Friday, 25 April 2025

अन्न व औषध प्रशासनात दक्षता आणि गुप्त वार्ता विभाग स्वतंत्र करावे

 अन्न व औषध प्रशासनात दक्षता आणि गुप्त वार्ता विभाग स्वतंत्र करावे

-अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ

 

मुंबईदि. २४: भेसळयुक्त अन्न शोधून त्यावर कारवाई करीत सामान्य नागरिकांचे आयुष्य निरोगी ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग सातत्याने काम करतो. त्यामुळे विभागाचे काम अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्न व औषध प्रशासन अधिक बळकट करण्यासाठी दक्षता आणि गुप्त वार्ता विभाग स्वतंत्र करावेत्यासाठी मनुष्यबळ नियुक्त करण्यात यावेअसे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिले.

 

मंत्रालयात अन्न औषध प्रशासन विभागाच्या विविध विषयांबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मंत्री श्री.झिरवळ बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन आयुक्त राजेश नार्वेकरउपसचिव अनिल अहिरेसहआयुक्त (विधी) दा. रा गहाणेसह आयुक्त ( अन्न ) उल्हास इंगवलेकक्ष अधिकारी साईनाथ गालनवाड आदी उपस्थित होते.

 

गुप्त वार्ता आणि दक्षता विभागात पदानुसार कामकाज वाटप करावे. स्वतंत्र विभाग केल्यामुळे कामकाज गतिमान होऊन आलेल्या तक्रारींवर विनाविलंब कारवाई करणे सोपे होईल. तसेच ॲनॉलॉग पनीर बाबत केंद्र शासनाच्या अधिसूचनेप्रमाणे कारवाई करावी. या पनीर संदर्भात विशिष्ट वजन आणि आकार असावाअशा सूचनाही मंत्री श्री.झिरवळ यांनी दिल्या.


हिंगणघाट शहरातील कामगारांना घर मिळवून द्यावे

 हिंगणघाट शहरातील कामगारांना घर मिळवून द्यावे

-         गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

 

            मुंबईदि. 24 : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात सुत गिरण्यांसह काही उद्योगधंदे आहेत. त्यामुळे शहरात रोजगारासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्याही अधिक आहे. कामगारांना परवडणाऱ्या किमतीमध्ये हक्काचे घर दिल्यास त्यांची मोठी सोय होणार आहे. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पिंपळगांव येथे अत्यल्प उत्पन्न गटाकरीता बांधण्यात आलेली घरे कामगारांना उपलब्ध करून द्यावीअसे निर्देश गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.

 

            पिंपळगांव (ता. हिंगणघाट जि. वर्धा) येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटाकरीता सदनिका बांधण्यात आलेल्या आहेत. यापैकी विक्री न झालेल्या सदनिकांबाबत मंत्रालयात गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी बैठक आयोजित केली होती. यावेळी मुख्य अभियंता शिवकुमार आडेउपसचिव अजित कवडेअवर सचिव रवींद्र खेतले आदी उपस्थित होते.

 

     पिंपळगांव येथील सदनिकांची रंगरंगोटी करावी. त्यानंतर सदनिकांची परवडणाऱ्या किमतीला विक्री करावी. कामगारांना घरे देण्यासाठी हिंगणघाट शहरातील उद्योजकांचे सहकार्य घ्यावे. कामगारांना घर खरेदी करण्यासाठी मिळणारे अनुदानत्यांच्यासाठी असणाऱ्या योजना याबाबत पडताळणी करावी. त्यानुसार कामागरांना घर खरेदी करून देण्याची कार्यवाही करावीअशा सूचनाही राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी दिल्या. बैठकीत पिंपळगांव येथील सदनिकांबाबत राज्यमंत्री डॉ.भोयर यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.


दिव्यांग उमेदवारांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र अनिवार्य १ मे २०२५ पासून नव्या अटींची अंमलबजावणी

 दिव्यांग उमेदवारांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र अनिवार्य

१ मे २०२५ पासून नव्या अटींची अंमलबजावणी

 

मुंबई, दि. २४ : महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाने २७ जून २०२४ रोजीच्या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व दिव्यांग उमेदवारांना केंद्र शासनाच्या स्वावलंबन पोर्टलवरून वितरित होणारे दिव्यांग प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र (युडीआयडी कार्डअनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व भरती प्रक्रियेत १ मे २०२५ पासून करण्यात येणार आहे.

