Wednesday, 23 April 2025

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शिष्यवृत्ती योजनेची व्याप्ती वाढवणार

 विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी

शिष्यवृत्ती योजनेची व्याप्ती वाढवणार

- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबईदि. 22 : राज्यातील पात्र शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनांचा  लाभ  मिळावा यासाठी विविध शिष्यवृत्ती योजनांचे सक्षमीकरण करण्यात येणार असून अधिकाधिक पात्र विद्यार्थ्यांपर्यंत शिष्यवृत्ती योजना पोहोचवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी आदिवासी विकास विभागसामाजिक न्याय व इतर मागास बहुजन कल्याण विभागांच्या समन्वयाने विविध शिष्यवृत्ती योजनांची व्याप्ती वाढवण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

 शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेच्या सक्षमीकरणाबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीस इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावेआदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक ऊईकेशालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओलआदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारेशिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंहएससीईआरटीचे संचालक राहुल रेखावार तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    शालेय शिक्षण मंत्री भुसे म्हणालेराज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत एन.एम.एम.एस. (नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप) योजना राबवली जाते. राज्यातील एन.एम.एम.एस.ही शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झालेलेपण केंद्र सरकारची शिष्यवृत्ती अप्राप्त असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सारथीच्या धर्तीवर शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात येणार आहे.

   केंद्र शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या वाढविणेराज्य शासनाच्या शिष्यवृत्ती योजनांच्या लाभार्थी संख्येत वाढ करण्यावर भर देण्यात येणार आहे. राज्यातील एकही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नयेयासाठी पहिली ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करण्याचा तसेच उत्पन्न मर्यादाही पुनर्रचित करण्याचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे निर्देशही शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी यावेळी दिले.

 आदिवासी विकास मंत्री डॉ.ऊईके यांनी 'सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनेबाबत नमूद करत सर्व विभागांच्या शिष्यवृत्ती योजनेत समानता असली पाहिजे व जास्तीत जास्त आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळाला पाहिजे असे सांगितले.

इतर मागास बहुजन कल्याण  मंत्री सावे म्हणालेआर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये आणि त्यांना दर्जेदार शिक्षण घेता यावे यासाठी शिष्यवृत्ती योजनांच्या सक्षमीकरणावर भर देण्यात येणार आहे.

*****

मराठी हा राज्याचा मानबिंदू ; पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी अनिवार्य न करता ऐच्छिक राहणार

 मराठी हा राज्याचा मानबिंदू ;


पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी अनिवार्य न करता ऐच्छिक राहणार


- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे


मुंबई, दि. 22 : राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. यात राज्यातील विद्यार्थी उद्याच्या स्पर्धेत कुठेही कमी पडू नयेत याचीही दक्षता घेतली जात आहे. सर्व शाळांमध्ये मराठी विषय बंधनकारक असून इंग्रजी भाषा शिकविण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. आता नवीन धोरण राबविताना सुकाणू समितीने घेतलेल्या निर्णयानुसार पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा विषय अनिवार्य करण्यात आला होता. तथापि हिंदी भाषा विषय ऐच्छिक ठेवण्याबाबतचा सुधारित शासन निर्णय काढला जाईल, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी स्पष्ट केले.


राज्यातील शालेय शिक्षण क्षेत्रात व्यापक आणि परिणामकारक सुधारणा घडवून आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने विविध महत्वाचे निर्णय घेतले आहेत. याबाबतची माहिती देण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री श्री.भुसे यांनी मंत्रालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, एससीईआरटी चे संचालक राहुल रेखावार उपस्थित होते.


शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली १०० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यगीत म्हणून ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ गीत सर्व शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर सन्मानपूर्वक गायले जाणार आहे. शाळांमध्ये पिण्याचे स्वच्छ पाणी, स्वच्छतागृहे, इमारतींची दुरुस्ती, वाचनालय, प्रयोगशाळा, खेळाचे मैदान अशा मूलभूत भौतिक सुविधा पुरवण्यावर भर देण्यात येत आहे. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कॉपीमुक्त परीक्षा अभियान हे दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये यशस्वीपणे राबवले गेले असून भविष्यात कॉपीच्या प्रकरणांमध्ये दोषी ठरलेल्या शाळांना परीक्षा केंद्र मान्यता नाकारण्यात येईल.


शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले, राज्यभरातील सर्व शाळा व अंगणवाड्यांचे जिओटॅगिंग करण्यासाठी एमआरसॅक ॲपचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. पीएमश्री शाळेच्या धर्तीवर राज्यात 'सीएम श्री' आदर्श शाळा उभारण्यात येणार आहे. तसेच ‘आनंद गुरुकुल’ उपक्रमाअंतर्गत प्रत्येक विभागात एक निवासी शाळा सुरू करून त्यात कला, क्रीडा व एआय (AI) प्रशिक्षणासह स्पेशालिटी शिक्षण दिले जाईल. शिक्षकांवरील शिक्षणबाह्य कामांचे ओझे कमी करण्यासाठी १५ समित्यांचे एकत्रीकरण करून आता फक्त चार समित्या ठेवण्यात आल्या आहेत. याचबरोबर आदर्श शिक्षक, चांगल्या शैक्षणिक संस्था यांची नोंद घेऊन त्यांचा अनुभव इतर शाळांना लाभावा, यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे.


शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये गुणवत्तेमध्ये आलेल्या सर्व विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहनपर लाभ देण्याचा विचार सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीनंतर हेल्थ कार्ड देण्यात येणार असून गंभीर आजारांवर मोफत उपचाराची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे. राज्यात सीबीएससी पॅटर्नमधील चांगल्या बाबींचा स्वीकार करत, त्यानुसार राज्याच्या अभ्यासक्रमात सुधारणा केल्या जाणार आहेत. तथापि राज्य शिक्षण मंडळ, बालभारती राज्याचा इतिहास, भूगोल याविषयी कुठेही तडजोड होणार नाही. विद्यार्थ्यांसाठी सर्व उपक्रम राबविताना गुणवत्तापूर्ण आनंददायी व सर्वसमावेशक शिक्षण देण्याच्या दिशेने राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे श्री.भुसे यांनी स्पष्ट केले

केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी परीक्षा 2024

 केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी परीक्षा 2024

            केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी सप्टेंबर 2024 मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली.  जानेवारी - एप्रिल 2025 दरम्यान परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या परिक्षेच्या निकालातील उत्तीर्ण 1009 उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध सेवेतील पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. यामध्ये सर्वसाधारण गटातून 335आर्थिक मागास प्रवर्गातून  (ईडब्ल्यूएस) 109इतर मागासवर्गीय प्रवर्गातून (ओबीसी) - 318अनुसूचित जाती प्रवर्गातून (एससी) - 160अनुसूचित जमाती प्रवर्गातून- 87  उमेदवारांचा समावेश आहे. एकूण यशस्वी उमेदवारांमध्ये 725 पुरूष तर 284 महिला उमेदवार आहेत.

एकूण यशस्वी उमेदवारांमध्ये 50  दिव्यांग आहेत. लोकसेवा आयोगाने 230 उमेदवारांची आरक्षित सूची (Reserve List)  तयार केली आहे. यामध्ये  सामान्य गट 115आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 35,  इतर मागास वर्ग 59अनुसूचित जाती 14अनुसूचित जमाती  06दिव्यांग 01  उमेदवारांचा समावेश आहे.

या रिक्त पदांवर उमेदवार होतील रूजू

भारतीय प्रशासन सेवा (आयएएस) या सेवेत शासनाकडे एकूण 180 जागा रिक्त आहेत. यामध्ये सर्वसाधारण  73आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 18 इतर मागास वर्ग (ओबीसी) 52अनुसूचित जाती (एससी)  24अनुसूचित जमाती (एसटी) 13  जागा रिक्त आहेत. उमेदवारांच्या गुणानुक्रमे रिक्त जागांवर यशस्वी उमेदवारांची निवड केली जाईल.

भारतीय विदेश सेवा (आयएफएस) या सेवेत शासनाकडे एकूण  55 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (ओपन)  23आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 05,  इतर मागास वर्ग (ओबीसी)  13अनुसूचित जाती (एससी)  09अनुसूचित जमाती (एस.टी.)  05 जागा रिक्त आहेत.

भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) या सेवेमध्ये एकूण  147 जागा रिक्त आहेतयामध्ये सामान्य गटातून (ओपन)  60,  आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 14,  इतर मागास प्रवर्गातून 41अनुसूचित जाती प्रवर्गातून  22तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून  10  उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे.

