Tuesday, 29 April 2025

परभणी शहराच्या विकासकामांसाठी आवश्यक जागेचा प्रस्ताव तातडीने सादर करा

 परभणी शहराच्या विकासकामांसाठी आवश्यक जागेचा प्रस्ताव तातडीने सादर करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

 

मुंबईदि. 28 : परभणी शहरासाठी पाणीपुरवठा योजनाघनकचरा व्यवस्थापन प्रकल्पक्रीडा संकुलसांडपाणी प्रक्रिया प्रकल्प यांसारख्या महत्त्वाच्या विकासकामांची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या साठ एकर जागेचा मागणी प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करावाअसे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. तसेच परभणी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तातडीने ठोस उपाययोजना राबवण्याच्या सूचना सुध्दा त्यांनी यावेळी केल्या.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात परभणी शहराच्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री व परभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकरआमदार राहूल पाटीलदूरदृश्य प्रणालीद्वारे आमदार राजेश विटेकर (व्हीसीद्वारे)आमदार रत्नाकर गुट्टेवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्तानियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरानगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराजवित्त विभागाच्या सचिव (सुधारणा) शैला ए.तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडेजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर व परभणी महानगरपालिकेचे आयुक्त धैर्यशील जाधव उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कीपरभणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येलदरी धरणात पर्याप्त जलसाठा उपलब्ध आहे. मात्र वितरण व्यवस्थेच्या कमतरतेमुळे व नियोजनाच्या अभावामुळे परभणी शहरातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे प्रभावी नियोजन करुन तातडीने सुधारणा करावी आणि नागरिकांना सुरळीत पाणी उपलब्ध करून द्यावा. महानगरपालिकेच्या नवीन इमारतीसाठी उत्कृष्ट आराखडा तयार करण्यासाठी खुली स्पर्धा आयोजित करावीतसेच गुणवत्तापूर्ण आराखडा अंतिम करण्यात यावाअसे निर्देश त्यांनी दिले. नाट्यगृहाच्या सुधारित प्रशासकीय मंजुरीचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवावाअशी सूचना त्यांनी केली.

            याशिवाय घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पसांडपाणी प्रक्रिया प्रकल्पनवीन पाणीपुरवठा योजना व क्रीडा संकुल अशा महत्त्वाच्या विकासकामांसाठी एकत्रितरीत्या सुमारे साठ एकर जागेची आवश्यकता असूनयासंदर्भातील मागणी प्रस्ताव त्वरित शासनाकडे सादर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

आदिवासी शेतकऱ्यांना ‘टीडीसी’सह व्यापाऱ्यांना धान विक्रीचे दोन्ही पर्याय खुले करावेत; धान हाताळणी प्रक्रीयेत होणारे नुकसान टाळण्यासाठी राज्यभर जिल्हा जाडणी प्रक्रीया राबवा -

 कालबाह्य झालेले सर्व जुने आदेश तातडीने रद्द करण्याचे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

आदिवासी शेतकऱ्यांना टीडीसीसह व्यापाऱ्यांना धान विक्रीचे दोन्ही पर्याय खुले करावेत;

धान हाताळणी प्रक्रीयेत होणारे नुकसान टाळण्यासाठी राज्यभर जिल्हा जाडणी प्रक्रीया राबवा

-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

 

मुंबईदि. 28:- राज्यात धान खरेदीभरडाईसाठवण व वाहतूक प्रक्रियेत होणारे शासनासह शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी या प्रक्रीयेत सुधारणा करुन घ्यावी. आदिवासी शेतकऱ्यांना आपले धान ट्रायबल डेव्हलपमेंट कार्पोरेशन (टीडीसी) अथवा व्यापाऱ्यांना विकण्याचे दोन्ही पर्याय खुले करुन देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. तसेच वाहतुकीसह योग्य साठवणुकीअभावी होणारे धानाचे नुकसान टाळण्यासाठी तातडीने राज्यभर जिल्हा जोडणी पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात विदर्भातील धान खरेदी व्यवस्थापनासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत गोंदियागडचिरोलीचंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांतील धान खरेदीभरडाई व साठवण प्रक्रियेसंदर्भात सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वालअन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे राज्यमंत्री योगेश कदममाजी केंद्रीय मंत्री खासदार प्रफुल्ल पटेलआमदार विनोद अग्रवालआमदार नरेंद्र भोंडेकरवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्तानियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवराअन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या प्रधान सचिव विनीता वेद सिंघलउपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुखदूरदृश्य प्रणालीद्वारे गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायरभंडाऱ्याचे जिल्हाधिकारी संजय कोलतेगडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पंडाचंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडामहाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीधर दुबे-पाटीलमहाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांच्यासह अन्न व नागरी पुरवठा विभागआदिवासी विकास विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेशेतकऱ्यांकडून खरेदी केलेला धानाचा साठा प्रायमरी सोसायट्यांकडे तीस दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी राहू नयेयासाठी ठोस नियमावली तातडीने तयार करून ती लागू करावी. साठवणुकीसाठी आवश्यक गोदामांच्या सुविधांचा अभाव असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर धान उघड्यावर राहत असून त्यातून होणारे नुकसान टाळण्यासाठी राज्यभर जिल्ह्यांची तातडीने जोडणी पूर्ण करावी.

धान विक्रीबाबत आदिवासी शेतकऱ्यांना ट्रायबल डेव्हलपमेंट कार्पोरेशन किंवा व्यापाऱ्यांना धान विक्री करण्याचा पर्याय खुला ठेवण्यात यावा. या प्रक्रियेसाठी अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि आदिवासी विकास विभाग यांच्यात समन्वय साधून आवश्यक निर्णय घेण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या. विदर्भातील धान गिरण्यांची कार्यक्षमता लक्षात घेऊन छोट्या गिरणीधारकांना देखील धान प्रक्रिया करण्याची संधी उपलब्ध करून द्यावीमात्र शासनाच्या आर्थिक हिताला बाधा पोहचणार नाही याची जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य काळजी घ्यावीअशा सूचना त्यांनी दिल्या. धान साठवणुकीसाठी आवश्यक गोदाम उभारणीसाठी उपलब्ध निधीचा तातडीने उपयोग करावा व गोदाम उभारणीचा अधिकार जिल्हाधिकारी पातळीवर प्रदान करावाअसे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

धान खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी शेतकऱ्यांची नोंदणी केवळ 'एनईएमएलपोर्टलवरच करण्यात यावीअशीही स्पष्ट सूचना करण्यात आली. शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवणारेविसंगत व कालबाह्य झालेले सर्व जुने आदेश तातडीने रद्द करून आवश्यकतेनुसार नव्याने आदेश निर्गमित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

Monday, 28 April 2025

प्रायोगिक तत्त्वावर ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’

 प्रायोगिक तत्त्वावर महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल

             २ ते ४ मे २०२५  दरम्यान पार पडणाऱ्या महाबळेश्वर महोत्सवात  महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’ प्रायोगिक तत्त्वावर कार्यान्वित होणार आहे. सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून २५ जवानांची नियुक्ती करण्यात येईल. या जवानांना पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि महोत्सवाच्या नियोजनानुसार आवश्यक प्रशिक्षण देण्यात येईल. हे दल  २५ एप्रिल  ते ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत कार्यरत राहील. या दलासाठी आवश्यक वाहन व्यवस्था आणि अन्य सुविधा पुरविल्या जातील. जवानांकडून योग्य कर्तव्ये पार पाडण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून केली जाईल. या उपक्रमासाठी होणारा खर्च महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ आणि सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्याशी समन्वय साधून अदा केला जाईल.

            महाबळेश्वर महोत्सवातील प्रायोगिक तत्त्वावरील यशस्वी अंमलबजावणीनंतरसंपूर्ण महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’ स्थापन केले जातील. या उपक्रमांतर्गत पर्यटन क्षेत्रात रु. १ लाख कोटींची खासगी गुंतवणूक आणि १८ लाख प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

****

आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षा दल ठरेल वरदान

 आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षा दल ठरेल वरदान

            प्रधान सचिव अतुल पाटणे म्हणाले कीपर्यटकांसाठी सुरक्षाकवच निर्माण करण्याच्या दृष्टीने पर्यटन विभागाचे हे पाऊल अत्यंत सकारात्मक आहे. यामुळे पर्यटनस्थळांवर विश्वासार्ह वातावरण निर्माण होईल. तसेच पर्यटकांचा पर्यटनाकडे ओघ वाढेल आणि स्थानिक समुदायांना आर्थिक लाभ मिळेल. दलामध्ये प्रशिक्षित कर्मचारीआधुनिक तंत्रज्ञान आणि समन्वित यंत्रणा असेलजी आपत्कालीन परिस्थितीत त्वरित कारवाई करेल. पर्यटकांसाठी हेल्पलाइनमाहिती केंद्र आणि डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे सुलभ सेवा उपलब्ध होतील. याशिवायस्थानिक पोलिस आणि प्रशासनाशी समन्वय साधून सुरक्षा व्यवस्था बळकट केली जाईल. पर्यटन विभाग पर्यटकांच्या गरजा समजून त्यांच्या अपेक्षांनुसार सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. या उपक्रमामुळे महाराष्ट्र पर्यटनाच्या जागतिक नकाशावर आणखी मजबूत होईल.

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल'

 पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल'

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

 मुंबईदि. 28 :- पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल (पर्यटन मित्र)’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटन क्षेत्रातील वाढत्या संधीनैसर्गिकसांस्कृतिक विविधतेचा विचार करता या सुरक्षा दलाच्या माध्यमातून पर्यटकांना सुरक्षित पर्यटनाचा अनुभव देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

पर्यटन मंत्री देसाई म्हणाले कीराज्यातील पर्यटन स्थळेसांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा यांची माहिती पुरविणे हा या पर्यटन सुरक्षा दलाचा मुख्य उद्देश असणार आहे. २ ते ४ मे२०२५ दरम्यान पार पडणाऱ्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर महोत्सवात 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दलप्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात येणार आहे.

राज्यात येणाऱ्या पर्यटकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावीतसेच राज्यातील संस्कृतीइतिहासपर्यटनस्थळेकायदानियमपर्यटनाविषयी आवश्यक माहिती देण्यासाठी राज्यात पर्यटन स्थळावर पर्यटकांच्या सेवेसाठी पर्यटन पोलिसांची कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सुरक्षा मंडळाने व मेस्कोने त्यांच्याकडे असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश पर्यटन विभागाने दिले आहेत. पर्यटन पोलीस’ या संकल्पनेमुळे पर्यटन स्थळावरील शाश्वत पर्यटन पद्धती टिकवून ठेवण्यासाठी व शाश्वत पर्यटनच्या संवर्धनासाठी प्रयत्न करतील.

            पर्यटन मंत्री देसाई म्हणाले कीपर्यटन सुरक्षा दलाच्या नव्याने सुरूवातीमुळे राज्यातील पर्यटनाला नवसंजीवनी मिळेल. हे दल पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तैनात असेलज्यामुळे देश-विदेशातील पर्यटकांचा विश्वास वाढेल. स्थानिक ठिकाणी रोजगाराच्या संधी निर्माण होतील. दलातील कर्मचारी विशेष प्रशिक्षण घेतीलजेणेकरून ते पर्यटकांना मार्गदर्शन आणि संरक्षण देऊ शकतील. पर्यटन स्थळांवर सीसीटीव्हीहेल्पलाईन आणि तत्काळ प्रतिसाद यंत्रणा यासारख्या सुविधा उपलब्ध होतील.

हेरिटेज दर्जा कायम ठेवून बी जे वैद्यकीय महाविद्यालयाच्या ऑडिटोरियमचा पुनर्विकास करावा

 हेरिटेज दर्जा कायम ठेवून बी जे वैद्यकीय महाविद्यालयाच्या

ऑडिटोरियमचा पुनर्विकास करावा

उपमुख्यमंत्री अजित पवार

बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एक हजार क्षमतेचे

नवीन पदव्युत्तर विद्यार्थी वसतीगृह उभारण्यास तत्वतः मान्यता

 

         मुंबई दि. २८ : - पुण्यातील बी. जे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय हे स्वातंत्र्यापूर्वीपासूनचे राज्यातील नामवंत असे शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आहे. त्यामुळे येथील ऑडिटोरियमचा पुनर्विकास करताना त्याचा हेरिटेज दर्जा कायम राखून तो महाविद्यालयाच्या लौकिकास साजेसा व्हावा. त्यासाठी तातडीने एकात्मिक विकास आराखडा सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिले.

             पुणे येथील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या ऑडिटोरियमच्या पुनर्विकासाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मंत्रालयातील समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

              यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कीबी जे वैद्यकीय महाविद्यालयात अनेक विद्यार्थी वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेत आहेत. येथील महात्मा गांधी सभागृहामध्ये (ऑडिटोरियम) महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रम तसेच राज्यस्तरीय कार्यक्रम घेण्यात येतात. परंतु सद्यस्थितीत या कार्यक्रमांसाठी महात्मा गांधी सभागृहाची आसन क्षमता अपुरी पडत आहे. या सभागृहात ५०० विद्यार्थ्यांची आसनक्षमता आहे. तथापि या ठिकाणी सुमारे १,५०० विद्यार्थी शिकत आहेत. त्यामुळे या सभागृहाचा पुनर्विकास करून पंधराशे आसन क्षमतेचे सुसज्ज सभागृह निर्माण करण्यात यावे.

            यावेळी हेरिटेज वास्तू विशारद आभा लांबा यांनी ऑडिटोरियमच्या पुनविकासाबाबत सादरीकरण केले.

एक हजार विद्यार्थी क्षमतेच्या नवीन पदव्युत्तर वसतीगृहाच्या निर्मितीस तत्वतः मान्यता

            वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातच एक हजार विद्यार्थी क्षमतेचे पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठीचे वसतिगृह बांधण्यासही या बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे बी जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी  शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय होणार आहे.

             या बैठकीस नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशीउपमुख्यमंत्र्यांचे सचिव राजेश देशमुखवैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमारवैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ.अजय चंदनवालेबी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवारपुणे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण उपस्थित होते तर पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

0000

माळशेज घाटात सार्वजनिक - खासगी भागीदारी तत्त्वावर स्कायवॉक उभारण्यासाठी एक महिन्याभरात एकत्रित प्रस्ताव सादर करावा

 माळशेज घाटात सार्वजनिक - खासगी भागीदारी तत्त्वावर स्कायवॉक उभारण्यासाठी

एक महिन्याभरात एकत्रित प्रस्ताव सादर करावा

उपमुख्यमंत्री अजित पवार

 

            मुंबई दि. २८ : - माळशेज घाट हे ठाणे आणि पुणे जिल्ह्यांच्या सीमेवरकल्याण-नगर महामार्गावर वसलेले पश्चिम घाटातील एक निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणचे पर्यटन दृष्ट्या महत्त्व लक्षात घेऊन माळशेज घाटातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या विश्रामगृहाच्या शेजारील टेकडीवर रिकाम्या जागेत काचेचा स्कायवॉक उभारण्यात यावा. सार्वजनिक - खासगी भागीदारी तत्वावर या स्कायवॉकची उभारणी करण्यासाठी एक महिन्यात एकत्रित प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

            माळशेज घाटामध्ये काचेचा स्कायवॉक बांधण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मंत्रालयातील समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

             यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार मार्गदर्शन करताना म्हणाले कीमाळशेज घाट हा मुंबई, पुणे, ठाणेनाशिक आणि अहमदनगर या प्रमुख शहरांच्या जवळ आहे तसेच घाटाच्या जवळच शिवनेरी किल्लाहरिश्चंद्रगडविविध धबधबेपिंपळगाव जोगा धरण इत्यादी पर्यटन स्थळे आहेत. त्यामुळे स्कायवॉक झाल्यास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील आणि पर्यटनाला चालना मिळेल. या भागाच्या विकासासाठी पर्यटन विभागाने एकत्रित प्रस्ताव सादर करावा. सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग (राष्ट्रीय महामार्ग) यांनी या प्रकल्पाची आर्थिक व्यवहार्यता तपासून प्रस्ताव सादर करावा,असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

            स्कायवॉक प्रकल्प उभारताना त्यातून इको सेन्सिटिव्ह भाग वगळावा तसेच या प्रकल्पामध्ये वनविभागाचे अभिप्राय लक्षात घेऊन ठाणे जिल्हाधिकारी यांनी वन विभागाला पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी,असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले.

             या बैठकीस आमदार किसन कथोरेवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्तानियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरापर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणेउपमुख्यमंत्र्यांचे सचिव राजेश देशमुखसार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुतेठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारेसार्वजनिक बांधकाम ( राष्ट्रीय महामार्ग) विभागाच्या अधीक्षक अभियंता तृप्ती नाग व अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.


Featured post

Lakshvedhi