केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी परीक्षा 2024
केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी सप्टेंबर 2024 मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली. जानेवारी - एप्रिल 2025 दरम्यान परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या परिक्षेच्या निकालातील उत्तीर्ण 1009 उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध सेवेतील पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. यामध्ये सर्वसाधारण गटातून 335, आर्थिक मागास प्रवर्गातून (ईडब्ल्यूएस) 109, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून (ओबीसी) - 318, अनुसूचित जाती प्रवर्गातून (एससी) - 160, अनुसूचित जमाती प्रवर्गातून- 87 उमेदवारांचा समावेश आहे. एकूण यशस्वी उमेदवारांमध्ये 725 पुरूष तर 284 महिला उमेदवार आहेत.
एकूण यशस्वी उमेदवारांमध्ये 50 दिव्यांग आहेत. लोकसेवा आयोगाने 230 उमेदवारांची आरक्षित सूची (Reserve List) तयार केली आहे. यामध्ये सामान्य गट 115, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 35, इतर मागास वर्ग 59, अनुसूचित जाती 14, अनुसूचित जमाती 06, दिव्यांग 01 उमेदवारांचा समावेश आहे.
या रिक्त पदांवर उमेदवार होतील रूजू
भारतीय प्रशासन सेवा (आयएएस) या सेवेत शासनाकडे एकूण 180 जागा रिक्त आहेत. यामध्ये सर्वसाधारण 73, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 18 इतर मागास वर्ग (ओबीसी) 52, अनुसूचित जाती (एससी) 24, अनुसूचित जमाती (एसटी) 13 जागा रिक्त आहेत. उमेदवारांच्या गुणानुक्रमे रिक्त जागांवर यशस्वी उमेदवारांची निवड केली जाईल.
भारतीय विदेश सेवा (आयएफएस) या सेवेत शासनाकडे एकूण 55 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (ओपन) 23, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 05, इतर मागास वर्ग (ओबीसी) 13, अनुसूचित जाती (एससी) 09, अनुसूचित जमाती (एस.टी.) 05 जागा रिक्त आहेत.
भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) या सेवेमध्ये एकूण 147 जागा रिक्त आहेत, यामध्ये सामान्य गटातून (ओपन) 60, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 14, इतर मागास प्रवर्गातून 41, अनुसूचित जाती प्रवर्गातून 22, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून 10 उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे.
केंद्रीय सेवा गट अ - या सेवेमध्ये एकूण 605 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) - 244, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 57 , इतर मागास प्रवर्गातून - 168, अनुसूचित जाती प्रवर्गातून - 90 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून –46 उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल.
केंद्रीय सेवा गट ब - या सेवेमध्ये एकूण – 142 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) - 55, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 15 उमेदवार, इतर मागास प्रवर्गातून - 44, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 15 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून -13 उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.
एकूण 241 उमेदवारांची निवड तात्पुरत्या स्वरुपाची आहे. अधिकृत निकाल व यशस्वी उमदेवारांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
यावर्षीच्या उत्तीर्ण उमेदवारामध्ये महाराष्ट्राचा श्री. डोंगरे अर्चित पराग (रोल क्र. ०८६७२८२) यांनी वेल्लोर व्हीआयटी येथून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये पदवीधर (बी.टेक.) असून युपीएससी परीक्षेत तत्वज्ञान हा पर्यायी विषय घेऊन देशभरात तिसरा क्रमांक पटकावला आहे.
पहिल्या २५ उमेदवारांमध्ये ११ महिला आणि १४ पुरुष आहेत. त्यांची शैक्षणिक पात्रता आयआयटी, एनआयटी, व्हीआयटी, जेएनयू, दिल्ली विद्यापीठ आणि अलाहाबाद विद्यापीठ यासारख्या देशातील प्रमुख संस्थांमधून अभियांत्रिकी, विज्ञान, वाणिज्य, वैद्यकीय विज्ञान आणि वास्तुकला या विषयातील पदवीपर्यंत आहे.
पहिल्या २५ यशस्वी उमेदवारांनी लेखी (मुख्य) परीक्षेत मानववंशशास्त्र, वाणिज्य आणि लेखाशास्त्र, भूगोल, गणित, तत्वज्ञान, भौतिकशास्त्र, राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध, सार्वजनिक प्रशासन, समाजशास्त्र आणि तमिळ भाषेचे साहित्य यासह विविध पर्यायी विषयांची निवड केली आहे
No comments:
Post a Comment