Tuesday, 22 April 2025

प्रशासनातील यशस्वी गोष्टींचे प्रमाणीकरण आवश्यक, सर्व विभागांनी टास्क फोर्स निर्माण करावा

 प्रशासनातील यशस्वी गोष्टींचे प्रमाणीकरण आवश्यक,

सर्व विभागांनी टास्क फोर्स निर्माण करावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. २१ : प्रशासनिक सेवेत महाराष्ट्र अग्रणी राज्य असून त्याचा आदर्श देशभरात घेतला जातो, या पार्श्वभूमीवर प्रशासनातील यशस्वी  गोष्टींचे प्रमाणीकरण होणे आवश्यक आहे. जेणेकरुन अधिकाऱ्यांच्या कल्पकतेतून यशस्वी केलेल्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचा व्यापक उपयोग होईलत्यादृष्टीने सर्व विभागांनी टास्क फोर्स निर्माण केला पाहिजेअसे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानातील सन २०२३-२४ तसेच सन २०२४-२५ या वर्षातील पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आलेत्यावेळी ते बोलत होते. यावेळी  कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढामुख्य सचिव सुजाता सौनिक आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीमहाराष्ट्राला शिवकालीन काळापासून प्रशासकीय कार्यपद्धतीचा उत्कृष्ट वारसा लाभलेला असून येत्या दहा पंधरा वर्षात राज्याला जागतिक स्तरावर अनेकविध संधी उपलब्ध होणार आहे. जगाच्या अर्थव्यवस्थेत देशाचे मजबूत स्थान निर्माण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला महत्वपूर्ण कामगिरी करणे गरजेचे आहेमहाराष्ट्राच्या सक्रिय सहभागातून देशाचे ध्येय साध्य होण्यास मोठे सहाय्य मिळते. यासर्वांत प्रशासकीय अधिका-यांचे योगदानगतिमानतापारदर्शक लोकाभिमुख कार्यपद्धतीचा स्विकार निश्चितचं महत्वाची भूमिका पार पाडणार आहे. महाराष्ट्राला ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था होण्यापासून कुणीही रोखू शकत नाहीकिंबहुना ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेचे हे ध्येय महाराष्ट्र  प्रशासनिक अधिकाऱ्यांच्या इच्छाशक्तीने मुदतीपूर्वीच साध्य करु शकते.  राज्य शासनाने राबवलेल्या शंभर दिवसाच्या संकल्पनेची यशस्वी अंमलबजावणी सर्व विभागांनी केली आहे. या संकल्पनेच्या यशाचे श्रेय हे प्रशासनिक अधिकाऱ्यांच्या इच्छाशक्तीचे असून काम पारदर्शक आणि गतीमानतेने यशस्वी होते याची अनेक उदाहरणे आहेत. विशेष म्हणजे लोकसेवेच्या भावनेतून केलेल्या कामाचे समाधान हे अधिका-यांनाही वेगळा आनंद देऊन जाते. अनेक ठिकाणी जेव्हा लोक वीस तीस वर्षांपूर्वी केलेल्या एखाद्या अधिका-याच्या कामाचा दाखला देता तेव्हा आपल्या कामातून मिळविलेली ही ओळख मोठी गोष्ट असते. चांगल्या भावनेतून केलेले काम हे यशस्वी होतेच. त्यातून अनेक गोष्टी शिकायला मिळतात .तंत्रज्ञानाचा व्यापक स्विकार आणि वापर हा गरजेचा आहे.अनेक विभागांच्या चांगल्या कल्पनांचे,निर्णयाचे प्रमाणिकरण व्हायला पाहिजेजेणेकरुन व्यापक स्तरावर त्या कामांचा लाभ इतरांनाही होईल.

प्रशासनात लोकाभिमुख दृष्टिकोनपारदर्शक कारभार आणि गतिशील कार्यपद्धती महत्वाची आहे.  यामुळे लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून  आणता येतो. लोकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी अधिका-यांची असते. लोकसेवेचा भाव मनात असेल तर ही जबाबदारी यशस्वी होते. अशा चांगल्या कार्याला पुरस्कार मिळणे, त्यातून इतरांना प्रेरणा मिळणे यादृ्ष्टीने पुरस्कार आणि त्यातुन मिळणारे प्रोत्साहन निश्चितच प्रेरणादायी आहे. ही ऊर्जा भविष्यातील कार्यासाठी देखील मार्गदर्शक ठरणार आहे.सर्व पुरस्कारार्थींचे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी अभिनंदन करुन नागरी सेवा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

  प्रास्ताविक मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी केले. तर यशदाचे अपर महासंचालक राहुल रंजन महिवाल यांनी आभार मानले. कार्यक्रमास माजी सनदी अधिकारी सुरेश कुमारके.पी.बक्षीस्वाधिन क्षत्रीयअजित कुमार जैन यांच्यासह इतर सनदी अधिकारीपुरस्कारार्थी उपस्थित होते.