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीत दिव्यांग उमेदवारांसाठी त्यांच्या खात्यात युडीआयडी कार्ड क्रमांक नोंदविण्याची व त्यास स्वावलंबन पोर्टलवरून वैधता (Validation) मिळविण्याची सुविधा आधीच उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

उमेदवारांकडे जर स्वावलंबन पोर्टलचे दिव्यांग प्रमाणपत्र आणि युडीआयडी कार्ड दोन्ही असतीलतर ते तपशील खात्यात नोंदवणे अनिवार्य आहे. ज्या उमेदवारांकडे सद्यस्थितीत स्वावलंबन पोर्टलवरुन वितरित केलेले दिव्यांग प्रमाणपत्र नाही. तथापि राज्य शासनाच्या एसएडीएम पोर्टलवरुन वितरित करण्यात आलेले दिव्यांग प्रमाणपत्र आहे. अशा उमेदवारांनी एसएडीएम प्रमाणपत्रासह वैश्विक ओळखपत्रासाठी नोंदणी केल्याचा क्रमांक (Enrolment Number) अनिवार्य असेल तथापि उमेदवारांना मुलाखतीपूर्वी वैश्विक ओळखपत्र सादर करणे आवश्यक असेल.

 

उमेदवाराचे नावदिव्यांगत्वाचा प्रकारस्थिती इत्यादी तपशील पडताळल्यानंतरच माहिती वैध ठरवली जाईल. खात्यातील आणि युडीआयडी कार्डवरील जन्मदिनांक एकसारखे असणे आवश्यक आहे.

 

कोणत्याही जाहिरातीसाठी अर्ज करताना दिव्यांग तपशील वैध असल्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्यामुळे सर्व दिव्यांग उमेदवारांनी ही प्रक्रिया शक्य तितक्या लवकर पूर्ण करावीअसे आवाहन आयोगाने केले आहे.

Thursday, 24 April 2025

मुंबईच्या वेव्हज् परिषदेत नवकल्पनेसोबत तंत्रज्ञानाचा महासागर

 मुंबईच्या वेव्हज् परिषदेत नवकल्पनेसोबत तंत्रज्ञानाचा महासागर

मुंबईदि. 24 : केंद्र सरकारच्यावतीने जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्राकरिता वेव्हज् 2025 परिषद’ मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे होत आहे. या परिषदेचे यजमानपद महाराष्ट्र शासन भूषवत आहेत. दि. 1 ते 4 मे 2025 या कालावधीत होत असलेल्या या परिषदेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारउद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. मुंबईत होणाऱ्या या परिषदेस विविध देशांचे मंत्रीधोरणकर्तेउद्योगपती तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

वेव्हज् परिषदेत जगभरातून 100 पेक्षा जास्त देश सहभागी होणार आहे. या परिषदेच्या माध्यमातून भारतातील क्रिएटिव्ह इकॉनॉमीला मोठ्या प्रमाणात चालना मिळण्यास मदत होणार आहे. भारतामध्ये माध्यम आणि मनोरंजन उद्योग वेगाने वाढत असून रोजगारनिर्मितीसाठी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत आहे. त्याचबरोबर ओटीटीॲनिमेशनगेमिंगव्हीएफएक्सचित्रपटसंगीत आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात देश प्रगती करत आहे. या पार्श्वभूमीवर वेव्हज् परिषदेचे आयोजन होत असून या परिषदेत चर्चासत्रेउद्योगक्षेत्रात गुंतवणूक आणि विविध कार्यक्रम होणार आहे.

या परिषदेच्या पहिल्या दिवशी भारत व महाराष्ट्र पॅव्हिलियन’ आणि वेव्हज प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून काही महत्त्वपूर्ण घोषणा व सामंजस्य करार (MOU) करण्यात येणार आहे. त्याचबरोबर क्रिएटोस्पिअरचे उद्घाटन आणि ‘वेव्हज बझार’वेव्हज एक्सलेटर इत्यादींचा प्रारंभ होणार आहे. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी जागतिक मीडिया संवादमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमध्ये संवाद तसेच क्रिएट इन इंडिया चॅलेन्जेसची अंतिम फेरी होणार आहे. या परिषदेच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी विविध चर्चासत्रांबरोबरच प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे.


कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार

 कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार

शासकीय कामकाजात गतिमानता येण्यासाठी तसेच अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यासाठी मित्र संस्थेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत युनिर्व्हसल ‘ए आय’ विद्यापीठाशी सामंजस्य करार केला. तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा शासकीय कामकाजात वापर वाढविण्यासाठी मित्र व भारतीय प्राद्यौगिक संस्थामुंबई (आयआयटी मुंबई )वोआरजीपीडिया यासंस्थेबरोबरही सामंजस्य करार झाला.


मित्रच्या नियामक मंडळाची दुसरी बैठक सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी नवीन साठवण तलाव बांधावेत

 मित्रच्या नियामक मंडळाची दुसरी बैठक


सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी नवीन साठवण तलाव बांधावेत


- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


 


मुंबई, दि. 24 - कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने मोठ्या धरणाच्या पाणलोट (कॅचमेन्ट) क्षेत्राबाहेरील लघु पाटबंधारे प्रकल्पांचे खोलीकरण करण्याचे व नवीन साठवण तलाव बांधण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.


महाराष्ट्र इन्स्टिटयूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन - 'मित्र' या संस्थेच्या नियामक मंडळाची दुसरी बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. यावेळी नियामक मंडळाचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, आमदार राणा जगजीतसिंह, राजेश क्षीरसागर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक सल्लागार तथा 'मित्र'चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, सह मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर होण्यासाठी आवश्यक धोरणे तयार करण्यासाठी उपाययोजना संदर्भात श्री. परदेशी यांनी यावेळी सादरीकरण केले. तसेच महास्ट्राईड प्रकल्प, महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास प्रकल्प आदींचा आढावा घेण्यात आला. केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाला सादर करावयाच्या प्राथमिक प्रकल्प अहवालच्या मानक कार्य प्रणालीला(एसओपी) यावेळी मान्यता देण्यात आली.


जागतिक बँक आणि बाह्य सहाय्यद्वारे राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या 'एसओपी'मध्ये दिलेल्या कालबद्ध कार्यक्रमाप्रमाणे सादरीकरण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले.


राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर करण्यासाठी दरवर्षी राज्याचे सकल उत्पन्न (जीडीपी) 14.5 टक्के करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात राज्य आधार सामग्री प्राधिकरण (स्टेट डेटा पॉलिसी) मधून साधन सामग्री तयार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

सौर उर्जा प्रकल्पातील विकासकांसाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्स,pl share

 सौर उर्जा प्रकल्पातील विकासकांसाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्स

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

§  मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चा आढावा

§  विकासकांच्या अडचणी तात्काळ सोडविण्याचे निर्देश

 

