Sunday, 27 April 2025

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शिष्यवृत्ती योजनेची व्याप्ती वाढवणार

 विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी

शिष्यवृत्ती योजनेची व्याप्ती वाढवणार

- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबईदि. 22 : राज्यातील पात्र शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनांचा  लाभ  मिळावा यासाठी विविध शिष्यवृत्ती योजनांचे सक्षमीकरण करण्यात येणार असून अधिकाधिक पात्र विद्यार्थ्यांपर्यंत शिष्यवृत्ती योजना पोहोचवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी आदिवासी विकास विभागसामाजिक न्याय व इतर मागास बहुजन कल्याण विभागांच्या समन्वयाने विविध शिष्यवृत्ती योजनांची व्याप्ती वाढवण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

 शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेच्या सक्षमीकरणाबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीस इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावेआदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक ऊईकेशालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओलआदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारेशिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंहएससीईआरटीचे संचालक राहुल रेखावार तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    शालेय शिक्षण मंत्री भुसे म्हणालेराज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत एन.एम.एम.एस. (नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप) योजना राबवली जाते. राज्यातील एन.एम.एम.एस.ही शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झालेलेपण केंद्र सरकारची शिष्यवृत्ती अप्राप्त असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सारथीच्या धर्तीवर शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात येणार आहे.

   केंद्र शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या वाढविणेराज्य शासनाच्या शिष्यवृत्ती योजनांच्या लाभार्थी संख्येत वाढ करण्यावर भर देण्यात येणार आहे. राज्यातील एकही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नयेयासाठी पहिली ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करण्याचा तसेच उत्पन्न मर्यादाही पुनर्रचित करण्याचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे निर्देशही शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी यावेळी दिले.

 आदिवासी विकास मंत्री डॉ.ऊईके यांनी 'सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनेबाबत नमूद करत सर्व विभागांच्या शिष्यवृत्ती योजनेत समानता असली पाहिजे व जास्तीत जास्त आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळाला पाहिजे असे सांगितले.

इतर मागास बहुजन कल्याण  मंत्री सावे म्हणालेआर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये आणि त्यांना दर्जेदार शिक्षण घेता यावे यासाठी शिष्यवृत्ती योजनांच्या सक्षमीकरणावर भर देण्यात येणार आहे.

मराठी हा राज्याचा मानबिंदू ; पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी अनिवार्य न करता ऐच्छिक राहणार

 मराठी हा राज्याचा मानबिंदू ;

पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी अनिवार्य न करता ऐच्छिक राहणार

- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. 22 : राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. यात राज्यातील विद्यार्थी उद्याच्या स्पर्धेत कुठेही कमी पडू नयेत याचीही दक्षता घेतली जात आहे. सर्व शाळांमध्ये मराठी विषय बंधनकारक असून इंग्रजी भाषा शिकविण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. आता नवीन धोरण राबविताना सुकाणू समितीने घेतलेल्या निर्णयानुसार पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा विषय अनिवार्य करण्यात आला होता. तथापि हिंदी भाषा विषय ऐच्छिक ठेवण्याबाबतचा सुधारित शासन निर्णय काढला जाईलअसे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी स्पष्ट केले.

राज्यातील शालेय शिक्षण क्षेत्रात व्यापक आणि परिणामकारक सुधारणा घडवून आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने विविध महत्वाचे निर्णय घेतले आहेत. याबाबतची माहिती देण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री श्री.भुसे यांनी मंत्रालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओलशिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंहएससीईआरटी चे संचालक राहुल रेखावार उपस्थित होते.

शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे म्हणालेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली १०० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यगीत म्हणून गर्जा महाराष्ट्र माझा’ गीत सर्व शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर सन्मानपूर्वक गायले जाणार आहे. शाळांमध्ये पिण्याचे स्वच्छ पाणीस्वच्छतागृहेइमारतींची दुरुस्तीवाचनालयप्रयोगशाळाखेळाचे मैदान अशा मूलभूत भौतिक सुविधा पुरवण्यावर भर देण्यात येत आहे. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कॉपीमुक्त परीक्षा अभियान हे दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये यशस्वीपणे राबवले गेले असून भविष्यात कॉपीच्या प्रकरणांमध्ये दोषी ठरलेल्या शाळांना परीक्षा केंद्र मान्यता नाकारण्यात येईल.

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणालेराज्यभरातील सर्व शाळा व अंगणवाड्यांचे जिओटॅगिंग करण्यासाठी एमआरसॅक ॲपचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. पीएमश्री शाळेच्या धर्तीवर राज्यात 'सीएम श्रीआदर्श शाळा उभारण्यात येणार आहे. तसेच आनंद गुरुकुल’ उपक्रमाअंतर्गत प्रत्येक विभागात एक निवासी शाळा सुरू करून त्यात कलाक्रीडा व एआय (AI) प्रशिक्षणासह स्पेशालिटी शिक्षण दिले जाईल. शिक्षकांवरील शिक्षणबाह्य कामांचे ओझे कमी करण्यासाठी १५ समित्यांचे एकत्रीकरण करून आता फक्त चार समित्या ठेवण्यात आल्या आहेत. याचबरोबर आदर्श शिक्षकचांगल्या शैक्षणिक संस्था यांची नोंद घेऊन त्यांचा अनुभव इतर शाळांना लाभावायासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे.

शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये गुणवत्तेमध्ये आलेल्या सर्व विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहनपर लाभ देण्याचा विचार सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीनंतर हेल्थ कार्ड देण्यात येणार असून गंभीर आजारांवर मोफत उपचाराची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे. राज्यात सीबीएससी पॅटर्नमधील चांगल्या बाबींचा स्वीकार करतत्यानुसार राज्याच्या अभ्यासक्रमात सुधारणा केल्या जाणार आहेत. तथापि राज्य शिक्षण मंडळबालभारती राज्याचा इतिहासभूगोल याविषयी कुठेही तडजोड होणार नाही. विद्यार्थ्यांसाठी सर्व उपक्रम राबविताना गुणवत्तापूर्ण आनंददायी व सर्वसमावेशक शिक्षण देण्याच्या दिशेने राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे श्री.भुसे यांनी स्पष्ट केले.

*रुग्ण हक्क परिषद मुंबई प्रदेश* संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण, एक सत्कार्य करा जास्तीजास्त मित्र नातेवाईक यांना शेअर pl

 *📢अत्यंत महत्त्वाची सूचना*

                


*रुग्ण हक्क परिषद मुंबई प्रदेश*

 संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण


1) हिंदुजा हॉस्पिटल

2) कोकिलाबेन हॉस्पिटल

3) जसलोक हॉस्पिटल

4) दि. बॉम्बे हॉस्पिटल 

5) लीलावती हॉस्पिटल

6) ब्रीच कँडी हॉस्पिटल

7) केईएम हॉस्पिटल

8) टाटा हॉस्पिटल

9) नानावटी हॉस्पिटल

10) दि. बांद्रा होली फॅमिली हॉस्पिटल

11) हिरानंदानी हॉस्पिटल

12) होली स्पिरिट हॉस्पिटल


          या किंवा अश्या महागड्या पंचतारांकित चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील, गरीब  रुग्णांचे सर्व बिल माफ करून दिले जाईल. *यासाठी संपर्क - सौ. वीणा सोनार, दादर, मुंबई - 400028 केव्हाही संपर्क साधा. मो.* 7028982041


 *आवश्यक कागदपत्रे-*

1) 2 फोटो

2) आधार कार्ड

3) रेशन कार्ड

4) उत्पन्नाचा दाखला

5) हॉस्पिटलचे इस्टिमेट

6) रोग निदान झाल्याचे रिपोर्ट


*🙏🙏कृपया ही पोष्ट जास्तीत जास्त ग्रुप वर शेयर करून आपल्या समाज बांधवांपर्यंत पोहचवावी ही विनंती.*


*धन्यवाद*



🙏 कोणाला वैद्यकीय आर्थिक मदत हवी असल्यास

 खालील ट्रस्टशी संपर्क साधा...


 🙏सर रतन टाटा ट्रस्ट बॉम्बे हाऊस, होमी मोदी स्ट्रीट, मुंबई 400 001 कॉल: 022-66658282


 🙏रिलायन्स फाउंडेशन (पूर्वी अंबानी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट) 222 मेकर चेंबर्स IV, 3रा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई - 400021 कॉल करा: 022-44770000, 022-30325000


 🙏अमिरीलाल घेलाभाई चॅरिटेबल ट्रस्ट 71, गीतांजली, 73/75, वाळकेश्वर रोड, मुंबई - 400006


 🙏आशा किरण चॅरिटेबल ट्रस्ट C/o Radium Keysoft Solutions Ltd, कॉल करा: 022-26358290 101, रायगड दर्शन, इंडियन ऑइल कॉलनी समोर, जेपी रोड, अंधेरी (w) मुंबई 400 053


 🙏अस्पी चॅरिटेबल ट्रस्ट C/o अमेरिकन स्प्रिंग अँड प्रेसिंग वर्क्स प्रा.  Ltd P.O.  बॉक्स क्र. 7602, आदर्श गृहनिर्माण संस्था.  रोड, मालाड (प), मुंबई ४०० ०६४ ,


 🙏ऑरेड चॅरिटेबल ट्रस्ट 1-बी-1 गिरीराज, अल्टामाउंट रोड मुंबई 400 026, कॉल करा: 022-23821452, 022-24926721


 🙏B.  अरुणकुमार अँड कंपनी 1616, प्रसाद चेंबर्स, ऑपेरा हाऊस, मुंबई - 400004


 🙏बी डी बांगुर ट्रस्ट C/o कार्बन एव्हरफ्लो लि. बखावर, दुसरा मजला, नरिमन पॉइंट मुंबई 400021


 🙏बॉम्बे कम्युनिटी पब्लिक ट्रस्ट (बीसीपीटी) 5 वा मजला रीजेंट चेंबर्स, नरिमन पॉइंट, मुंबई 400021, कॉल करा: 022-22845928 / 022-22836672


 🙏बुर्हानी फाउंडेशन 276 डॉ. डी.एन. रोड लॉरेन्स आणि मेयो हाऊस फोर्ट मुंबई-400001


 🙏शताब्दी सेवा ट्रस्ट सेंचुरी बाजार, वरळी, मुंबई - 400025


 🙏सेंटर फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट श्रेयस चेंबर्स, तळमजला, 175-डॉ.  डी.एन. रोड, फोर्ट, मुंबई - 400 001


 🙏मुख्यमंत्री मदत निधी, महाराष्ट्र शासन मंत्रालय, सहावा मजला नरिमन पॉइंट, मुंबई - ४००२०


🙏श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट प्रभादेवी, मुंबई - ४०० ०२८, दूरध्वनी.  ०२२-२४३७३६२६ : वैद्यकीय जाहिरात फॉर्म वेबवर उपलब्ध आहे.

 कृपया तपशीलांसाठी त्यांची वेबसाइट पहा.


 🙏दामोदर आनंदजी चॅरिटी ट्रस्ट 66, वाजू कोटक मार्ग, G.P.O जवळ, मुंबई -400001


 🙏डायमंड ज्युबली ट्रस्ट आगा हॉल, नेस्बिट रोड, समोर.  सेंट मेरी हायस्कूल मुंबई 400010, कॉल करा: 022-23775294, 022-23778923


 🙏धर्म विजय ट्रस्ट C/O किलाचंद देवचंद अँड कंपनी न्यू ग्रेट इन्शुरन्स भवन, 7, जमशेदजी टाटा रोड, मुंबई - 400020


 🙏धरमदास त्रिकमदास कपूरवाला 46, रिज रोड, रेखा क्रमांक 2, 4था मजला, मुंबई - 400006


 🙏धीरुभाई अंबानी फाउंडेशन रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड रिलायन्स सेंटर, 19, वालचंद हिराचंद मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई 400 038. दूरध्वनी : 022-30327000


