सीईओ डॉ. विश्वास देवस्करआयआयसीटीचे सीईओ  निनाद रायकर आणि आयआयसीटीच्या विपणन प्रमुख श्वेता वर्मा यांचा समावेश आहे.

या सत्रादरम्यानआयआयसीटी आणि आघाडीच्या उद्योग भागीदारांचे प्रतिनिधी एकत्र आले आणि त्यांनी इरादा पत्रांचे आदानप्रदान करून भारतातील एव्हीजीसी-एक्सआर परिसंस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने दीर्घकालीन सहयोगी प्रयत्नांचा शुभारंभ केला. स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये जिओस्टारअ‍ॅडोबगुगलयूट्यूब आणि मेटा यासारख्या आघाडीच्या  जागतिक उद्योग कंपन्यांचा  समावेश होता.

अ‍ॅनिमेशनव्हिज्युअल इफेक्ट्सगेमिंगकॉमिक्सचित्रपट आणि विस्तारित वास्तवात शिक्षणसंशोधन आणि विकास आणि नवोन्मेषाला  चालना देण्यासाठी या सहकार्याची रचना केली आहे. भविष्यातील वाढीसाठी एक शाश्वत परिसंस्था विकसित करून सृजनशील आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात भारताच्या यशस्वी आयटी मॉडेलची प्रतिकृती तयार करणे हे याचे उद्दिष्ट आहे.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगनमाहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजूआणि पत्र सूचना कार्यालयाचे प्रधान महासंचालक धीरेंद्र ओझा हे करारांच्या आदानप्रदान प्रसंगी उपस्थित होते.

0000

तंत्रज्ञान, कायदा आणि जागरूकता यांच्या संयोगातून पायरसी विरोधात एकत्रित कारवाई करण्याचे तज्ज्ञांचे आवाहन · "पायरसी: तंत्रज्ञानाद्वारे आशय सामग्रीचे संरक्षण" विषयावर चर्चासत्र

  तंत्रज्ञानकायदा आणि जागरूकता यांच्या संयोगातून

पायरसी विरोधात एकत्रित कारवाई करण्याचे तज्ज्ञांचे आवाहन

·         "पायरसी: तंत्रज्ञानाद्वारे आशय सामग्रीचे संरक्षण" विषयावर चर्चासत्र

 

मुंबई3 :- वेव्हज 2025 मध्ये, "पायरसी: तंत्रज्ञानाद्वारे आशय सामग्रीचे संरक्षण" या विषयावरील चर्चेत आयपी हाऊसचे आशिया पॅसिफिक विभागाचे उपाध्यक्ष आणि प्रमुख नील गेन यांनी पायरसी एक सीमांत चिंता नव्हे तर समन्वितबहुआयामी प्रतिसादांची आवश्यकता असलेला मुख्य प्रवाहातील धोका असल्याचे मत व्यक्त केले.

मीडिया पार्टनर्स आशियाचे व्यवस्थापकीय आणि कार्यकारी संचालक विवेक कौटो यांनी अनियंत्रित पायरसीमुळे होणारे आर्थिक नुकसान यावर मत मांडले. "ऑनलाइन पायरसीमुळे उद्योगाला 2025 ते 2029 दरम्यान 10% पेक्षा जास्त महसूल गमावावा लागेल अशी शक्यता आहे. "परंतु पायरसी विरोधी प्रभावी अंमलबजावणी केल्यास कायदेशीर व्हिडिओ सेवा वापरकर्त्यांमध्ये 25% तर आशय सामग्री गुंतवणुकीत 0.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सची वाढ होऊ शकतेज्यामुळे 2029 पर्यंत एकूण मूल्य 3.8 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढेल." विशेषतः भारताची डिजिटल व्हिडीओ अर्थव्यवस्था वाढत असताना त्यांनी हितधारकांना पायरसी संरक्षणापासून संभाव्यतेपर्यंत सर्व शक्यता पुन्हा मांडण्याचे आवाहन केले.

आयएसबी इन्स्टिट्यूट ऑफ डेटा सायन्सच्या सहयोगी संचालक डॉ. श्रुती मंत्री यांनी डिजिटल पायरसी आणि सायबर क्राइम यांच्यातील संबंधांवर प्रकाश टाकला. "पायरेसीत अनेकदा ट्रोजनरॅन्समवेअर आणि स्पायवेअर सारख्या द्वेषयुक्त साधनांचा समावेश असतो. खास करून 18 ते 24 वयोगटातील वापरकर्ते असुरक्षित असतात," असे त्यांनी निदर्शनास आणले. प्रतिबंधाची सुरवात माहितगार ग्राहकांपासून झाली पाहिजे हे नमूद करून त्यांनी व्यापक जनजागृती मोहिमा आणि शैक्षणिक उपक्रमांचे आवाहन केले. त्यांनी 9-10 जुलै रोजी सीबीआय आणि इंटरपोलच्या सहकार्याने आयएसबी द्वारे आयोजित डिजिटल पायरसी विरोधी शिखर परिषदेची घोषणा देखील केली.

