Sunday, 4 May 2025

आयआयसीटी’च्या स्थापनेतून माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात भारताला जागतिक नेतृत्व बनवण्याचा प्रधानमंत्री यांचा दृष्टिकोन

 ‘आयआयसीटी’च्या स्थापनेतून माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात

भारताला जागतिक नेतृत्व बनवण्याचा प्रधानमंत्री यांचा दृष्टिकोन

- माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

 

मुंबईदि. 3 :- भारताच्या एव्हीजीसी-एक्सआर परिसंस्थेला सक्षम बनवण्याच्या दिशेने एक मोठी झेप घेतमाहिती आणि प्रसारण मंत्रालयानेफिक्की आणि सीआयआयच्या सहकार्यानेकेवळ एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्रासाठी समर्पित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) - एक राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राची स्थापना केली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या धोरणात्मक सहकार्याला औपचारिकरित्या हिरवा झेंडा दाखवला.

त्यांनी माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात जागतिक नेतृत्व बनण्याच्या भारताच्या क्षमतेवर भर दिला आणि सांगितले कीतंत्रज्ञान आणि व्यवस्थापन शिक्षणात आयआयटी आणि आयआयएम ज्या प्रकारे मापदंड बनले आहेत त्याचप्रमाणे आयआयसीटी या  क्षेत्रातील एक प्रमुख संस्था बनण्याच्या मार्गावर आहे.

वेव्हज 2025 च्या उद्घाटनप्रसंगी करण्यात आलेल्या घोषणेला मुंबईत सुरू असलेल्या वेव्हज शिखर परिषदेदरम्यान केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी औपचारिक रूप दिले. केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्रातील व्यावसायिक बनू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठे जागतिक दर्जाचे शिक्षण आणि प्रशिक्षण केंद्र म्हणून स्वतःला प्रस्थापित करण्यासाठी आयआयसीटी भारतातील आयआयटी आणि आयआयएमच्या नमुन्याचे अनुसरण करेल.

"चित्रपट आणि मनोरंजन विश्वात  पूर्णपणे नवीन असा उपक्रम सुरू करणे. हा (उपक्रम) माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात भारताला जागतिक नेतृत्व बनविण्याचा प्रधानमंत्री यांच्या दूरदृष्टिकोन असल्याचे वैष्णव म्हणाले. सहकार्य करण्याची तयारी दर्शविणाऱ्या उद्योग भागीदारांचे त्यांनी  मनापासून आभार मानले. आघाडीच्या जागतिक कंपन्यांनी अभ्यासक्रम विकासइंटर्नशिपशिष्यवृत्तीस्टार्टअपना  निधीपुरवठा  आणि नोकरी मिळवून देण्यासाठी मदत करण्यासाठी आयआयसीटीसोबत भागीदारी करण्यास सहमती दर्शवल्याचे त्यांनी जाहीर केले.

"या उपक्रमासाठी आमच्यासोबत भागीदारी करण्याची तयारी दर्शविल्याबद्दल मी सर्व उद्योग भागीदारांचे आणि त्यांच्या वरिष्ठ व्यवस्थापनाचे त्यांनी आभार मानले. ते म्हणाले, ही संस्था उभी करण्यात  आणि दीर्घकालीन वाढ टिकवून ठेवण्यास मदत करतील. मला आशा आहे की आयआयसीटी  (AVGC-XR) क्षेत्रासाठी एक मोठी शैक्षणिक पायाभूत सुविधा बनेल. आम्ही आमच्या देशातील आयआयटी आणि आयआयएमसाठी तयार केलेल्या निकषांचे पालन करूजेणेकरून ती जागतिक दर्जाची संस्था बनेल ," असे केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी सांगितले.

दीर्घकालीन सहकार्यासाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या काही कंपन्यांमध्ये जिओ स्टार ,ऍडोब गुगल आणि युट्युब मेटा वाकॉममायक्रोसॉफ्ट  आणि एनव्हीआयडीआयए (NVIDIA)  यांचा समावेश आहे.

या समारंभात उपस्थित असलेल्या उद्योजकांमध्ये रिचर्ड केरिस, (उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक  मीडिया अँड एंटरटेनमेंटएनव्हीडिया)संजोग गुप्ता (सीईओस्पोर्ट्स अँड लाईव्ह एक्सपिरीयन्सेसजिओ स्टार)माला शर्मा (उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक - एज्युकेशनअ‍ॅडोब)प्रीती लोबाना (कंट्री हेड आणि उपाध्यक्षगुगल इंडिया)राजीव मलिक (वरिष्ठ संचालकवॅकॉम)संदीप बांदीबेकर (सेल्स प्रमुखराज्य सरकार आणि आरोग्यसेवा)संदीप बांदीवडेकर (संचालकमेनस्ट्रीम सर्व्हिसेस पार्टनर्समायक्रोसॉफ्ट) आणि सुनील अब्राहम (संचालकसार्वजनिक धोरणमेटा) यांचा समावेश होता.

आयआयसीटीचे संचालक मंडळाचे  सदस्य आणि नियामक परिषदेचे  सदस्य आशिष कुलकर्णीबिरेन घोषमानवेंद्र शुकुलमुंजाल श्रॉफचैतन्य चिंचलीकर आणि सुभाष सप्रू आज उपस्थित  होते. आयआयसीटीच्या कार्यकारी चमूमध्ये आयआयसीटीचे सीईओ डॉ. विश्वास देवस्करआयआयसीटीचे सीईओ  निनाद रायकर आणि आयआयसीटीच्या विपणन प्रमुख श्वेता वर्मा यांचा समावेश आहे.

या सत्रादरम्यानआयआयसीटी आणि आघाडीच्या उद्योग भागीदारांचे प्रतिनिधी एकत्र आले आणि त्यांनी इरादा पत्रांचे आदानप्रदान करून भारतातील एव्हीजीसी-एक्सआर परिसंस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने दीर्घकालीन सहयोगी प्रयत्नांचा शुभारंभ केला. स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये जिओस्टारअ‍ॅडोबगुगलयूट्यूब आणि मेटा यासारख्या आघाडीच्या  जागतिक उद्योग कंपन्यांचा  समावेश होता.

अ‍ॅनिमेशनव्हिज्युअल इफेक्ट्सगेमिंगकॉमिक्सचित्रपट आणि विस्तारित वास्तवात शिक्षणसंशोधन आणि विकास आणि नवोन्मेषाला  चालना देण्यासाठी या सहकार्याची रचना केली आहे. भविष्यातील वाढीसाठी एक शाश्वत परिसंस्था विकसित करून सृजनशील आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात भारताच्या यशस्वी आयटी मॉडेलची प्रतिकृती तयार करणे हे याचे उद्दिष्ट आहे.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगनमाहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजूआणि पत्र सूचना कार्यालयाचे प्रधान महासंचालक धीरेंद्र ओझा हे करारांच्या आदानप्रदान प्रसंगी उपस्थित होते.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi