Sunday, 27 April 2025

गुणात्मक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नवीन मॉडेल तयार करणार,शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम किरणोपचार प्रणालीचे लोकार्पण

 गुणात्मक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नवीन मॉडेल तयार करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

देशातील गतिमान आरोग्य सेवेची जागतिक स्तरावर दखल केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा.

 

शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम किरणोपचार प्रणालीचे लोकार्पण

 

छत्रपती संभाजीनगरदि.२७ (विमाका) सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या समन्वयातून आरोग्य सेवेतील त्रिस्तरीय यंत्रणा पुढील तीन ते चार वर्षात उभी करण्यात येणार आहेया माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला गुणात्मक आरोग्य सेवा त्याच्या घरापासून तीन ते पाच किलोमीटर परिसरात उपलब्ध करून देण्यासाठी नवीन मॉडेल तयार करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलेदरम्यान, देशात मोठ्या प्रमाणावर उपचार सुविधा निर्मितीवर भर देण्यात येत असून चालू वर्षात कर्करोगावर अधिक लक्ष केंद्रीत केले आहेज्यामुळे लवकर निदान करण्यासोबतच निदान झाल्यावर 90 टक्के रुग्णांवर 30 दिवसात उपचार सुरू करण्यात आले आहेतयाची नोंद जागतिक स्तरावर घेण्यात आली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांनी सांगितले.

 

शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम युनिट या कर्करोगावरील अतिविशेष उपचार देणाऱ्या अत्याधुनिक यंत्र प्रणालीचे  कर्करोग संस्थेच्या विस्तारीत भागाचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तसेच केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण  रसायने आणि खते मंत्री जे.पी. नड्डा यांच्या हस्ते करण्यात आलेयावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेवैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफइमाव कल्याण मंत्री अतुल सावेविधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेराज्यसभा सदस्य खासदार डॉभागवत कराडखासदार सांदिपान भुमरेमदार सतिष चव्हाणमदार संजय केणेकरमदार नारायण कुचेमदार अनुराधा चव्हाणमदार संजना जाधववैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमारवैद्यकिय शिक्षण आयुक्त राजीव निवतकरसंचालक डॉअजय चंदनवाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉशिवाजी सुक्रेराज्य कर्करोग संस्थेचे सल्लागार डॉ.कैलास शर्माराज्य कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉअरविंद गायकवाड तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेछत्रपती संभाजीनगर येथे ट्रू बीम सारखी कर्करोगावरील उपचारासाठी अद्यावत सुविधा उपलब्ध होत आहेयाचे समाधान आहेराज्यात शासकीय आरोग्य व्यवस्थेत छत्रपती संभाजीनगर येथे पहिल्यांदा ही अद्ययावत उपचार यंत्रणा उपलब्ध होत आहेजीवन पद्धतीत झालेल्या बदलांमुळे कर्करोगाचे प्रमाण वाढले आहेकर्करोगावरील उपचारासाठी रेडिएशनकीमोथेरेपी यासारखी पद्धती वापरली जात आहेआधुनिक तंत्रज्ञान विकसित होत आहेट्रु बीम सारख्या अद्यावत यंत्रामुळे ज्या भागात संक्रमण आहेत्याच भागात नेमकेपणाने रेडिएशनद्वारे उपचार करणे शक्य झाले आहेया उपचारासाठी राज्यात टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे जावे लागत होतेदेशभरातून तिथे येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असल्याने टाटा मेमोरियल हॉस्पिटलवर मोठा भार आहेमात्र आता छत्रपती संभाजीनगर येथे ही सेवा उपलब्ध झाली असून मराठवाड्यातील तसेच लगतच्या जिल्ह्यातील कर्करोगाच्या रुग्णांसाठी ही सुविधा वरदान ठरेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 


 

छत्रपती संभाजीनगर येथे अद्ययावत कर्करोग सुविधा उपलब्ध होण्यासाठी केंद्र शासनाकडून सहाय्य मिळावेयासाठी 2016 मध्ये येथील कर्करोग रुग्णालयाला राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतलात्यानुसार आवश्यक कार्यवाही करून आज अद्ययावत उपचार सुविधा उपलब्ध झाली असल्याचे सांगून श्री. फडणवीस म्हणालेकर्करोगावरील संपूर्ण उपचार रुग्णांना मिळावेतयासाठी पेट सिटी स्कॅनरलाही मंजुरी देण्यात आली आहेहे उपकरण कार्यान्वित झाल्यानंतर कर्करोग रुग्णांवरील उपचारासाठी आणखी चांगली सुविधा मिळू शकेलकर्करोग बरा होण्यासाठी लवकर निदान महत्वाचे असतेमात्र अनेकदा त्याकडे दुर्लक्ष केले जातेत्यामुळे राज्य शासनाच्या सर्व वैद्यकीय सेवा देणाऱ्या संस्थांमध्ये याबाबतची तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येत आहेतयासोबतच कर्करोग होवूच नयेयासाठीही जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.गुणात्मक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नवीन मॉडेल तयार करणार


- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


 


देशातील गतिमान आरोग्य सेवेची जागतिक स्तरावर दखल - केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा.


 


शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम किरणोपचार प्रणालीचे लोकार्पण


 


छत्रपती संभाजीनगर, दि.२७ (विमाका) - सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या समन्वयातून आरोग्य सेवेतील त्रिस्तरीय यंत्रणा पुढील तीन ते चार वर्षात उभी करण्यात येणार आहे. या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला गुणात्मक आरोग्य सेवा त्याच्या घरापासून तीन ते पाच किलोमीटर परिसरात उपलब्ध करून देण्यासाठी नवीन मॉडेल तयार करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. दरम्यान, देशात मोठ्या प्रमाणावर उपचार सुविधा निर्मितीवर भर देण्यात येत असून चालू वर्षात कर्करोगावर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. ज्यामुळे लवकर निदान करण्यासोबतच निदान झाल्यावर 90 टक्के रुग्णांवर 30 दिवसात उपचार सुरू करण्यात आले आहेत. याची नोंद जागतिक स्तरावर घेण्यात आली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांनी सांगितले.


 


शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम युनिट या कर्करोगावरील अतिविशेष उपचार देणाऱ्या अत्याधुनिक यंत्र प्रणालीचे व कर्करोग संस्थेच्या विस्तारीत भागाचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तसेच केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण व रसायने आणि खते मंत्री जे.पी. नड्डा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, इमाव कल्याण मंत्री अतुल सावे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राज्यसभा सदस्य खासदार डॉ. भागवत कराड, खासदार सांदिपान भुमरे, आमदार सतिष चव्हाण, आमदार संजय केणेकर, आमदार नारायण कुचे, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार संजना जाधव, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, वैद्यकिय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, संचालक डॉ. अजय चंदनवाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, राज्य कर्करोग संस्थेचे सल्लागार डॉ.कैलास शर्मा, राज्य कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.


 


मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, छत्रपती संभाजीनगर येथे ट्रू बीम सारखी कर्करोगावरील उपचारासाठी अद्यावत सुविधा उपलब्ध होत आहे, याचे समाधान आहे. राज्यात शासकीय आरोग्य व्यवस्थेत छत्रपती संभाजीनगर येथे पहिल्यांदा ही अद्ययावत उपचार यंत्रणा उपलब्ध होत आहे. जीवन पद्धतीत झालेल्या बदलांमुळे कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. कर्करोगावरील उपचारासाठी रेडिएशन, कीमोथेरेपी यासारखी पद्धती वापरली जात आहे. आधुनिक तंत्रज्ञान विकसित होत आहे. ट्रु बीम सारख्या अद्यावत यंत्रामुळे ज्या भागात संक्रमण आहे, त्याच भागात नेमकेपणाने रेडिएशनद्वारे उपचार करणे शक्य झाले आहे. या उपचारासाठी राज्यात टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे जावे लागत होते, देशभरातून तिथे येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असल्याने टाटा मेमोरियल हॉस्पिटलवर मोठा भार आहे. मात्र आता छत्रपती संभाजीनगर येथे ही सेवा उपलब्ध झाली असून मराठवाड्यातील तसेच लगतच्या जिल्ह्यातील कर्करोगाच्या रुग्णांसाठी ही सुविधा वरदान ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


 



 


छत्रपती संभाजीनगर येथे अद्ययावत कर्करोग सुविधा उपलब्ध होण्यासाठी केंद्र शासनाकडून सहाय्य मिळावे, यासाठी 2016 मध्ये येथील कर्करोग रुग्णालयाला राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आवश्यक कार्यवाही करून आज अद्ययावत उपचार सुविधा उपलब्ध झाली असल्याचे सांगून श्री. फडणवीस म्हणाले, कर्करोगावरील संपूर्ण उपचार रुग्णांना मिळावेत, यासाठी पेट सिटी स्कॅनरलाही मंजुरी देण्यात आली आहे. हे उपकरण कार्यान्वित झाल्यानंतर कर्करोग रुग्णांवरील उपचारासाठी आणखी चांगली सुविधा मिळू शकेल. कर्करोग बरा होण्यासाठी लवकर निदान महत्वाचे असते, मात्र अनेकदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे राज्य शासनाच्या सर्व वैद्यकीय सेवा देणाऱ्या संस्थांमध्ये याबाबतची तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. यासोबतच कर्करोग होवूच नये, यासाठीही जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या दशकपूर्तीनिमित्त 28 एप्रिल रोजी मुंबईत सोहळा

  

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या दशकपूर्तीनिमित्त

28 एप्रिल रोजी मुंबई सोहळा

 

मुंबईदि. 27 - सामान्य प्रशासन विभाग (प्रशासकीय नावीन्यताउत्कृष्टता व सुशासनव महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम२०१५ च्या अंमलबजावणीची "दशकपूर्तीआणि "प्रथम सेवा हक्क दिन” निमित्त राज्यस्तरीय सोहळा सोमवारदि२८ एप्रिल२०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

सह्याद्री अतिथीगृह येथे दु. 1.00 वा होणाऱ्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारकौशल्यरोजगारउद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढामाहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार व  मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित राहणार आहेतअशी माहिती राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनु कुमार श्रीवास्तव यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना शासनामार्फत व शासनाचे अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवा पारदर्शकगतिमान व विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पारित करण्यात आला आहेनागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात हे या अधिनियमाचे उद्दिष्ट आहे.

लोकसेवा हक्क नियम माहितीचा अधिकारhttps://aaplesarkar.mahaonline.gov.in

 सार्वजनिक प्राधिकरणाची भूमिका :

या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सार्वजनिक प्राधिकरणांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. अधिसूचित सेवा आणि त्यासंबंधीची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे हे सार्वजनिक प्राधिकरणाचे कर्तव्य आहे. यासाठीराजपत्रात अधिसूचना प्रकाशित करण्यात येते. सार्वजनिक प्राधिकरणाने पुरविलेल्या लोकसेवांची यादीत्यासाठी लागणारा वेळविहित शुल्कपदनिर्देशित अधिकारी आणि अपील प्राधिकाऱ्यांचे तपशील कार्यालयाच्या सूचना फलकावर आणि त्यांच्या वेबसाइटवर किंवा पोर्टलवर दर्शविण्यात येतात. ही माहिती प्रदर्शित केली नाहीतर मुख्य आयुक्त किंवा संबंधित आयुक्त स्वतः दखल घेऊन कारवाई करू शकतात.

लोकसेवा मिळवण्यासाठी आवश्यक असणारी विविध प्रमाणपत्रेकागदपत्रे आणि प्रतिज्ञापत्रे कमी करण्यावर या कायद्यात भर देण्यात आला आहे.

 

 अर्ज कुठे करावा?

लोकसेवा मिळवण्यासाठी अर्जदारा पदनिर्देशित अधिकाऱ्याकडेप्रत्यक्ष कार्यालयात जाऊन किंवा 'आपले सरकार सेवा पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज करता येतो. प्रत्येक विशिष्ट सेवेसाठी अर्ज करण्याचा नमुना वेगळा असतो. अर्जाचा नमुना आणि आवश्यक कागदपत्रांची यादी संबंधित कार्यालयात, 'आपले सरकार सेवा केंद्रां'मध्ये आणि संबंधित विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असते.

 

 ऑनलाईन अर्ज सुविधा:

'आपले  सरकार सेवा पोर्टल(https://aaplesarkar.mahaonline.gov.in) हे विविध विभागांच्या लोकसेवांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी एक सामान्य व्यासपीठ आहे. जे नागरिक स्वतःहून अर्ज करू शकत नाहीतत्यांच्यासाठी राज्यभरात 32000 हून अधिक 'आपले सरकार सेवा केंद्रे' (ASSK) कार्यरत आहेत. याव्यतिरिक्त, 'आरटीएस महाराष्ट्रनावाचे मोबाईल ॲपदेखील वापरकर्त्यांसाठी मराठी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. प्रत्येक ऑनलाईन अर्जाला एक विशिष्ट ओळख क्रमांक (युनिक आयडेंटिफिकेशन नंबर - UIN) मिळतोज्यामुळे अर्जाच्या प्रगतीचा मागोवा घेणे सोपे होते.

जर एखाद्या पात्र व्यक्तीला विहित वेळेत सेवा मिळाली नाही किंवा तिचा अर्ज फेटाळला गेलातर ती व्यक्ती प्रथम अपील प्राधिकरणाकडे अपील करू शकते. प्रथम अपील अर्ज सेवा नाकारल्याच्या किंवा विहित कालमर्यादा संपल्याच्या दिवसापासून 30 दिवसांच्या आत दाखल करता येतो. मात्रजर अर्जदाराकडे वेळेत अपील न करण्याचे योग्य कारण असेलतर प्रथम अपील प्राधिकरण विलंब माफ करून 90 दिवसांत अपील स्वीकारू शकते. अपील सुनावणीची नोटीस अर्जदाराला प्रत्यक्षनोंदणीकृत पोस्टानेईमेलद्वारेएसएमएसद्वारे किंवा मोबाईल ॲपद्वारे दिली जाते.

 

दशकपूर्ती महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची! माहितीचा अधिकार

 दशकपूर्ती महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची!

 

  राज्यातील नागरिकांना पारदर्शकगतिमान व कालबध्द पध्दतीने  लोकसेवा देता याव्या यासाठी शासनाने 'महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015' लागू केला आहे. यामुळे शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी निश्चित झाली आहे. हा अधिनियम 28 एप्रिल 2015 रोजी अंमलात आला असून राज्यात हा दिवस सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीस दहा वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्त हा विशेष लेख

 

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 हा कायदा राज्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. या कायद्याची व्याप्ती संपूर्ण राज्यभर आहे. हा अधिनियम संबंधित कायद्यातील तरतुदीनुसार पात्र असलेल्या व्यक्ती व  लोकसेवा देणारी सार्वजनिक प्राधिकरणे यांना लागू होतो. तसेचया अधिनियमांतर्गत अधिसूचित केलेल्या सर्व सेवांसाठी हा कायदा लागू आहे.

 

या कायद्याचा मुख्य उद्देश हा पात्र व्यक्तींना पारदर्शककार्यक्षम आणि वेळेत लोकसेवा पुरवणे आहे. यासोबतचलोकसेवा देणाऱ्या सार्वजनिक प्राधिकरणांमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवणे हे देखील या कायद्याचे उद्दिष्ट आहे. एखाद्या व्यक्तीची पात्रता संबंधित कायद्यातील तरतूदीनुसार ठरविली जाते. विशेष म्हणजेया कायद्यानुसार सार्वजनिक सेवा मिळवण्यासाठी कोणताही पात्र व्यक्ती अर्ज करु शकते. परदेशात राहणारी एखादी व्यक्ती कोणत्याही अधिसूचित सेवेसाठी पात्र असेलतर तीदेखील या कायद्यानुसार सेवा प्राप्त करू शकते.

 

गेल्या दहा वर्षात 18 कोटींपेक्षा अधिक अर्जदारांनी या अधिनियमानुसार अधिसूचित सेवा मिळविल्या आहेत. "आपले सरकार पोर्टल" यांसारख्या उपक्रमांनी नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारात सुलभता आली आहे. सर्व विभागांच्या मिळून एक हजारपेक्षा जास्त सेवा अधिसूचित असून त्यापैकी त्यापैकी 583 सेवा आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन उपलब्ध आहेत. एकूण 1 कोटी पेक्षा अधिक नागरिकांनी "आपले सरकार" पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेले आहे.

सेवेचा अधिकार म्हणजे सार्वजनिक प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या वेळेत लोकसेवा मिळवण्याचा हक्क. सार्वजनिक प्राधिकरणात शासनाचे विभागविविध सरकारी संस्थामहामंडळेस्थानिक स्वराज्य संस्था आणि शासनाकडून आर्थिक सहाय्य मिळणाऱ्या अशासकीय संस्था यांचा समावेश होतो. प्रत्येक सेवेसाठी कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या कायद्याची आणि नियमांची प्रत 'आपले सरकारपोर्टल किंवा 'आरटीएस महाराष्ट्रमोबाईल ॲपवरून विनामूल्य डाउनलोड करता येते.

परिचारिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डिजिटल प्रमाणपत्रांच्या वितरणाचा शुभारंभ

 परिचारिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते

डिजिटल प्रमाणपत्रांच्या वितरणाचा शुभारंभ

 

मुंबई, दि.१७ : महाराष्ट्रातील नर्सिंग क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल प्रमाणपत्र देण्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी दोन विद्यार्थिनींना प्रातिनिधीक स्वरुपात हे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

 

मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफराज्यमंत्री माधुरी मिसाळवैद्यकीय शिक्षण सचिव धीरज कुमारआयुक्त राजीव निवतकर आदी उपस्थित होते.

 

राज्य शासनाने जनरल नर्सिंग मिडवाईफरी  (जीएनएम)  आणि ऑक्सीलरी नर्स मिडवाईफरी (एएनएमअभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना डिजिटल प्रमाणपत्र देण्याचे ऐतिहासिक पाऊल टाकले आहे.  वैद्यकीय शिक्षण विभागाच्या पुढाकाराने ही योजना शासनाच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यातील महत्त्वपूर्ण उपक्रमांपैकी एक आहे.

 

मुख्यमंत्री  फडणवीस म्हणालेही डिजिटल प्रमाणपत्रे २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेत. यामुळे प्रमाणपत्राची ऑनलाइन पद्धतीने खात्री करणे सुलभ होणार आहे. नोकरी देण्याच्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता व विश्वासार्हता येणार आहे. तसेचबनावट प्रमाणपत्रे देण्याच्या प्रकारांना यामुळे आळा बसेल.

 

महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून नर्सिंग क्षेत्रातील विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण दिले जाते. दरवर्षी सुमारे २० हजाराहून अधिक विद्यार्थी जनरल नर्सिंग मिडवाईफरी (जीएनएम) व ऑक्सीलरी नर्स मिडवाईफरी (एएनएम) अभ्यासक्रम पूर्ण करतात. आतापर्यंत विद्यार्थ्यांना केवळ छापील प्रमाणपत्रे दिली जात होती. मात्रआता त्यांना ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल प्रमाणपत्रे मिळणार आहेत.

 

या उपक्रमामुळे डिजिटल प्रमाणपत्राची सुविधा देणारे महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळ हे राज्यातील पहिले शैक्षणिक मंडळ ठरले आहे.

Featured post

Lakshvedhi