Sunday, 20 April 2025

मुंबईकरांची पुढच्या 25 वर्षाची तहान भागवणाऱ्या गारगाई धरणाला कालच मान्यता दिल्याबद्दल

 मुंबईकरांची पुढच्या 25 वर्षाची तहान भागवणाऱ्या गारगाई धरणाला कालच मान्यता दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी यांचे आभार व्यक्तं करण्यासाठी “धन्यवाद देवेंद्रजी” अशी अभिनंदन स्वाक्षरी मोहीम कांदिवली पूर्व विधानसभेतस्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी राबवली. महाविकास आघाडी सरकारने पर्यावरणाच्या नावाखाली गारगाई धारण रद्द केल्यानंतर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांनी या निर्णयाचे वर्णन 'शुद्ध वेडेपणा' या शब्दात केला होता, याची देखील आठवण भातखळकर यांनी करून दिली.


पोलादपूर, महाड, माणगाव तालुका क्रीडा संकुलाच्या कामास गती द्यावी

 पोलादपूरमहाडमाणगाव तालुका 

क्रीडा संकुलाच्या कामास गती द्यावी

- क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे

 

मुंबई, दि. ८ : तालुका क्रीडा संकुल पोलादपूरसाठी आरक्षित जागेची पाहणी करून संकुलासाठी जागा संपादित करण्याची कार्यवाही करण्यात यावी. माणगावमहाड येथील क्रीडा संकुलात खेळाडूंसाठी अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या कार्यवाहीस गती देण्याचे निर्देश क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.  

रायगड येथील पोलादपूरमहाडमाणगाव येथे तालुका क्रीडा संकुल उभारण्यासंदर्भातील कामकाजाचा आढावा मंत्री श्री. भरणे यांनी घेतला. यावेळी रोजगार हमी योजना, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरत गोगावलेविभागाचे उपसचिव सुनिल पांढरेउपसंचालक नवनाथ फरताडेजिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ आदी उपस्थित होते.

मंत्री भरणे म्हणाले कीमाणगाव येथील क्रीडा संकुलात खेळाडूंसाठी बहुउद्देशीय सभागृहात बॅडमिंटन कोर्टसह चेंजिंग रूम व प्रसाधनगृहबंदिस्त प्रेक्षागृहबॅडमिंटन कोर्टधावनमार्गविविध खेळाचे मैदान अद्ययावत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच महाड क्रीडा संकुलाची डागडुजी करण्यात यावी. अद्ययावत टर्फचे फुटबॉल, क्रिकेट मैदान व त्या परिसरातील प्रचलित असलेल्या खेळांच्या क्रीडांगणांसाठीची कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

पद्मदुर्गचा समावेश गडकोट किल्ले संवर्धन योजनेत करणार

 पद्मदुर्गचा समावेश गडकोट किल्ले संवर्धन योजनेत करणार

मुरुड तालुक्यातील पद्मदुर्ग किल्याचं ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन या किल्ल्याचा समावेश गडकोट किल्लेसंवर्धन योजनेत करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला पद्मदूर्ग किल्ला बघण्याची अनेक इतिहासप्रेमी व पर्यटकांची इच्छा असतेजेट्टीचा अभाव आणि पुरेशा सोयींअभावी त्यांना पद्मदूर्ग किल्ल्यावर जाता येत नाही. त्यासाठी पद्मदूर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी पर्यटनजेट्टी उभारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे विचाराधीन आहे. त्यास केंद्र शासनाच्या पूरातत्व विभागाकडून मंजूरी मिळवण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावीअसे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले. मुरुड किल्ला परिसर आणि राजापूरी ग्रामपंचायत क्षेत्रातील अडचणी सोडवण्यासंदर्भात  तसेच श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे केंद्र शासन पुरस्कृत स्वदेश दर्शन योजनेतून मत्स्यालयपर्यटक निवारा केंद्र उभारण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागांचे अधिकारी तसेच रायगडचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना दिले आहेत.