केंद्रीय सेवा गट अ - या सेवेमध्ये एकूण  605 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) - 244आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 57 , इतर मागास प्रवर्गातून - 168अनुसूचित जाती प्रवर्गातून - 90 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून 46  उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल.

केंद्रीय सेवा गट ब - या सेवेमध्ये एकूण – 142   जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) - 55आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस)  15 उमेदवारइतर मागास प्रवर्गातून - 44अनुसूचित जाती प्रवर्गातून – 15 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून -13 उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.

एकूण 241 उमेदवारांची निवड तात्पुरत्या स्वरुपाची  आहे. अधिकृत निकाल व यशस्वी उमदेवारांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

यावर्षीच्या उत्तीर्ण उमेदवारामध्ये महाराष्ट्राचा श्री. डोंगरे अर्चित पराग (रोल क्र. ०८६७२८२)  यांनी वेल्लोर व्हीआयटी येथून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये पदवीधर (बी.टेक.) असून युपीएससी परीक्षेत तत्वज्ञान हा पर्यायी विषय घेऊन देशभरात  तिसरा क्रमांक पटकावला आहे.

पहिल्या २५ उमेदवारांमध्ये ११ महिला आणि १४ पुरुष आहेत. त्यांची शैक्षणिक पात्रता आयआयटीएनआयटीव्हीआयटीजेएनयूदिल्ली विद्यापीठ आणि अलाहाबाद विद्यापीठ यासारख्या देशातील प्रमुख संस्थांमधून अभियांत्रिकीविज्ञानवाणिज्यवैद्यकीय विज्ञान आणि वास्तुकला या विषयातील पदवीपर्यंत आहे.

            पहिल्या २५ यशस्वी उमेदवारांनी लेखी (मुख्य) परीक्षेत मानववंशशास्त्रवाणिज्य आणि लेखाशास्त्रभूगोलगणिततत्वज्ञानभौतिकशास्त्रराज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंधसार्वजनिक प्रशासनसमाजशास्त्र आणि तमिळ भाषेचे साहित्य यासह विविध पर्यायी विषयांची निवड केली आहे

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2024 चा अंतिम निकाल जाहीर महाराष्ट्रातून 90 हून अधिक उमेदवार यशस्वी

 केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2024 चा

अंतिम निकाल जाहीर

महाराष्ट्रातून 90 हून अधिक उमेदवार यशस्वी

 

नवी दिल्‍लीदि. 22 : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2024 चा अंतिम निकाल जाहीर झाला असून  देशभरातून एकूण 1009 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातून 90 हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. अर्चित पराग डोंगरे राज्यातून  प्रथम आले असून देशात 3 रा क्रमांक पटकाविला आहे. तर शिवांश सुभाष जगदाळे यांना 26वी ऑल इंडिया रँक मिळाला  आहे. पहिल्या 100 मध्ये राज्यातील 7 उमेदवार आहेत.