 🙏धिरजलाल टॉकचंद चॅरिटेबल ट्रस्ट शैलेश निवास, सुभाष लेन दफ्तरी रोड, मालाड (पू), मुंबई - 400097


 🙏धिरजलाल मोरारजी अजमेरा चॅरिटी ट्रस्ट 37 - ए, सारंग स्ट्रीट, मुंबई - 400003


 🙏दीपचंद गार्डी चॅरिटेबल ट्रस्ट उषा किरण, दुसरा मजला, अल्टामाउंट रोड, मुंबई - ४००००६


 🙏दिवालीबेन मोहनलाल चॅरिटेबल ट्रस्ट खटाऊ हवेली, पहिला मजला, 95-K.  ओमेर पार्क, भुलाभाई देसाई रोड, मुंबई ४०० ०२६


 🙏एकता चॅरिटेबल ट्रस्ट 4/444, पंचरत्न, ऑपेरा हाऊस, मुंबई -400004


 🙏एसके चॅरिटेबल ट्रस्ट C/O कॅप्रिहन्स इंडिया लि., शिवसागर इस्टेट, 'डी' ब्लॉक, दुसरा मजला, डॉ. ए.बी. रोड, वरळी, मुंबई - 400018


 🙏एक्सेल प्रोसेस प्रा.  लि. चॅरिटेबल ट्रस्ट 117/118, मथुरदास वासनजी रोड, चकाला, अंधेरी (पू), मुंबई - 400093


 🙏फजलभॉय चॅरिटेबल ट्रस्ट लिबर्टी सिनेमाजवळ, मरीन लाईन्स, मुंबई -४००२०


 🙏गाला फाउंडेशन वाकोला म्युनिसिपल मार्केटच्या मागे, नेहरू रोड, वाकोला, सांताक्रूझ (ई) मुंबई


 🙏गरवारे फाउंडेशन ट्रस्ट चौपाटी चेंबर्स, मुंबई - 400007


 🙏गोकाक फाउंडेशन फोर्ब्स बिल्डीजी., फोर्ब्स स्ट्रीट, मुंबई - 400023


 🙏गुडलास नेरोलॅक पेंट्स लि. (ट्रस्ट) नेरोलॅक हाउस, ए.जी. कदम मार्ग, लोअर परेल, मुंबई - 400013


 🙏गोविंद दत्तात्रय गोखले चॅरिटेबल ट्रस्ट कल्पतरू हेरिटेज, 5 वा मजला, 129, M.G.  रोड मुंबई 400 023, कॉल करा: 022-22673831


 🙏हरेंद्र दवे मेमोरियल ट्रस्ट C/O जन्मभूमी, 3रा मजला, जन्मभूमी मार्ग मुंबई 400 001


 🙏हेल्पिंग हँड चॅरिटेबल ट्रस्ट 3, विदर्भ सम्राट को-ऑप Hsg.  सोसायटी 93-सी, व्ही.पी.रोड, विलेपार्ले (पश्चिम) मुंबई - 400 056 दूरध्वनी: 022-6147448


 🙏हिरानंदानी फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट ऑलिंपिया, सेंट्रल एव्हेन्यू, हिरानंदानी बिझनेस पार्क पवई, मुंबई 400076


 🙏हर्डिलिया चॅरिटेबल फाउंडेशन एअर इंडिया बिल्डिंग, 13वा मजला नरिमन पॉइंट मुंबई 400 031, कॉल करा: 022-22024224


 🙏हिराचंद गोवर्धनदास 222, मेकर चेंबर्स 1V 3रा मजला, नरिमन पॉइंट मुंबई 400 021


 🙏H.  एम. मेहता चॅरिटी ट्रस्ट मेहता हाऊस, 4 वा मजला, अपोलो स्ट्रीट, खुशरू दुभाष मार्ग, मुंबई - 400001


 🙏H.  S. C. ट्रस्ट रेडी मनी मॅन्शन, वीर नरिमन रोड, मुंबई - 400023


 🙏जमनालाल बजाज फाउंडेशन बजाज भवन 2रा मजला, जमनालाल बजाज मार्ग, 226 नरिमन पॉइंट, मुंबई 400 021, कॉल करा: 022-22023626


 💝 उपर सांगते सर्व जरुरतमंद आणि गरीब कुटुंबांना मेडीकली मदत करते


  डायलिसिस @ मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात फक्त 200/- मध्ये करता येते.  एकूण 22 डायलिसिस मशिन्स बसवण्यात आल्या.  कृपया.  हे fwd करा जेणेकरून इतरांना फायदा होईल.  धन्यवाद.