प्रशासनात गतिमानता आणण्यासाठी राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा’ हे अभियान दरवर्षी राबविण्यात येते. या अभियानातंर्गत तालुकाजिल्हाविभाग व राज्यस्तरावरील स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केलेली कार्यालये व सर्वोत्कृष्ट कल्पना / उपक्रम सुचविणाऱ्या शासकीय संस्थाअधिकारी व कर्मचारी यांना पारितोषिके देण्यात येतात.

कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांच्या वापराने जनसंपर्क क्षेत्रातील कामे प्रभावीपणे करावीत

 कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांच्या वापराने

जनसंपर्क क्षेत्रातील कामे प्रभावीपणे करावीत

प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह

मुंबईदि. २१ : आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात कृत्रिम बुद्धिमत्ता हे व्यवस्थापन व संवाद क्षेत्रात एक प्रभावी साधन ठरत आहे. जनसंपर्क क्षेत्र हे विश्वासावर चालते. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि चॅटजीपीटी (ChatGPT) आदीसारख्या तंत्रज्ञानांनी मोठा बदल घडवून आणला आहे. एआयचॅटजीपीटीकॅनव्हा आदी सगळी साधने आहेतयाचा वापर योग्यरित्या करायला शिका. या साधनांचा उपयोग करून जनसंपर्क क्षेत्रातील कामे अधिक चांगली आणि प्रभावीपणे करावीतअसे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले.

राष्ट्रीय जनसंपर्क दिनानिमित्त पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियामुंबई विभागाच्यावतीने प्रेस क्लब ऑफ इंडियामुंबई येथे आयोजित "कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदार वापर : जनसंपर्काची भूमिका" या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी अतिथी वक्ते द इकॉनॉमिक टाईम्सचे कार्यकारी संपादक मुकबिल अहमरइंडियन ऑइलच्या मुख्य महाव्यवस्थापक तथा पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियामुंबई विभागाच्या अध्यक्ष अनीता श्रीवास्तवकॉर्पोरेट अफेअर्स इंड ब्लेंडर्स अँड डिस्टिलर्स लिमिटेडचे संचालक तथा पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियामुंबई विभागाचे उपाध्यक्ष राजेश परिडासचिव डॉ. मिलिंद आवताडेखजिनदार अमलान मस्कारेनहासमुंबई विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाच्या प्राध्यापिका दैवता पाटीलजनसंपर्क आणि पत्रकारिता क्षेत्रातील विविध मान्यवर तसेच मुंबई विद्यापीठातील मास कम्युनिकेशन आणि पत्रकारिता अभ्यासक्रमाचे विद्यार्थी उपस्थित होते.