राज्यातून यशस्वी झालेले उमेदवार

अर्च‍ित पराग डोंगरे (03) शिवांश सुभाष जगदाळे (26) शिवानी पांचाळ (53) अदिती संजय चौघुले  (63) साई चैतन्य जाधव (68) विवेक शिंदे (93) तेजस्वी प्रसाद देशपांडे (99)  दिपाली मेहतो (105) ऐश्वर्या मिलिंद जाधव (161) शिल्पा चौहान (188) कृष्णा बब्रुवान पाटील (197) गौरव गंगाधर कायंदे पाटील (250) मोक्ष दिलीप राणावत (251)प्रणव कुलकर्णी (256)  अंकित केशवराव जाधव (280) आकांश धुळ (295) जयकुमार शंकर आडे (300) अंकिता अनिल पाटील (303) पुष्पराज नानासाहेब खोत (304) राजत श्रीराम पात्रे (305) पंकज पाटले (329) स्वामी सुनील रामलिंग (336)अजय काशीराम डोके (364) श्रीरंग दीपक कावोरे (396) वद्यवत यशवंत नाईक (432) मानसी नानाभाऊ साकोरे (454) केतन अशोक इंगोले (458) बच्छाव कार्तिक रवींद्र (469) अमन पटेल (470) संकेत अरविंद शिंगाटे (479) राहुल रमेश आत्राम (481) चौधर अभिजीत रामदास (487) बावणे सर्वेश अनिल (503) आयुष राहुल कोकाटे (513) बुलकुंडे सावी श्रीकांत (517)  पांडुरंग एस कांबळी (529) ऋषिकेश नागनाथ वीर (556)  श्रुती संतोष चव्हाण (573) रोहन राजेंद्र पिंगळे (581) अश्विनी संजय धामणकर (582) अबुसलीया खान कुलकर्णी (588) सय्यद मोहम्मद आरिफ मोईन (594)वेदांत माधवराव पाटील (601) अक्षय विलास पवार (604) दिलीपकुमार कृष्ण देसाई (605) गायकवाड ऋषिकेश राजेंद्र (610) स्वप्नील बागल (620) सुशील गिट्टे (623)  सौरव राजेंद्र ढाकणे (628) अपूर्व अमृत बलपांडे (649) कपिल लक्ष्मण नलावडे (662) सौरभ येवले (669) नम्रता अनिल ठाकरे (671) ओंकार राजेंद्र खुंताळे (673) यश कनवत (676) बोधे नितीन अंबादास (677) ओमप्रसाद अजय कंधारे (679) प्रांजली खांडेकर (683) सचिन गुणवंतराव बिसेन (688)  प्रियंका राठोड (696) अक्षय संभाजी मुंडे (699)अभय देशमुख (704) ज्ञानेश्वर बबनराव मुखेरकर (707) विशाल महार (714) अतुल अनिल राजुरकर (727) अभिजित सहादेव आहेर (734) भाग्यश्री राजेश नायकेले (737) श्रीतेश भूपेंद्र पटेल (746) शिवांग अनिल तिवारी (752) पुष्कर लक्ष्मण घोळावे (792) योगेश ललित पाटील (811) श्रुष्टी सुरेश कुल्ये (831) संपदा धर्मराज वांगे (839) मोहिनी प्रल्हाद खंदारे (844) सोनिया जागरवार (849) अजय नामदेव सरवदे (858) राजू नामदेव वाघ (871) अभिजय पगारे (886) हेमराज हिंदुराव पनोरेकर (922) प्रथमेश सुंदर बोर्डे (926)गार्गी लोंढे (939) सुमेध मिलिंद जाधव (942) आनंद राजेश सदावर्ती (945) जगदीश प्रसाद खोकर (958) विशाखा कदम (962) सचिन देवराम लांडे (964) आदित्य अनिल बामणे (1004

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2024 चा अंतिम निकाल जाहीर महाराष्ट्रातून 90 हून अधिक उमेदवार यशस्वी

 केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2024 चा

अंतिम निकाल जाहीर

महाराष्ट्रातून 90 हून अधिक उमेदवार यशस्वी

 

नवी दिल्‍लीदि. 22 : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2024 चा अंतिम निकाल जाहीर झाला असून  देशभरातून एकूण 1009 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातून 90 हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. अर्चित पराग डोंगरे राज्यातून  प्रथम आले असून देशात 3 रा क्रमांक पटकाविला आहे. तर शिवांश सुभाष जगदाळे यांना 26वी ऑल इंडिया रँक मिळाला  आहे. पहिल्या 100 मध्ये राज्यातील 7 उमेदवार आहेत.