----००००----


रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील विकास कामाचा आढळा

 डॉ. सी. डी. देशमुख जैवविविधतावने व उद्यानाचा विकास

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत संबंधित विषयांचा सखोल आढावा घेतला. कोकणचे सुपुत्रथोर अर्थतज्ज्ञ डॉ. चिंतामणराव देशमुख यांच्या कार्याच्या स्मतीप्रित्यर्थ जामगाव येथे उभारण्यात येत असलेल्या जैवविविधता आणि वनउद्यानासाठी निधीची उणीव भासू देणार नाही. सध्या सुरु असलेली कामे तातडीने पूर्ण करावीत. निसर्गपर्यटनाचा प्रस्ताव तात्काळ शासनाकडे पाठवावा. प्रस्तावाची पडताळणी करुन तातडीने मान्यता देण्यात येईल. आवश्यतेनुसार टप्प्याटप्याने निधी उपलब्ध केला जाईल. यासंदर्भातील प्रशासकीय कार्यवाही तातडीने पूर्ण करावीअसे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

तिसे येथील केदारजननी माता देवस्थान परिसरात रोपवे

रोहा तालुक्यातील मौजे तिसे येथील केदारजननी माता देवस्थानाच्या ठिकाणी रोपवे उभारणीसंदर्भातही बैठकीत चर्चा झाली. केंद्र शासनाच्या पर्वतमाला योजनेंतर्गत राज्यात कळसूबाईहरिश्चंद्रगडमाथेरानसिंहगडशिवनेरीराजगडभीमाशंकरलेण्याद्रीजेजुरीनिमगाव खंडोबा आदी 45 ठिकाणी रोपवे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. या यादीत तिसे येथील केदारजननी माता देवस्थानचा समावेश करण्यासंबंधीचा प्रस्ताव सादर करावा.  तो शासनाच्या मंजूरीसह केंद्र शासनाकडे पाठविण्यात येईल. हा प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यासाठी वनविभागाकडून आवश्यक परवानगी मिळविण्याची कार्यवाही तातडीने सुरु करावीअसे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. 

संभे गावाचे सुरक्षित स्थलांतर व पुनर्वसनाचे निर्देश

रोहा तालुक्यातील मौजे संभे गावाला भूस्खलन आणि दरड कोसळण्याचा असलेला धोका लक्षात घेऊन सुरक्षिततेसाठी सदर गावाचे स्थलांतर आणि पुनर्वसनाची कार्यवाही युद्धपातळीवर करावी. यासाठी आवश्यक प्रशासकीय बाबी तातडीने पूर्ण करुन घ्यावात. राज्य शासनासाठी नागरिकांचा जीव वाचवणे सर्वात महत्वाचे असल्याने धोकादायक गावांच्या स्थलांतरपूनर्वसनासंदर्भात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाहीअसा इशाराही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

रायगड जिल्ह्यात विविध प्रकल्प, विकासकामांना गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे यांची विशेष उपस्थिती

 रायगड जिल्ह्यात विविध प्रकल्पविकासकामांना गती देण्यासाठी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक

मंत्री आदिती तटकरेखासदार सुनील तटकरे यांची विशेष उपस्थिती

 

          जामगावच्या डॉ. सी. डी. देशमुख जैवविविधतावनउद्यानाचा विकास करणार

          मौजे तिसे येथील केदारजननी माता देवस्थानाच्या रोपवे निर्मितीचा प्रस्ताव

          मौजे संभे गावाचे सुरक्षित स्थलांतर व पुनर्वसनाची कार्यवाही तातडीने होणार

          गिरणे येथे खारभूमी संशोधन केंद्राच्या उभारणीचा मार्ग मोकळा

          दिवेआगर येथे स्वदेश दर्शन योजनेतून मत्स्यालयपर्यटक निवारा केंद्र

          पद्मदुर्ग किल्याचा गडकोट किल्लेसंवर्धन योजनेत समावेश करण्याचा प्रस्ताव

          मुरुड किल्ला आणि राजापूरी क्षेत्रातील अडचणी सोडवण्याबाबत चर्चा

 

मुंबईदि. ८ :- रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील जामगाव येथे उभारण्यात येत असलेल्या डॉ. सी. डी. देशमुख जैवविविधतावने व उद्यान प्रकल्पात राखीव वने तसेच निसर्ग पर्यटनस्थळांच्या विकासाचा ८० कोटींचा सुधारित प्रस्ताव तात्काळ सादर करावा. वित्त विभाग प्रस्तावाची पडताळणी करुन त्वरित मान्यता देईल तसेच आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध केला जाईल. उपलब्ध ३० कोटींच्या निधीतून  सध्या सुरु असलेली कामे तातडीने पूर्ण करावीतअसे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायगड जिल्ह्यातील विविध विकासकामांना गती देण्यासाठी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले. 