मुंबई, दि.24 : शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राबविण्यात येणारा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 हा राज्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. 2025 वर्षात सात हजार मेगावॅट सौर उर्जा निर्मितीचे उद्दिष्ट आहे. राज्यातील विकासकांना 100 दिवसाला 690 मेगावॅटचा लक्ष्यांक केंद्र सरकारने दिलेला असताना 746 मेगावॅट सौर उर्जा निर्मिती करण्यात आली असून यामध्ये दिलेल्या मुदतीपेक्षा अगोदर लक्ष्यांक पूर्ण केला आहे. मात्र अजूनही काही ठिकाणी विकासकांना वनपर्यावरणसुरक्षेबाबतच्या अडचणी असल्याने त्या सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्स तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 च्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी अपारंपरिक उर्जा मंत्री अतुल सावेराज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकरमुख्य सचिव सुजाता सौनिकउर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्लामहसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमारमुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडेसचिव डॉ. श्रीकर परदेशीग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवलेमहावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रामहापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक डॉ संजीव कुमारमहानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ राधाकृष्णन बी. यांच्यासह सौरऊर्जा कंपनीचे राज्यातील प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीसौर उर्जा प्रकल्पामध्ये महाराष्ट्राने देशात सर्वोत्कृष्ट काम केले आहे. विकासकांना जिल्हास्तरावर येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स तयार करून जिल्हाधिकाऱ्यांसोबत पोलीस अधीक्षकमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी महिन्यातून एकदा बैठक घेवून प्रशासकीय व तांत्रिक अडचणी सोडवाव्यात. आदिवासी शेतकऱ्यांना सौर कृषी उर्जा प्रकल्पाचा लाभ मिळण्यासाठी त्यांना देण्यात आलेले वनपट्टे कायदेशीर होण्यासाठी वन विभागाने प्रयत्न करावेत. हा इको फ्रेंडली प्रकल्प असल्याने वन जमीन इतर कामासाठी वापरण्यास देण्याबाबत आणि शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार करून वन आणि पर्यावरण विभागाने तसा प्रस्ताव शासनाकडे सादर करावायाबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईलअसेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सप्टेंबर 2026 अखेर सर्व सौर उर्जा फीडरचे काम होण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व जिल्हाधिकारीजिल्हास्तरीय यंत्रणाउर्जा विभागसौर उर्जा विकासक यांचे अभिनंदन केले.

 प्रकल्पात अडचणी आणल्यास थेट कारवाई

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. गुंड प्रवृत्तीचे लोक कामात अडचणी आणत असल्यास त्यांच्यावर थेट कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.

ग्रामपंचायतीच्या ‘ना हरकत’ ची गरज नाही

सौर उर्जा प्रकल्पासाठी गावातील खासगी किंवा शासकीय जमिनीबाबत राज्य शासनाने ना हरकत दिली असल्याने पुन्हा ग्रामपंचायतीच्या ‘ना हरकत’ प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. याबाबत सर्व जिल्हाधिकारीमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.

यावेळी विकासकांनी मांडलेल्या समस्याअडचणी समजून घेवून जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृष्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या.

खासगी जमीन घेतानाही मुद्रांक शुल्क माफ

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पासाठी सरकारी जमिनीसाठी सरकारने मुद्रांक शुल्क माफ केले आहे. आता खासगी जमीन घेतानाही मुद्रांक शुल्क माफ करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

आतापर्यंत 2 लाख 14 हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा

सौर उर्जा योजनेच्या अंतर्गत राज्यात ठिकठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारून त्याच्या आधारे सर्व कृषी फीडर चालविण्यात येणार आहेत. राज्यात 15 हजार 284 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांचे काम चालू आहे. एकूण 16 हजार मेगावॅट क्षमतेचा हा जगातील सर्वात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प आहे. आतापर्यंत राज्यात 1359 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प पूर्ण झाले असून त्यामुळे 2 लाख 14 हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होऊ लागल्याची माहिती अपर मुख्य सचिव श्रीमती आभा शुक्ला यांनी सादरीकरणात दिली.

प्रकल्प व्यवस्थापन पोर्टलचे अनावरण

सौर कृषी वाहिनी योजना प्रकल्प विकासकांना परवाने देण्यापासून ते वीज निर्मिती बिलांच्या पेमेंटपर्यंत सर्व कामांची प्रभावीपणे देखरेख करता यावी. यासाठी महावितरणच्या सोलर ॲग्रो कंपनीने 'प्रकल्प व्यवस्थापन पोर्टलविकसित केले आहे. पोर्टलचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. हे पोर्टल महावितरणमहापारेषणमहाऊर्जाविद्युत निरीक्षकसोलार ॲग्रो कंपनीसर्व सौर ऊर्जा प्रकल्प विकासकांना उपलब्ध आहे. अंमलबजावणीच्या प्रत्येक टप्प्यावर करावयाची कार्यवाहीघ्यावयाची दक्षता व आवश्यक मार्गदर्शन करण्यास ते सक्षम आहे. ज्यामुळे नियोजित सर्व प्रकल्प विक्रमी काळात पूर्ण होण्यास व व्यवस्थापनाची कामे वेळेत आणि सुरळीत होण्यास मदत होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Featured post

Lakshvedhi