 कृपया तुमच्या ग्रुपमध्ये पास करा हा सर्व डायलिसिस रुग्णांसाठी उपयुक्त संदेश आहे

 प्राप्त झाल्याप्रमाणे फॉरवर्ड केले.. 👆🏼☝🙏

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल विश्वविद्यालय में ‘दीनदयाल उपाध्याय अध्यासन’ की स्थापना की जाएगी

 रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल विश्वविद्यालय में

 ‘दीनदयाल उपाध्याय अध्यासन’ की स्थापना की जाएगी

        -राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन की घोषणा

 

मुंबईदिनांक 26: पंडित दीनदयाल उपाध्याय ने साम्यवाद और पूंजीवाद के बीच संतुलन साधते हुए ‘एकात्म मानवतावाद’ का सिद्धांत प्रस्तुत किया था। उनके विचार युवाओं तक पहुँचाने के उद्देश्य से रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल विश्वविद्यालय में दीनदयाल उपाध्याय अध्यासन’ की स्थापना की जाएगीऐसी घोषणा राज्यपाल तथा विश्वविद्यालयों के कुलाधिपति सी. पी. राधाकृष्णन ने की।

 

पंडित दीनदयाल उपाध्याय ने मुंबई के रुईया महाविद्यालय में 22 से 25 अप्रैल 1965 के दौरान एकात्म मानवतावाद’ विषय पर व्याख्यान दिए थे। इस व्याख्यानमाला के हीरक जयंती महोत्सव के अवसर पर रुईया महाविद्यालय में आयोजित चर्चा सत्र को राज्यपाल राधाकृष्णन ने संबोधित किया। कार्यक्रम में केंद्रीय वाणिज्य एवं उद्योग मंत्री पीयूष गोयलकौशल एवं रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढ़ाराष्ट्रीय स्वयंसेवक संघ के सुरेश सोनीदीनदयाल शोध संस्थान के महासचिव अतुल जैन तथा विभिन्न विश्वविद्यालयों के कुलपति उपस्थित थे।

 

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन ने कहा किसाधारण जीवनशैली और उच्च विचारों वाले उपाध्याय जी के विचारों को पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी ने अपने कार्यों के माध्यम से साकार किया। वर्तमान समय में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भी इस कार्य को आगे बढ़ा रहे हैं। ग्रामीण क्षेत्रों में सड़कों का निर्माणगरीबों को गैस कनेक्शनपेयजल योजनाएं इसी का परिणाम हैं। कोरोना काल में यदि पश्चिमी देशों ने टीका विकसित किया होतातो उसकी कीमत आम जनता की पहुँच से बाहर होती। लेकिन भारत ने अपने देशवासियों को निःशुल्क कोरोना टीका उपलब्ध कराया और कई अन्य देशों को भी नि:शुल्क टीका प्रदान किया। यह सर्वसमावेशी सोच प्रधानमंत्री श्री मोदी ने पंडित दीनदयाल उपाध्याय से ही प्रेरित होकर अपनाई हैऐसा राज्यपाल श्री. राधाकृष्णन ने कहा।

 

राज्यपाल श्री. राधाकृष्णन ने यह भी कहा किवास्तविकता का ध्यान रखते हुए अन्न को बर्बाद नहीं करना चाहिएप्रत्येक व्यक्ति को धन अर्जन करना चाहिए लेकिन अनावश्यक खर्च से बचना चाहिए और केवल अपने लिए नहींबल्कि दूसरों के लिए भी जीना चाहिए, यह पंडित दीनदयाल उपाध्याय का विचार हमें अपनाना चाहिए।

00000

 

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मुंबईतील सर्वच रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून प्रभावी देखरेख

 प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मुंबईतील सर्वच रेल्वे स्टेशनवर

सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून प्रभावी देखरेख

 

            मुंबईदि. 26 : जम्मू काश्मिरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक ठिकाणांवरील सुरक्षा अधिक मजबूत करण्यात येत आहे. मुंबईकर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे स्थानक आणि परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून प्रभावी देखरेख करण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई आयुक्तालयातर्फे देण्यात आली आहे.

मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयांतर्गत 139 रेल्वे स्टेशन्स आहेत. दिवसभरामध्ये लोकल ट्रेनच्या जवळपास साडेसात ते आठ हजार फेऱ्या होतात. यामधून दैनंदिन 75 ते 80 लाख प्रवासी प्रवास करतात. आयुक्तालयांतर्गत या सर्व रेल्वे स्टेशन्सवर सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे प्रवशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत प्रभावी देखरेख ठेवली जात आहे.

            सर्व पोलिस ठाण्यांतर्गत पोलिस मित्रशांतता समितीप्रवाशांबरोबरच प्रवाशी संघटना तसेच कॅन्टीन, रेल्वे, सफाई कर्मचारी, हमालबुट पॉलिशवाले यांच्याशी वैयक्तिक संपर्क ठेवला जातो. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक माहितीबरोबरच कोणतीही संशयित व्यक्तीगोष्टवस्तू असल्यास त्याची तत्काळ माहिती मिळते. प्रत्येक वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला किमान दोन तास क्षेत्रीय ठिकाणी उपस्थित राहणे बंधनकारक आहे.

 पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये प्रत्येक अधिकाऱ्याला किमान चार तास पेट्रोलिंग करणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे दैनंदिन प्रवाशांना अचानकपणे तपासणी करण्याची मोहीम सुरू असते. त्यामध्ये विशिष्ट कार्यपद्धती ठरवून देण्यात आली असून त्यानुसारच ही तपासणी करण्यात येत असते. तसेच लोकल ट्रेनमध्येदेखील अचानक तपासणी म्हणजेच 'मॅसिव्ह फ्लॅश चेकिंगकरण्यात येते. त्यात एक अधिकारी व त्यांच्या सोबत तीन ते चार कर्मचारी असतात. चालू लोकलमध्ये प्रवाशांचीरॅकची आणि प्रवाशांसोबत असणाऱ्या सामानाची ते अचानकपणे तपासणी करतात. दैनंदिनरित्या घातपात तपासणी करण्यात येत असते. विविध पोलीस स्टेशनकडून या बाबींचे दैनंदिनरित्या आयुक्तालयातील 'अंतर्गत व्हाट्सअप ग्रुप'मध्ये फोटो पोस्ट करण्यात येतात. या फोटोंचे नियंत्रण कक्षात एकत्रिकरण केले जाते. घातपात तपासणीबाबत मुंबई रेल्वे पोलीस सजग राहून कार्य करत आहेअसेही रेल्वे पोलीस आयुक्तालयाने कळविले आहे.

शेती महामंडळाच्या 22 हजार कर्मचाऱ्यांना म्हाडाकडून घरे देणार; 500 कोटी उत्पन्न मिळविण्याचे महामंडळाला उद्दिष्ट

 शेती महामंडळाच्या 22 हजार कर्मचाऱ्यांना म्हाडाकडून घरे देणार;

500 कोटी उत्पन्न मिळविण्याचे महामंडळाला उद्दिष्ट

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबई,दि.२६ :  शेती महामंडळाच्या सुमारे २२ हजार कर्मचाऱ्यांनी महामंडळ विकसित करण्यासाठी आपले योगदान दिले आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना राहण्यासाठी योग्य अशा सदनिका म्हाडाच्या माध्यमातून बांधून देण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे.

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या संचालक मंडळाची ३२७ वी बैठक मंत्रालयातील महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती. बैठकीला महसूल राज्यमंत्री योगेश कदममहाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेशेती महामंडळाच्या १४ शेतमळ्यांवर २९६६ निवासस्थाने आहेत. यापैकी १७८६ निवासस्थाने राहण्यास अयोग्य ठरविण्यात आली आहेत. त्यामुळे ही निवासस्थाने रिक्त करण्याचा प्रस्ताव महामंडळाने बैठकीसाठी ठेवला होता. यावर चर्चा करताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेती महामंडळाच्या सर्वच सुमारे २२ हजार कर्मचाऱ्यांना म्हाडाच्या माध्यमातून चांगली घरे उपलब्ध करुन देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. गिरणी कामगारांप्रमाणे या कामगारांनाही चांगली घरे मिळाली पाहिजेत अशी भूमिका त्यांनी यावेळी घेतली. त्याला महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनीही दुजोरा दिला.

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाला उत्पन्न वाढविण्यासाठी ५०० कोटींचे उद्दिष्ट बैठकीत देण्यात आले आहे. महामंडळाच्या ताब्यात असलेल्या सुमारे ३० हजार एकर जागेवर विविध उपक्रम राबवून हे उत्पन्न वाढविण्याच्या सूचना महसूलमंत्र्यांनी केल्या. त्याबरोबरच शेती महामंडळाच्या कोणत्याही जागा मोफत वापरासाठी न देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

शेती महामंडळाच्या मळ्यावरील सेवानिवृत्तराजीनामा दिलेल्या, मयत कर्मचाऱ्यांना बोनस वाटपास मंजुरी देण्यात आली. तर महामंडळाच्या जमिनीवर संयुक्त शेती पद्धतीने पीक योजना राबविण्यासाठी वीज आणि सौरपंप जोडणी मिळण्याबाबत तसेच सौरऊर्जा प्रकल्पासाठी ऊर्जा विभागाच्या प्रचलित भाडेपट्ट्याने जागा देण्यासाठी बैठक आयोजित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोकमठाण येथील महामंडळाची जमीन वखार महामंडळास व्यवसायाकरिता देणेअकृषिक जमिनी विना निविदा शासनाच्या संलग्न संस्थांना भाडेपट्टाने देणेसंयुक्त शेतीसाठी ब्लॉकचा कालावधी १ एप्रिलपासून सुरु करणे१४ मळ्यांमधील शेतजमीन भूमी अभिलेख विभागाकडे शुल्क भरून मोजणी करुन घेणेपुणे मुख्यालय येथील ५४ सदनिका यांचे वापरमूल्य दर सुधारित करणे१ ते २ गुंठ्याच्या आतील शिल्लक क्षेत्र विक्री करण्यास मान्यता देणेनाशिक जिल्ह्यातील काष्टी ता. मालेगाव येथील १२ हेक्टर १७ आर जागा राहूरी कृषी विद्यापीठास पैशांची आकारणी करुन मंजुरी देणे आदी विषय बैठकीत मंजूर करण्यात आले.

Saturday, 26 April 2025

पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या 2795 पदांची भरती; 29 एप्रिलपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार - राज्य लोकसेवा आयोगाची माहिती

 पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या 2795 पदांची भरती;

29 एप्रिलपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार

-         राज्य लोकसेवा आयोगाची माहिती

 

मुंबईदि.26 : राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागात पशुधन विकास अधिकारी या संवर्गाची 2795 पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी उमेदवारांना 29 एप्रिल 2025 पासून 19 मे 2025 पर्यंत आपला अर्ज सादर करता येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे देण्यात आली आहे.

 

राज्य शासनाच्या कृषिपशुसंवर्धनदुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या मागणीवरून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) पशुधन विकास अधिकारीमहाराष्ट्र पशुसंवर्धन सेवागट-अ या संवर्गातील पदभरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत पशुसंवर्धन विभागात पशुधन विकास अधिकारी या संवर्गाची 2795 पदे भरली जाणार आहेत. सामाजिक व समांतर आरक्षणानुसार पदांचा तपशील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करताना आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक आहे.

000

Featured post

Lakshvedhi