रायगड जिल्ह्यातील विकासकामांबाबत बैठकीत चर्चा

रायगड जिल्ह्याच्या  रोहा तालुक्यातील जामगाव येथील डॉ. सी. डी. देशमुख जैवविविधतावने व उद्यान प्रकल्पातील विकासकामेरोहा तालुक्यातील मौजे तिसे येथील केदारजननी माता देवस्थानाच्या ठिकाणी रोपवेची उभारणी करणेरोहा तालुक्यातील मौजे संभे या दरडप्रवण गावाचे सुरक्षिततेच्या कारणास्तव पुनर्वसन करणेतळा तालुक्यात गिरणे येथे डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठांतर्गत खारभूमी संशोधन केंद्राची उभारणीश्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे केंद्र शासन पुरस्कृत स्वदेश दर्शन योजनेतून मत्स्यालयपर्यटक निवारा केंद्राची निर्मितीमुरुड तालुक्यातील पद्मदुर्ग किल्याचा समावेश गडकोट किल्लेसंवर्धन योजनेत करण्यासह मुरुड किल्ला परिसर आणि राजापूरी ग्रामपंचायत क्षेत्रातील अडचणी सोडवण्यासंदर्भात आज एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेकृषीमंत्री माणिकराव कोकाटेखासदार सुनील तटकरेनियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरासांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगेनगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्तामदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव डॉ. सोनीया सेठी,  वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरव विजयउपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ. राजेश देशमुखपर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणेसिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघलकोकणचे विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशीरायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे आदींसह शासनाच्या संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र*

 *जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र*

जागतिक बँकेच्या साहाय्याने महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रमांतर्गत ३४ जिल्ह्यांमध्ये (मुंबई शहर आणि मुंबई उपनगर वगळता) आणि ३ महानगरपालिका (सांगली-मिरज-कुपवाडकोल्हापूर आणि इचलकरंजी) जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्रांचे (DEOC) आधुनिकीकरण करण्यात येत आहे.  यामध्ये एकात्मिक आपत्कालीन व्यवस्थापन प्रणाली (IEMS), आपत्ती रेझिलियन्स नेटवर्क आणि ऑडिओ व्हिज्युअल आणि माहिती संप्रेषण आणि तंत्रज्ञान (ICT) घटकांचा समावेश असेल.ज्यामुळे जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र हे राज्य आपत्कालीन कार्यकेंद्राशी अखंडपणे जोडले जातीलअसे यावेळी सांगण्यात आले.

अद्यावत राज्य आपत्कालीन कार्य केंद्राबाबाबत...

 अद्यावत राज्य आपत्कालीन कार्य केंद्राबाबाबत...

आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन मानकांनुसार हे केंद्र नव्याने उभे करण्यात आले आहे. नव्या SEOC मध्ये बेझल-फ्री व्हिडिओ वॉलउच्च क्षमतेचे AV कॉन्फरन्सिंगडेटा सर्व्हरहाय-स्पीड संगणक, SATPHONES, हॅम रेडिओ, VHF/UHF वायरलेस सेट यांचा समावेश आहे. हे सर्व घटक आपत्तीच्या वेळी वेळेवर प्रतिसाद देण्यासाठी आणि सर्व यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

तसेच Geo-DSS या प्रणालीद्वारे AI आणि मशीन लर्निंगवर आधारित 'चेंज डिटेक्शनप्रक्रिया राबवली जात आहे. ही प्रक्रिया उपग्रह इमेजरीवर आधारित असूनआपत्तीच्या ठिकाणी जवळपास प्रत्यक्ष वेळेत परिस्थिती समजून नुकसान मूल्यांकन व मदत कार्याची दिशा ठरवणे अधिक सोपे होणार आहे.

विशेष म्हणजे, ‘आपत्ती सहाय्यक’ नावाचे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आले असूनयामार्फत नागरिक आपत्तीच्या वेळी SOS अलर्टद्वारे माहिती देऊ शकतात. हे अ‍ॅप द्वि-मार्गी संवादाचे एक महत्त्वाचे माध्यम ठरणार आहे.

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या नवीन संकेतस्थळावर आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व माहितीमार्गदर्शक तत्त्वे व उपक्रम सहज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे संकेतस्थळ नागरिकस्थानिक प्रशासन आणि यंत्रणा यांच्यात अधिक सुसूत्रता निर्माण करण्यासाठी  मोलाची भूमिका बजावणार आहे.

Featured post

Lakshvedhi