प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह म्हणालेजरी ‘एआय’ला मानवी भावना समजत नसल्या तरीहीभावना विश्लेषण आणि प्रतिक्रिया संकलनात त्याची कार्यक्षमता खूप आहे. तंत्रज्ञान सतत बदलतंय. जो नवीन गोष्टी शिकत राहतोतोच टिकतो. त्यामुळे आज ‘एआय’ आहेउद्या दुसरं काही येईलपण तुम्ही शिकण्याची आणि जुळवून घेण्याची वृत्ती ठेवलीतर तुम्ही कुठेही कमी पडणार नाही. ‘एआय’ आणि चॅटजीपीटी सारख्या तंत्रज्ञानांनी खरंच खूप मोठा बदल घडवून आणलाय. जिथे पूर्वी मानवी मेंदूची गरज असायचीआज तिथे मशीन हे काम करतंय आणि बऱ्याच वेळा ते अधिक जलदअधिक अचूक पद्धतीनं करतंय. पण यातून घाबरण्यापेक्षा शिकण्याची आणि स्वतःला नव्यानं सिद्ध करण्याची गरज आहे. कारण कोणतंही यंत्र मानवी कल्पकतेशीअनुभवाशी आणि सहानुभूतीशी स्पर्धा करू शकत नाही. भाषांतर करणेलेख लिहणेव्हीज्युअल तयार करणेअहवाल तयार करणे असो  किंवा कोणत्याही भाषेत सोशल मीडियासाठी पोस्ट्स बनवणे असो ‘एआय’ लगेच करू शकतं असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कृत्रिम बुद्धिमत्ता एक वेगळेच पाऊल आहे. कारण पहिल्यांदाच एखाद्या तंत्रज्ञानाला निर्णय घेण्याची क्षमता आहे. संगणक टायपरायटरची जागा घेऊ शकतोपण तो मानवी आदेशावर चालतो. ‘एआय’ मात्र स्वतः शिकतो आणि निर्णय घेतो. जगातील ६० देशांनी राष्ट्रीय एआय धोरण तयार केले आहेअसे द इकॉनॉमिक टाईम्सचे कार्यकारी संपादक मुकबिल अहमर  यांनी सांगितले.

‘एआय’वर १४२ अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली आहेपुढच्या काही वर्षांत ती २०० अब्ज डॉलरपर्यंत जाणार आहे. तसेच ५५ टक्के कंपन्यांकडे एआय बोर्ड आहेआणि ५४ टक्के कंपन्यांकडे मुख्य कृत्रिम बुद्धिमत्ता अधिकारी या पदावर काम करणारे अधिकरी आहेत. हा फक्त ट्रेंड नाहीहे तर क्रांती आहे. एआय सर्व क्षेत्रांत बदल घडवत असल्याचे श्री. अहमर यांनी यावेळी सांगतिले.

000

Monday, 21 April 2025

राज्याचा कौशल्य विभाग काळाची गरज ओळखून मार्गक्रमण करत आहे -

 राज्याचा कौशल्य विभाग काळाची गरज ओळखून मार्गक्रमण करत आहे

- राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्ण यांचे प्रतिपादन

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा दुसऱ्या वर्धापन दिनाचा समारोप

मुंबई. दि.१९: काळाची गरज ओळखून रतन टाटा महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठ विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करून जगभरात भारतीय कुशल मनुष्यबळ पुरवत आहेही आनंदाची बाब आहे असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. रतन टाटा महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाच्या दुसऱ्या वर्धापन दिनाच्या समारोप कार्यक्रमात राज्यपाल राधाकृष्णन विद्यार्थ्यांना संबोधित करत होते.

एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूल येथे रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा दुसऱ्या वर्धापन दिनाचा समारोप कार्यक्रम पार पडला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन होते. त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाच्या वर्धापन दीन समारोपात कौशल्य रोजगार उद्योजक्ता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढाविभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा वर्मामहाराष्ट्र राज्य रतन टाटा कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकरएआयसीटीईचे अध्यक्ष डॉ. टी. जी. सितारामराज्यपालांचे सचिव डॉ.प्रशांत नारनवरेव्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालिका  माधवी सरदेशमुखकौशल्य विभाग आयुक्त नितीन पाटील उपस्थित होते.

            राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन पुढे म्हणाले कीरतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने AI तंत्रज्ञानअभियांत्रिकीवाणिज्य आणि मीडिया या क्षेत्रात कौशल्य शिक्षण आणि प्रशिक्षणाचा प्रारंभ केला आहेहे अतिशय आनंददायक आणि उल्लेखनीय आहे. बदलत्या काळात आपल्या पारंपरिक कौशल्याच्या पलीकडे जाऊन आपण नवी पिढी घडवली पाहिजेत्यासाठी आपल्या शिक्षकांनीही नवी संकल्पना समजून घेऊन त्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना द्यायला हवे. रतन टाटा महाराष्ट्र कौशल्य विभागाच्या कुलगुरू श्रीमती अपूर्वा पालकर या दृष्टिकोनातून योगदान देत असल्याबाबत त्यांचेही अभिनंदन करतो असेहीराज्यपाल राधाकृष्णन यांनी यावेळी नमूद केले.

आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. विकसित राष्ट्र निर्माण करण्याच्या दृष्टीने त्यांनी सुरू केलेला 'स्किल इंडिया हा उपक्रम या संकल्पात महत्वाचा भाग आहे. जागतिक कौशल्य आत्मसात करताना परदेशी भाषा शिक्षण अतिशय महत्वाचे आहे. राज्याच्या कौशल्य विभागाने जर्मन भाषा विद्यार्थ्यांना शिकवून मनुष्यबळ पुरवण्याचा अतिशय योग्य निर्णय घेतला असल्याचेही राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी एखादी तरी जागतिक भाषा शिकावीअसे आवाहनही यावेळी राज्यपालांनी केले. जगात आवश्यक असलेले मनुष्यबळ पुरवण्यासाठी आपल्या महाराष्ट्रात मोठा वाव असल्याचेही ते म्हणाले. 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) कौशल्यभारतीय मूल्ये आणि एकात्मिक शैक्षणिक प्रणालीवर भर देत आहे. मुख्य प्रवाहातील शिक्षणामध्ये कौशल्याधारित शिक्षणाचा समावेश केल्याने जागतिक स्तरावर रोजगाराभिमुख संधी उपलब्ध होऊ शकते. यासंदर्भात रतन महाराष्ट्र विद्यापीठाने आधीच आर्टिफिशियल इंटेलिजन्स( AI ), रिअल इस्टेटसेवा क्षेत्रआणि  औद्योगिक व्यवस्थापनात हजारो  विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यास प्रारंभ केला आहेही अतिशय जमेची बाजू असल्याचे राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले.

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की,राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन हे आमचे ऊर्जास्त्रोत असल्याचे सांगितले. त्यांच्या सहकार्याने विद्यापीठ नव्या उंचीवर जाणार असल्याचेही लोढाजी म्हणाले.

रतन टाटा महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू श्रीमती अपूर्वा पालकर यांनी यावेळी  विद्यापीठात सुरू असलेल्या कोर्सेसची तसेच मुंबईनवी मुंबईपुणे आणि नागपूर केंद्रात सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. या विद्यापीठात शिक्षित झालेला स्नातक जगाच्या कानाकोपऱ्यात आपले भवितव्य घडवायची क्षमता ठेवतो. राज्यशासनाच्या वतीने लवकरच अद्ययावत सुविधांसह पनवेल इथे विद्यापीठाची भव्य वास्तू उभारण्यात येणार असल्याची माहितीही  कुलगुरू डॉ. पालकर यांनी यावेळी दिली.

राज्यातल्या युवकांना जर्मनीत काम करण्याची संधी कौशल्य विभागाने मिळवून दिली असून विविध स्तरावर यावर उपक्रम राबवण्यात येत असल्याचे कौशल्य विभागाच्या अप्पर मुख्य सचिवआयुक्त श्रीमती मनीषा वर्मा यांनी स्पष्ट केले. रतन टाटा महाराष्ट्र विद्यापीठात थिअरी बरोबरच प्रशिक्षणावर अधिक भर दिला जात आहे. त्यामुळे अनेक उद्योगक्षेत्राकडून या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मोठी मागणी निर्माण होणार आहे. परदेशी कंपन्यांसोबत कराराच्या प्रक्रिया पूर्णत्वाला जात असून हे विद्यापीठ जगात एक ब्रँड म्हणून नावाजले जाईलअसा विश्वास वर्मा यांनी यावेळी व्यक्त केला.

विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्या सांगता समारंभात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचाही सन्मान करण्यात आला. आदर्श प्राध्यापक संदीप जैनआदर्श युवा प्राध्यापक अनिरुद्ध चव्हाणप्रशासकीय उल्लेखनीय कार्य मीना श्रीमाळीग्रंथपाल मीनाक्षी पाटील तर संत गाडगेबाबा स्वच्छ भारत कौशल्य प्रबोधिनीचे पारितोषिक दीप्ती जाधव यांना देण्यात आले.  उत्कृष्ट स्टार्ट अप गटात एक लाख रुपयांचे पारितोषिक वैष्णवी कोठावडे यांना दुसरे दोन लाखांचे पारितोषिक साक्षी पारेख यांना तर तीन लाखांचे पाहिले पारितोषिक विष्णुदास विश्वकर्मा यांना राज्यपालांचे हस्ते देण्यात आले.

0000

बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार

 बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर

ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार

-अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

 

मुंबई दि.१९:- बनावट पनीर किंवा चीज ऍनालॉग वापरणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत कडक कारवाई करण्यात येत आहे. पनीरसारख्या बनावट पदार्थाची विक्री केल्याचे आढळून आल्यास अशा व्यावसायिकांचे परवाने रद्द करण्यात येतीलअसा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे.

मंत्री श्री. झिरवाळ यांनी सांगितलेपनीर हा  खाद्यपदार्थामधील आवडता पदार्थ असून त्याला बाजारात मोठी मागणी असते. विशेषतः लहान मुलांमध्ये पनीरची क्रेझ अधिक आहे. मात्र  काही ठिकाणी बनावट पनीर अथवा चीज ऍनालॉग’ वापरून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तपासणीत आढळून येते. अशा प्रकारे ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या पनीर विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006, तसेच 2011 आणि 2022 मधील नियमानुसार ही कारवाई केली जाईल.

अन्न सुरक्षा आणि मानके (लेबलिंग व डिस्प्ले नियमन) 2020 च्या नियमांनुसारविक्री होणाऱ्या अन्नपदार्थातील सर्व घटक व पोषणमूल्यांची माहिती ग्राहकांसमोर मांडणे बंधनकारक आहे. रेस्टॉरंटहॉटेलकॅटरर्स आणि फास्ट फूड विक्रेत्यांना आपल्या मेनू कार्ड्सडिस्प्ले बोर्ड्स आणि ऑर्डर मशीनवर अचूक माहिती देणे अनिवार्य आहे.

अन्न व औषध प्रशासन विभाग ग्राहकांच्या हितासाठी कटिबद्ध आहे. अन्नाच्या गुणवत्तेशी  कोणत्याही प्रकारची  तडजोड केली जाणार नाही.

रेस्टॉरंटहॉटेल व फास्ट फूड व्यावसायिकांकडून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास  आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ च्या कलम १८ (२)(e) नुसारग्राहकांना अन्नपदार्थातील घटकांची माहिती देणे बंधनकारक आहे. तसेचअन्न सुरक्षा व मानके (लेबलिंग आणि डिस्प्ले) नियमन २०२० च्या प्रकरण ३ मधील नियमन ९ (६) नुसारअन्न व्यावसायिकांनी अन्नपदार्थांची विक्री करताना पोषण संबंधित माहिती आणि त्यातील घटकांची माहितीतसेच आरोग्य संदेश प्रदर्शित करणे आवश्यक आहे.

अन्न व औषध प्रशासन सर्व अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील चीज अॅनालॉग वितरकांचे खरेदी-विक्री बिले तपासण्याचे निर्देश दिले आहेत. तसेचहॉटेलरेस्टॉरंटफास्ट फूड विक्रेते आणि केटरर्स यांची खरेदी बिले तपासूनपनीरच्या ऐवजी अॅनालॉगचा वापर करून ग्राहकांची फसवणूक केल्यासकिमान १० आस्थापनांची सखोल तपासणी करून अन्न नमुने घेऊन घाडी-जप्तीची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६नियम व नियमन २०११ तसेच अन्न सुरक्षा व मानके (अन्न व्यवसायिक परवाना व नोंदणी) नियमन २०११ मधील तरतुदींनुसार तात्काळ परवाना निलंबनाची कार्यवाही केली जाईल.

विभागीय सह आयुक्त (अन्न) आणि सहा आयुक्त (अन्न) यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील हॉटेल असोसिएशनच्या कार्यशाळा घेऊनपनीरच्या ऐवजी चीज अॅनालॉगचा वापर करत असल्यासत्याबाबत मेनू कार्डमध्ये उल्लेख करण्याबाबत तसेच कायद्यातील तरतुदींबाबत अवगत करावे. यासोबतचग्राहकांमध्ये याबाबत जनजागृती करावी.

ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला माफ केले जाणार नसून अन्न व्यावसायिकांनी नियमांचे पालन करून ग्राहकांना अचूक माहिती देणे आवश्यक आहे.

००००

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दर्जेदार आरोग्यसेवा दुर्गम भागांपर्यंत पोहोचवा

 तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दर्जेदार आरोग्यसेवा दुर्गम भागांपर्यंत पोहोचवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. 19 :   आरोग्यसेवेच्या सुविधांसाठी महाराष्ट्र एक महत्त्वपूर्ण केंद्र बनले आहे. राज्यात सर्व प्रकारच्या दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध आहेत.  ही गुणवत्तापूर्ण  आरोग्यसेवा समाजाच्या शेवटच्या टोकावरअतिदुर्गम भागात राहणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचली पाहिजे. यासाठी डॉक्टरांचीतज्ञांची मदत आवश्यक असून आजच्या तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण या शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवू शकतोअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 22 व्या मुंबई लाईव्ह इंडोस्कोपी अवॉर्ड 2025 चे वितरण करण्यात आलेत्यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ.अमित मायदेवडॉ.तरंग ग्यानचंदानीदेश विदेशातील डॉक्टर्स आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की,  देशातील प्रत्येक व्यक्तीला दर्जेदारसुलभ आणि परवडणारी आरोग्यसेवा मिळणे अत्यंत गरजेचं असून दर्जेदार आरोग्यसेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये महाराष्ट्रात दहा नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात डॉक्टरांची व आरोग्य सेवकांची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

इंडोस्कोपी क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या डॉक्टरांचा यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील डॉ.राधिका चव्हाण यांना वूमन इन इंडोस्कोपी’ अवॉर्डचंडीगड येथील डॉ. सुरेंदर राणा यांना इंडोस्कोपी एज्युकेटर’ अवॉर्डओडिशाचे डॉ.आशुतोष मोहपात्रा यांना लीडर फ्रॉम टायर 2/3 सिटीज’ अवॉर्डराजस्थानचे डॉ.मुकेश कल्ला यांना लीडरशिप’ अवॉर्डचंडीगड येथील डॉ.जयंत सामंता यांना इम्पॅक्टफुल पब्लिकेशन’ अवॉर्डमहाराष्ट्राचे डॉ.अमोल बापये आणि तेलंगणा येथील डॉ.मोहन रामचंदानी यांना टेक्निकल स्कील’ अवॉर्ड आणि महाराष्ट्राचे डॉ.प्रवीण सूर्यवंशी यांना इंडोस्कोपी फॉर सर्जन’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Rahul Pande takes oath as State Chief Information Commissioner 3 State Information Commissioners also sworn in

 Rahul Pande takes oath as State Chief Information Commissioner

3 State Information Commissioners also sworn in

 

Mumbai, 21st April : Governor C. P. Radhakrishnan today administered the Oath of office to the newly appointed State Chief Information Commissioner Rahul Pande at a brief swearing-in ceremony held at Raj Bhavan, Mumbai.

In the oath taking ceremony attended by State Chief Minister Devendra Fadnavis, the Governor also administered the  Oath of office to three State Information Commissioners - Ravindra Thakre, Prakash Indalkar and Gajanan Nimdev.

Earlier, Secretary to the Governor Dr. Prashant Narnaware read out the notification of appointment of the State Chief Information Commissioner and State Information Commissioners.

The oath taking began with National Anthem and State Song and concluded with the rendition of National anthem.

The oath-taking ceremony was attended by MLC Parinay Phuke,  Chief Secretary Sujata Saunik, Principal Secretary Brijesh Singh, senior journalists, and dignitaries from various walks of life.

राज्य मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ रवींद्र ठाकरे, प्रकाश इंदलकर, गजानन निमदेव यांना राज्य माहिती आयुक्त पदाची शपथ

 राज्यपालांकडून राहुल पांडे यांना

राज्य मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ

रवींद्र ठाकरेप्रकाश इंदलकरगजानन निमदेव यांना राज्य माहिती आयुक्त पदाची शपथ

 

मुंबई, दि. 21 : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी ज्येष्ठ पत्रकार राहुल पांडे यांना राज्याच्या मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राजभवन मुंबई येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभात राज्यपालांनी रवींद्र ठाकरेप्रकाश इंदलकर व गजानन निमदेव यांना देखील राज्य माहिती आयुक्त पदाची शपथ दिली. 

सुरुवातीला राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे तसेच इतर माहिती आयुक्त यांच्या नियुक्तीची अधिसूचना वाचून दाखविली.

शपथविधी सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली तसेच समारोप राष्ट्रगीताने झाला.

शपथविधी सोहळ्याला विधान परिषद सदस्य परिणय फुकेमुख्य सचिव सुजाता सौनिकप्रधान सचिव तथा माहिती व जनसंपर्क महासंचालक ब्रिजेश सिंहपत्रकार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

0000

Featured post

Lakshvedhi