राज्यातून यशस्वी झालेले उमेदवार

अर्च‍ित पराग डोंगरे (03) शिवांश सुभाष जगदाळे (26) शिवानी पांचाळ (53) अदिती संजय चौघुले  (63) साई चैतन्य जाधव (68) विवेक शिंदे (93) तेजस्वी प्रसाद देशपांडे (99)  दिपाली मेहतो (105) ऐश्वर्या मिलिंद जाधव (161) शिल्पा चौहान (188) कृष्णा बब्रुवान पाटील (197) गौरव गंगाधर कायंदे पाटील (250) मोक्ष दिलीप राणावत (251)प्रणव कुलकर्णी (256)  अंकित केशवराव जाधव (280) आकांश धुळ (295) जयकुमार शंकर आडे (300) अंकिता अनिल पाटील (303) पुष्पराज नानासाहेब खोत (304) राजत श्रीराम पात्रे (305) पंकज पाटले (329) स्वामी सुनील रामलिंग (336)अजय काशीराम डोके (364) श्रीरंग दीपक कावोरे (396) वद्यवत यशवंत नाईक (432) मानसी नानाभाऊ साकोरे (454) केतन अशोक इंगोले (458) बच्छाव कार्तिक रवींद्र (469) अमन पटेल (470) संकेत अरविंद शिंगाटे (479) राहुल रमेश आत्राम (481) चौधर अभिजीत रामदास (487) बावणे सर्वेश अनिल (503) आयुष राहुल कोकाटे (513) बुलकुंडे सावी श्रीकांत (517)  पांडुरंग एस कांबळी (529) ऋषिकेश नागनाथ वीर (556)  श्रुती संतोष चव्हाण (573) रोहन राजेंद्र पिंगळे (581) अश्विनी संजय धामणकर (582) अबुसलीया खान कुलकर्णी (588) सय्यद मोहम्मद आरिफ मोईन (594)वेदांत माधवराव पाटील (601) अक्षय विलास पवार (604) दिलीपकुमार कृष्ण देसाई (605) गायकवाड ऋषिकेश राजेंद्र (610) स्वप्नील बागल (620) सुशील गिट्टे (623)  सौरव राजेंद्र ढाकणे (628) अपूर्व अमृत बलपांडे (649) कपिल लक्ष्मण नलावडे (662) सौरभ येवले (669) नम्रता अनिल ठाकरे (671) ओंकार राजेंद्र खुंताळे (673) यश कनवत (676) बोधे नितीन अंबादास (677) ओमप्रसाद अजय कंधारे (679) प्रांजली खांडेकर (683) सचिन गुणवंतराव बिसेन (688)  प्रियंका राठोड (696) अक्षय संभाजी मुंडे (699)अभय देशमुख (704) ज्ञानेश्वर बबनराव मुखेरकर (707) विशाल महार (714) अतुल अनिल राजुरकर (727) अभिजित सहादेव आहेर (734) भाग्यश्री राजेश नायकेले (737) श्रीतेश भूपेंद्र पटेल (746) शिवांग अनिल तिवारी (752) पुष्कर लक्ष्मण घोळावे (792) योगेश ललित पाटील (811) श्रुष्टी सुरेश कुल्ये (831) संपदा धर्मराज वांगे (839) मोहिनी प्रल्हाद खंदारे (844) सोनिया जागरवार (849) अजय नामदेव सरवदे (858) राजू नामदेव वाघ (871) अभिजय पगारे (886) हेमराज हिंदुराव पनोरेकर (922) प्रथमेश सुंदर बोर्डे (926)गार्गी लोंढे (939) सुमेध मिलिंद जाधव (942) आनंद राजेश सदावर्ती (945) जगदीश प्रसाद खोकर (958) विशाखा कदम (962) सचिन देवराम लांडे (964) आदित्य अनिल बामणे (1004)   

मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रकल्पग्रस्तांच्या घरांची निर्मिती, वितरण धोरणात सुधारणा

 मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी

प्रकल्पग्रस्तांच्या घरांची निर्मितीवितरण धोरणात सुधारणा

मुंबईतील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या बांधकामामुळे बाधित होणाऱ्यांसाठी जास्तीत जास्त सदनिकांचे उपलब्ध व्हाव्यात यासाठीच्या आणि त्यांच्या वितरणाच्या सुधारित धोरणास आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयाच्या अनुषंगाने गृहनिर्माण विभागाच्या यापुर्वीच्या १९ ऑगस्ट २०२४ च्या शासन निर्णयात सुधारणा व  स्पष्टीकरणाचा समावेश करण्यात येणार आहे.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनेक पायाभूत प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांच्या कामांमुळे बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांसाठी घरांची (सदनिका) मोठ्या प्रमाणात गरज भासणार आहे. यासाठी अशा सदनिका मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हाव्यात यासाठीन्या. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली (Task Force) कृती दल स्थापना करण्यात आले होते. या दलाने अहवाल सादर अशा सदनिकांची संख्या वाढविण्यासाठी शासनास विविध शिफारशी केल्या होत्या. त्याबाबतचा शासन निर्णय़ १९ ऑगस्ट २०२४ रोजी काढण्यात आला आहे. या निर्णयातील परिच्छेद क्रमांक १ मधील क्रमांक १० व ११ मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.  त्यानुसार शासकीय जमिनीवरील विनिमय ३३ (१०) उपखंड ३.२ व ३.८ अनुसार झोपड पट्टी पुनवर्सन योजनेच्या विकासकास सार्वजनिक बांधिव सुविधेच्या मोबदल्यात इन-सिटू वाढीव चटईक्षेत्र (incentive FSI) देण्याच्या तसेच समायोजन (Clubbing/Amalgamation)  संबधातील मुद्द्याच्या अनुषंगाने झोपडीधारक यांची अदलाबदल करण्याची आवश्यकता राहणार नाहीअशा तरतूदींचा समावेश करण्यात आला आहे.  याबाबतचे सविस्तर शासन शुद्धीपत्रक प्रसिद्धीस देण्यात येणार आहे