डॅझन (DAZN) च्या पायरसीप्रतिबंधक कार्य विभागाचे प्रमुख अनुराग कश्यप म्हणाले की, रणनीती डिटेक्शनडिस्रप्शन आणि डिटरन्स या  तीन ‘D’ वर म्हणजेच शोधअडथळा आणि प्रतिबंध या तीन गोष्टीवर आधारित आहे. आम्ही थेट कार्यक्रम होण्यापूर्वीच अंमलबजावणी सुरू करतो. अदृश्य वॉटरमार्किंग लीक शोधण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतेअसेही त्यांनी पुढे नमूद केले.

जिओ हॉटस्टारचे लीगल प्रमुख आणि या  कायद्याशी संबंधित बाबींचे तज्ज्ञ अनिल लाळे यांनी कठोर अंमलबजावणीचे महत्त्व स्पष्ट केले. "सर्वात मोठा प्रतिबंधक उपाय म्हणजे म्हणजे पायरसी करणाऱ्यांवर खटला चालवणे. कायद्याच्या अंमलबजावणीत नेमकी फट कुठे आहे हे ओळखणे आवश्यक असून वरवरची कारवाई करणे थांबवले पाहिजे," ते म्हणाले. प्रतिबंध हा प्रतिक्रियात्मक ऐवजी सक्रियपणे करणे आवश्यक आहेअसे त्यांनी सांगितले.

आनंद अँड आनंद असोसिएट्सचे प्रवीण आनंद यांनीतंत्रज्ञान आणि न्यायिक सुधारणा या दोन्हीमध्ये उपाय त्यावर आहेयावर मुद्द्यावर भर दिला.  "एआयब्लॉकचेन आणि वॉटरमार्किंग सारखी साधने महत्त्वपूर्ण आहेत. परंतु मेटल डिटेक्टर सारख्या उपायांसह कॅमकॉर्डिंग करणे कठीण होईल असे देखील करण्याची आवश्यकता आहे. अशा गोष्टींना प्रतिबंध करण्यासाठी वेळीच कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे," ते म्हणाले.

परिसंवादातील सहभागी वक्त्यांनी. तंत्रज्ञानकायदेअंमलबजावणी करणाऱ्या संस्था आणि सार्वजनिक जागरूकता डिजिटल आशयाच्या भविष्याचे रक्षण करण्यासाठी एकत्र काम करणारी संयुक्त आघाडी तयार करण्याच्या गरजेबाबत सहमती व्यक्त केली. WAVES 2025मध्ये अशा चर्चांद्वारेमीडिया आणि मनोरंजन उद्योगातील अशा महत्त्वाच्या समस्यांवर करण्याजोग्या उपायांवर प्रकाश टाकला जात आहे.

जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेत फिल्म पोस्टर मेकिंग चॅलेंज स्पर्धा

 जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेत

फिल्म पोस्टर मेकिंग चॅलेंज स्पर्धा

 

मुंबई दि. ३ : जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद२०२५ मध्ये नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया (एनएफएआय) आणि इमेजनेशन स्ट्रीट आर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने "फिल्म पोस्टर मेकिंग चॅलेंज" स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली.

 

डिजिटल पोस्टर्स स्पर्धेसाठी ५४६ प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी सर्वोत्तम ५० पोस्टर्स 'क्रिएटोस्फेअर्स'मध्ये प्रदर्शित करण्यात आले आहेत. तर हँड-पेंटेड पोस्टर्ससाठी२ मे रोजी चार संस्थांमधील १० अंतिम स्पर्धकांनी प्रत्यक्ष रंगकाम करत स्पर्धेत सहभाग नोंदवला.

 

हँड-पेंटेड फिल्म पोस्टर्स स्पर्धेतील विजेत्यांची नावे

सुवर्ण पदक – दृश्या ए. (फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियापुणे)

रौप्य पदक – आदिशा ग्रोव्हर (कॉलेज ऑफ आर्टदिल्ली विद्यापीठ)

कांस्य पदक – तमन्ना सूरी (चितकारा युनिव्हर्सिटीपंजाब)

 

डिजिटल फिल्म पोस्टर्स स्पर्धेतील विजेत्यांची नावे

सुवर्ण पदक – सुरेश डी. नायर (कोची)

रौप्य पदक – सप्तसिंधु सेनगुप्ता (कोलकाता)

कांस्य पदक – शिवांगिनी सर्मा कश्यप (आसाम)

 

डिजिटल फिल्म पोस्टर्स स्पर्धेसाठी छायाचित्रकार आणि म्युसेओकॅमेराचे संस्थापक संचालक आदित्य आर्यप्रिंटमेकरचे उपप्राचार्य आनंदमॉय बॅनर्जी यांनी तर हँड-पेंटेड पोस्टर्स स्पर्धेसाठी चित्रपट निर्माते आणि व्हिसलिंग वूड्सचे प्राध्यापक शरद राज यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

Featured post

Lakshvedhi