चंद्रपूर आणि कोल्हापूर येथे प्रायोगिक तत्त्वावर ‘स्वस्थ जन्म अभियान’

 चंद्रपूर आणि कोल्हापूर येथे प्रायोगिक तत्त्वावर 

स्वस्थ जन्म अभियान

- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

 

मुंबईदि. २२ : महिलाचे प्रसुतीपूर्व आणि प्रसुतीपश्चात आरोग्य उत्तम राहावे. बॉडी मास इंडेक्स (बीएमआय)रक्तदाब, हिमोग्लोबिन प्रमाणथायरॉईड संप्रेरकांचे कार्य आणि रक्तातील साखरेचे प्रमाण या महत्त्वपूर्ण घटकांवर लक्ष राहावे. गर्भधारणेपूर्वी या महत्वपूर्ण घटकांचे अनुकूलन व्हावेयासाठी प्रायोगिक तत्वावर प्रथम चंद्रपूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील सर्व महिलांची आरोग्य तपासणी करून स्वस्थ जन्म अभियान’ मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी बैठकीत दिली.

माझे आरोग्यमाझ्या हाती’ या अभियानांतर्गत बैठकीचे मंत्रालयात आयोजन करण्यात आले. या बैठकीत आमदार सुधीर मुनगंटीवारआरोग्य सेवा संचालक डॉ.नितीन अंबाडेकरइंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ.मंगेश गुलवाडेचंद्रपूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारीफेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनेकोलॉजिस्ट्स सोसायटीज ऑफ इंडिया (FOGSI) च्या डॉ.सुनीता तांदुलवाडकर तसेच दूरदृश्यप्रणालीद्वारे कोल्हापूर आणि चंद्रपूरचे जिल्हाधिकारी उपस्थित होते.

आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले कीगर्भधारणेच्या वेळी प्रत्येक महिलांच्या आरोग्याची नियमित तपासणी झाली पाहिजे. यासाठी गर्भवती महिलांच्या सदृढ आरोग्यासाठी फॉग्सी आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आयव्हीएचएम’ यांच्यासोबत प्रायोगिक तत्त्वावर चंद्रपूर आणि कोल्हापूरमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. हे अभियान राबविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात यावी. या समितीत शासकीय सदस्य म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीजिल्हा आरोग्य अधिकारीवैद्यकीय अधिकारी आणि अशासकीय सदस्य म्हणून फॉग्सी आणि आयव्हीएमएमचे सदस्य घेण्यात येईल.

गर्भधारणेचा काळ फक्त नऊ महिन्यांचा प्रवास नसून गर्भधारणेपूर्वीचा कालावधी हा मातेचे आरोग्य अनुकूल करण्यासाठी आणि गर्भधारणेच्या प्रतिकूल परिणामांचा धोका कमी करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षमता निरोगी गर्भधारणा, सुरक्षित प्रसुतीसाठी महत्वपूर्ण ठरते. गर्भधारणेपूर्वी या महत्वपूर्ण घटकांचे अनुकूलन नसेल तर रक्तक्षयगर्भधारणेदरम्यान मधुमेहउच्च रक्तदाबअकाली प्रसूतीजन्माच्या वेळी बाळाचे कमी वजन आणि गर्भधारणेशी संबंधित इतर गंभीर समस्यांसह गुंतागुंत होण्याचा धोका संभवतो. यासाठी स्वस्थ जन्म अभियान’ चंद्रपूर आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लवकरच सुरू करण्यात येईल. या अभियानाच्या यशस्वीतेनंतर ते सर्व राज्यभर राबविण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

आरोग्यमंत्री श्री. आबिटकर म्हणाले कीकोल्हापूर जिल्ह्यामध्ये पिंक ओपीडी सुरू करण्यात आली आहे. चंद्रपूर येथे स्मार्ट पीएससी करण्यात येत आहे. राज्यातील जनतेचे आरोग्य उत्तम राहावेयासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यासाठी उत्तम आरोग्यसेवा देण्यासाठी सर्व रूग्णालयातील पदभरती तातडीने करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

000

Featured post

Lakshvedhi